|
श्यामली, अप्रतिम गज़ल! लांघुन या शब्दात काहि गैर नाही. हा शब्द बरेच कथांमधुन वाचल्याचे स्मरते. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
|
Desh_ks
| |
| Saturday, March 10, 2007 - 6:40 am: |
| 
|
श्यामली, 'लंघून' बद्द्ल माझंही थोडंसं 'लंघून' या शब्दात एक अगतिकता आहे, सहजता आहे. एखादं भांडं पाण्यानं पूर्ण भरून ओसंडून जावं तसं माझ्या मनात दु:ख मावेनासं झालं तेव्हां नकळत उमटलेला हा उसासा किती सुंदर शब्द आहे त्यात दु:ख, असहायता, निराशा, अगतिकता सारंच व्यक्त झालंय. आणि 'लांघून' या शब्दाचा अर्थ जरी 'ओलांडून जाणं' असाच असला तरी त्यात एक सहेतुकता, व्यक्त होण्याचा प्रयत्न आहे असा भाव येतो असं मला वाटतं. आणि तुमच्या त्या सहजसुंदर शेरात म्हणूनच 'लंघून' अधिक समर्पक होईल अशी माझी कल्पना. 'तुला वाटले जोगिया गात होते' यात माझ्या अगतिक, सहज बाहेर पडलेल्या उसाशाला तू 'दाखवलेलं' दु:खच समजलास ना? असा भाव आहे असं मला प्रतीत झालं, म्हणून हे सारं मांडलं. आणि 'लंघून' असं लिहिण्यात मात्रांचीही काहीच चूक नाही. इतक्या सुंदर शेराबद्द्ल पुन्हा अभिनंदन!
|
Athak
| |
| Saturday, March 10, 2007 - 7:36 am: |
| 
|
माशा _ ए _ अल्लाह बहोत खुब बहोत खुब ऐसेही और शेर जनम लेते रहे आपकी कलमसे
|
Dineshvs
| |
| Saturday, March 10, 2007 - 4:06 pm: |
| 
|
श्यामली, छान जमलीय. माझ्या आठवणीप्रमाणे, तु पहिल्यांदाच असे काहि वृत्तात वैगरे लिहिले आहेस. तुझ्या वतीने, जोगिया बद्दल चार शब्द लिहु का ? जोगिया हा एक आर्त राग आहे. भीमसेन जोशींचा, पिया मिलनकि आस, बहुतेकानी ऐकला असेलच. निदान वद जाऊ कुणाला शरण हे नाट्यगीत तरी परिचयाचे असेलच. आणि लताचे भेटीलागे जीवा. या सगळ्या रचनेतुन, हा राग छानच खुललाय. गदिमांची जोगिया नावाची एक कविता होती. घरकुल सिनेमात ती सी रामचंद्राच्या चालीवर, फ़ैयाजने गायलीय. ( तिचे नंतर एक रडगाणे स्वरुप देखील बाजारात आले. ) पण फ़ैयाजचा खर्जातला आवाज, प्रत्येक शब्दाला दिलेला न्याय आणि तालवाद्य न वापरता दिलेली मोजक्या नाजुक वाद्यांची साथ, यामूळे ते गायन खुपच परिणामकारक झाले होते. मी काहि ओळी लिहिल्या तर जास्त चांगले होईल नाही का ? कोन्यात झोपली सतार, उतरला रंग पसरली पैंजणे, सैल टाकुनी अंग दुमडले गालिचे, तक्के झुकले खाली तबकात राहिल्या, देठ, लवंगा, साली
|
Milya
| |
| Saturday, March 10, 2007 - 7:14 pm: |
| 
|
सिमा का सीमा माझ्यामते सी दुसरा आहे मग सीमोल्लंघन का सिमोल्लंघन?
|
अता स्पंदनांचे उगा दाखले का? तसेही कुठे प्राण देहात होते?>>>>> आणि तो जोगिया... श्यामले पाय कुठे तुझे.. काय सुरेख लिहिले ग...!!!! वा वा.. काय दाद द्यावी.. आणि कशा कशाला...
|
Pendhya
| |
| Saturday, March 10, 2007 - 8:20 pm: |
| 
|
श्यामले, बोहोत खूब! छानच केलियेस गजल. शेवट तर फ़ारच छान.
|
Shyamli
| |
| Sunday, March 11, 2007 - 4:25 am: |
| 
|
धन्यवाद मंड्ळी दिनेशदा, हो वृत्तबद्ध लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न हा मिल्या, सी, दुसराच (आता शब्द तपासून बघायची सवय लागली )
|
Pulasti
| |
| Tuesday, March 13, 2007 - 3:56 am: |
| 
|
श्यामली. फार छान गझल. अभिनंदन!! सर्वच शेर आवडले! मक्ता तर ("अ"ता असूनही) हेलाऊन गेला. यातला पहिला मिसरा असा केला तर - "कशाला उगा दाखले स्पंदनांचे" -- पुलस्ति.
|
Bairagee
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:17 am: |
| 
|
'लांघना' हे हिंदी क्रियापद/धातू आहे. मराठीत 'लांघणे' वापरत असल्यास ते मराठीवरील हिंदी प्रभावाचे एक उदाहरण असावे. 'लंघून' आणि 'लांघून' दोहोंच्या मात्रा समान आहेत. त्यामुळे 'लंघून' वापरावेसे सुचवावेसे वाटते. मिल्या, सीमोल्लंघन बरोबर . दिनेश फैय्याज उत्तम गायिका 'होती' हे त्या गाण्यामुळे कळते. माझे एक आवडते गाणे आहे.
|
Shyamli
| |
| Wednesday, March 14, 2007 - 3:45 am: |
| 
|
गझल आवडली आणि अभ्यासपूर्वक अभिप्राय दोन्हीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद पुलस्ति १ली गझल आहे तेंव्हा एवढी सुट घ्यायला(द्यायला) हरकत नसावी ना! पण पुढल्या गझलच्यावेळेला मात्र मी हे नक्की लक्षात ठेवीन. बैरागी, "लंघून" चा बदल बिनशर्त मान्य आपल्यासारख्या जाणकार लोकांनी वेळीवेळी मार्गदर्शन करत राहावं ही नम्र विनंती देशपांडॆजी, लांघून आणि लंघून च तुम्ही केलेलं विवेचन आवडलं, पटलं, धन्यवाद
|
Nalini
| |
| Wednesday, March 14, 2007 - 8:24 pm: |
| 
|
हाय श्यामली. तुझी ही गजल ऑरकुट ह्या संकेतस्थळावरील मैत्रिण ह्या सदरात (community मध्ये) मेघना नावच्या मुलीने टाकलिय. तिथे तुझ्या नावाचा कुठेच उल्लेख नाही. मी तिला तसा मेसेजपण पाठवलाय. तुही लक्ष घालशील. http://www.orkut.com/Messages.aspx?msg=U0027098074%2FIB%2F0973693981%2FU0054652842&fld=IB&debug=&na=1&nid=&nst=1
|
Meenu
| |
| Thursday, March 15, 2007 - 4:25 am: |
| 
|
वा श्यामली बाई मोठ्ठ्या कवी झाल्या म्हणजे आता ..
|
Shyamli
| |
| Thursday, March 15, 2007 - 9:03 am: |
| 
|
धन्यवाद नलीनी मेसेज टाकलाय मी तीला मीनु 
|
|
|