|
Astitva
| |
| Monday, April 23, 2007 - 5:44 am: |
| 
|
एकदा वडाची सावली वडालाच म्हणाली "किती तु जाडा! तुझ्या वजनामुळे मला लागतय वाकायला"
|
Astitva
| |
| Monday, April 23, 2007 - 5:51 am: |
| 
|
'सरी सरी कोसळल्या दरी परी जाहल्या नदी नदया नदया चा मेळ सागराचा हा ख़ेळ सागराची शाळा... हजेरी लावे महासागरा...' साहिल....
|
Desh_ks
| |
| Monday, April 23, 2007 - 6:29 am: |
| 
|
पुलस्ति, "शब्द उतरायचे कागदांवर अलगद - श्वासांसारखे," हे आवडलं. मीनु, वा! सुंदर व्यक्त झालंय. विशेषत: हे "अखेरचा निरोप घेतला होता, मी माझा .. " छानच. -सतीश पुलस्ति, गणेश, मीनु - 'अनुराग' आवडल्याचं कळवल्याबद्दल Thanks.
|
Mankya
| |
| Monday, April 23, 2007 - 7:57 am: |
| 
|
सतीश ... ' अनुराग ' आवडली .. सुंदर ! पुलस्ति .. शब्द उतरायचे अलगद श्वासांसारखे .. भन्नाट कल्पना .. किंमत खूपच आवडली ! मीनू .. किती खरंय .. खूपच मनाला भिडली .. सुंदर ! माणिक !
|
Bee
| |
| Monday, April 23, 2007 - 10:27 am: |
| 
|
पुर्वज.. ती मानवनिर्मित वाट आता बुजली असेल पण ती पुर्वी नव्हतीच हे केवळ अशक्य आहे.. उत्खनन करता करता फ़क्त मातीचेच ढिगारे सापडत नाहीत तर पुर्वजांचे अवशेषही त्यात दडले असतात... कुणास ठावूक पण मला हवी असलेली ती अज्ञात अशी वाट ह्या इथेच कुठेतरी गाढली गेली असावी ज्यावरून कधी काळी नक्की गेली असतील पुर्वजांची पावन पावले..
|
Zaad
| |
| Monday, April 23, 2007 - 12:31 pm: |
| 
|
गुलमोहर फुलण्याचे हे दिवस. अंगणात पेटलेल्या गुलमोहराची एखादी बहरदार डहाळी कुंपण ओलांडून रस्त्याकडे झुकावी आणि लालजर्द फुलांच्या छायेने पांथस्थांनाही भुरळ घालावी असे काहीसे झाले शनिवारी संध्याकाळी. मायबोलीपासून सुरू झालेला वैभव आणि प्रसादचा हा काव्यप्रवास आता मायबोलीबाहेरील रसिकांपर्यंतही जाऊन पोचला तो शनिवारी झालेल्या 'कुणीतरी आठवण काढतंय' या मैफिलीमुळे. या कार्यक्रमाचा हा पहिलाच प्रयोग महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात संपन्न झाला. "हसता हसता" मैफिलीला सुरुवात झाली आणि डोळे अलगद भरून कधी आले ते समजलंही नाही. विनोद, प्रेम, पाऊस, विरह, त्याचं आणि तिचं नातं अशा अनेक विषयांवरच्या कविता दोघांनी सादर केल्या. डोळ्यांत आठवणींचं पाणी आणि कानांना पुढची कविता ऐकण्याची उत्कंठा अशा अवस्थेत सुमारे सव्वाशे रसिक भरभरून दाद देत होते. वैभव आणि प्रसादच्या आपल्याला माहित असलेल्या पुष्कळ कविता यात असल्या तरी, या कवितांचं सादरीकरण ही या मैफिलीतली सगळ्यात लक्षणीय बाब होती.(आतल्या गोटातली बातमी प्रसादच्या आवाजावर मंडळी अक्षरश्: फिदा झाली होती!!!) आणि कवितांबद्दल काय सांगायचं? आयुष्यात कधीही कवितेच्या वाटेला न गेलेल्या माणसांनाही "गर्द अंधारात" "चांदणे" भेटावे तसे झाले होते...! मैफिल संपूच नये असं श्रोत्यांना वाटणं आणि तेव्हाच ती संपणं यातच तिचं खरं यश लपलं होतं. खूप काही मिळाल्याचं अपूर्व समाधान पदरात घेऊन सभागृहातून बाहेर पडत असताना वैभवच्या ओळी डोक्यात घुमत होत्या... संपली मैफल तरी ना संपलो मी माझिया राखेतही झंकार होता... पण ही मैफिल अजून संपलेली नाहीये, कारण ही तर फक्त सुरुवात आहे..... वैभव आणि प्रसादला पुढील सर्व कार्यक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा!
|
Mankya
| |
| Monday, April 23, 2007 - 5:28 pm: |
| 
|
खरंय झाड ! मी अनुभवलं ते या ठिकाणी लिहून ठेवलंय ! ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्हित्गुज्मेस्सगेस४४१२५०५६्त्म्ल आणि काही लिंक्सही दिल्यात सादर केलेल्या कवितांच्या ! माणिक !
|
Manogat
| |
| Tuesday, April 24, 2007 - 8:33 am: |
| 
|
काय सांगु तुम्हाले इपरित घडल शहराच्या पोरि संग म्हाय बि सुत जुलल मित्राले भेटवाय पोरिले नेल तोंडावरचा तिचा रुमाल पाहुन त्याने वेगलच भाकित केल कोपर्यात बोलवुन म्हने अबे मुसल्मान हाय काय परद्या मधे लपवुन पोरगि दाखवाले आला काय त्याले म्हन्ल बुवा पोरगि हिन्दुच हाय तो तोंडावरचा रुमाल शहरातली फ़ॅशनच हाय तुटक्या फ़ुटक्या इंग्रजित त्यायच introduction केल त्यायन बि मुक्या वानि तिले अभीवादन केल शहरातलि पोरगि म्हन्जे म्हाया साठि प्रश्नच हाय थे बोलल्या वर कलत न्हाहि कारन इंग्रजि तीची म्हने मत्रुभाशाच हाय भांडनात तिन एकदा मले "u phool" म्हनल मराठितल फूल समजुन मि तीले थांकु म्हनल शेवटि मले त्रासुन ती सोडुन गेली म्हाया नाजुक दिलाले ती तोडुन गेली म्हाया नाजुक दिलाले ती तोडुन गेली
|
Astitva
| |
| Tuesday, April 24, 2007 - 10:11 am: |
| 
|
शिल्पा चांगल लिहील आहेस.पण ते एका गावरान मुलाला ऊदयेशून आहे का? असो. लिहीत रहा...........
|
Niru_kul
| |
| Wednesday, April 25, 2007 - 12:22 pm: |
| 
|
शब्द माझे संपले... त्या तिच्या नयनात गहिर्या, भाव माझे गुंतले... ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले... मोकळा मग श्वास झाला, धन्य झाल्या भावना; भास मज झाला असा की, आज जग मी जिंकले... सावरले मन, बावरले मन, धुंद झाले अन् वेडावले; पुन्हा त्या क्षितीजास हळव्या, मी नाजुकतेने स्पर्शिले... तिने माळूनी गजरे कुंतली, मज केले भावगंधीत; जणू सुगंधाचे पावसाळे, अंगणी माझ्या वर्षिले... हास्य तिचे निर्मळ, गेले करुनी घाव ह्रदयी; फिरुनी तिने मागे पुन्हा मग, वेदनेला चुंबीले... ती सखी लाजली अशी की, शब्द माझे संपले... - निरज कुलकर्णी.
|
Mankya
| |
| Thursday, April 26, 2007 - 4:13 am: |
| 
|
निरज .. सहिच रे मित्रा ! भावगंधीत .. वाह ! वेदनेला चुंबीले .. मस्तच ! धन्य झाल्या भावना .. शब्दप्रयोग अतिसुंदर ! अरे ह्याची तर मस्त गज़ल होईल .. प्रयत्न करून बघशील मित्रा ! माणिक !
|
Samurai
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:29 pm: |
| 
|
प्रश्नोत्तरे आक्रोश उन्मनाचे, सांगू कसे कुणाला? अन कोरडे दिलासे, मिळवू पुन्हा कशाला? क्षितिजास मोजले मी, कित्येक चांदण्यांनी, जो चंद्र ना मिळाला, शोधू पुन्हा कशाला? डोळ्यात नीज नाही, ओठात नाही शीळ, मग स्वप्न जीवनाचे, पाहू पुन्हा कशाला? जेव्हा समीप होतो, होता असीम गंध, नुसतेच श्वास आता, घेवू पुन्हा कशाला? वार्यात तीच वाहे, पानात तीच आहे, मी वेगळ्या निसर्गा, फ़ुलवू पुन्हा कशाला? ना शीड ना सुकाणू, ना सागारी किनारा नावेत या मुसाफ़िर, नेवू पुन्हा कशाला?
|
Imtushar
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:52 pm: |
| 
|
सामुराई, सुरेख आहे कविता फार. नुसतेच श्वास आता, घेवू पुन्हा कशाला? छानच. फक्त घेवू आणि नेवू ऐवजी 'घेऊ' आणि 'नेऊ' असे हवे होते. ना सागारी किनारा मध्ये 'सागरी' हा शब्द थोडा भरीचा वाटला, पण त्या कडव्यातील कल्पना जबरदस्त आहे. ओठात नाही शीळ ऐवजी 'ओठात शीळ नाही' असा शब्दांचा क्रम बदलल्यास बरे वाटेल. पण एकंदरीतच सुरेख कविता... मनाला अगदी भिडली. (याची थोड्याफ़ार डागडुजीने गझल होऊ शकते हे जाणकार सांगतीलच.) -तुषार
|
Pulasti
| |
| Thursday, April 26, 2007 - 8:14 pm: |
| 
|
सामुराइ, कविता छानच आहे! १,२ आणि ६ द्विपदी आवडल्या!! तुषार्ने म्हटल्याप्रमाणे अगदी (नाही शीळ चे "शीळ नाही" असे करून आणि श्वास या शेरात शेवटी 'गा' सांभाळून) थोडी डागडुजी करून ही गझल होईल. -- pulasti
|
Mankya
| |
| Friday, April 27, 2007 - 2:07 am: |
| 
|
सामुराइ .. मस्तच आहे कविता ! तुषार, पिलस्ति ला अनुमोदन .. ग़जल चा फॉर्म आहे हा ! माणिक !
|
Daad
| |
| Friday, April 27, 2007 - 3:33 am: |
| 
|
आहा! सामुराई. खरय, गज़ल फ़ॉर्मात आहे ही कविता. हर एक कडवं 'जियो' आहे! आक्रोश.... क्षितिजास.... जेव्हा समीप.... वार्यात.... ना शीड.... (सगळीच कविता) आवडली!
|
समुराई... Fantasic !!! मस्त कविता... हीची गझल व्हायला काहीच वेळ लागणार नाही. एक एक ओळ आवडली. मुळात जवळ जवळ ९९% कवितेचा आकृतीबंध 'गागाल गालगागा गागाल गालगागा' असा आहे! आनंदकंद... मस्त वृत्त आहे हे! 'ओठात नाही शीळ' च्या जागी फक्त 'ओठात शीळ नाही' असे झाले की ही गझलच झाली!!! काफिये जरासे बदलावे लागतील. मस्त कविता... मजा आ गया!! लगे रहो.
|
Bee
| |
| Friday, April 27, 2007 - 3:45 am: |
| 
|
समुराई, आज बर्याच दिसांनी येणे केले. कविता सुंदर आहे. प्रत्येक कडवे आवडले..
|
Amruta_w
| |
| Friday, April 27, 2007 - 7:27 am: |
| 
|
मीनु तुझी कविता वाचून अंगावर शहारा आला. पुढे अजुन मी काय बोलणार
|
Gobu
| |
| Saturday, April 28, 2007 - 9:23 am: |
| 
|
निरज, एकदम छान! सुन्दर!! "तु अप्रतिम इतके लिहीलेस की, शब्दच माझे सम्पले!!!"
|
|
|