Mankya
| |
| Friday, April 20, 2007 - 11:10 am: |
| 
|
आनंदयात्री .. खूप खूप आभार रसग्रहणाबद्दल ! अताशा थोडं थोडं कळतय ! ग़जलच नाही तर देवाच्या काही कविताही कधी कधी झेपत नाहीत मला ! ग़जल सुंदरच .. वादच नाही ! माणिक !
|
नचिकेत बरोबर आहे काफ़ियाबद्दल.. सारे चालले असते.. खरंतर मी आधी तसेच लिहिले होते.. पण मला पाहिजे तो अर्थ शेरांतून येत नव्हता.. ही पुर्ण गज़ल नाहिये.. इथे व्यायले कोण काव्यास सांगा जमा मैफ़िलीला मुके भास का रे या शेरात 'भास' वर श्लेश घेउन पहा माणिक.. प्रयत्न करतो गज़ल अजून सोपी करायचा
|
Vaatsaru
| |
| Friday, April 20, 2007 - 1:42 pm: |
| 
|
वैभव, प्रसाद कार्यक्रमासाठी दोघांना शुभेच्छा एक विनंती ह्या कार्यक्रमाचे Video / Audio करुन YouTube वर टाकता आले तर आमच्यासारख्या देशाबाहेरील लोकांना पण त्याचा आनंद घेता येइल. बघा शक्य आहे का
|
Peshawa
| |
| Friday, April 20, 2007 - 4:55 pm: |
| 
|
वाट्सरुला अनुमोदन.... तुम्हाला कार्यक्रमासाठी शुभेच्चा...
|
कार्यक्रमाची ई सकाळमधे आलेली छोटीशी झलक इथे बघायला मिळेल.
|
Zaad
| |
| Monday, April 23, 2007 - 12:28 pm: |
| 
|
गुलमोहर फुलण्याचे हे दिवस. अंगणात पेटलेल्या गुलमोहराची एखादी बहरदार डहाळी कुंपण ओलांडून रस्त्याकडे झुकावी आणि लालजर्द फुलांच्या छायेने पांथस्थांनाही भुरळ घालावी असे काहीसे झाले शनिवारी संध्याकाळी. मायबोलीपासून सुरू झालेला वैभव आणि प्रसादचा हा काव्यप्रवास आता मायबोलीबाहेरील रसिकांपर्यंतही जाऊन पोचला तो शनिवारी झालेल्या 'कुणीतरी आठवण काढतंय' या मैफिलीमुळे. या कार्यक्रमाचा हा पहिलाच प्रयोग महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात संपन्न झाला. "हसता हसता" मैफिलीला सुरुवात झाली आणि डोळे अलगद भरून कधी आले ते समजलंही नाही. विनोद, प्रेम, पाऊस, विरह, त्याचं आणि तिचं नातं अशा अनेक विषयांवरच्या कविता दोघांनी सादर केल्या. डोळ्यांत आठवणींचं पाणी आणि कानांना पुढची कविता ऐकण्याची उत्कंठा अशा अवस्थेत सुमारे सव्वाशे रसिक भरभरून दाद देत होते. वैभव आणि प्रसादच्या आपल्याला माहित असलेल्या पुष्कळ कविता यात असल्या तरी, या कवितांचं सादरीकरण ही या मैफिलीतली सगळ्यात लक्षणीय बाब होती.(आतल्या गोटातली बातमी प्रसादच्या आवाजावर मंडळी अक्षरश: फिदा झाली होती!!!) आणि कवितांबद्दल काय सांगायचं? आयुष्यात कधीही कवितेच्या वाटेला न गेलेल्या माणसांनाही "गर्द अंधारात" "चांदणे" भेटावे तसे झाले होते...! मैफिल संपूच नये असं श्रोत्यांना वाटणं आणि तेव्हाच ती संपणं यातच तिचं खरं यश लपलं होतं. खूप काही मिळाल्याचं अपूर्व समाधान पदरात घेऊन सभागृहातून बाहेर पडत असताना वैभवच्या ओळी डोक्यात घुमत होत्या... संपली मैफल तरी ना संपलो मी माझिया राखेतही झंकार होता... पण ही मैफिल अजून संपलेली नाहीये, कारण ही तर फक्त सुरुवात आहे..... वैभव आणि प्रसादला पुढील सर्व कार्यक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा!
|
Sumedhap
| |
| Monday, April 30, 2007 - 5:47 pm: |
| 
|
प्रिय मायबोलीकरांनो, मी गझल लिहीण्याचा पहिला प्रयत्न केला आहे. मायबोली गझल कार्यशाळा सुरु होऊन खुप दिवस झाले. खरंतर उशीरच झालाय मला गझल लिहायला. पण वाटलं एक प्रयत्न करावा. आज म्हणे माझ्या मनाला तुझे मन भेटले होते न जाणो अंगावर त्याने काय भाव लपेटले होते क्षितीजावर पाहिले एक नाते ढळताना आक्रोशाने गुलमोहर ही पेटले होते गमावले आपण जे ती वाहीलेली गंगा राहीलेले तिर्थ मी समेटले होते दिसेल स्पष्ट कसे पांढरे आणी पिवळे काळाने त्यास अरे फेटले होते उलगडण्या मला जन्म पुरलाच नाही असे काही चित्र तू खरेटले होते
|
Ksha
| |
| Monday, April 30, 2007 - 8:36 pm: |
| 
|
सुमेधा, तुला शेवटची ओळ "असे काही चित्र तू रेखाटले होते" अशी लिहायची होती का? भावार्थ छान आहे, पण याला गज़ल म्हणण्यासाठी बरेच बदल करावे लागतील. अजून सांगेनच..
|
Sumedhap
| |
| Wednesday, May 02, 2007 - 2:02 pm: |
| 
|
धन्यवाद क्ष खरंतर मी आधी 'रेखाटले" हाच शब्द लिहीला होता..पण तो इथे बरोबर बसेल की नाही या बद्दल मला जरा शंका होती... आणी 'खरेटले' हा शब्द मराठीत आहे की नाही मला जरा सांगशील का? आजुन काय बदल करावे लागतील मला ह्याला गझल म्हणायला... तांत्रीक दॄष्ट्या सांगीतलंस तर बरं पडेल...मला पुढे ही उपयोगी पडेल.. आणी पुन्हा एकदा धन्यवाद!
|
Anilbhai
| |
| Wednesday, May 02, 2007 - 2:40 pm: |
| 
|
सुमेधा, आधी मिटर काय आहे ते सांग.
|
सुमेधा, गझलच्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी ही गझलेची बाराखडी पहावी.
|
Ksha
| |
| Thursday, May 03, 2007 - 10:05 pm: |
| 
|
सुमेधा, मराठीत मी तरी 'खरेटले' हा शब्द अजून ऐकला नाही. अर्थात मी पुण्याबाहेरचे मराठी फार कमी ऐकले असल्याने माझाच शब्द प्रमाण मानावास असाही आग्रह नाही
|
Jo_s
| |
| Monday, May 07, 2007 - 9:41 am: |
| 
|
तोल किरणांचा ढळाया लागला साज संध्येचा चढाया लागला लाल झाली पश्चिमा ती लाजली पाहण्या जोतो जमाया लागला विहग सारे श्रांत, परतू लागले वृक्षही तो सळसळाया लागला लांबल्या त्या सावल्या कंटाळुनी गाव सारा आळसाया लागला सावल्या पूर्वेस वळल्या वाकल्या रंग त्यांचा विरघळाया लागला सुधीर
|