Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » झुळूक » Archive through April 27, 2007 « Previous Next »

R_joshi
Wednesday, April 18, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस, गिरिराज,जगु,माणिक फारच छान:-)
मेघा, मेघासम बरसते आहेस:-)


R_joshi
Wednesday, April 18, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर बरसे ती ओली
चिंब मन हे झाले
आठवांचे इंद्रधनु मी
तुझ्या विरहात बांधले

सर बरसे ती ओली
काजळकाठ वाहुन गेला
स्वप्ने जी दिधली डोळा
अंश न त्यांचा काहि ऊरला

सर बरसे ती ओली
चिंब मी त्यात भिजले
बरसणा-या सरीपरी
तशीच मी वाहुन गेले

बरसणा-या सरीपरी
तशीच मी वाहुन गेले....

प्रिति:-)



Gobu
Thursday, April 19, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिती,
सुरेख आहे ह कविता..
पण "सर बरसे ती ओली" म्हणजे काय ग? (हसु नको ह!)
"पावसात ओलिचिम्ब झालेली" अस म्हणायचे की काय तुला?
बाकी कविता मस्तच आहे ह
मानक्या,
वैशाखात तुझे आगमन कधी?
वैशाखात किती सुन्दर जलधार बरसत आहेत इथे!
(भारतात आता पाउस पडतोय की काय?)


R_joshi
Thursday, April 19, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु धन्यवाद :-)
"सर बरसे ती ओली" याचा अर्थ तु अश्रुधारा असाहि घेऊ शकतोस. तसे वरवर पाहता पावसाचा अर्थ याला चांगल्याप्रकारे लागतो. आणि विचारलस यात हसण्यासरख काय आहे.


Gobu
Thursday, April 19, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही चारोळ्या,

मी तुला कधीही
वजन करायला लावत नाही
कारण तुझ्या शरीराचा व्यास
त्या इवल्या मशीनवर मावत नाही!!!

जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार होत्या
तेव्हाच हीच्या घोरण्याच्या
सीमा पार होत होत्या!!!

अशी एक बायको हवी
तोंड हे अंग नसलेली
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवानं आशा नाही सोडलेली!!!

मी आता ठरवलंय
स्टेफी ग्राफ सारखं वागायचं
फेकलेलं भांडं झेलुन
परतीला फेकायचं!!!
(मित्रहो, सदर चारोळ्या माझ्या नसुन विनोद या बिबिवरील रमजाधव यान्च्या आहेत!!!
)


R_joshi
Friday, April 20, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आसमंत माझा असावा
असा ध्यास मी घेतला
आसमंत माझा झाला
परी प्रेमाचा हात न ऊरला

प्रिति:-)


Mankya
Friday, April 20, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकाकी दाटले मळभ
बरसल्या मेघधारा
लाट निघून गेल्यावर
जसा पोरका किनारा !

माणिक !


Mankya
Friday, April 20, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति .. अर्थ न बदलता हे कसं वाटतं बघ हं !

अखेर जाहला माझा
हा आसमंत सारा
ध्यास जाहला पुरा
परि मुकलो निवारा !

माणिक !


Jo_s
Friday, April 20, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणीक किनारा खासच.
सुधीर




Mankya
Friday, April 20, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर .. धन्यवाद रे मित्रा !

अता कुठे रविकिरणांनी
फुलवला रम्य पिसारा
लाजर्‍या डोळ्यांनी सांगे कळी
झोंबतो कसा हा पहाटवारा !

माणिक !


R_joshi
Saturday, April 21, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक झुळका छानच:-)
माझी झुळुकही छान बदललिस:-)

शीतल रविकिरण
झोंबरा पहाटवारा
खंत आता कशाची
आपलाच आसमंत सारा

प्रिति:-)


Gobu
Saturday, April 21, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान्क्या,
"रविकिरण" हा शब्द अतिशय सुन्दर वापरला आहे, आणि "लाजर्‍या डोळ्यानी" मुळे काव्य अतिशय रोमेन्टीक झाले आहे
सुन्दर!


Gobu
Tuesday, April 24, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,
कुठे आहात सारे?
लपुन बसलात की काय?


Mankya
Wednesday, April 25, 2007 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू, प्रिति .. धन्यवाद रे मित्रांनो !

भोवताली धुके धुके
बेसावध क्षणी तू गाठले
अन दवबिंदू अव्यक्ताचे
रोमरोमात ते साठले !

माणिक !


R_joshi
Wednesday, April 25, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दवबिंदु तव नयनातील
नयनात माझ्या साठले
भाव सारे मनातील
आज त्यात वाहिले

प्रिति:-)


Manogat
Wednesday, April 25, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यथा सागराचा
न मिळाला किनारा
माझिया अस्तित्वाचा
वेडा म्हणुनी प्रतिशोध झाला


Mankya
Thursday, April 26, 2007 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अबोल्यातही तुझ्या
लाखो शब्दांची किमया
एक स्पर्श .. वेस
अव्यक्ताची लांघतो लीलया !

माणिक !


Gobu
Thursday, April 26, 2007 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनक्या,
वरील काव्य सुन्दर आहे
पहील्या २ ओळी अतिशय सुन्दर आहेत, पण अन्तीम २ ओळीचा अर्थ नाही कळला रे
(हसु नका ह कोणी , मी आपल मनापासुन जे वाटलय ते लिहीलय)


R_joshi
Friday, April 27, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्द... मनाची गोडी
शब्द... जादुची काडी
शब्द... आपल्यातील दुवा
शब्दच... तुझी माझी जोडी

प्रिति:-)


Krishnag
Friday, April 27, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उष्ण निश्वास वसुधेचे
का मेघांना कळत नाहीत?
तिच्यासाठी धाव घेऊन
का तिला सुखावत नाहीत?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators