Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 08, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » श्यामली » Archive through March 08, 2007 « Previous Next »

Moderator_10
Thursday, March 08, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Provided by Vaibhav_joshi.

मित्रांनो, थोड्याच प्रयत्नांत निर्दोष झालेली आणखी एक गज़ल. कल्पना आणि शब्दयोजना दोन्ही छान साधलं गज़लकाराला.

श्यामली

ऋतू येत होते, ऋतू जात होते
मनाचे परी गाव ग्रीष्मात होते

पुन्हा खेळ झाला उन्हापावसाचा
पुन्हा साठले नीर डोळ्यात होते

उसासा जरा वेस लांघून गेला
तुला वाटले जोगिया गात होते

तशी मी कधी काय तक्रार केली
तुझ्याही कुठे काय हातात होते?

कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार प्रत्येक डावात होते?

अता स्पंदनांचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते?



Chinnu
Thursday, March 08, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुर्रे! मीच पहिली इथे! अलभ्य लाभ हा असा, ते ही श्यामलीची गजल. वा वा वा..
मतला छानच. (एक शंका आहे परि की परी?) दुसर्‍या शेरात, पुन्हाची द्विरुक्ती! अस केलं तर- असा खेळ झाला उन्हापावसाचा... आपलं विनम्र सजेशन हो! पाचवा शेर छान आणि स्पष्ट.
शेवटचा शेर अतिशय सुरेख!
अता स्पंदनाचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते?
सुंदर आणि सुंदर! :-)


Mankya
Thursday, March 08, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो श्यामली जियो .. वाह !
उसासा, नवा खेळ ... केवळ अप्रतिम शब्दरचना ...!!
मक्तेकु तो तहे दिल से सलाम करता है अपुन !

माणिक !


Mayurlankeshwar
Thursday, March 08, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक नंबर!! एकदम वन्टास!!
तिसरा शेर :-(
मक्ता(शेवटचा शेर?) झकास! :-)


Sarang23
Thursday, March 08, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! श्यामली क्या बात है!! ३ रा आणि शेवटचा विशेष आवडले

Mi_anandyatri
Thursday, March 08, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा श्यामली...

अता स्पंदनांचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते? ... भारी....

३ र्‍या शेर मधे "ओलांडून" हा अर्थ अपेक्षित आहे का?
मग माझ्या मते, "लंघून" योग्य आहे, "लांघून" नव्हे..


Bairagee
Thursday, March 08, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


श्यामली,
तुमची गझल चांगली आणि सफाईदार आहे.
मतल्यातला सानी मिसरा आतापर्यंत मला सर्वाधिक आवडलेला.

उसासा जरा वेस लंघून गेला
तुला वाटले जोगिया गात होते
वा!

तशी मी कधी काय तक्रार केली
तुझ्याही कुठे काय हातात होते?
वा! मस्त. लहजा फार आवडला.

कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार प्रत्येक डावात होते?
वा!

बरेचदा वेगळ्या, भारी कल्पना मांडून इम्प्रेस करण्याच्या नादात शेराचा चिवडा होता. तसे इथे बिलकुल झालेले नाही.

पुढच्या गझलेला शुभेच्छा.



Abhi_
Thursday, March 08, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली खूप सुंदर!! शेवटचा शेर खास!!! ..

Kandapohe
Thursday, March 08, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा खेळ झाला उन्हापावसाचा >>>>
पुन्हा साठले नीर डोळ्यात होते >>>>
अता स्पंदनांचे उगा दाखले का? >>>>
तसेही कुठे प्राण देहात होते? >>>>>
जबरीच!! :-)


Paragkan
Thursday, March 08, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुभानल्लाह .... क्या बात है! आपण तर या गज़लेवर फुल्ल फिदा!

Nandini2911
Thursday, March 08, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार प्रत्येक डावात होते?
..................
हे जाम आवडलं..... पटुन गेलं.


Psg
Thursday, March 08, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, छान आहे पूर्ण गजल :-)

(उगाच रडत होतीस :P )


Ganesh_kulkarni
Thursday, March 08, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शामलीजी,
गज़ल खुप छान आहे!

उसासा जरा वेस लांघून गेला
तुला वाटले जोगिया गात होते

क्या बात है!


Meenu
Thursday, March 08, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा गं श्यामले खासच !!! महीला दिन जोरात आहे की ....
कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार प्रत्येक डावात होते?

अता स्पंदनांचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते?

उसासा जरा वेस लांघून गेला
तुला वाटले जोगिया गात होते >>> हे तीनही शेर मस्तच ..

Meenu
Thursday, March 08, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझलेचा चिवडा>>> ..... ......

Sanghamitra
Thursday, March 08, 2007 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, अतिशय सुरेख. सगळेच शेर छान आहेत.
>> कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार प्रत्येक डावात होते?
खासच!
चिन्नू, पुन्हाची द्विरुक्ती दोन वेगवेगळ्या ओळीत झालेय. आणि ते छान वाटतेय ना वाचायला (मला तरी). :-)


Princess
Thursday, March 08, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले, बघितलेच नाही ग आज इकडे. त्या कथेच्या नादात आहे सध्या. .
एकदम झकास जमलीय. खरच उगीच रडत होतीस.
स्पंदनाचे दाखले वर जान कुर्बान. बहोत अच्छे.:-)


Chakrapani
Thursday, March 08, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,
गझल छानच झाली आहे. अभिनंदन! सगळेच शेर आवडले. त्यातही उसासा आणि तक्रारवाला शेर खूपच आवडला. 'उसासा'वाल्या शेराबाबत एक शंका अशी, की तिथे वापरलेला 'ज़ोगिया' हा शब्द ज़ोगवा मागणारे अगर मागणारी दर्शवत असेल, तर तो योग्य मराठी शब्द आहे का हे तपासून पहा. म्हणजे ज़ोगवा मागणार्‍यांना ज़ोगिया म्हणतात का? तसे असल्यास त्याचे अनेकवचन 'ज़ोगिया' आहे की 'ज़ोगिये'? कारण 'होते' क्रियापद असल्याने येथे अनेकवचन यायला हवे. तेव्हा तो शब्द तेव्हढा तपासून योग्य शब्दच येईल, हे बघा. तोच शब्द योग्य असेल, तर प्रश्नच मिटला :-)

या ज़ागी "ज़ोगवे" हा शब्द वापरल्यास कसे वाटेल?
उसासा ज़रा वेस लांघून गेला
तुला वाटले ज़ोगवे गात होते

हा शेर बाकी मस्तच आहे. पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.


Meghdhara
Thursday, March 08, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली..
तशी मी.. आणि कितीदा नव्याने.. व्वा!


Mi_abhijeet
Thursday, March 08, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधे पण प्रत्यय्कारी शब्द...
अचूक परिणाम साधतात...

कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार
प्रत्येक डावात होते?

अता स्पंदनांचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators