भाई बोले तो ....
मित्रांनो , अनिलभाईंचा पण गज़ल लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न . कल्पना अबाधित ठेवण्यासाठी मतल्यात " जात होते " असा पूर्ण रदीफ़ येतोय जो नंतरच्या शेरांमध्ये " आ " त होते असा होतोय . ह्या वर विस्तृत चर्चा भाईंसोबत होईलच . पण कार्यशाळेच्या deadlinesa नुसार आता पोस्ट करत आहोत .
बदललेली गजल.. नविन मतला व नविन मक्ता अनिलभाई ऋतु येत होते, ऋतु जात होते! कलाकार ते काय नखर्यात होते! खरे कोण खोटे कसे ओळखावे मला भेटले ते मुखवट्यात होते जगाला कसा दोष लावू पहाना खरे पाप माझ्याच रक्तात होते विसावे कसे हे चोरटे निघाले फसावे सदाचेच भाग्यात होते तिजोरी दिलाची कुणी बंद केली किती दर्द ते देखणे आत होते झुरे येथ कोणी, झरे तीच गाथा झरे आठवांचे, कुणा गात होते? असा श्याम यावा कडाडून जावा निमंत्रण असे काय प्याल्यात होते? पहा फाटलो मी चुरडलो जरासा खरे मोल अनिला, वटवण्यात होते
|
Desh_ks
| |
| Wednesday, March 21, 2007 - 6:08 am: |
| 
|
"तिजोरी दिलाची कुणी बंद केली किती दर्द ते देखणे आत होते" वा! किती सुंदर कल्पना आणि सुंदर मांडणीही!
|
Zaad
| |
| Wednesday, March 21, 2007 - 6:17 am: |
| 
|
तिजोरी दिलाची कुणी बंद केली किती दर्द ते देखणे आत होते व्वा!! फारच सुंदर!!!
|
असा श्याम यावा कडाडून जावा निमंत्रण असे काय प्याल्यात होते? हे नाही कळलं. "एकच प्याला" शी काही संबन्ध आहे का? रागावू नका...
|
Jo_s
| |
| Wednesday, March 21, 2007 - 6:56 am: |
| 
|
अनिलभाई मस्त, छानच आहेत सगळे शेर फक्त शेवटचा नाही निट समजला
|
Meenu
| |
| Wednesday, March 21, 2007 - 7:10 am: |
| 
|
भाई बोले तो एकदम झकास लिखेला है भाई
|
Jayavi
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:26 am: |
| 
|
भाई....... आप तो सव्वा सेर निकले मस्त झालीये गझल भाई! जगाला कसा दोष लावू पहाना खरे पाप माझ्याच रक्तात होते ....... सही! झुरे येथ कोणी, झरे तीच गाथा झरे आठवांचे, कुणा गात होते? ..... हा झुरझुरीत शेर आवडेश! तिजोरी दिलाची कुणी बंद केली किती दर्द ते देखणे आत होते ........एकदम खल्लास कर डाला आपने तो !
|
Mankya
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:37 am: |
| 
|
भाई ... तुमने कर दिखाया भाई ! दर्द देखने .. विसावे ... किती सुंदर ! मक्ता मलाहि नाहि कळेश ! माणिक !
|
तिजोरी दिलाची कुणी बंद केली किती दर्द ते देखणे आत होते क्या बात है! खूप प्रयत्न करूनही मक्ता समजला नाही.. 'श्याम' हा कोण आहे?
|
Bee
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:55 am: |
| 
|
भाई, तुम्ही एक दर्दी अहात हे मला आज उमगले. गझल छान आहे
|
Anilbhai
| |
| Wednesday, March 21, 2007 - 12:43 pm: |
| 
|
सगळ्यांचे आभार. सर्व प्रथम वैभवचे अभिनंदन असा छान उपक्रम सुरु केल्याबद्दल. स्वाती चे मनापासुन आभार मार्गदर्शना बद्दल. जोडाक्षराचे रस्व दिर्घ कळल्यासारख वाटतय. मतल्यातली गडबड लक्षात आली आहे. सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. (अर्थ असा होता की शहाण्या पाहुण्या सारखे कंटाळा आला की जात होते.) 'श्याम' आणि 'प्याला' ह्यावरुन 'श्यामका' प्यालाच आठवतोय का?. Hmmm..
|
भाईंच्या गज़लवर मी काम केलं होतं. मतल्यातली गडबड माझ्या ध्यानात यायला हवी होती. इतकी trivial गोष्ट माझ्या कशी लक्षात आली नाही याचं माझं मलाच सखेदाश्चर्य वाटतंय. आणि त्यासाठी मी दिलगीर आहे. भाई आणि वैभव, तुम्ही विश्वासाने माझ्याकडे सोपवलेलं काम माझ्या हातून नीट झालं नाही याबद्दल मी तुमची क्षमा मागते. ही चूक निदर्शनाला आणून दिल्याबद्दल मी पूनम( psg ) ची आभारी आहे. जाता जाता, आता या गोष्टी वाचकांच्या लक्षात यायला लागल्या हे मी कार्यशाळेचं यश समजते, आणि त्याचा आनंदच आहे.
|
Paragkan
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:00 pm: |
| 
|
kya bhaay .. thet gazalet ??? ... tumhara kya munnabhay ho gayelaa hei kyaa? 
|
Asami
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:45 pm: |
| 
|
भाई गजरा मरलेला कि मळलेला दिसतोय वेणीने फ़क्कड जमलिये
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 21, 2007 - 4:42 pm: |
| 
|
भाई, हि पण हुनर आहेच का अंगात ? स्वाती, एवढे काय वाईट वाटुन घेतेस ? भाव व्यक्त होतोय ना, मग झाले. आणि सहज नेमके शब्द आठवुनही जातील बघ.
|
Mankya
| |
| Wednesday, March 21, 2007 - 4:49 pm: |
| 
|
स्वाती .. दिनेशदांना अनुमोदन ! अग एवढ काय वाईट वाटून घेतेस .. तुझी Post वाचतानाही कसंतरी वाटतय ! छोड दो यार ! माणिक !
|
Zakasrao
| |
| Thursday, March 22, 2007 - 3:54 am: |
| 
|
तिजोरी दिलाची कुणी बंद केली किती दर्द ते देखणे आत होते >>> वा भाइ क्या शेर लिखेला हे.
|
भाईगिरी मस्तच! श्यामचा प्याला म्हणजे मीरेने प्यायलेला का?
|
Dineshvs
| |
| Saturday, March 24, 2007 - 4:49 pm: |
| 
|
भाई, तुम्ही समजून घ्याल म्हणुन ईथे लिहित आहे. तेषां तपस्तप्स्यौ शिशिरः मधुमाधवौ वसंतः शुचिशुक्रौग्रीष्मः नभोनभस्यौवर्षा इषोज्जौं शरद सहःसहस्यओ हेमंत: इति असा एक श्लोक आहे. शिशिराचे माघ आणि फ़ाल्गुन म्हणजे तपमास वा तपस्यमास वसंताचे चैत्र व वैषाख म्हणजे मधुमास वा माधवमास ग्रीष्माचे ज्येष्ठ व आषाढ म्हणजे शुचिमास वा शुक्रमास श्रावण भाद्रपद म्हणजे वर्षाऋतु म्हणजेच नभोमास वा नभस्यमास अश्विन कार्तिक म्हणजे इषमास वा ऊज्ज्रमासा म्हणजेच शरद ॠतु आणि पौष आणि मार्गशीर्षाचा, हेमंत ऋतु म्हणजे सहमास वा सहस्यमास. याबाबतीत जाणकार अधिक सांगतीलच, पण या सुंदर कल्पना कुठल्यातरी गझलेत यायला हव्या होत्या.
|
Anilbhai
| |
| Monday, March 26, 2007 - 1:19 pm: |
| 
|
वा दिनेश मस्तच माहिती. आवडल. गजलेचि दुरुस्ती चालु आहे. लवकरच वैभव गुरुजी कळवतील. Bhramar_vihar, अगदी बरोबर.
|