|
Swasti
| |
| Saturday, April 07, 2007 - 1:40 pm: |
| 
|
धन्यवाद !! बी , मैत्रेयी , मनु आणि इतर काही जुन्या आणि जाणकार लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की अधिकच बरं वाटतं . तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे बी . पण body language नावाचीही काही गोष्ट असते ना . मी म्रुदुलाची गोष्ट जवळुन पाहिली आहे , तिच्या शेजारी बसणारा मुलगा अगदी हबकलाच होता . "तो तिला रोज भेटायला यायचा दोघे गप्पा मारायचे , मीही थट्टा मस्करी करायचो पण मला हे सगळ पत्रिका हातात आल्यावर कळलं " आणि या अगदी उलट किस्सा ही माहिती आहे - दोघे प्रेमात पडले ते एकामेकाना कळायच्या अगोदर बहुतेक पुर्ण office ला कळलेलं
|
Swasti
| |
| Saturday, April 07, 2007 - 1:44 pm: |
| 
|
Mmoli मी त्याचा विचार केला होता , पण मग कुठेतरी वाटलं की कथा फ़ारच melodramatic होतेय , म्हणुन नाही लिहिलं
|
स्वस्ति अगदी तंतोतंत उभं केलंस सगळं. अशी माणसं मी प्रत्येक कंपनीत पाहीलीयत. अशाच वाक्यांसकट. पण थोडी क्लिष्ट झालीय. थोडी अजून सोपी करून लिहीली असतीस तर software सोडून इतर लोकांना पण सहज कळली असती. अर्थात तसं अपेक्षित असेल तर. नाहीतर चुभुद्याघ्या (कारण हल्ली मायबोलीवर नसेल आवडली तर वाचू नका, मला यावर काहीच बोलायचे नाही असं लेखकच लिहीतात त्यामुळे )
|
Swasti
| |
| Monday, April 09, 2007 - 4:23 pm: |
| 
|
संघमित्रा , बाकीच्या लेखकांच माहीत नाही , पण मला नाही वाटतं अस काही . तुमच्या सारख्या मोठ्या ( अनुभवाने बरं का ) माणसांच्या प्रतिक्रिया नक्किच महत्वाच्या वाटतात . क्लिष्ट झाली का ? मेलं सारखं s/w मध्ये राहून बाकीचे non IT आहेत , त्यांची भाषा , terminology वेगळी असते हे लक्षातच येत नाही . घरी बोलतानाही हेच होतं . पण thanks पुढच्या वेळेपासून नक्की लक्षात ठेवीन .
|
Chinnu
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:21 pm: |
| 
|
सन्मीला अनुमोदन. software एकच field न ठेवता generalised लिहायचे होते. तरी पण आवडली. सन्मीमाता चरण्स्पर्श.
|
स्वस्ती तू मायबोलीवर माझ्या आधी रजिस्टर केलेयस असो. हळूहळू नॉन आयटी लोकांनाही समजायला लागेलच. मागच्या पिढीतल्या कित्येक लेखकांचे (उदा. वपूंच्या गोष्टी) वाचून क्लेरिकल आणि अकाउंटिंग ची भाषा समजायला लागतेच की. मेलं सारखं s/w मध्ये राहून... अगदी अगदी. सेम पिंच. जोक्स पण प्रोजेक्ट, म्यानेजर्स यांचेच सुचतात. चिन्नू मला डोक्याच्यामागे एक वलय आल्यासारखं वाटतंय.
|
Badbadi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 10:05 am: |
| 
|
स्वस्ती, मस्तच ग आम्ही कॉलेज मधल्या ४ जवळच्या मैत्रीणी म्हणजे थोड्याफार फरकाने तुझ्या कथेतील ४ जणी आहोत
|
Swasti
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:15 pm: |
| 
|
सन्मि , तुझ्या डोक्यामागच्या वलयाची शप्पथ .. अगं माणूस मोठा समजला जातो त्याच्या कर्तुत्त्वाने ( जोडाक्षर नाही लिहिता येत ) , वयाने नाही
|
|
|