|
Avikumar
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:57 pm: |
| 
|
मला वाटते, श्यामलीला 'जोगिया'च अभिप्रेत आहे इथे. जोगिया हे गाण्यातल्या एका रागाचे नाव आहे. माझे उसासे, पण तुला वाटले की मी गाणेच गात आहे. हे झाले माझे विचार. बाकी, श्यामली आणि जाणकार क्लिअर करतिलच.
|
Ashwini
| |
| Thursday, March 08, 2007 - 3:09 pm: |
| 
|
अहाहा श्यामली, सुरेख. 'हार डावात' आणि 'प्राण देहात' फार सुंदर जमलय.
|
Maitreyee
| |
| Thursday, March 08, 2007 - 3:15 pm: |
| 
|
माझ्या मते जोगिया आणि लांघून या दोन्ही शब्द्प्रयोगात काहीच चूक नाहिये. छान आहे गझल, श्यामली, शेवट खास!
|
Lalu
| |
| Thursday, March 08, 2007 - 3:56 pm: |
| 
|
श्यामली, वा! मस्त आहे गं. मीनू, गजलेचा नाही, शेराचा चिवडा.
|
Shyamli
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:36 pm: |
| 
|
बापरे एवढा उदंड प्रतीसाद भरुन आल्यासारख झालय मला. सर्वप्रथम गुरुजनांना चरणस्पर्श ज्यांच्या प्रोत्साहनाशीवाय हे शक्यच नव्हतं धन्यवाद दोस्तहो मन: पूर्वक धन्यवाद चीन्नु, ते पुन्हा पुन्हा साठी पुन्हाच हव नै का? असा, तसा नी हवातसा परिणाम नव्हता साधला जात ग. परीच्या बाबतीत हा शब्द दोन्ही त-हेनी लिहीता येतो मयुर, अविकुमार यांनी अर्थ स्पष्ट केलाय कळला असेलच चक्रपाणी, मला अभिप्रेत असलेला "जोगिया" एक राग आहे जो करुणरसप्रधान आहे (आता बरोबर आहे ना?) धन्यवाद अविकुमार मी आनंदयात्री ,लांघून बद्दल मीही जराशी साशंक आहे शब्दकोशात लंघून असाच शब्द आहे पण मला लांघून सुध्दा बरोबर असेल असं वाट्तय उदा:- पंगु लांघती.... सारंग जरा सांगणार का?
|
Shyamli
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:38 pm: |
| 
|
Mod_10, ५ व्या शेरातली ओळ का हो तोडली जोडता येत असेल तर जोडा ना please 
|
Chinnu
| |
| Thursday, March 08, 2007 - 7:02 pm: |
| 
|
श्यामली, पुन्हाच्या बाबतीत मलाही सन्मीचं आणि "पुन्हा" तुझं म्हणणं पटलं बरं! लांघून हा शब्द मला तरी बरोबर वाटला. जोगियावाला शेर आधी समजला नव्हता. धन्यवाद.
|
ज़ोगियाबद्दलचे माझे अज्ञान दूर झाले. धन्यवाद आणि शुभेच्छा.
|
Jo_s
| |
| Friday, March 09, 2007 - 3:41 am: |
| 
|
श्यामली छान आहे गझल हे दोन शेर जास्त आवडले पुन्हा खेळ झाला उन्हापावसाचा पुन्हा साठले नीर डोळ्यात होते उसासा जरा वेस लांघून गेला तुला वाटले जोगिया गात होते
|
Bee
| |
| Friday, March 09, 2007 - 3:42 am: |
| 
|
श्यामली, गझल खूप छान आहे. खास करुन शेवट आवडला.
|
Jayavi
| |
| Friday, March 09, 2007 - 4:02 am: |
| 
|
श्यामली....... अगं काल मला नेट लागलंच नाही गं... म्हणून आज बघतेय तुझी गझल. अ प्र ति म!!!!!!!!!!!!!!!!! दुसरे काही शब्दच नाहीत. अतिशय ताकदीची गझल लिहिली आहेस श्यामली. प्रत्येक शेर अगदी मनापासून आलाय आणि तसाच तो अगदी आतपर्यंत पोचतोय. पुन्हा खेळ झाला उन्हापावसाचा पुन्हा साठले नीर डोळ्यात होते उसासा जरा वेस लांघून गेला तुला वाटले जोगिया गात होते कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू? कशी हार प्रत्येक डावात होते? अता स्पंदनांचे उगा दाखले का? तसेही कुठे प्राण देहात होते? Terrific!!!!!!!! तू स्वत:ला खूपच underestimate करतेस..... खरं तर तू अंगावर काटा फ़ुलवणारं लिहतेस. जबरदस्त वजन आहे तुझ्या शब्दांना. सलाम.....तुझ्या कल्पनेला आणि तुझ्या शब्दांना.... 
|
क्षमा! सारंग च्या आधी मीच मधे बोलतोय... श्यामली, "लन्घ्" हा मूळचा संस्कृत धातू आहे - (१० वा गण, उभयपद), हे तुला माहितच असेल. "मूकं करोति वाचालम् पंगु लङ्घयते गिरिम्" किंवा "प्रयत्नेन धीरा: गिरिं लङ्घयन्ति"(हे सुभाषित ८वी मध्ये होतं )असे श्लोक ही आहेत... ओलांडून जाणे या अर्थी मराठीत लंघणे असाच शब्द आहे, असं मला वाटतं... अर्थात, त्यामुळे गज़लेचा अर्थ बदलत नाही...
|
Sarang23
| |
| Friday, March 09, 2007 - 5:15 am: |
| 
|
लांघणे हे लंघणे या शब्दाचेच एक रूप आहे. मुळ संस्कृत शब्दावरून मराठीत लंघणे हा शब्द आला आणि नंतर त्याचे अपभ्रंशीत रूप प्रचलीत झाले... लांघणे. त्यामुळे लांघणे हा शब्द बरोबर आहे. गमतीशीर गोष्ट अशी की ओलांडणे या शब्दाची उत्पत्तीही उल्लंघन या मुळ संस्कृत शब्दावरूनच झाली जो लांघणे ला समानार्थी आहे! आणि आता ओलांडणेच जास्त प्रचलीत आहे! लंघन फारच कमी वापरला जातो. लंघन हा शब्द दुसर्या अर्थाने फार प्रचलीत आहे... उपवास या अर्थाने!
|
Shyamli
| |
| Friday, March 09, 2007 - 5:28 am: |
| 
|
म्हणजे दोन्हीही बरोबर आहे धन्यवाद मी आनंदयात्री,सारंग
|
Zakasrao
| |
| Friday, March 09, 2007 - 6:03 am: |
| 
|
एकसो एक गजल वाचायला मिळत आहेत. छान आहे गजल. पण रसग्रहण करणारे जाणकार नाहीत का? अरे करा ना कोणीतरी म्हणजे कस अजुन कळते गजल.
|
Bee
| |
| Friday, March 09, 2007 - 6:18 am: |
| 
|
सीमोलंघन करणे म्हणजे सीमा पार करणे. उल्लंघन करणे म्हणजे मोडणे, ओलांडणे जसे नियमांचे उल्लंघन करणे. लंघण म्हणजे ओलांडणे किंवा पार करणे. लांघणे हे लंघणेचे अपभ्रंशीत रुप असू शकते.
|
Bee
| |
| Friday, March 09, 2007 - 6:23 am: |
| 
|
लंघनचा आणखी एक अर्थ उपास देखील होतो. काहीही न खाणे म्हणजे आज मी लंघण केले असे म्हंटले जाते. फ़रक इतकाच की उपवास देवासाठी केला जातो. लंघन प्रकृतीसाठी केले जाते.
|
Sarang23
| |
| Friday, March 09, 2007 - 1:06 pm: |
| 
|
बी... तो उपवास मी उपासमारी या अर्थानेच वापरला आहे रे... देवासाठी उपवास करताना उपासमारीची काहीच गरज नसते... आता या प्रत्येक गोष्टीच्या existence बद्दल भरपूर बोलता येईल, पण ही ती जागा नाही. पुर्वीच्या हुषार लोकांनी पोटाला आराम मिळावा म्हणून उपवासाची चाल रुढ केली. सिमोल्लंघन म्हणजे सिमा पार करणे चूक. सिमोल्लंघन म्हणजे सिमेची सिमा(मर्यादा किंवा रेषा) ओलांडणे उल्लंघन करणे म्हणजे मोडणे, ओलांडणे चूक. नुसत्या उल्लंघनाचा अर्थ म्हणजे सिमोल्लंघन. मर्यादा(सिमा) ओलांडणे. बी, माझ्याच पोस्ट तोडून मोडून चुकीच्या लिहिण्यामागचे प्रयोजन कळाले नाही ...
|
Bee
| |
| Friday, March 09, 2007 - 5:03 pm: |
| 
|
सारंग, माझी वरील post तुझ्या post वरुन आलेली नाही. सिमोल्लंघन बद्दल तू वर कुठे काही बोललास का? नाही ना पण मी बोललो तेंह्वा तुझी आणि माझी पोष्ट निराळी आहे.. सिमेची सिमा पार करणे ही जरा अतिशयोक्ती झाली असे वाटते. जसे की you are next to impossible हे जरी म्हणायला बरे वाटते तरी त्याचा काही अर्थ निघत नाही. because impossible says it all, no need to say next to impossible म्हणून सिमा पार करणे इतकाच अर्थ मला बरा वाटतो.
|
Shyamli
| |
| Saturday, March 10, 2007 - 3:52 am: |
| 
|
या शब्दासाठी बरीच वणवण केली तेंव्हा हा शब्द, शब्द रत्नाकर मधे लंघून असाच आहे मग हा "लांघून" असा शब्द बरोबर कसा म्हणायचा ? आणि "लंघून" केलं इथे, तर मात्रा चुकतल का?
|
|
|