Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 03, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » कथा कादंबरी » तिश्न्नगी » Archive through April 03, 2007 « Previous Next »

Swasti
Thursday, March 22, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" हां ग आई ठीक आहे बघुया नंतर आणि मी या शनिवार्-रविवार काही येणार नाही आहे "
" आम्ही सिंहगडला जातोय , trekking ला "
"हां काका इथेच side ला लावा ... हे घ्या "
"चल mumma byeee मी पोचले आता ofice मध्ये संध्याकाळी बोलु . टाटा "

"Good morning madam "
"Gooood Morning !!"
Security ला प्रसन्न Good morning करत अनन्या office मध्ये शिरली

अनन्या देशमुख
वय वर्शे २८
या कंपनीत येउन जेमतेम एक वर्श झालं होतं. मुळची मुंबईची पण मुंबैच office join करायचा पर्याय असतानाही हट्टाने पुण्याला आलेली.
मुंबईच्या धकाधकीच्या आणि routine आयुष्याला कंटाळुन ती पुण्याला आली . स्वतंत्र आपल्या इच्छेप्रमाणे जगता यावं , इतकाच उद्देश .

"Hello Mr.Beans ! Any news ? "
Desk वर आपली पर्स ठेवत अनन्याने विचारलं .
Mr.Beans -- श्रीनिवास उमदा , अतिशय हुशार अनन्याचा ' शेजारी ' आणि खास दोस्त. त्याच हे नाव तिनेच ठेवल होत त्याच्या JAVA Experties मुळे.
"Maruti Motors is hiking car prices!" पेपरच पानं पलटतं श्रीने शांतपणे माहिती पुरवली.
"Stupid !! I m asking about our company and people.I am more interested in our project.Any mail from Boss?"
"Nope.But your Darling Mili,is dying to talk to you .She called up twice"
"Oh God! Plz Plz ping her and tell I will be there in 10 Mins "

आना 'ladies room' कडे पळाली . चेहर्‍यावर गार पाण्याचे हबके मारल्यावर जर बरं वाटल .Tissue paper ने चेहरा पुसत तिने आरशात पाहिलं .
...
...

" अनु , कशी अवतारात राहतेस गं जर केस नीट बांध , हातात चार बांगड्या घाल . तुझ्यासारख्या लग्नाच्या वयाच्या मुलीने कसा चेहरा टवटवित ठेवावा ."
" आई झालं तुझ परत सुरु.मी दिसायला अशीच आहे . ज्याला पसंद करायच असेल तो करेल ."
...
...
"Plz आना , don't say like this. तुझ्यासारख्या lovable मुलीला पसंद करणार कोणितरी असेलच ना "
" श्री , जाउदे ना . जगातली सगळी मुलं तुझ्यासारखी थोडीच आहेत "
...
...

खरच ! या जगात श्री सारखी मुल आहेत ?. 'not at all hot' चेहर्‍यावर न जाता इतर गुणांकडे पहणारी.
मग अजून मला कोणी का भेटल नाही. चारचौघांत या एकटेपणाच कौतुक सांगता येत,पण एकांतात हे हृदयाच दु:ख असच उसळी मारुन वर येत.
मलाही वाटत आपला एक boyfriend असावा,आपणही कोणाच्या प्रेमात पडावं , एक कोणीतरी जीव ओवाळुन टाकणार हक्काच माणुस असावं .
नशिबात एखाद सुख लिहिल असेल तरच त्या गोष्टि मिळतात हेच खर.
एखादीच मिली अशी नशिबवान निघते जिला नेमका तिचा करण भेटतो.
योग्य वयात लग्न होउन मार्गी लागलेलं आयुष्य , करणसारखा प्रेमळ आणि महत्वाकांक्षी नवरा , मोठ श्रीमन्त सासर राजाराणीचा सुखी संसार .
शेवटी आणखी काय अपेक्षा ठेवायच्या आयुष्याकडुन.
Really ! मिली किती भाग्यवान आहे.
मिली .. श्री म्हणतो तसं ....My Darling मिली !!! Lucky girl!

मिली आणि श्रीची आठवण येताच अनन्या भानावर आली.
Oh No !
पटापट आवरुन ती बाहेर पडली.
desk वर श्री मिलीशीच फ़ोनवर बोलत होता
" I m so sorry milii " त्याच्या हातून फ़ोन जवळजवळ हिसकावत अनन्या म्हणालि
" आना , काय हे ? मी कधीची वाट पहातेय मला call च्या अगोदर तुझ्याशी discuss करायच होत .but its late now .
आता चटकन dial-in कर . मी ठेवते फ़ोन . bye"
अनन्या notepad आणि print outs घेऊन cabin कडे वळली.


Runi
Thursday, March 22, 2007 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति,
चांगली झाली आहे सुरुवात कथेची. एकंदर ही कथा अनन्या आणि श्रीनिवास बद्दल दिसतेय पण मला कथेच्या नावाचा अर्थ नाही कळला.
रुनि


R_joshi
Friday, March 23, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति कथा अनेक कलाटण्या घेणार बहुतेक. सुरवात चांगली केली आहेस. :-)

Suvikask
Tuesday, March 27, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोष्टीच्या नावाचा अर्थ काय आहे?

Manya2804
Wednesday, March 28, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तश्न्नगी म्हणजे तहान. पहा :

इस कू-ए-तश्न्नगी मे बहोत है के एक जाम
हाथ आ गया है दौलत-ए-नादार की तरहा

(कवी: मजरूह सुल्तानपुरी
फिल्म: दस्तक)


Swasti
Saturday, March 31, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

conference room मधलं आवरून मिली आपल्या डेस्कजवळ आली .
खुर्चीत स्वत:ला झोकुन,मागे मान टेकवत डोळे मिटले आणि ती स्वत:शीच समाधानाने हसली .

आज पेट्रिक माझ्या कामावर खूप खुश दिसत होता.मी बनवलेले detail plans,resource planning,risk analysis,mitigation plan त्याला फ़ार अभ्यासपूर्ण वाटले आणि पटलेही .
"Excellent job ,Mili.That's fabulous.Lets go ahead with your findings ."
करणला हे सगळं कळवते . He will be very happy म्हणेल , "I knew it baby.I told,you have everything in , all you need is boost up your confidence"


तिने चटकन उठुन outlook उघडलं आणि 'new message' वर क्लिक केलं "Karan , you know what .."

मिली उर्फ़ म्रुदुला अग्निहोत्री -- आताची म्रुदुला करण शर्मा .
म्रुदुलाने तीन वर्षांपुर्वी या कंपनीत join केलं तेंव्हा करण तिचा सिनियर होता . प्रथम बाजुला बसतात म्हणुन , मग एकच प्रोजेक्ट म्हणून दोघांच एकत्र भेटण बोलणं वाढलं . मग प्रेमात पडले आणि लग्न करायच ठरवलं . त्या आधी करणने विचारपूर्वक नोकरी बदलली.मिलीची लग्नपत्रिका पाहुन करण सारखा दिल्लीचा hansome hunk या नाशिकच्या साध्या सरळ मुलीच्या प्रेमात पडला यापेक्षा जास्त , वर्षभर चाललेल्या या प्रेमप्रकरणाचा सन्शयही आला नाही याच सगळ्यांना आश्चर्य वाटलं .
दोघांचा संसार सुरु होउन जेमतेम ६ महिने होतायेत तोच करण UK project वर गेला .

"Hi मिली , आज लवकर आलीस ? " शोभनाच्या हाकेने मिली दचकली.
" हो ग . आज सकाळी सकाळी telecon होता . घरुन घेतला असता तर परत इथे येइपर्यन्त उशीर झाला असता ."
"I know माझाही अगोदर असाच प्रॉब्लेम व्हायचा . call संपवुन ऑफ़िसमध्ये पोचेपर्यंत १२ वाजायचे .
आता presentation वगैरे काही नसेल तर मग मी कार मध्येच घेते . घरुन निघुन इथे पोचेपर्यन्त call आटपतो . "
"excuse me, नवर्‍याचा call" शोभनाने मोबाईल उचलला आणि बोलण्यात गर्क झाली .

शोभनाच काय सही आयुष्य आहे ना !! साधारण वर्षभरापुर्वी आम्हि दोघी एकाच level वर होतो आणि आता ती project manager आहे .
आज शोभनाच्या नावाला कंपनीत एक वेगळ महत्त्व आणि मान आहे. ऑफ़िसमधल्या सगळ्यात successful project managers मध्ये तिच नाव घेतल जात . कोणत्याही महत्वाच्या प्रोजेक्ट्मध्ये शोभना inputs देणार त्यांचे plans review करणार.ती management च्या बर्‍याचशा निर्णयामध्ये सहभागी असते आणि वेळप्रसंगी त्याच्याशी भांडते ही.
शोभना आज कंपनीत एक institution , एक आदर्श बनली आहे


"you are jeleous of her, darling"
"shut up Karan ! I am not.I am just appreciating her achiviemnts in her life. I know there are so many things I can learn from her"

चायला असं successful career मिळालं तर आणखी काय हवं .

मिलीने मगासचं मेल पुर्ण करायला घेतलं .


Swasti
Saturday, March 31, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" ठिक है फ़िर . रातमे बात करते है | "
" नाही बाबा . आज शामको मुझे जाना है ना लेट हो जाउंगी |"

शोभना नायर
चार वर्षांपुर्वी या कंपनीत आली ती TL म्हणुन आज आपल्या कर्तबगारीने आणि मेहनतीने ती ं आहे

गेल्या सहा महिन्यात तीन foreing trips , तगडा पगार , स्वत:ची कार मुलुंडच्या पॉश एरियात ३ बेडरूम्सच घर आणि कोणालाही हेवा वाटेल अस successful career . आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आणि हुशारीमुळे अल्पावधीत शोभन कम्पनीतील एक महत्वाचि व्यक्ति बनली


"Are you there ?"
शोभना online येताच रुपलचा mesg आला .
" haa.n rupal , bol.ab kaisii hai babykii tabiyaat?"
"thik hai.she is better now. I hope she will be fit n fine for B'day. ooops ! BRB"


Typical Mom !! नक्की राशीने काहीतरी गडबड केली असणार म्हणून ही पळाली .
लेक एकदम आईच्या वळणावर गेली आहे , धडपडी ! आणि रुपलकडे बघुन कोणी म्हणेल का ही एका मुलीची आई आहे .
तिचा नोकरी सोडायचा निर्णय तेंव्हा मला फ़ारसा पटल नव्हता . पण आता तिल मुलीमध्ये रमलेली पाहून बरं वाटत .
किती पैसा , ऐषोआराम मिळवा , आई होण्यातल सुख काही वेगळच असेल .
रुपलकडे बघून पुरेपुर पटत की स्त्रीच्या आयुष्याला आई बनण्याने पुर्णत्व येत .


"Sorry Shobha! raashi ro rahi thi"
"tell me, what abt u? what did Dr. say ?"
"Still nothing. will go today eve. to see Dr. again. Lets see wht happns"
"rupal,kabhi kabhi lagata hai ye saab mere naseeb mehi nahi hai."
"plz shobhaa , don't talk so depressing !.Everything will b alright .Don't worry"
"Pata nahi kyaa hoga "
"Rups , I will b right back"


Swasti
Saturday, March 31, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" पिंकी , बेबीको लेके जाओ , मैं फ़ोनपे बात कर रही हूं ."
" दीदी साथे जाओ बेटा हूं आउ छुं "
" sorry aana, बोल काय म्हणतेयस ?" मुलीला पिंकीकडे देत रुपलने विचारल .
" अग आज सकाळी आई म्हणाली . तेंव्हा म्हटल राशीची तब्येत विचारुया . आता कशी आहे ती ?.
" ठीक आहे आता . हितेन टुर वर गेला की हीच नेहमीचच असत . पण या वेळेला जास्त . म्हणुन घाबरले ."

रुपल हितेन ठक्कर.
ती आणि शोभना एकत्र office मध्ये असल्यामुळे दोघींची गाढ मैत्री आणि तिचे सासरे अनन्याच्या बाबांचे खास मित्र .
दोन वर्ष नोकरी केली आणि मग maternity leave नंतर रुपलने नोकरी सोडायचा निर्णय घेतला , अगदी स्वखुशीने .
नवरा फ़िरतीच्या नोकरीवर , सासुबाई हिच्या लग्नापुर्वीच वारलेल्या , दीर नणंद , आजे सासु - सासरे असं मोठं कुटुंब आणि आता त्यात मुलगी , त्यामुळे संसारच्या पुर्ण वेळ नोकरीत रुपल चांगलीच रमली .

" आणि नविन काय खबर आना ?"
" नविन .... मी तुला बोलले का मी dance class join केला आहे ?"
" काय म्हणतेस ? वाह !!! मस्त . ए , या शनिवारी येना गं घरी , गप्पा मारु . किती दिवस झाले तुला भेटल्यावर "
" हो ना . मलाही राशीला भेटायच आहे . पण या शनिवारी नाही . आम्ही trekking ला चाललो आहोत ."
" सहीच . सिंहगडला ? तुला सांगू आना अगं आता जेवढी मजा करता येइल ना तेवढी करुन घे . Just live your life fully .
एकदा का लग्न झाल आणि संसार आणि मुलं यात पडलीस की मग अडकलीस . "
" आना , You are so lucky !!! I realy envy you , dear !! "



समाप्त


Adm
Saturday, March 31, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समाप्त
नाही कळलं काही... :-(


Chinnu
Saturday, March 31, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ती, सहीच! :-)
प्रत्येकाची तहान वेगळी. दुसर्‍याच्या हतातला जाम अधिक खुणावितो हेही तितकेच खरे. शॉर्ट, स्वीट आणि वेगळी मांडणी. मस्त.. पु.ले.शु.


Manuswini
Saturday, March 31, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

grass is greener on other side

माझे observation, लग्न झालेल्या मुली असे सल्ले देणार की अग मजा कर लग्न वगैरे झाले की काही करता येत नाही. त्यांना एकटे रहताना स्वःताहुन मरावे लागते ह्याचा अंदाज असो वा नसो पण उगाच पणे बोलायचे. इथे 'मजा' हा खवचट्पणे वापरलेला असतो.

स्व खुषीने नोकरी न करणर्‍या उगाच खोचक टोमणे, तुम्ही काय बाबा कमवत्या ना, काय वाटेल ते करु शकता... त्यात काय वाटेल ते मध्ये त्यांचे त्यांनाच माहीती कीती काय अभीप्रेत आहे ते.

मुले असणारे अग बाई बरी आहेस मुले म्हणजे ताप आहे गं........

anyways चालयचेच.

आणि असेच वरच्या गोष्टीसारखे.
चांगला प्रय्त्न होता swasti


Sneha21
Sunday, April 01, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान कथ होति आवाडलि


Dhoomshaan
Sunday, April 01, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहिच होती गं.................
पहिल्यांदा काही कळले नाही, पण हळु हळु डोक्यात ट्युब लाईट पेटत गेली!


Swasti
Sunday, April 01, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
खरतर कथा लिहायचा हा पहिलाच प्रयत्न :-)

अगदी खरं मनुस्विनी . मीही बर्‍याचदा पाहिली आहेत अशी लोक .
या चौघीजणी ही मला आयुष्यात कधिना कधी भेटल्या होत्या .. आपापल्या जगात मग्न आणि आनंदी . सहज वाटल , या चौघीं एकमेकींना भेटल्या तर..... ?

आणि तिश्न्नगी ( मन्याने सांगितलं तसं तिश्न्नगी : तहान ) या नावाचं म्हणाल तर हे शानचं एक गाणं आहे - याच अल्बममधलं . या गाण्यातही हाच विषय आहे . एखादी व्यक्ती त्याच्या क्षेत्रात फ़ार समाधानी आणि विजयी असली तरी शेवटी तिला इतर कसली तरी तहान ( हाव नाही ओढ म्हणा हवतरं ) असतेच .


Maitreyee
Sunday, April 01, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आवडली ही कथा कल्पना.. वेगळा प्रयत्न.

Madhura
Sunday, April 01, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही आवडली या कथेची कल्पना . Good one!

Bee
Monday, April 02, 2007 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच कथा खूप आवडली. कथेचा शेवट तर एकदम छान..

मिलीची लग्नपत्रिका पाहुन करण सारखा दिल्लीचा hansome hunk या नाशिकच्या साध्या सरळ मुलीच्या प्रेमात पडला यापेक्षा जास्त , वर्षभर चाललेल्या या प्रेमप्रकरणाचा सन्शयही आला नाही याच सगळ्यांना आश्चर्य वाटलं .
>>> हे असं खूप जणांच्या बाबतीत होतं. आणि जे s/w engineer म्हणून काम करतात त्यांना तर मेल्स असतात खूप काही बोलायला. मग आपल्याला माहिती पडत नाही.. :-)

Princess
Monday, April 02, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ती, सुरेख आहे कथा. तुझी शैली खुप आवडली. नवीन आणि वेगळे वाचायला मिळाले या कथेच्या रुपाने.

Marhatmoli
Tuesday, April 03, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच आहे कथा, खुप आवडलि. पण अनन्याप्रमाणे बाकिच्या तिगिंचि मन:स्थिति पण जर detail मध्ये जाणुन घ्यायला आवडलि असति.

Disha013
Tuesday, April 03, 2007 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ती,वेगळी शैली आवडली.क्ज्क्ज्ज्ज झ्झ्ज्ख




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators