|
Nilima_v
| |
| Friday, April 20, 2007 - 3:35 pm: |
| 
|
नचिकेत, एकच गोष्ट कळली नाही. तिसर्या कडव्यात तु म्हणतोस तुझे प्रेम लपले नकारात होते . तर चवथ्या कडव्यात तु म्हणतोस जरी ओठ माझे , तुझे दात होते. यामुळे प्रेम व्यक्त करण्याची तूझी हिम्मत झाली नाही की नायिकेची हे कळले नाही. बाकी गझल सून्दर आहे.
|
बस्स करा ही फुकाची तारीफ़ मिस्टर नचिकेत आपली गझल ही अजून पाळण्यात आहे तिला रांगायला आणि वाढायला बराच वेळ लागेल तुमच्या या बाळबोध गझलेला जे महान रचना वैगरे समजत आहेत ना त्यांनी मायबोलीवर गझल काय असते ते पाहण्यासाठी ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्हित्गुज्मेस्सगेस०३३८५१२१७३१्त्म्ल?११७३७८०८०३ आणि शेर काय असतात ह्यासाठी ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्हित्गुज्मेस्सगेस०३३८५१०७१३५्त्म्ल?११७३९५९८०४ इथे अवश्य भेट द्या आणि आता तरी ही तारीफ़ करणे थांबवा आणि तुम्हाला जर अशा गझलेपासून भविष्यात तुम्हाला तो अनभिषिक्त सम्राट होईल असं वाटतंय तर तुमच्या दर्जाहीन रसिकतेचं हसायला येतंय. नचिकेत राग मानू नकोस पण तुझि गझल खरच निष्प्रभ आणि दर्जाहीन आहे आणि नव्या गझलकारांमध्ये दीपक अंगेवार,वैभव देश्मुख,विजय आव्हाड यांसारखी काही मंडळी खरंच चांगलं लिहीत आहेत त्यांच्या गझला वाचा आणि मग प्रतिक्रिया द्या. मनस्मी ने विचारलेल्या प्रश्नाचं जर तुमच्यापैकी कुणी समर्पक उत्तर तरी द्या. बघू दे तुम्हाला सगळ्यांना ही गझल किती भिडली आहे? आणि नचिकेत असल्या मूर्ख प्रतिक्रियांनी हुरळून जाऊ नका आधी स्वत: गझलेचा नीट अभ्यास करा भटांचं एल्गार,झंझावात,रंग माझा वेगळा किंवा सानेकरांचं एका उन्हाची कैफियत,नवोदित कवी दीपक अंगेवार यांचं काळजाची वात हे संग्रह वाच मग तुला जास्त कळेल की तू कुठे कमी पडतो आहेस.
|
युवराजशेखर, नचिकेत यांची गझल याच घडीला आहे त्या स्थितीत सानेकर, भट यांच्याशी गझलांशी तोलण्यात काही अर्थ नाही. ती त्यांची स्वत्:ची अभिव्यक्ती आहे; आणि ते स्वत: अज़ूनही शिकतच आहेत. त्यामुळे सानेकर प्रभृतींची उदाहरणे येथे देण्यात हशील नाही. आठवलेंना ज़े शिकायचे आहे, ज़से शिकायचे आहे, तसे त्यांना स्वत:हून (ऑन हिज़ ओन) शिकूदेत. या कार्यशाळेत बैरागी, प्रसाद शिरगावकर, वैभव ज़ोशी यांसारख्यांचे मार्गदर्शन सहभागी गझल लेखकांना मिळाले आहे. सुरेशचंद्र वैराळकरांसारख्यांकडून या गझलांचे परीक्षण झाले आहे. त्यामुळे येथे मिळालेल्या मार्गदर्शनाविषयी शंका घेण्याचे कारण नाही. बाकी तुमचे मोलाचे सल्ले, इतरांच्या प्रतिक्रिया यातले काय किती घ्यायचे आणि काय किती सोडायचे हे ठरवण्याइतपत नचिकेत स्वत: समंजस असतील, असा विश्वास वाटतो. दुसरी गोष्ट अशी की 'दर्जाहीन रसिकता' म्हणून तुम्ही इथल्या वाचकवर्गाचा निष्कारण उपमर्द करत आहात, याचे भान ठेवावे. तुम्हाला या गझलेला निष्प्रभ आणि दर्जाहीन म्हणायचे असलेच, तर या गझलेतील त्रुटी उदाहरणार्थ स्पष्ट कराव्यात. रसिकता ही सापेक्ष संज्ञा आहे. उद्या मी म्हटले कसले बायल्यासारखे मसाला पान खाता; त्यापेक्षा सणसणीत एकसोबीस मारा एखादे, तर त्यामुळे मसालापानाचा गोडवा, चव, लोकप्रियता कमी होणार नाही. तसेच बिनबुडाचे बेछूट आरोप करण्यात काही अर्थ नाही; त्यासोबत सबळ स्पष्टीकरण ज़ोडावे. स्वत:हून (स्वत:च्याच!) सुधारणा सुचवाव्यात.
|
Mansmi18
| |
| Monday, April 23, 2007 - 2:46 am: |
| 
|
अहो मला खरच त्या ओळीन्चा अर्थ कळला नाही. कोणी सान्गेल का? (वर कोणीतरी प्रतिक्रिया दिली आहे कि ओठ्-दात पाहुन वेडापीसा झालो असे काहितरी. आणि मला त्याचा अर्थच कळला नाही त्यामुळे न्युनगन्ड आल्यासारखे झाले आहे.)
|
युवराजशेखर, तुम्हाला काही गोष्टींचा विसर पडलेला दिसतोय.. एकतर ही गझल कार्यशाळा आहे.. आणि तीसुध्दा अश्या लोकांसाठी ज्यांना गझल या प्रकाराची फ़ारशी तांत्रिक माहिती नाही.. इथे आलेले सर्वजण हे शिकण्याच्याच उद्देशाने आलेले आहेत आणि प्रत्येकाने केलेली गझल ही सुद्धा त्यांच्या अध्ययनाचाच एक भाग आहे.. त्यामुळे या पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांनी आकाशाची पातळी गाठली पाहिजे अशी अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता? नचिकेतचे केलेले कौतुक हा फ़ुकाचा उधो उधो नसुन त्याने केलेल्या चांगल्या प्रयत्नाला दिलेली ती एक दाद आहे.. दुसरी गोष्ट कोणाला काय आवडले पाहिजे आणि कोणी कश्याचे कौतुक केले पाहिजे हे ज्याचे त्याला ठरवु द्या ना.. तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर जरूर करा.. पण योग्य पध्दतीने.
|
युवराज १) सानेकर अप्रतिम लिहीतात . २) नचिकेत ला गज़लसम्राट म्हणून ताम्रपत्र व थैली दिलेली नाही . ३) कुणाचा दर्जा किती आहे ज्याला त्याला ठरवू द्या . तुम्ही रसिकांना दर्जाहीन म्हणून स्वतःचा दर्जा चौकात मांडायची गरज नाही . ४)मनस्मी ने विचारलेल्या प्रश्नाला सहज उत्तर देण्यासारखं आहे . तुम्हीही देऊ शकला असतात . पण तुम्हाला तो शेर तितकाचा कळला नसावा किंवा कळून घ्यायचा नसावा . आणि आता इथे त्याचं कुणीही उत्तर देऊ नये असं मी आवाहन करतोय . तुम्ही जाब मागितल्यासारखे शेराचे स्पष्टीकरण मागणारे कोण ? नाही सांगायचं . पुढं काय म्हणणं आहे ? ५)एल्गार वगैरे खूप वरच्या दर्जाचं आहे हे सांगायला इतर दर्जाची माणसं नचिकेतला लागतील असं मला वाटत नाही . ही एक कार्यशाळा होती , ह्यातलं एक पोरगं स्वबळावर सर्वोत्कृष्ठ ठरलंय , आम्ही त्याचं कौतुक करणार . त्रास होत असेल तर जसं इतके दिवस इथे चाललेल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसल्या नाहीत ना तसंच आताही दुर्लक्ष करा नचि :- ज्यांना शेर समजलेला नाही त्यांना व्यक्तीगत निरोप ने उत्तर पाठव नाहीतर असं कर फोन नं च मागवून घे . नवीन मित्र दिसतांयत बरेच , ओळख झालेली बरी
|
मित्रहो, युवराज ला मी दोन दिवसांपुर्वीच व्यक्तीगत निरोप पाठवून माझ्या बाजूने हा संवाद संपवलेला आहे. वेळ होईल तसा मनस्मी ह्यांना ही व्यक्तीगत निरोप पाठवण्याचा इरादा आहेच. कार्यशाळेत सहभागी झालेले जाणकार, नवोदीत गज़लकार आणि रसिक वाचक स्वतःशी पुर्णपणे प्रामाणिक होते आणि आहेत या बद्दल माझ्या मनात तरी तसुभर ही शंका नाही. ह्या उप्पर दुसरी कुठली गोष्ट मला महत्वाची वाटत नाही. त्यामुळे आपण ही चर्चा इथेच थांबवणे इष्ट. धन्यवाद!!!
|
Mansmi18
| |
| Monday, April 23, 2007 - 2:06 pm: |
| 
|
एक खुलासा: मला अर्थ खरोखरच कळला नव्हता. मी कुत्सिततेने किन्वा उपहासाने विचारले नव्हते. नचिकेत यानी अतिशय अर्थपुर्ण स्पष्टीकरण पाठवले आणी अर्थ स्पष्ट झाला. माझ्या पोस्ट मुळे कुणाचा काही गैरसमज झाला असेल तर क्षमस्व. धन्यवाद.
|
Punam
| |
| Thursday, April 26, 2007 - 3:04 pm: |
| 
|
उशिरा प्रतिसाद देण्याबद्दल क्शमस्व... मी नवीन आहे...... पण...... ही गज़ल वाचली आणि वेडावून गेले............ कस सुचत........... तिथे पाहिली दानवांचीच सत्ता तिथे देव नुसते पुराणात होते हे फार भारी लिहलय......... आणि तरसलो जरी मी , बरसलेच नाही खुजे मेघ त्या आसमंतात होते हे लागतय मनाला नचिकेत तु खुप छान लिहतोस......... अस पुन्हा पुन्हा ऐकवत रहावस ही विनन्ति.......... मल फ़ारस काही कळत नाहि पण कळल ते लागल.........लागल म्हणून लिहिल...........काही चुकिचे लिहिले असल्यास क्शमस्व............ पण खरच........ नचिकेत तु महान आहेस............
|
|
|