मित्रांनो , सन्मीची गज़ल उशीरा आली नसती तर ............................ one of my favourites . ह्या गज़ल मधला चंद्रस्नाने चा शेर मला कार्यशाळेतला सर्वात जास्त आवडलेला शेर. संघमित्रा ऋतू येत होते , ऋतू जात होते मला काय ? मी माळरानात होते नकोसे जिणे वाकलेल्या कण्याचे कधी तप्त उन्मेष रक्तात होते खळाळून हासे नदी वाहताना कुणाचे उसासे प्रवाहात होते ? किती चंद्रस्नाने तुझ्या सोबतीने फुकाचे बहाणे उजेडात होते उधळलेस अर्ध्यातुनी मैफ़लीला अडकले जरी सूर प्राणात होते तुझा ध्यास , आशा तुझ्या मीलनाची वृथा गुंतले मी प्रपंचात होते
|
Zaad
| |
| Tuesday, March 27, 2007 - 5:26 am: |
| 
|
केवळ अप्रतिम!!! मतला प्रचंड आवडला!!!!
|
खळाळून हासे नदी वाहताना कुणाचे उसासे प्रवाहात होते ? वा! उधळलेस अर्ध्यातुनी मैफ़लीला अडकले जरी सूर प्राणात होते तुझा ध्यास , आशा तुझ्या मीलनाची वृथा गुंतले मी प्रपंचात होते हे तीन शेर खूप आवडले! किती चंद्रस्नाने तुझ्या सोबतीने फुकाचे बहाणे उजेडात होते - हा शेर डोक्यावरून गेला. कोणीतरी दाखवा उलगडून!
|
Daad
| |
| Tuesday, March 27, 2007 - 5:39 am: |
| 
|
सन्मी, अतीव सुंदर. मतल्यातला सहजपणा प्रचंड आवडला. मक्ताही थोर आहे.
|
Psg
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:00 am: |
| 
|
सन्मी! काय सही गजल.. प्रत्येक शेर सही झालाय.. अर्थवाही आहे.. कमीतकमी दोनदा तरी प्रत्येकजण वाचेल अशी गजल! मक्ता मस्त!
|
Desh_ks
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:07 am: |
| 
|
एकापेक्षा एक सरस शेर आहेत! मक्ता तर फारच फारच सुंदर आला आहे, आणि मतला ही. मुद्दाम उल्लेख करायचा म्हणून पाहिलं तर सारेच शेर त्याच दर्जाचे! तरीही नकोसे जिणे वाकलेल्या कण्याचे कधी तप्त उन्मेष रक्तात होते खळाळून हासे नदी वाहताना कुणाचे उसासे प्रवाहात होते ? किती चंद्रस्नाने तुझ्या सोबतीने फुकाचे बहाणे उजेडात होते उधळलेस अर्ध्यातुनी मैफ़लीला अडकले जरी सूर प्राणात होते हे तीन विशेषच छान! आणि 'चंद्रस्नाने, फुकाचे बहाणे' यावरचं शायराचं विवेचन मिळू शकेल का? -सतीश
|
Mankya
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:19 am: |
| 
|
संघमित्रा ... अगदि समोर बसून म्हणल्यासारखं वाटलं, खूप बोलकी आणि सुंदर शब्दरचनेने अलंकृत अशी रचना ! खळाळून हासे नदी .. उसासे प्रवाहात .. हा ओघ जबरदस्तच ! चंद्रस्न्नाने ... रसग्रहण वाचायला आवडेल या शेराचं ! मक्ता ... व्यवस्थित शेवट केलास ! माणिक !
|
Desh_ks
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:20 am: |
| 
|
पीएस जी नं म्हटल्या प्रमाणे पुन्हा (आणि पुन्हा) वाचलीच जाते ही गज़ल आणि मग न राहवून आलेली ही प्रतिक्रिया खळाळून हासे नदी वाहताना कुणाचे उसासे प्रवाहात होते ? एकदा वाचताना आवडलेला हा शेर पुन्हा वाचताना वाटलं की 'खळाळून हसणं' आणि 'उसासे' हा विरोधाभास आहे; आणि मग पुन्हा वाचताना आठवलं 'तुम इतना क्यूं मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो' असं असणार ते चित्र! शायराची कल्पना काय आहे यातली? -सतीश
|
Bairagee
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:23 am: |
| 
|
संघमित्रा, फारच उत्तम प्रयत्न. काही शेर तर फारच चांगले. ऋतू येत होते , ऋतू जात होते मला काय? मी माळरानात होते वाव्वा. मतला फार चांगला निभावला आहे. बेश्ट. नकोसे जिणे वाकलेल्या कण्याचे कधी तप्त उन्मेष रक्तात होते ह्या दोन ओळींतल संबंध लागत नाही. मेहनत केली तर लागेलही. खळाळून हासे नदी वाहताना कुणाचे उसासे प्रवाहात होते ? वाव्वा!! साफ आणि मस्त. किती चंद्रस्नाने तुझ्या सोबतीने फुकाचे बहाणे उजेडात होते चंद्रस्नाने जरा कानाला खटकते. द्विपदी वा! किती चंद्र न्हाले तुझ्या सोबतीने फुकाचे बहाणे उजेडात होते हे कसे वाटेल? उधळलेस अर्ध्यातुनी मैफ़लीला अडकले जरी सूर प्राणात होते ह्मह्म. हा शेर अस्पष्ट वाटतो आणि त्यामागील तर्कशास्त्रही कळत नाही. तुझा ध्यास , आशा तुझ्या मीलनाची वृथा गुंतले मी प्रपंचात होते ह्मह्म. सरळ-सपाट. काही विशेष नाही. पुढच्या गझलेला शुभेच्छा. तुम्ही नक्कीच उत्तम गझल लिहाल. बैरागी
|
Jo_s
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:36 am: |
| 
|
संघमित्रा फारच छान गझल, वैभवशी एकदम सहमत.चंद्रस्नाने चा शेर अप्रतीम. आणि "खळाळून हासे नदी वाहताना" हाही आवडला.
|
Jayavi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:59 am: |
| 
|
आए हाए....... मार डाला रे! एकदम संघमित्रावाली गझल मित्रा.... अजूनही 'आतला पाऊस' ह्या तुझ्या कवितेतून बाहेर पडता आलेलं नाहीये गं गझल अप्रतिम झालीये. खळाळून हासे नदी वाहताना कुणाचे उसासे प्रवाहात होते ? किती चंद्रस्नाने तुझ्या सोबतीने फुकाचे बहाणे उजेडात होते हे सगळ्यात जास्त आवडलेले शेर...!
|
संघमित्रा फारच छान गझल! खळाळून हासे नदी वाहताना कुणाचे उसासे प्रवाहात होते ? क्या बात है!
|
खळाळून हासे नदी वाहताना कुणाचे उसासे प्रवाहात होते ? उधळलेस अर्ध्यातुनी मैफ़लीला अडकले जरी सूर प्राणात होते. वाहवावावावा!!!!! पुन्हा एकदा... आहाहा!! किती चंद्रस्नाने तुझ्या सोबतीने फुकाचे बहाणे उजेडात होते. अर्थ कळला नाही. उजेड पडला नाही डोक्यात. कुणी तरी सांगा ना. गझल अप्रतिम आहे
|
Bee
| |
| Tuesday, March 27, 2007 - 9:44 am: |
| 
|
शृंगारीक घाटातली आहे ही गझल! खूप आवडली पण २रा शेर गडबडला खरचं. आणि ते 'चन्द्रस्नान' हाच शब्द अधिक बरा वाटतो वाचायला. 'चंद्र न्हाले' असे जर केले तर अर्थात बदल होइल. मला एकसो सोला चांदकी रातेची आठवण झाली..
|
Nachikets
| |
| Tuesday, March 27, 2007 - 10:16 am: |
| 
|
संघमित्रा, खूपच सुंदर गज़ल. सगळेच शेर आवडले.
|
Lalu
| |
| Tuesday, March 27, 2007 - 1:40 pm: |
| 
|
संघमित्रा, सुंदर! आज दोन एकदम छान गज़ल वाचायला मिळाल्या. प्रसादची आणि तुझी. 'चन्द्रस्नान' सुंदर. दुसरा शेर मलाही खास वाटला नाही. (कळला नाही ) बाकीचे सगळे सुरेख! इतक्या गज़ल वाचल्यावर आता अजून काय नवीन कल्पना येणार असतील असं वाटतं, पण नाही... सुरेखच लिहितायत सगळे.
|
Yog
| |
| Tuesday, March 27, 2007 - 4:46 pm: |
| 
|
वाह! मस्त गझल.. पण अडकले प्राण सूरात अस हवय का?
|
सन्मी !!! किती चंद्रस्नाने... क्या बात है ! वा ! 'उसासे' ही सुंदर..
|
Supermom
| |
| Tuesday, March 27, 2007 - 5:18 pm: |
| 
|
संघमित्रा, अप्रतिम गजल. फ़ार आवडली ग. वैभव, 'उशिरा आली नसती तर...?' म्हणजे काय? उशिरा आलेल्या गजलही घेताय का? म्हणजे अजूनही पाठवता येईल का?
|
सुपरमॉम, गज़ल पाठवायची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी होती. तोवर आलेल्या प्रवेशिकांपैकी जी सर्वात चांगली ठरेल त्या गज़लेला बक्षिसे जाहीर झाली आहेत. सन्मीची त्यानंतर आली त्यामुळे इतकी चांगली असूनही दुर्दैवाने बक्षिसासाठी तिचा विचार करता येणार नाही.
|