|
वैभवने चला दुसर्या गज़लकडे वळू या म्हटलेय तरी वरचे वाचून रहावले नाही म्हणून लिहीतेय. बैरागी तुम्ही लिहीताय ते मला समजले आणि without context वाचले तेंव्हा पटलेही. पण एक सांगू का, तुम्ही हे सगळं चुकीच्या जागी लिहीलंत. खरंतर MAS चे सदस्य आपण कधी होतो कळत सुद्धा नाही हे मनापासून मान्य. पण विनोदाची गोष्ट अशी की स्वाती स्वतःच ही गोष्ट मनापासून टाळते हे मला माहितीय. तिच्याशी जो काही संवाद होतो त्यात मला हे नेहमी जाणवतं. मायबोलीवरच्या न आवडणार्या गोष्टींपैकी एक म्हणजे MAS किंवा अहो रुपं अहो ध्वनीं हे तिच्याशी डिस्कस केलेलं मला आठवतंय. पण MAS नाही तरी Admiration Society or fans असणं हे काही कुणाच्या हातात नसतं. आणि कुणीतरी आपलं कौतुक करतंय म्हटल्यावर त्याला टाकून बोललं किंवा खडूसपणे त्याचा अनुल्लेख केला तरच आपण त्या MAS चे सदस्य नाही असं सिद्ध होतं असं तुम्हाला म्हणायचंय का? नवे लोक उत्साहानं काही करतात म्हणून लगेच MAS चा शिक्का कशाला? (मी स्वतः अजूनही प्रसाद मोकाशीच्या कवितांना त्याच उत्साहाने दाद देते जशी पहिल्यांदा दिली होती. कारण मला त्याची भाषा, मांडणी मनाला भिडणारी वाटते. भले तो मी लिहीलेले वाचत असेल वा नसेल.) तरीही तुम्ही जे मांडलंय तो धोका प्रत्येक चांगल्या कवीने आधी ओळखावा हे नक्की.
|
बैरागी माझ्या संपूर्ण पोस्ट मधलं एकच वाक्य तुम्हाला उद्देशून होतं ज्याबद्दलही ते व्यक्तीगत नव्हतं असं आपण लिहीलेलं आहे . त्यामुळे तो विषय मिटला आहे . आपल्या " आनंदाने " गज़ल बद्दल लिहायला माझ्याकडून उशीर होतोय हे पूर्णपणे कबूल . मेलमध्ये अर्धा ड्राफ्ट लिहीलेला आहे पण हे काही कारण नव्हे . लिहायला हवे होते हे मान्यच आहे . तसंच आपला वेळेअभावी न लिहू शकण्याचा मुद्दा पण पूर्णपणे मान्य आहे . आता मी वर जे लिहीलं त्या मागची भूमिका सांगतो . मला कार्यशाळेतल्या सर्वांशी " गज़ल वाचावी कशी ? " ह्या विषयावर बोलावेसे वाटले . अजूनही मी रोज कवीवर्य बोरकर किंवा कवीवर्य सुरेश भट वाचतो तेव्हा मला ह्या गोष्टींच नवल वाचल्याशिवाय रहात नाही . बर्याच वेळा कल्पना माहितीतल्या असूनही ते लिखाण का स्पर्श करून जातं ? ते ही वर्तमानपत्रा ऐवजी त्या वेळेचा सदुपयोग म्हणून रोज रोज वाचूनही ? कुठे दडलंय सौंदर्य ? रोज नव्या ठिकाणी कसं दिसतं ? एका कवितेमध्ये / गज़लमध्ये असे किती कंगोरे दडलेले असतात ? मग आजूबाजूच्या लिखाणातही बरंच काही असणार म्हणजे मीच तितक्या तन्मयतेने ते वाचत नाहीये का ? अश्या काही गोष्टी ती पोस्ट लिहीताना माझ्या मनात होत्या . आणि लिहून झालेल्या गज़लकार मित्रांना हा एक नवा angle द्यावा , कार्यशाळेचा उद्देश आणखी पुढे न्यावा असं वाटलं . लिहीताना लेखक नव्हे तर वाचक असण्याची प्रक्रिया फार अवघड आहे पण वर उल्लेखलेल्या दोन ज्येष्ठ कवींच्या रचनांमध्ये मला तेही सौंदर्य दिसतं . म्हणून फक्त वाचकाभिमुख लिहायचं का ? हा प्रश्न ह्या context मध्ये मला पडत नाही . ( आणखी एका चर्चेची शक्यता negate करतोय )
कार्यशाळेतल्या मित्रांशी काहीतरी crative discuss करण्याचा प्रयत्न होता . कुणी दुखावले असल्यास दिलगीर आहे . मी सर्वांना विनंती करतो की आपण सारे जण सुधीर च्या गज़ल चा आस्वाद घेऊ या . धन्यवाद
|
वैभव, विषय संपवला असलास तरी.. तू दिलगिरी व्यक्त करायचे काहीच कारण नाही. नमतं कोणापुढे नी किती घ्यावं? अरेरे! वैभव, मी तुला पाहिलेले नाही. आज पहाटे केलेलं पोस्ट सकाळी एडीट केलं होतं. चूक दुरुस्त करत आहे. सकाळी वाटले आपणही जर असे कुचके उपरोधीक बोललो तर फरक काय? आणि शिवाय 'आपण का मधे पडा' हा सवयीचा मिडिऑकरपणा होताच.. पण वरती रसिकांनी बाणेदार व्हायचे दिवे घ्यावेत हा सल्ला सर आखोंपर घेऊन आगाउपणा करत आहे. क्षमस्व नाही. डिलीट केलेली पोस्ट.. स्वाती मी तुला पाहिले असते तर गज़ल अजून आवडली असती. मुळात बाळगज़लकार काय, प्रस्थापीत गझलकर काय अगदी कोणीही आनण्द झाल्यावर स्वताःला अगदी मोर समजून नाचला तर काय हरकत आहे? आणि चार शिंतोडेच काय नुसत्या आभासानेही स्वताःला मोर समजून नाचता येऊ शकतं.. तुम्ही बघू नका, सहभागी होऊ नका. काय उथळपणा आहे म्हणून सोडून द्या. परिपक्व माणसं असच करतात म्हणे. सुगंध डायरेक्ट स्त्रोताकडून आहे की मार्केटेड बाय आहे याचा कीस पाडण्यापेक्षा सुंगंध आला.. छान वाटला.. सामान्य वाटला.. फक्त इतके व्यक्त होऊ शकत नाही? आणि एखाद्या चांगल्या रचनाकाराकडून साधी सामान्य रचना आलीच तर त्याच्याकडून गुन्हा घडल्यासारखे.. बाकीच्यांना ती रचना का आवडावी.. यावर किती विच्छेदन? तुम्हाला एखादी रचना आवडली नाही आणखीन कुणाला आवडली. फक्त एवढं सोपं नाही का हे? बैरागी.. लागले न झाडांना.. म्हणून नवीन गज़लकारांची आणि त्यांच्या अभिव्यक्तीला आकार देऊ पाहाणार्या सगळ्यांची अशी हीन थट्टा(खुपच प्रेमळ शब्द आहे) का करता? बाकी तुमच्यासारखा, सगळ्या गज़लकरांना ATTITUDE असता तर या जन्मात गज़ल लिहायचा प्रयत्न आमच्या सारख्या सामान्य माणसांकडून झाला नसता. भाग्य आमचं. बाणेदारपणाचे दिवे दिल्याबद्दल प्रचंड आभारी आहे. मेघा
|
well said megha !!!!
|
Bairagee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 12:59 pm: |
| 
|
मेघधारा, तुमच्या काही मुद्द्यात जरूर तथ्य असू शकते. मला काय म्हणायचे होते ते एकंदर कुणाला कळले नसल्यास दुर्दैव आहे. मला जे काही बोलायचे होते (मोर वगैरे) ते काहींना कळले असावे, अशी दाट शक्यताही वाटते. वैभव, दुश्मन चे कुनद गर दोस्त मेहेरबान बाशद कुणाची बाजू घेऊन भांडणे मला आवडत नाही आणि कुणी माझी बाजू घेतलेलीही आवडत नाही. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. तुम्हा सर्व गझलकारांना शुभेच्छा.
|
Lalu
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:35 pm: |
| 
|
हुश्श! बैरागी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी इथे जे लिहायला आले ते वरती संघमित्रा ने लिहिले आहे आधीच. >>बैरागी तुम्ही लिहीताय ते मला समजले आणि without context वाचले तेंव्हा पटलेही. पण एक सांगू का, तुम्ही हे सगळं चुकीच्या जागी लिहीलंत. (इथे तुमची बाजू वगैरे घेत नाही हां.. ~d ) स्वाती, गज़ल अजून वाचलीच नाही. ~D
|
Me_anand
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:21 am: |
| 
|
स्वाती, खुपच छान प्रयत्न... एकच वाटत ते स्पष्ट बोलतो... गझलचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असावी असं म्हणतात. मी काही गझलचा जाणकार नाही.. पण बहुतेक वैभव ने कविवर्य बोरकर आणि कविवर्य सुरेश भट यांच्याबद्दल जे लिहीलय त्याच खर मर्म यातच असेल... बाकी तुझ्या कविता सुरेखच असतात... पण ही गझल त्या उंचीपर्यंत जात नाही अस उगाच वाटत... ही प्रतिक्रीया एक रसिक म्हणून दिलेली समजा कारण मी नक्कि काय कमी आहे ते सविस्तर सांगू शकणार नाही कदाचीत... ~ आनंद
|
|
|