Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » अनिलभाई » Archive through March 26, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, March 21, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई बोले तो ....
:-)

मित्रांनो ,
अनिलभाईंचा पण गज़ल लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न . कल्पना अबाधित ठेवण्यासाठी मतल्यात " जात होते " असा पूर्ण रदीफ़ येतोय जो नंतरच्या शेरांमध्ये " आ " त होते असा होतोय . ह्या वर विस्तृत चर्चा भाईंसोबत होईलच . पण कार्यशाळेच्या deadlinesa नुसार आता पोस्ट करत आहोत .
:-)
बदललेली गजल.. नविन मतला व नविन मक्ता

अनिलभाई

ऋतु येत होते, ऋतु जात होते!
कलाकार ते काय नखर्‍यात होते!

खरे कोण खोटे कसे ओळखावे
मला भेटले ते मुखवट्यात होते

जगाला कसा दोष लावू पहाना
खरे पाप माझ्याच रक्तात होते

विसावे कसे हे चोरटे निघाले
फसावे सदाचेच भाग्यात होते

तिजोरी दिलाची कुणी बंद केली
किती दर्द ते देखणे आत होते

झुरे येथ कोणी, झरे तीच गाथा
झरे आठवांचे, कुणा गात होते?

असा श्याम यावा कडाडून जावा
निमंत्रण असे काय प्याल्यात होते?

पहा फाटलो मी चुरडलो जरासा
खरे मोल अनिला, वटवण्यात होते



Desh_ks
Wednesday, March 21, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"तिजोरी दिलाची कुणी बंद केली
किती दर्द ते देखणे आत होते"

वा! किती सुंदर कल्पना आणि सुंदर मांडणीही!


Zaad
Wednesday, March 21, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिजोरी दिलाची कुणी बंद केली
किती दर्द ते देखणे आत होते

व्वा!! फारच सुंदर!!!


Mi_anandyatri
Wednesday, March 21, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा श्याम यावा कडाडून जावा
निमंत्रण असे काय प्याल्यात होते?
हे नाही कळलं.
"एकच प्याला" शी काही संबन्ध आहे का? रागावू नका...


Jo_s
Wednesday, March 21, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई
मस्त, छानच आहेत सगळे शेर
फक्त शेवटचा नाही निट समजला


Meenu
Wednesday, March 21, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई बोले तो एकदम झकास लिखेला है भाई

Jayavi
Wednesday, March 21, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई....... आप तो सव्वा सेर निकले :-)
मस्त झालीये गझल भाई!

जगाला कसा दोष लावू पहाना
खरे पाप माझ्याच रक्तात होते
....... सही!
झुरे येथ कोणी, झरे तीच गाथा
झरे आठवांचे, कुणा गात होते?
..... हा झुरझुरीत शेर आवडेश!

तिजोरी दिलाची कुणी बंद केली
किती दर्द ते देखणे आत होते
........एकदम खल्लास कर डाला आपने तो !




Mankya
Wednesday, March 21, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई ... तुमने कर दिखाया भाई !
दर्द देखने .. विसावे ... किती सुंदर !
मक्ता मलाहि नाहि कळेश !

माणिक !


Mayurlankeshwar
Wednesday, March 21, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिजोरी दिलाची कुणी बंद केली
किती दर्द ते देखणे आत होते

क्या बात है!
खूप प्रयत्न करूनही मक्ता समजला नाही.. :-(
'श्याम' हा कोण आहे?


Bee
Wednesday, March 21, 2007 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, तुम्ही एक दर्दी अहात हे मला आज उमगले. गझल छान आहे :-)

Anilbhai
Wednesday, March 21, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे आभार. सर्व प्रथम वैभवचे अभिनंदन असा छान उपक्रम सुरु केल्याबद्दल.
स्वाती चे मनापासुन आभार मार्गदर्शना बद्दल. जोडाक्षराचे रस्व दिर्घ कळल्यासारख वाटतय.
मतल्यातली गडबड लक्षात आली आहे. सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
(अर्थ असा होता की शहाण्या पाहुण्या सारखे कंटाळा आला की जात होते.)

'श्याम' आणि 'प्याला' ह्यावरुन 'श्यामका' प्यालाच आठवतोय का?. Hmmm..



Swaatee_ambole
Wednesday, March 21, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाईंच्या गज़लवर मी काम केलं होतं. मतल्यातली गडबड माझ्या ध्यानात यायला हवी होती. इतकी trivial गोष्ट माझ्या कशी लक्षात आली नाही याचं माझं मलाच सखेदाश्चर्य वाटतंय. आणि त्यासाठी मी दिलगीर आहे.
भाई आणि वैभव, तुम्ही विश्वासाने माझ्याकडे सोपवलेलं काम माझ्या हातून नीट झालं नाही याबद्दल मी तुमची क्षमा मागते.
ही चूक निदर्शनाला आणून दिल्याबद्दल मी पूनम( psg ) ची आभारी आहे.

जाता जाता, आता या गोष्टी वाचकांच्या लक्षात यायला लागल्या हे मी कार्यशाळेचं यश समजते, आणि त्याचा आनंदच आहे.


Paragkan
Wednesday, March 21, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya bhaay .. thet gazalet ??? ... tumhara kya munnabhay ho gayelaa hei kyaa? :-)

Asami
Wednesday, March 21, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई गजरा मरलेला कि मळलेला दिसतोय वेणीने

फ़क्कड जमलिये


Dineshvs
Wednesday, March 21, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, हि पण हुनर आहेच का अंगात ?
स्वाती, एवढे काय वाईट वाटुन घेतेस ? भाव व्यक्त होतोय ना, मग झाले.
आणि सहज नेमके शब्द आठवुनही जातील बघ.


Mankya
Wednesday, March 21, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती .. दिनेशदांना अनुमोदन ! अग एवढ काय वाईट वाटून घेतेस .. तुझी Post वाचतानाही कसंतरी वाटतय ! छोड दो यार !

माणिक !


Zakasrao
Thursday, March 22, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिजोरी दिलाची कुणी बंद केली
किती दर्द ते देखणे आत होते >>>
वा भाइ क्या शेर लिखेला हे.




Bhramar_vihar
Friday, March 23, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाईगिरी मस्तच! श्यामचा प्याला म्हणजे मीरेने प्यायलेला का?

Dineshvs
Saturday, March 24, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, तुम्ही समजून घ्याल म्हणुन ईथे लिहित आहे.

तेषां तपस्तप्स्यौ शिशिरः मधुमाधवौ वसंतः
शुचिशुक्रौग्रीष्मः नभोनभस्यौवर्षा
इषोज्जौं शरद सहःसहस्यओ हेमंत: इति

असा एक श्लोक आहे.
शिशिराचे माघ आणि फ़ाल्गुन म्हणजे तपमास वा तपस्यमास
वसंताचे चैत्र व वैषाख म्हणजे मधुमास वा माधवमास
ग्रीष्माचे ज्येष्ठ व आषाढ म्हणजे शुचिमास वा शुक्रमास
श्रावण भाद्रपद म्हणजे वर्षाऋतु म्हणजेच नभोमास वा नभस्यमास
अश्विन कार्तिक म्हणजे इषमास वा ऊज्ज्रमासा म्हणजेच शरद ॠतु
आणि पौष आणि मार्गशीर्षाचा, हेमंत ऋतु म्हणजे सहमास वा सहस्यमास.
याबाबतीत जाणकार अधिक सांगतीलच, पण या सुंदर कल्पना कुठल्यातरी गझलेत यायला हव्या होत्या.


Anilbhai
Monday, March 26, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दिनेश मस्तच माहिती. आवडल.
गजलेचि दुरुस्ती चालु आहे.
लवकरच वैभव गुरुजी कळवतील.

Bhramar_vihar,
अगदी बरोबर.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators