Meenu
| |
| Thursday, March 08, 2007 - 9:21 am: |
| 
|
कुणी चंद्र विश्वास तोडून जातो हसे चांदणीचे लिलावात होते ! >>> अप्रतिम सारंग ... !!! बाकी पुर्ण गज़ल सुंदरच ..
|
खरच खंत वेदना खोल आत जिरवून अशी सुंदरपणे शब्दात आणण्यासाठी काहीतरी जात्याच असलं पाहिजे.. सलाम.
|
Jo_s
| |
| Friday, March 09, 2007 - 3:59 am: |
| 
|
सारंगा आज खरी धम्माल आली. मस्त गझल. कुठला एक शेर सांगण अवघडच आहे. पण तरीही या "तरही" मधले हे शेर खास आवडले. किती हासरा भासलो बोलताना मनी माझिया मात्र आघात होते ! इथे तेच जाणून होते यशाला ; दिमाखात जे जे शिव्या खात होते ! अशा मोगलाईत जन्मास आलो कलम घेतले की कलम हात होते ! तुझे साफ चुकलेत अंदाज वेड्या इथे पावसाळे उन्हाळ्यात होते ! कसे बोचते सूख आताच त्यांना? कधी ते सुखाने व्यथा गात होते !
|
Desh_ks
| |
| Friday, March 09, 2007 - 4:01 am: |
| 
|
सुंदर! कुणी चंद्र विश्वास तोडून जातो हसे चांदणीचे लिलावात होते ! नको एवढा जीव लावू कुणाला युगांचे दिवाळे क्षणार्धात होते ! हे शेर विशेषच हळवे आहेत. अभिनंदन!
|
Sarang23
| |
| Friday, March 09, 2007 - 4:44 am: |
| 
|
धन्यवाद मित्रांनो! खूप खूप आभारी आहे... बैरागी... इथे 'कलम' साठी 'होते' खुपच पथ्यावर पडलय... पहा ना... पहिलं कलम न.लिंगी. ते कलम (ते पेन) तो पेन किंवा ती पेन अशी शंका तुम्हाला का आली ते माहीत नाही. आणि दुसरे कलम अनेकवचनीसाठी वापरले असल्यामुळे न.लिंगीच होते... 'दोन्ही हात कलम केले जातील' हे गृहीत आहे... मला खरतर या गोष्टींचा खुलासा करावा लागेल असं वाटत नव्हतं... संघमित्रा... कुणी चंद्र विश्वास तोडून गेला हसे चांदणीचे लिलावात होते ! इथे गेला बदलून तू मोठाच संभ्रम निर्मण केलास... तुला हा बदल का करावासा वाटला हेच मुळात मला कळले नाही. आता तिथे पहिल्या ओळीत जर गेला केलस तर खालच्या ओळीत होते ऐवजी झाले म्हणावं लागेल तरच काळ सगळीकडे सारखा राहील... मित्रांनो... इथे होते हा भूतकाळासाठी तसेच वारंवारीतेसाठी वापरला गेलाय... जसं की... आजकाल हे असंच होतं; चारचौघात हसचं होतं... इथे होतं (मी होतं ऐवजी होते असंही लिहु शकतो पण मग हसेच आणि असेच असं लिहावं लागेल...) ज्या अर्थी वापरला आहे त्याच अर्थी तो त्या चांदणीच्या शेरात वापरलाय आणि मोगलाईच्या देखील... वरती जो होते निळ्या अक्षरात ठळकवला आहे तो ही याच प्रकारातला... परत एकदा सर्वांचा खूप आभारी आहे...
|
सारंगा हो संभ्रम झाला खरा. मला चांदणीचे हसू लिलावात मांडले होते असे वाटले. तो "हसे होते" असा साधा वर्तमानकाळ आहे. ठीक आहे. मराठीत साधा वर्तमान आणि पूर्ण भूतकाळ यात ambiguity आहेच. पण एका गज़लेत सगळीकडे एकच काळ असला पाहिजे असे जरूरी नाही का? कारण माझाही हाच प्रॉब्लेम झालेला एका शेरात. जाणकारांनी खुलासा करावा. बरं मोगलाईच्या शेरात या अर्थी कुठे वापरलायस? तिथे हात कलम (होत) होते असे आहे ना. (फक्त होत या शब्दाची अनुपस्थिती जाणवतेय) वर्तमान नाहीये तिथे. नाहीतर कलम हात होतात असं होईल की ते.
|
Sarang23
| |
| Friday, March 09, 2007 - 7:15 am: |
| 
|
मोगलाईच्या शेरात होते वारंवारीतेसाठी येतो. हात कलम झाले होते नसून होत होते... आणि म्हणूनच हात अजूनही कलम होत असतील आणि होतात! या अर्थाने होते... लक्षात आलं का? आता एकाच गझलेत इतक्या सहजपणे येत असतील तर वेगवेगळ्या काळातले शेर आल्यास हरकत नाही. कारण इथे फक्त संभ्रम होते या शब्दाने साधलेला आहे. पण जर ते फरक ठळक दिसत असतील तर मात्र वाचताना flow जातोच... असं इथे अजीबातच होत नाहीये... तरीही, शक्यतो एकाच काळात गझल लिहीणे चांगले... पण नसेल तर तो गझलच्या दृष्टीने दोष होत नाही... बर्याचवेळा अशी गरज पडते खास करून रवानी गझलेमध्ये, जिथे वेगवेगळ्या काळांचा संदर्भ द्यावा लागत असेल तिथे हे चालते... दाग साहेबांच्या अशा काही रचना माझ्याकडे आहेत... finally माझ्या तरी वाचनात असा कुठेही नियम नाही की सगळे शेर एकाच काळात हवेत, पण वाचताना पकड सुटू नये म्हणून एकाच काळात लिहीणे उत्तम!
|
Bairagee
| |
| Friday, March 09, 2007 - 11:12 am: |
| 
|
सारंग, कलम घेतले की कलम हात होते ! तुमच्या ह्या मिसऱ्यात काळाची गडबड झाली आहे. व्याकरणाच्या (कवितेशी फारसा संबंध नसलेल्या) तज्ज्ञांकडून आणि कवितेच्या जाणकारांकडून (हे इंटरनेटवरील जाणकार नाहीत) विचारले आणि खातरजमा केली. कवीकडून दुरुस्तीपत्र यावे अशी अपेक्षा होती. म्हणूनच तुम्हाला कुठले कलम अपेक्षित आहे हे विचारले. तुमचा वरील मिसरा गृहीत धरून धरून त्याचे साधे वाक्य लिहिल्यास ह्या दोन शक्यता आहेत-- कलम घेतले की (माझे) हात कलम होतात कलम घेतले की (माझा) हात कलम होतो असे होईल. आता ह्याला तुमच्या शेरात टाकायचेच झाल्यास कलम घेतले की कलम हात होती किंवा कलम घेतले की कलम हात होतो असे होईल. "हात कलम झाले होते नसून होत होते... आणि म्हणूनच हात अजूनही कलम होत असतील आणि होतात! या अर्थाने होते... लक्षात आलं का?" हे जे तुम्हाला म्हणायचे आहे ते तुमच्या मिसऱ्यातून लक्षात येत नाही. दहादा तो मिसरा वाचला, दहादा इतरांना ऐकवला पण "कलम घेतले की कलम हात (होत) होते" ही अभिप्रेत वाक्यरचना आणि हा कंसातला "होत" कुणापर्यंतही पोचला नाही. एकदा "माझे", "तुझे" ह्यासारखी सर्वनामे गृहीत धरता येतात. पण क्रियापदांचे कसे? असो. चुभूद्याघ्या. कलोअ. बैरागी
|
Mankya
| |
| Friday, March 09, 2007 - 11:20 am: |
| 
|
बैरागी ... क्षमस्व मित्रा, मध्येच बोलतोय मोठ्यांच्या ! माझ्या अनेक मित्रांनी हि गजल वाचली ( ज्यांना मराठीत गजल असते याचा गंधही नाही, अर्थात मलाही थोड्या दिवसांपुर्वी कळलय, असो. ), त्यांना व्यवस्थित अर्थ कळला रे, अगदी मध्ये ' होत ' होते असे अलिखित आहे हे ही ! माणिक !
|
Sarang23
| |
| Friday, March 09, 2007 - 11:42 am: |
| 
|
बैरागी... सर्वप्रथम, जाणकार कुठलेही असोत. इंटरनेटवरचे किंवा इतर. ते जाणकार आहेत एवढी गोष्टच माझ्यासाठी पुरेशी आहे! ती मोगलाई अशी होती की तिथे बरेच काही होत होते. जो कुणी कलम घेईल त्याचे हातच कलम होते! अशी वाक्यरचना बरोबर वाटते आहे. आता यापुढे मी काय बोलू शकतो? तुम्ही दिलेल्या शक्यतांमध्ये हात शरीरापासून वेगळे होण्याची खूण आहे तर मी लिहिलेल्या शेरातील शक्यतेमध्ये "कलम झालेले हात होते" असा अर्थ आहे. "ज्या हातात कलम घेऊ ते हात कलम होते" आणि मग ओघानेच होत होते हे आलंच! असो चुभुद्याघ्या.
|
सारंग मी तेच म्हणत होते. बैरागी मला तरी तो कंसातला होत पोचतोय असं वाटलं. कारण सारंगने खुलासा करायच्या आधीच्या पोस्टमधे मी तेच लिहीलेय. त्या (होत) ची अनुपस्थिती जाणवतेय हे नक्की. पण तसे लिहील्याने एकच निश्चित अर्थ निघतोय. आणि गज़लेच्या जमिनीमुळे ही त्याला मदत होतेय. (जसे ऋतू येत होते आणि जात होते तसे हात कलम होत होते.) म्हणूनच एकच काळ सगळीकडे पाळावा का हे विचारले होते मी. सारंग तुझ्या लेटेस्ट पोस्ट मधे तू जी शक्यता लिहीलीयस तिच्यासाठी "कलम घेतलेले कलम हात होते" असे लिहावे लागेल.
|
Bairagee
| |
| Friday, March 09, 2007 - 12:20 pm: |
| 
|
सारंग, तुम्हाला तुमचे म्हणणे बरोबर वाटते आहे ना, मग प्रश्नच मिटला. कवीला नव्हत्याचे "होते" करण्याचा परवाना आहेच. शुभेच्छा. संघमित्रा, "कलम घेतलेले कलम हात होते" वा!तुम्ही सुचविलेला बदल अगदी योग्य आहे. आणि चांगला आहे.
|
मला ' होत' होते हा अर्थ अगदी व्यवस्थित कळला होता. त्यावरुन इतकी चर्चा झालेली पाहून खरंच नवल वाटलं. सन्मे, ' कलम घेतलेले' मधे ' कलम घेतले की' ची मजा नाही असं माझं मत. शिवाय त्यातही ' होत' अध्यारुतच येतो.
|
Sarang23
| |
| Friday, March 09, 2007 - 1:35 pm: |
| 
|
सन्मी, त्या छोट्याश्या बदलामुळे पुर्ण अर्थच बदलून जातोय. आणि तिथे 'होत' घेण्याची गरज अगदीच वाटत नाहीये असे नाही. बरोबर ना? नुस्तेच 'होते' म्हणजे आधीच झाले होते, पण होत असतीलही किंवा त्यामुळेच (म्हणूनच) पुढेही होतीलच ही शक्यता नाकारताच येत नाही. मुळात तो अध्यारुत 'होत' घेण्याची मला गरजच वाटत नाहीये! कुठेच. त्या बदललेल्या ओळीतही आणि मुळ ओळीतही. एकुण स्वातीच्या मताशी सहमत...
|
Chinnu
| |
| Friday, March 09, 2007 - 1:50 pm: |
| 
|
मी लहान तोंडी मोठा घास घेतेय खरी! पण पहिली ओळ पाहिली तर "अशा मोगलाईत जन्मास आलो" ह्या ओळीने काळाचे संदर्भच नाहीसे होतात. जे काही या पुढे येणार ते "त्या" मोगलाईस उद्धेशून आहे. ती मोगलाई भले आजच्या काळात असो, की भूतकाळात, गजलकार फ़क्त आपली व्यथा व्यक्त करतो कि अशा मोगलाईत जन्मलो, जेव्हा हातात कलम घेताच हात (आत्ता) कलम होत होते किंवा व्हायचेत(भूतकाळ धरला तर!). (ते) कलम घेतले की कलम (केले जाणे-क्रियापद) हात (दोन्ही हात या अर्थी!) होते! अतिशय सुंदर शेर आहे हा आणि बदलण्याची गरज नाही, अर्थात हे मला जे वाटले ते!
|
Bairagee
| |
| Friday, March 09, 2007 - 2:10 pm: |
| 
|
वरची चर्चा मनोरंजक तेवढीच उद्बोधकही आहे. "आंब्याचे कलम" किंवा "घटनेचे कलम"कवीला देखील अभिप्रेत असू शकते. आणि "आंब्याचे कलम घेतले की हात कलम (होत) होते असा तो काळ होता" असे कवीला म्हणायचे आहे की काय असे वाटून जाते. चूभूद्याघ्या.
|
Chinnu
| |
| Friday, March 09, 2007 - 2:15 pm: |
| 
|
बैरागी, इथे लेखणीच अपेक्षित आहे असे मला वाटते. पण जसं आपण ते दार आणि तो दरवाजा म्हणतो, तसच ती लेखणी असुनही ते कलम आहे, असे वाटते!
|
>>>> "आंब्याचे कलम" किंवा "घटनेचे कलम"कवीला देखील अभिप्रेत असू शकते. आणि "आंब्याचे कलम घेतले की हात कलम (होत) होते असा तो काळ होता" असे कवीला म्हणायचे आहे की काय असे वाटून जाते????? बैरागी, with all due respect , हे वाचून माझं उद्बोधन किंवा मनोरंजन यापैकी काहीच नाही झालं.
|
Bairagee
| |
| Friday, March 09, 2007 - 3:13 pm: |
| 
|
>>>बैरागी, with all due respect , हे वाचून माझं उद्बोधन किंवा मनोरंजन यापैकी काहीच नाही झालं. स्वाती, तुमचे मनोरंजन किंवा उद्बोधन झाले नसल्यास माझा नाइलाज आहे. दिलगीर आहे. Take it easy.
|
Raadhika
| |
| Friday, March 09, 2007 - 3:34 pm: |
| 
|
सारंग, तुमचा गझल खूप आवडले. बैरागी, तुम्हाला काय म्हणायचा आहे काही समजला नाही
|