|
Supermom
| |
| Tuesday, March 27, 2007 - 5:37 pm: |
| 
|
अच्छा, असे आहे होय. पण स्वाती, मी पुरस्कारप्राप्त लोकांची नावे वाचली नाहीत अजून. की अजून जाहीर व्हायचीच आहेत?
|
अजून सगळ्या प्रवेशिका पोस्ट झालेल्या नाहीयेत, आणि सर्वोत्तम गज़लची निवडही झालेली नाहीये. पण लवकरच होईल.
|
Milya
| |
| Tuesday, March 27, 2007 - 5:55 pm: |
| 
|
वा सन्मे सहीच... अगदी सराईत गज़ल आहे... उसासे, मैफ़िल आणि मक्ता खूप आवडले
|
सन्मित्रा.. अप्रतिम!!! नकोसे जिणे.. सही! पण वाचताना लय गडबड वाटते. चंद्रस्नाने.. इतकं प्रामाणीक! व्वा. मेघा
|
Paragkan
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:33 pm: |
| 
|
व्वा! बहोत खूब ...
|
Meenu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:18 am: |
| 
|
सन्मे मस्त गं ..!!
|
पहिलाच प्रयत्न गज़ल लिहायचा. तोही वैभवच्या उपक्रमामुळं. सगळ्यांचे खूप आभार वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल. बैरागी तुमच्या सूचना, शेरे अगदी मान्य. मला काय म्हणायचंय ते सांगते. २ रा शेर पूर्वी इतकं धडाडीनं जगलोय की आता हे असं वाकलेलं गलितगात्र जिणं नको वाटतंय. तारुण्यात काय काय करायची, जग बदलायची ताकद असल्यागत होतं. अशा माणसाला फार कठीण जातं म्हातारपण. लिहीताना अजून एक अर्थ मनात होता. की पूर्वीच्या पिढीने अतिशय नेटानं सर्वस्व वाहून देशासाठी, इतरांसाठी काम केलं. पण आत्ताची पिढी मात्र आपण बरे आणि आपलं काम बरं असं (कणाहीन ) धोरण स्वीकारते. ३ रा शेर नदी वाहतेय जोमाने खळाळून पण मग प्रवाहात उतरून नीट ऐकलं की जाणवणारे उसासे कुणाचे असतात? तिचे स्वतःचे असतील किंवा इतरांनी तिच्यात विसर्जलेली दुःखं असतील. अजून एक म्हणजे : लांबून एखादी गोष्ट छान वाटते म्हणून प्रत्यक्षात त्यात उतरलात की कळतं किती कष्ट आहेत ते. ४ था शेर हा मला वाटलं होतं सरळ समजेल तरी पण.. इतकी चंद्रस्नाने तुझ्या सोबत अनुभवली. पण दिवसाउजेडी मात्र तुझ्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस नव्हतं. अजूनही अर्थ आहेत. परत वाचले की आपले आपण लक्षात येतीलच. बी (शृंगारिक घाट कुठला बाबा? एवढा एकच शेर आहे तसा ) बैरागी: चंद्रस्नाने शब्दात वजन जरा जास्त होतेय ना. पण तो शब्द हवाच होता. मी बरेच घोळवले होते या शेराला मनात. चांदराती असाही एक शब्द सुचला होता. पण हा आवडला म्हणून रिस्क घेतली. (मयूर आता डोक्यात उजेड पडला असेल असे वाटतेय ) ५ वा शेर हा मला स्वतःला आवडलेला इतका जीव गुंतला असूनही एका क्षणात कसं सगळं संपवू शकलास? एवढंच सांगू शकते. ६ वा शेर शेवटचा शेर खरेच अगदी वैभवला पाठवायच्या आधी ५ मिनिटे सुचलेला. अगदीच ५ शेर म्हटलं की पाचच नको म्हणून तो ऍड केला. बैरागी: सपाट झालाय ना जरा. पण गुरुजींनी दिलेल्या व्याख्येप्रमाणे वेगवेगळे विषय हाताळायचे होते ना. मग शेवटी माझा आवडता cosmic flavor हवा म्हणून
|
Pulasti
| |
| Wednesday, March 28, 2007 - 6:24 pm: |
| 
|
संघमित्रा, सुंदर गझल! उन्मेष आणि मैफ़ल शेर खूप आवडले. "चंद्रस्नाने" शब्द वाचताना अडखळलो.. पण शब्द आवडत आवडत अडखळलो सानी मिसरा तू समजावल्यावर समजला. मक्ता कळला पण विशेष भावला नाही. पण मला सर्वात जास्त भिडले ते "उसासे"! वा.. अप्रतिम शेर!! -- पुलस्ति.
|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 8:51 pm: |
| 
|
ऋतू येत होते , ऋतू जात होते मला काय ? मी माळरानात होते किती ऋतू आले गेले तर काय? माळरानात कायसा फरक पडणार? कितीही वातावरण बदलले तरी स्वत:ला बदलण्याची गरज नाही, हे मतल्यातून 'ठसक्या'त व्यक्त झाले आहे. नकोसे जिणे वाकलेल्या कण्याचे कधी तप्त उन्मेष रक्तात होते मिंधेपणाचे जगणे वाटेला आल्यावरचा संताप व्यवस्थित प्रकटला आहे. खळाळून हासे... हा शेर उपरोधिक वाटला, पण पटला नाही. चंद्रस्नाने! Extreme शृंगारिक!! एका क्षणात चांदण्या रात्रीत फिरुन आले मी. चांदराती, हा शब्द पण छान आहे. चॉकलेटच्या जपुन ठेवलेल्या चंदेरी कागदासारखा! उधळलेस अर्ध्यातुनी मैफ़लीला अडकले जरी सूर प्राणात होते शृंगाराकडुन एकदम अध्यात्माकडे transit सही जमली आहे. आवडीचा पदार्थ लवकर संपु नये असेच वाटत राहते. पण मोहाला पाठ दाखविणे हे स्वत:ला जिंकल्याचेच लक्षण. फार सुंदर आहेत ह्या ओळी. तुझा ध्यास, आशा-तुझ्या मीलनाची वृथा गुंतले मी प्रपंचात होते कोठे भेटेल तो मानसरोवर हंस? एकदा परमार्थाची जायची वाट स्पष्ट दिसली की प्रपंचच वृथा भासला! वाह. सन्मी, you Rock! . लयी लयी आवडेश.
|
Ashwini
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:25 am: |
| 
|
संघमित्रा, सुरेख जमली आहे गझल. सगळेच शेर आवडले.
|
Saavat
| |
| Thursday, March 29, 2007 - 3:04 pm: |
| 
|
संघमित्रा, उधळलेस अर्ध्यातुनी मैफ़लीला अडकले जरी सूर प्राणात होते तुझा ध्यास , आशा तुझ्या मीलनाची वृथा गुंतले मी प्रपंचात होते अरे वा! 'भाव' वळले! कार्यशाळेच्या गझलकारापैंकी 'कोणीतरी' हा 'भाव' शब्दात पकडावा अस वाटत होत, ते तुम्हांला बरोबर साधल! एकदम खूश!! अनेक धन्यवाद!
|
|
|