मित्रांनो ... नजिकच्या काळात लगेचच ज्याच्या सुंदर गझल वाचायला मिळतील असा विश्वास वाटतो अश्या नचिकेतचा पहिला प्रयत्नदेखील पहिला वाटणार नाही इतका सुरेख होता . नचिकेत आठवले ऋतू येत होते , ऋतू जात होते तरी ताटवे मग्न झुरण्यात होते म्हणाया तुझे आटणेही अकाली तुझे दाटणेही अकस्मात होते समजण्या मला लागला वेळ थोडा तुझे प्रेम लपले नकारात होते मला सांग होता कसा दोष माझा ? जरी ओठ माझे , तुझे दात होते तरसलो जरी मी , बरसलेच नाही खुजे मेघ त्या आसमंतात होते तिथे पाहिली दानवांचीच सत्ता तिथे देव नुसते पुराणात होते इथे कोणती लाट घेऊन आली ? मला हे किनारे कुठे ज्ञात होते ?
|
Mankya
| |
| Friday, March 16, 2007 - 6:08 am: |
| 
|
जियो नचिकेता ... जियो .. दमदार आहे गजल ! विविधतेनी नटलेली तरीही सुटसुटित रचना .. अभिनंदन नचिकेता अशी रचना पहिल्या प्रयत्नात उतरण कठिण ! दाटणेही अकस्मात .. तरसलो जरी .... मनाला भिडले ! प्रेम नकारात .. ओठ माझे .. सहजता छान ! देव नुसते ... वास्तवालाही स्पर्श केलायेस ! मक्ता .. ज्या वृत्तीला शेवट नाही असा शेवट .. पटलं ! माणिक !
|
Psg
| |
| Friday, March 16, 2007 - 6:25 am: |
| 
|
मला सांग होता कसा दोष माझा ? जरी ओठ माझे , तुझे दात होते वा! मस्त कल्पना.. आणि मक्ता खूपच आवडला.. लिहत रहा.. शुभेच्छा..
|
Meenu
| |
| Friday, March 16, 2007 - 6:29 am: |
| 
|
इथे कोणती लाट घेऊन आली ? मला हे किनारे कुठे ज्ञात होते ? >> मस्त ..!!
|
कार्यशाळेतली मला सगळ्यात भावलेली गज़ल. अप्रतिम लिहीलेय नचिकेत. सगळेच शेर सुरेख. लिहीत रहा.
|
Desh_ks
| |
| Friday, March 16, 2007 - 7:38 am: |
| 
|
Vaibhav Joshee yaanchyaa mataashee poorna sahamatee. Abhinandan Nachiket, Sundar gazal lihilee aahe. Akherachaa sher manaapaasoon aavadalaa.
|
Vshaal78
| |
| Friday, March 16, 2007 - 7:58 am: |
| 
|
नचिकेत तुझ्या पायशी लोळण घ्ययला हवी ... महान आहेस तू. येथे बरीच वर्षे गजल लिहिणार्यांना जे साध्य झाले नाही, ते तुला पहिल्याच प्रय्त्नात सहजसाध्य झालय. खुप खुप खुपच छान. जर गजल कार्यशाळेच्या सर्वोत्तम गजल साठी मतदान असेल, तर या गजलला मझी एक कोटी मते.
|
Jo_s
| |
| Friday, March 16, 2007 - 9:06 am: |
| 
|
नचीकेत सुंदरच गझल. सगळेच शेर मस्त.
|
जबरदस्त गझल... मतलाच भारी आहे... असा विचारच केला केला नव्हता... प्रत्येक शेर सुंदर आहे... प्रत्येकाला स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे... जियो.... लिहीत रहा... अशी घडीव रत्ने उधळत रहा...
|
Bairagee
| |
| Friday, March 16, 2007 - 11:07 am: |
| 
|
नचिकेत, मक्ता फारच चांगला आहे. पण खाली अज्ञात किनारे हवे होते असे वाटले. खुजे मेघ, अकस्मातही छान. तुम्हाला गझलेची तबीयत लाभलेली दिसते. 'दात' हे यमक बांधण्याचे धाडस आणि प्रयत्न फार आवडला. त्यातच खरी फनकारी आहे. नाहीतर बहुंताश गझलकार केवळ लुसलुशीत काफियांच्या प्रेमात पडलेले दिसतात. दानवांची सत्ता आणि लपलेला नकार छान. पण वेगळे लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे किमान लहजा, टोन वेगळा असावा. असो. शुभेच्छा. बैरागी
|
Chinnu
| |
| Friday, March 16, 2007 - 12:05 pm: |
| 
|
खुजे मेघ, आटणे-दाटणे आणि पुराणातले देव सहीच, नचिकेत!
|
Ashwini
| |
| Friday, March 16, 2007 - 2:27 pm: |
| 
|
सुरेख कल्पना, आणि शब्दांची मांडणी. मक्ता सही!
|
amazing पहिल्याच प्रयत्नात इतकं जबरी लिहिलं आहे! 'ओठ आणि दात' पाहुन अक्षरश्: वेडापिसा झालो! गझलेच्या राज्यातला तू अनभिषीक्त सम्राटा होणार हे नक्की!
|
Pulasti
| |
| Saturday, March 17, 2007 - 2:15 am: |
| 
|
नचिकेत - छानच गझल! देव-दानव सोडून सर्व शेर मस्तच आलेत. तुमचा मतला मला या कार्यशाळेतला सर्वात उत्तम मतला वाटला!! मक्ता अप्रतिम आहे. अनेक पातळ्यांवर याचे अनेक अर्थ लावता येतील!! अभिनंदन आणि शुभेच्छा. पुलस्ति.
|
Jayavi
| |
| Saturday, March 17, 2007 - 9:14 am: |
| 
|
नचिकेत, अभिनंदन........ एकदम झकास झालीये गझल मला सांग होता कसा दोष माझा ? जरी ओठ माझे , तुझे दात होते वा...वा..... क्या बात है! तरसलो जरी मी , बरसलेच नाही खुजे मेघ त्या आसमंतात होते सही....! मक्ता पण लाजवाब गुरु.......! और आने दो....!
|
Nachikets
| |
| Wednesday, March 21, 2007 - 10:30 am: |
| 
|
मंडळी, धन्यवाद!!! गझल लिहीण्याचा पहिलाच (आणि एकूणच कुठल्याही प्रकारचे "काव्य" लिहीण्याचा तीसरा-चौथा ) प्रयत्न पसंतीत उतरला हे पाहून अजून लिहिण्याचा हुरूप आला आहे. चार पाच वर्षांपुर्वी ज्याच्यामुळे "मराठी गझल" हा काय प्रकार आहे ते समजले आणि गझलेची आवड निर्माण झाली त्या प्रसाद शिरगावकरचे मला आभार मानलेच पाहिजेत!!! आणि ही कार्यशाळा सुरू करून गझल लिहीण्यास प्रवृत्त केल्याबद्दल वैभवला धन्यवाद!!!
|
Vshaal78
| |
| Wednesday, March 21, 2007 - 10:37 am: |
| 
|
नचिकेत, खरच किती नम्र अहेस तु. विद्या विनयेन शोभते हे मोठ्य लोकांचे लक्षण असते म्हनतात हे खरे अहे
|
Gajanan1
| |
| Sunday, March 25, 2007 - 10:34 am: |
| 
|
नचिकेत गजल छान आहे.
|
Mansmi18
| |
| Wednesday, April 18, 2007 - 6:41 pm: |
| 
|
मला सांग होता कसा दोष माझा ? जरी ओठ माझे , तुझे दात होते ----------------------------------------------- क्षमा करा. मला वरील ओळीन्चा अर्थ नीट कळला नाही. स्पष्ट कराल का? धन्यवाद.
|
R_joshi
| |
| Thursday, April 19, 2007 - 8:59 am: |
| 
|
नचिकेत गजल छानच लिहिली आहेस. अशाच सुंदर सुंदर गजला येऊ देत
|