Zaad
| |
| Wednesday, April 18, 2007 - 10:44 am: |
| 
|
दि. २१ एप्रिल ०७ संध्याकाळी ६.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वैभव जोशी आणि प्रसाद शिरगावकर सादर करीत असलेल्या "कुणीतरी आठवण काढतंय" या काव्यमैफिलीमध्ये तुमच्या आमच्या नक्की कसल्या आठवणी आहेत याची एक झलक म्हणजे वैभव ची ही गज़ल वाटचाल आठवतंय कुठून निघालो होतो.. पण समजत नाही कुठे आलो आहोत प्रारंभ दिसतोय .. पण शेवट नाही अश्या कुठल्या प्रवासाला निघालो आहोत गर्द अंधारात आता चालणे माझे तुझे राहिले केव्हाच मागे चांदणे माझे तुझे आठवतंय? मावळतीसारखं रेंगाळायचो नको वाटायचं .. एक दिवस वजा करायला मग रात्र यायची स्वप्नात आपल्या उद्याचं स्वप्न जमा करायला पावले वेगात गेली गाठण्या दाही दिशा ते कुठे रेंगाळले , रेंगाळणे माझे तुझे आठवतंय? एक वेस होती न आखताही .. आखलेली मनापासून मनापर्यंत एक साधी सोप्पी रांगोळी रेखलेली आपल्या वेशीविना होत्या तिथे वेशी कुठे एकमेकांना उगा ओलांडणे माझे तुझे आठवतांयत ती शब्दफुलं? बोलक्या निरागस रंगांची? मग ही बाग अशी का झाली? अबोल , काटेरी निवडुंगांची? लागली बोलावयाला शांतता दोघांतली आसवांना ऐकवेना बोलणे माझे तुझे आठवतीय ती आपली वाट? ती .. आपण तयार केलेली वाट... त्याचे दोन वाटे कधी झाले? कधी आडवं आलं ललाट? चालल्या एकत्र ह्या आपापल्या वाटा जरी हात हाती ठेवुनी हे पांगणे माझे तुझे
|
जियो!!! झलकच अशी तर मैफलीत आठवणींचा नजारा काय असेल!!!
|
Daad
| |
| Wednesday, April 18, 2007 - 10:42 pm: |
| 
|
छ्छे! असं काहीतरी सांगून दु:खावर डागण्या का काय म्हणतात त्या देतोयस तू, झाडा ;) काश.... प्रसाद आणि वैभवला ह्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!
|
गुपित आरसे का हसू लागले? चेहरेही फसू लागले . माणसांचे दगड जाहले गाव कुठले वसू लागले? उसळले श्वास गात्रातुनी ओठ हळवे डसू लागले! गुपित चंद्रास कळले प्रिये, चांदणे रसरसू लागले. मेघ गद्दार झाले पुन्हा दु:ख धरणी कसू लागले. पिंजर्याने दिशा बांधल्या आत पक्षी बसू लागले. (मयूर)
|
वा.. मयूर... आवडली.. एकूण एक शेर घडीव आहे.. तोलामोलाचा आहे.. अप्रतिम!
|
Zaad
| |
| Thursday, April 19, 2007 - 6:22 am: |
| 
|
शलाका, तुझी दाद नक्कीच miss करू!
|
Mankya
| |
| Thursday, April 19, 2007 - 8:31 am: |
| 
|
मयुरा .. सहिच जमली रे मित्रा ! अतिसुंदर .. प्रत्येक शेर ! माणिक !
|
Anilbhai
| |
| Thursday, April 19, 2007 - 12:06 pm: |
| 
|
Astitva, तुझी कविता 'गझल' ह्या सदरात येत नसल्यामुळे खालील ठिकाणी हलवली आहे. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=940415#POST940415
|
सखी मनास वाटे असेच व्हावे कुणा सखीच्या मनी भरावे झळा उन्हाच्या, जिवास तलखी बनून छाया तिला जपावे जरी दिसाया नसलो सुंदर सुंदर आहे, तिला पटावे चिडून, "गेला उडत" म्हणावे मलाच घेउन तिने उडावे दवात न्हाता पहाट, स्वप्नी- तिने मला, मी तिला पहावे कधी उरे जर रिते रितेपण तिचे तिचेपण भरून घ्यावे..* कळेल भाषा दिठी-मिठीची असे रुजावे, असे फुलावे - नचिकेत जोशी (* सानी मिसऱ्यासाठी विनायकला (झाड) धन्यवाद..)
|
Anilbhai
| |
| Thursday, April 19, 2007 - 4:51 pm: |
| 
|
लगालगागा लगालगागा कधी वाटता रिते रितेपण ( मिटर ठिक वाटत नाही इथे. ) तिचे तिचेपण भरुन घ्यावे बाकी सही. जरा मिटर सांगा.
|
होय अनिलभाई.. तुमचं बरोबर आहे.. मलाही आश्चर्य वाटतंय, हे माझ्या कसं लक्षात आलं नाही! धन्यवाद! शेर सुधारतो.. कधी उरे जर रिते रितेपण तिचे तिचेपण भरून घ्यावे.. पण हा आता मूळ गझलेच्या पोस्ट मध्ये कसा टाकायचा?
|
hmmmm ... पण "वाटता" मधे जी बात होती ती "उरे जर" मधे नाही
|
नचिकेत्स अगदी अगदी. सुंदर गज़ल. मेघा
|
Imtushar
| |
| Friday, April 20, 2007 - 8:16 am: |
| 
|
आनंदयात्री, फ़ार सुरेख गझल आहे... दवात न्हाता ... अप्रतिम 'उरे जर' बाबत नचिकेत्स शी अगदी सहमत. जरी दिसाया आणि चिडून मला व्यक्तिश: आवडले नाही, आणि ते तिथे नसते तर गझल अजून छान वाटली असती हे प्रामाणिक मत (अर्थात हे माझ्या व्यक्तिगत आवडीमुळे असेल... माझ्या मतावरून इथे (V&C) होऊ नये ) - तुषार
|
Mankya
| |
| Friday, April 20, 2007 - 8:25 am: |
| 
|
नचिकेता .. सुंदर रे मित्रा ! नविन मांडलेला ' कधी उरे '.. अप्रतिम रे ! किती सहज अन किती सुंदर ! मक्ता .. खूपच आवडला रे दोस्त ! तुषारला अनुमोदन ! माणिक !
|
नको द्यायला दोष देवास त्या रे? जरी तोडतो तोच विश्वास सारे कशी ना कळावी तिला मूक भाषा कसे बंध माझ्याच ओठास सारे इथे व्यायले कोण काव्यास सांगा जमा मैफ़िलीला मुके भास का रे कशाला हवेते सुरेचे बहाणे इथे भ्यायले लोक पाण्यास सारे व्यथा चार चौघात का बोललो मी बघा सज्ज झालेच हसण्यास सारे कशी वाचली फक्त लाक्षाघरे ही जळाले जिथे खाक आवास सारे -देवदत्त
|
देवदत्ता रदीफ काय आहे गझलेतला?? आणि रदीफ नसेल तर मग काफिया कोणता आहे? I am confused...confused.. 'सारे' हा रदीफ ठेवून गझल निर्दोष करता येईल..
|
Mankya
| |
| Friday, April 20, 2007 - 9:36 am: |
| 
|
देवा .. मतला अस्पष्ट वाटतोय रे मला ! व्यथा .. अप्रतिम रे ! मक्ता .. मस्त, पण पुर्ण अर्थ नाही पोहोचला ! मी कुठेतरी कमी पडतोय ही ग़जल समजण्यासाठी ! Please... रसग्रहण देशील ईथे या ग़जलेच ! माणिक !
|
रदीफ नाहिये या गझलेत. काफ़िया "रे" आहे. बरोबर ना देवा? नको द्यायला दोष देवास त्या रे? जरी तोडतो तोच विश्वास सारे मतला सरळ आहे. फक्त प्रश्नार्थक उत्तर उला मिसऱ्यात आहे त्याचे कारण सानी मिसऱ्यात आहे. इथे "देवा" तून देवदत्त म्हणायचं नाहिये ना? कशी ना कळावी तिला मूक भाषा कसे बंध माझ्याच ओठास सारे माझे ओठ बांधले गेलेत, आणि तिलाही या मौनाचा अर्थ का कळत नाहिये?.. किंवा, तिला मौनाची भाषा कळत नाहिये खरी, पण मी सांगू ही शकत नाहिये, हे दुर्दैव! किंवा "हम लबो से कह ना पाये..." असं काही म्हणायचंय का रे? इथे व्यायले कोण काव्यास सांगा जमा मैफ़िलीला मुके भास का रे या मैफलीत असे भास होताहेत कि कुणाला तरी कविता(किंवा काव्य) "झाली आहे".. कशाला हवेते सुरेचे बहाणे इथे भ्यायले लोक पाण्यास सारे अर्थ सहज आहे.. व्यथा चार चौघात का बोललो मी बघा सज्ज झालेच हसण्यास सारे मला खूप आवडला हा शेर.. अर्थवाही शेर आहे.. कशी वाचली फक्त लाक्षाघरे ही जळाले जिथे खाक आवास सारे सगळी घरं जिथे खाक होईपर्यंत जळाली, तिथे सर्वांत आधी पेटायला हवी अशी लाक्षाघरं कशी टिकली?("नक्कीच कोणीतरी विदूर हजर असला पाहिजे" असं म्हणायचंय का?) मी माझ्य़ा अल्पबुद्धीनुसार हा रसग्रहणाचा प्रयत्न केला आहे.. बाकी देवदत्ता, तुम्हीच सांगा.. चुभूद्याघ्या.
|
नुसता 'रे' हा काफिया ठेवण्यापेक्षा कसे द्यायचे दोष देवास सारे? जरी तोडतो तोच विश्वास सारे इथे व्यायले कोण काव्यास सांगा जमा मैफ़िलीला मुके भास सारे. असा बदल चालणार नाही का? बाय द वे.. गझल आवडली
|