Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » स्वाती आंबोळे » Archive through April 02, 2007 « Previous Next »

Mankya
Thursday, March 29, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू ... लाजवाब रसग्रहण !
माणिकला खूप खूप आवडलं ! खूप वेगवेगळ्या अर्थाचे पदर लाभलेत या ग़जलेला !

माणिक !


Bairagee
Thursday, March 29, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चिन्नू,

आसवे जवळ बोलवतात, गुंतवतात, ही कल्पना आवडली. माझ्या मनात आली नव्हती. चिन्नू, तुमच्यापाशी केशर काढण्याची कला नक्कीच आहे. पण सौदाचा शेर पुन्हा पुन्हा आठवतो आहे-
"सौदा" जो तेरा हाल है, इतना तो नहीं वो
क्या जानिए तूने उसे किस आन में देखा है?

असो. रसग्रहणाचे आपले स्थान आहे आणि मर्यादाही आहेत. कवीला आपण कविता लिहितो, याबद्दल चांगले वाटायला हवे. त्याची स्तुतीही व्हायला हवी. पण नतमस्तक होण्याच्या स्पर्धेत दोष झाकले जाता कामा नयेत.

बैरागी



Chinnu
Thursday, March 29, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"When I asked, he told me, his name was perspective!" :-)
बैरागी, केशर काढण्याची कला, रसग्रहण वगेरे फार फार झालं हो, चिन्नुला एक रसिक म्हणा हवं तर! वर लिहिलेले 'दोन शब्द' म्हणजे या अफाट गझलेतून माझ्या वाटे आलेली फक्त ओंजळ. Thanks for considering, I'm honoured!
खरा समीक्षक नेहमी चांगला कलाकार 'घडवितो'. दोष झाकले जाता कामा नये, या बाबतीत तुमच्याशी कधीही दुमत असणार नाही.


Pulasti
Thursday, March 29, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, दर्जेदार गझल!
तिरस्कार, खुलासे आणि भोवरे खूप खूप आवडले.
मतला - आवडला नव्हता. खरे तर समजला नव्हता... पण चिन्नुचे अप्रतिम "दोन शब्द" वाचल्यावर ती भेगाळलेली जमीन दिसली आणि मतला मनाला अगदी भिडलाच! धन्य. चिन्नु!!
तयारी आणि मक्ता नाही विशेष भावला..
-- पुलस्ति.

Swaatee_ambole
Thursday, March 29, 2007 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिप्रायांसाठी सर्वांची आभारी आहे.
रसग्रहणासाठी चिन्नूचे पेशल आभार. :-)

मतला लिहीताना ' जर पावसाळेच सुने गेले, तर बाकी ऋतू आले काय नि गेले काय, हात रितेच रहायचे' असा एक अर्थ अभिप्रेत होता. जिथून मिळायला हवी तिथूनच आपुलकी नाही मिळाली तर बाकी परिस्थिती कितीही चांगली असली तरी एक अकृतार्थता येतेच ना?
( लहानपणी ऐकलेला एक कूटप्रश्न आठवला त्यावरून : '( २७ - ९ = ०) हे कसं?' :-) )

असो. असं स्पष्टीकरण द्यावं लागणं ही तो शेर फसल्याचीच खूण आहे असं मी समजते.


Mayurlankeshwar
Friday, March 30, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"असो. असं स्पष्टीकरण द्यावं लागणं ही तो शेर फसल्याचीच खूण आहे असं मी समजते."
स्वाती तुमच्या ह्या विधानाशी सहमत.
मतल्याची झेप चिन्नुचे स्पष्टीकरण वाचल्यावरच लक्षात आली.
अर्थात गद्य स्पष्टीकरणाची झेप पद्य मतल्यापेक्षा जास्त आहे असे वाटून गेले.


Jo_s
Friday, March 30, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,
सुंदर गझल,साधे सोपे शब्द पण आशयपूर्ण, एक एक शेर मनात विरघळत जातो, अर्थ लावत बसावं लागत नाही.

ऋतू येत होते , ऋतू जात होते
सुने पावसाळे , रिते हात होते

खुणा फक्त चर्येवरी सुरकुत्यांच्या
किती सोसले आतल्या आत होते

पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते

तयारीस कोठे कधी वाव होता
तुझे सर्व घाले अकस्मात होते

नवे देव घडवी चिमुट शेंदराची
जुन्यांच्या कपाळी घणाघात होते

हे अधीकच आवडले.



Desh_ks
Friday, March 30, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,

"स्पष्टीकरण द्यावं लागणं ही तो शेर फसल्याचीच खूण आहे असं मी समजते." या तुमच्या प्रतिक्रियेमागची भूमिका खरंच चांगली आहे. या कार्यशाळेत शिकायला मिळालेला हा मोठा विचार आहे असं वाटलं. पण त्याबद्दल काही म्हणावंसं वाटतं आहे.

एखाद्या शेराचा, कवितेचा रसास्वाद घेताना लिहिणार्‍याच्या भावनेशी वाचणारा किती समरस झाला आहे त्यावर ते लिहिणं वाचणार्‍याला 'भेटणं' अवलंबून आहे. आणि अशा भावनिक पातळीवर असलेल्या अंतराला कमी करणारं स्पष्टीकरण हे वाचकाला रसिकतेकडे नेणारं मार्गदर्शनच आहे, असं मला वाटतं. अन्यथा तुम्ही इतरांच्या कवितांची रसग्रहणं लिहावी असा आग्रह वाचक धरते ना...

कुणी सांगावं, कदाचित शेर नाही वाचकच फसलेला असायचा आणि त्याचा साक्षात्कार त्याला स्पष्टीकरण वाचूनच व्हायचा. :-)

-सतीश


Vshaal78
Friday, March 30, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी मला तुमचे म्हणने पटले.
अति कौतुक करण्याच्या स्पर्धेत दोश झाकले जाता काम नयेत.
अगदी खरे.
मला ही गझल अगदी पहिल्यांदा वचली तेव्हाही नवख्या गजलांपेक्षा खूप वेगळी आहे असे वाटले नवते.
नन्तर स्पश्टिकरण व रसग्रहण वाहुनही मत बदलत नहिये.
कदचित मी एक फसलेल वाचक आहे


Bairagee
Friday, March 30, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय चिन्नू,ग़ालिबला जसा निरूपणकार हाली भेटला, तसे कदाचित तुम्ही स्वातीला भेटले आहात :-)"स्पष्टीकरण द्यावं लागणं ही तो शेर फसल्याचीच खूण आहे असं मी समजते." हे स्वातीचे म्हणणे तसे रास्त आहे. आमचेही असेच म्हणणे फार पूर्वीपासूनच आहे आणि होते. इतरत्र आम्ही ते मांडतही आलो आहोत. कधीकधी वाचक फसतो. नेहमीच फसेल असेही नाही. तसेच शेर वाचताना कविता वाचनाचा आनंद आधी मिळायला हवा,कोडे सुटल्याचा नको.आणि २ ओळींसाठी नंतर १० ओळींचे निरूपण व पाल्हाळ नको.असो.सुगंधाला स्वतःची जाहिरात करावी किंवा करवून घ्यावी लागत नाही.

Swaatee_ambole
Friday, March 30, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी, ' जाहिरात' करवून घ्यावी लागत नाही' हे काय लिहीलंयस? कसली जाहिरात? कोणी केली? कोणी करवून घेतली? कसली नतमस्तक होण्याची स्पर्धा?
गज़ल तुला आवडली नाही, तू ते स्पष्ट सांगितलंस, याबद्दल आभार.
त्यापुढे जाऊन ती आवडलेल्यांचा, त्यावर लिहीणार्‍यांचा आणि माझा असा अपमान करायचं काय कारण आहे? मी सौजन्याने उत्तरं देते याचा अर्थ कोणालाही काहीही बोलायची मुभा आहे असा नाही.


Chinnu
Friday, March 30, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातीताई, आभार कसले ग त्यात? जे भावले ते मी सांगितले एवढंच.
बैरागी, सुगंधाला जाहिरातीची गरज नाही, हे एकदम मान्य. पण स्वातीचा शेर फसला हे मात्र मान्य नाही मला.
स्वातीला मतल्यात २७-९=०, असे जे अभिप्रेत होते, तेच मी भेगाळलेल्या जमीनीच्या रुपात मांडले ना? तिने मला तर स्पष्टीकरण दिले नव्हते ना?
मी लिहिलेले या गझलेवरचे भाष्य माझ्या मते केवळ रसास्वाद आहे. निरुपण, पाल्हाळ किंवा स्पष्टीकरण नव्हे. ते पोस्ट करण्या आधी मी फ़क्त गझल वाचलेली, प्रतिक्रियादेखील वाचल्या नव्हत्या. "हाली" म्हणजे फारच झाले हो! मी इतक्या कौतुकास पात्र नाही. :-)
जर हे तुम्हाला स्पष्टीकरण वाटले तर, स्वातीची परवानगी न घेता पोस्टल्या बद्दल मी दिलगीर आहे.
मी फ़क्त माझ्या भावना पोचवल्या!
सतीशना काही अंशी अनुमोदन. माणिक, मयुर, पुलस्ति, बैरागी रसास्वाद आवडल्याबद्दल धन्यवाद. अहो पण पोहोर्‍यात यायला आडात आधी हवे की नाही? :-) इथे आड नाही समुद्रच आहे की! CBDG!


Vaibhav_joshi
Friday, March 30, 2007 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ,

खरं सांगायचं तर ह्या चर्चेत ( !!!! ) मी भाग घ्यायचा की नाही ह्यावर खूप वेळ विचार केला . माणसाला सतत गुरुजी गुरुजी म्हणून ऐकल्याने तसं होत असेल नाही ? पण शेवटी त्यातल्या " माणसाला " काय वाटतं हे महत्त्वाचं . मी माझ्याशी प्रामाणिक असणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून हे लिहीतोय .

स्वातीची ( किंवा कुणाचीही असो ही गज़ल मला फरक पडत नाही , मी सारंगच्या एका शेरावरच्या चर्चेतही हाच stand घेतला होता ) गज़ल पोस्ट झाल्यापासून वाचतोय की इतकी जमली नाही तितकी जमली नाही . मला सखेद आश्चर्य वाटतंय की नक्की किती जमायला हवी होती ? किंवा एखादा शेर तरी नक्की किती जमायला हवा होता ? त्याचं उदाहरण कुणी का देत नाहीये ? आतातर आपण सगळेच भुजंगप्रयात शिकलो आहोत , रदीफ़ , काफ़िया काय आहे कळलं आहे , आपण स्वतः ह्या जमिनीवर गझल लिहीताना शेकडो / हजारो प्रयत्न करून झाले आहेत . मग ह्या गज़ल मध्ये नक्की काय कमी आहे हे सोदाहरण दाखवायला का कुणी तयार नाहीये ?

मी गंमत म्हणून लिहायचा प्रयत्न केला तरी तिचे काफ़िये घेऊन मला त्याच अर्थाने तो शेर त्याहून जास्त चांगला लिहीताच नाही आला . म्हणजे मला जर आत्ता ह्या क्षणी कुणी सांगितलं की " तुला नाही पटला ना ? लिहून दाखव " तर मी निरुत्तर होईन . बरं " नुसती आवडली नाही, ती मजा नाही " हे वाचक आणि कवी / गझलकार जिथे एकत्र असतात ( उदा :- कविता बीबी वगैरे ) तिथल्या नुसत्या वाचकांनी म्हटलं तर ठीकही आहे पण इथे तर आपण सगळेच गज़लकार आहोत ना आता ? नुसती आवडली नाही , जमली नाही , असं म्हणून कसं चालेल ? आपल्या शब्दांना जबाबदार आपणच रहायला नको ?

आणखी एक गोष्ट .. मी जसं पाहतोय तसं आपणही पहातच असाल की एकच मिसरा घेऊन लिहीलेल्या गज़लमध्ये नंतर नंतर तेच काफ़िये आल्याने लोकांना त्यात चिरपरिचित वास आणि been there,done that चा भाव येऊ लागतो . माझ्यामते संपूर्ण कार्यशाळा संपेपर्यंत प्रत्येक गज़ल ही पहिलीच गज़ल आहे ह्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे . त्यामुळे काही गज़लवरती ( ही सोडा ... उमेदीने पहिल्यांदा लिहीणार्‍या गझलकारांवर सुध्दा ) तेच ते काफ़िये केवळ उशीरा गज़ल आल्यामुळेच अन्याय झाला आहे असे मला वाटते .

एरव्ही इतरांच्या रचनांचं इतकं डोळस रसग्रहण करणार्‍या व्यक्तीला आपली रचना कशी घडतीये / कशी घडलीये हे कळत नसेल असं मानणं योग्य नव्हे असं मला वाटतं .

जाहिरात करवून कवितेसारखी पवित्र गोष्ट so called hit करवून घेता येते की नाही मला माहीत नाही , कदाचित internet व orkut च्या ह्या जमान्यात हे शक्यही असेल पण स्वातीला ओळखणार्‍या कुठल्याही माणसाने स्वाती असे करेल असं म्हणून दाखवावं , मी लिखाण सोडून देईन . अर्थात माझ्या लिहीण्या , न लिहीण्याने कुणाला काहीच फरक पडायचं कारण नाही पण जितकं मी लिखाणाला पवित्र मानतो तितकंच मला लिखाणाच्या रुपाने भेटलेल्या आपल्यासारख्या , स्वातीसारख्या काही निर्भेळ व्यक्तित्वांना . बैरागी हे वाक्य अनाठायी होतं .

मित्रांनो .. चुकून मिळालेल्या गुरुजी ह्या बिरुदावलीमुळे नव्हे तर मित्रत्त्वाच्या हक्काने आपल्या कार्यशाळेत मी हे बोललो आहे . प्रत्येक रचना स्वतंत्र म्हणून बघा . कुणाचीही असो . आवडली तर खुल्या दिलाने लिहा . का आवडली हे ही लिहा . पण तसेच नाही आवडली तरीही कारणांसकट , सूचनांसकट , उदाहरणांसकट लिहा .

आपल्याला एकत्र राहून अजून बरंच काही शिकायचं आहे , शिकताना चर्चाही करायची आहे पण आता आपण सगळे एका पातळीवर आलो आहोत . आपण गज़लकार म्हणून बोलताना आपल्या शब्दांची / प्रतिक्रियांची जबाबदारी घ्यायची तयारी असायला हवी . उद्या कुणीही आपल्याला उलटून विचारता कामा नये ...


" कुठे शिकलास हे ? "

चला ... दुसर्‍या गज़लकडे वळू या .
:-)


Bairagee
Saturday, March 31, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



स्वाती, तुझी ही गझल मला आवडली नाही, असे कुठेही मी म्हटलेले नाही. प्रश्न काही शेरांचा आणि शब्दांचा आहे.असो. सुगंधाचे ते वाक्य एका फारसी ओळीवरून सुचलेले आहे. ती ओळ अशी-
मुश्क आनीस्त के ख़ुद बूयद, ना के अत्तार बगोयद
थोडक्यात अर्थ- सुगंध स्वतःहून दरवळतो. अत्तरविक्रेत्याने किंवा अत्ताराने सांगितल्याने सुगंध दरवळत नाही. कवितेचेही असेच आहे.
असो, तुझ्या भावना दुखावल्याबद्दल क्षमस्व. तसा मुळीच हेतू नव्हता. तुला मला उलट-सुलट जे बोलायचे ते बोलून मोकळी, निरभ्र हो. मुभा आहे.:-)
तसेच इतर कुणाचाही अपमान करण्याचाही हेतू नव्हता, हेही खास नमूद करतो. असे कुणाला वाटले असल्यास मी अत्यंत दिलगीर आहे. माझी वाक्ये अत्यंत जनरलाइज़्ड होती. रोख व्यक्तिशः स्वातीवर नव्हता. रोख एकंदर म्युच्युअल ऍडमिरेशन सोसायटीवर होता. त्यातील स्तुतीच्या अलिखित नियमावर होता. आपल्या नकळत आपण कधी ह्या सोसायटीचे सदस्य होतो कळतसुद्धा नाही.असो. मी तुला एक उत्तम कवयित्री म्हणून ओळखतो. ह्याउप्पर कुठलीही ओळख करून घेणे, माझ्यासाठी गरजेची नाही. एखादा कवी दिसतो कसा, त्याचा स्वभाव कसा, ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. त्याची कविता कशी आहे, ती दिसते कशी, ह्या गोष्टीच मी बघत असतो. शेवटी कविताच कवीची बाजू घेत असते.
कवीने स्वतःला नव्हे, तर कवितेला गंभीरपणे घ्यावे, असे माझे मत आहे. स्तुतीने हुरळून जाऊ नये, टीकेने विचलित होऊ नये. जेहेत्ते असे आहे.

वैभव,
प्रत्येक वेळी प्रत्येक शेर का जमला नाही हे वेळेअभावी सविस्तर सांगता येत नाही. असो. दुश्मन चे कुनद गर दोस्त मेहरबान बाशद? (मित्रच मेहरबान असल्यावर शत्रू काय करणार?:-))


चिन्नू,
तुमच्यासारखीच प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट खेळकरपणे घेता आली असती, तर किती बरे झाले असते.:-)

मांगे सबकी खैर!
बैरागी



Giriraj
Saturday, March 31, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नुला कवितेचंच नाही तर गद्याचं रसग्रहण करायचीही खोड आहे बरं का बैरागीबुवा! :-)

असो..... आणि ते सुखाने नांदू लागले...... :-)


Chinnu
Saturday, March 31, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी, :-) अहो, मी अत्तरविक्रेती नाही, असते तर मी माझे अत्तर आधी विकले नसते का! :-) Mutual Adminration society मध्ये membership ची अजुन तरी गरज पडली नाही. पुढेही, I'm least interested! :-) तुमचे शालजोडीतले तीर मात्र, मी किती खेळकरपणे घेतले तरी फार जोरात लागतात हो! :-)
गिर्‍या! तुझ्या 'रिमझिम' च्या पानावर मध्येच घुसुन लिहील्याबद्दल कधीच दिवे घेतले मी! तेथेही जे आले ते उत्स्फुर्त होते. कधी भेटलास तर तुला 'रिमझिम' च्या college मध्ये असतांनाच्या गोड आठवणी सांगेन. गाण्याच्या स्पर्धा जिंकायचे अमोघ शस्त्र होते 'रिमझिम'! :-) विषय आला म्हणुन सांगितले, पाल्हाळ लावयाचा हेतु नाही बरं.
गुरुजी, एकावेळी माणुस आणि गुरु या दोनही भुमिका लिलया निभाविल्याबद्दल अभिनंदन! अजुन कुठे या जगात आलो आहोत, आताच आम्हा सर्वांना गझलकार म्हणुन संबोधुन, एकाच पातळीवर आहोत असे 'उगा'च म्हटल्याबद्दल धन्यवाद. वैसे दिल्ली अभी बहोत दुर है! काही लोकांना मंजिल मिळाली आहे, पण आम्ही अजुन रस्त्यातच आहोत! :-) आम्हाला 'पोहोचवायची' जिम्मेदारी तुमचीच!
स्वातीताई, गझल माझ्या नवर्‍याला पण फार्फार आवडली.


Swaatee_ambole
Saturday, March 31, 2007 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> प्रत्येक वेळी प्रत्येक शेर का जमला नाही हे वेळेअभावी सविस्तर सांगता येत नाही.

बैरागी, मुळात अस्तित्वातच नसलेल्या म्युच्युअल ऍडमिरेशन सोसायटीची ऑनररी(?) उठाठेव करण्यात जो वेळ गेला तो इस्लाह करण्यात कारणी लावला असतास तर आम्ही सगळेच काही शिकलो असतो त्यातून. दुर्दैव, दुसरं काय?

आणि त्याहून मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यापुढे तुझ्या प्रतिक्रिया वाचताना त्या घाईघाईत तर दिल्या गेल्या नाहीयेत ना, किंवा एखादी ( खरी, संभाव्य, वा आत्तासारखी काल्पनिक) MAS बरखास्त करण्याच्या वा नवीन स्थापन करण्याच्या उद्देशाने तर लिहील्या नाहीयेत ना, अशी शंका मला कायमच येत राहील.

असो. तू दिलगिरी व्यक्त केली आहेसच. मीही माझ्याकडून हा विषय संपवत आहे.

वैभव, चिन्नू, सतीश आणि बाकी सर्वांची आभारी आहे.


Bairagee
Sunday, April 01, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,
दुर्दैव माझेच. मला काय म्हणायचे ते कुणाला कळलेले नाही. असो.
जमवून तुझ्याशी माझे-तुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

वैभव,
मला त्या ओळींवर सविस्तर लिहिणे जमले नाही, हे खरे. एक आठवले, तू मला स्वतः 'आनंदाने' फोन केलास. सविस्तर अभिप्रायाची वाट बघू का? शेवटी तुझ्याच शब्दांत, " नुसती आवडली नाही , जमली नाही , असं म्हणून कसं चालेल ?":-)

>>>आपण सगळे एका पातळीवर आलो आहोत :-) ते " कुठे शिकलास हे ? "
लागले न झाडांना दोन चार शिंतोडे
नाचही सुरू झाला, जंगलात मोरांचा

:-):-):-)


इति
बैरागी


Meghdhara
Sunday, April 01, 2007 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती गज़ल छान झालेय. पुन्हा आसवे.. अप्रतिम.
शेवटचे तिन्ही शेर.. व्वा!

मेघा



Chakrapani
Monday, April 02, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, गझल चांगली आहे, पण अपील कमी पडते आहे असे मला वाटले.
पुन्हा आसवांचा शेर मस्त आहे. त्यातले खालच्या ओळीतले भोवरे मस्तच! आसवांचे प्रवाह आणि त्यातले भोवरे तसेच त्यांच्यामध्ये गुंतणे हे सगळे छान विणले गेले आहे. अकस्मात घालेही आवडले. छान झालेत.
मतला मला ज़रा अस्पष्ट वाटला. इकडचा अर्थ वाचून थोडे थोडे ध्यानात आले, पण तो अधिक स्पष्ट होत असता, तर आवडले असते. तीच गोष्ट नज़र चोरतानाच्या कुशंका आणि मक्त्याची. मक्त्यातला वरचा मिसरा छान आहे; पण खालच्या ओळीशी संबंध लागण्यात ज़रा दमछाक झाली.
नकारातल्या तिरस्काराचा शेर काहीसा वृत्तांतात्मक (किंवा सपाट) वाटला. 'खुणा फक्त चर्येवरी सुरकुत्यांच्या'मध्ये खुणा या फक्त सुरकुत्यांच्या असल्याने मध्येच आलेल्या 'चर्येवरी'ने घोळ केला आहे. ती ओळ बदलता आली तर पहा.
पुढील लेखनासाठी मन्:पूर्वक शुभेच्छा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators