|
बैरागीबुवांचा '(होत) होते' वरचा आक्षेप तितकासा पटला नाही. संघमित्रा यांची सुचवणी चांगली आहे.
|
बरीच चर्चा झाली इथे . माझ्याकडे जेव्हा सारंगची ही गज़ल आली तेव्हा सर्वात आवडलेला हा शेर . नंतर काही दिवस हा शेर मनातून हललाच नाही . साहजिकच खूप वेळा वाचल्याने , मनात ऐकल्याने एके दिवशी आणखी काही शोधण्याचा यत्न सुरू झाला आणि तिथे " होत " नाहीये हे लक्षात आलं . सारंगशी ह्या विषयावर विस्तृत बोलणं झालं . आज ही चर्चा वाचल्यानंतर मी हा शेर तर्हेतर्हेने लिहून पाहिला . पण शेवटी हेच लक्षात आलं की ती " होत " नसलेली त्रुटी त्या संपूर्ण शेराच्या आकर्षणापुढे काहीच नाही . हे माझं ह्या विषयावरचं फायनल मत . ऑलरेडी ह्या शेराने रात्रीचे अडीच वाजवले .
सारंग .. पुन्हा एकदा .. आत्तापर्यंत मला तुझी सर्वात जास्त आवडलेली ही गज़ल .
|
Manas6
| |
| Saturday, March 10, 2007 - 8:05 am: |
| 
|
'कलम हात होते'- समस्त चर्चा वाचली; एक म्हणावेसे वाटते-निर्दोष गझल लिहायला मदत करणे हे ह्या कार्यशाळेचे ध्येय आहे, आणि त्यात जसे मात्रा, वृत्त, लघु-गुरु ह्यांच्या नियमाचे बंधन अपेक्षित आहे तसे व्याकरणाच्या नियमांचे का असू नये? सारंग ह्यांच्या शेरातील आशय निर्विवाद सुंदरच आहे, पण मलाही पहिल्याच वाचनात तो खटकला होता, व्याकरण दृष्ट्या, म्हणुन मी तो दोनदा तीनदा वाचला, आशय लगेच कळला,आवडला पण व्याकरण खटकत होते.आणि केवळ आशय उत्तम आहे म्हणुन व्याकरणातील त्रुटी असल्या तरी चालतील,असे असू नये. उद्या कोणी म्हणेल माझा आशय उत्तम आहे, मला लघु गुरुच्या बंधनातून सुट द्या, मग कसे? आणि ह्या बाबतीत बैरागी ह्यांनी व्यक्त केलेल्या व्याकरण विषयक नियमांच्या आग्रहाशी मी सहमत आहे. सारंग, एक सुचवू का?.. तुझ्या शेरात जो आशय आहे त्यात एक खंत आहे विचार-स्वातंत्र्य नसल्याची, दडपशाहीची. ह्याही पुढे जाऊन तुझ्या शेरात असा बदल केला तर कसे? पुन्हा मोगलाईत घेतो कलम मी, जरी जाहलेले कलम हात होते!-- असे काहीसे ह्यात एक झुंजार, उसळुन येण्याची कविची वृत्ती तर दिसतेच, पण व्याकरणाचा प्रश्न सुद्धा सुटतो ना! शिवाय विरोधाभासामुळे अजून एक पैलू! चर्चेसाठी घेतलेले हे 'कलम' आता इथेच 'कलम' केलेले बरे!...हा हा! -मानस६
|
मानसराव, ल-ग क्रम आणि रदीफ़,काफ़िया इत्यादी हे गझलेचा आकृतीबंध ठरवतात. त्यांची बंधनं पाळली नाहीत, तर गझल ही तांत्रिकदृष्ट्या 'गझल' राहणार नाही. त्यामुळे ती पाळायलाच हवीत. पण भाषिक व्याकरणदृष्ट्या केला ज़ाणारा अडेलतट्टूपणा हा शेरातील कल्पना, आशय आणि एकूणच सौंदर्य यांना मारक ठरणार असेल, तर त्याला काही अर्थ आहे का? अहो वेळ आलीच, तर अलामतीची सूटही घेतोच ना आपण? ती तर चक्क गझलेच्या व्याकरणातच घेतलेली सूट आहे. उच्चारणानुसारही 'सुद्धा'चा उच्चार 'सुधा' असा होत असेल, 'मध्ये'चा उच्चार 'मधे' असा होत असेल, तर सु, म हे तांत्रिकदृष्ट्या गुरू असूनही लघु पकडण्याची सूट आपण घेतोच! का? तर शेरातील आशय, सौंदर्य, कल्पना यांना प्राधान्य आहे आणि ते वाचकांपर्यंत पोचावे म्हणून! मग असे असताना आणि ज्या 'कलम (होत) होते' विषयी इतका गहज़ब झालाय त्यातली कल्पना प्रधान असताना व्याकरणाच्या बाबतीतला कर्मठपणा निवळावा, असे मला वाटते. वाक्य व्याकरणदृष्ट्या पूर्णच चुकीचे असते, तर इतक्या वाचकांना त्याचा ज़ो अर्थ लागलाय, तो सुद्धा लागला असता, असे मला वाटत नाही (माझ्या स्वत:च्याच बाबतीत बोलायचे झाले, तर मलाही त्या ओळीचा अर्थ नीट लागला होता). मग अशावेळी '(होत) होते' मधले कंसातले 'होत' अध्याहृत असले, तर कुठे बिघडले? बैरागीबुवांच्या व्याकरणविषयक आग्रहाविषयी मुळीच तक्रार नाही, भाषिक व्याकरणविषयक शुद्धता हवीच. पण या आग्रहाचा 'दुराग्रह' होऊ नये, असे नेहमीच वाटते. असो. या बाबतीत अधिक काही बोलू शकेन, असे वाटत नाही, तेव्हा इथेच थांबलेले इष्ट!
|
Bairagee
| |
| Saturday, March 10, 2007 - 2:51 pm: |
| 
|
" 'कलम हात होते'- समस्त चर्चा वाचली; एक म्हणावेसे वाटते-निर्दोष गझल लिहायला मदत करणे हे ह्या कार्यशाळेचे ध्येय आहे, आणि त्यात जसे मात्रा, वृत्त, लघु-गुरु ह्यांच्या नियमाचे बंधन अपेक्षित आहे तसे व्याकरणाच्या नियमांचे का असू नये?" Manas you've hit the nail on the head. मला नेमके हेच म्हणायचे आहे. "अहो वेळ आलीच, तर अलामतीची सूटही घेतोच ना आपण? ती तर चक्क गझलेच्या व्याकरणातच घेतलेली सूट आहे. उच्चारणानुसारही 'सुद्धा'चा उच्चार 'सुधा' असा होत असेल, 'मध्ये'चा उच्चार 'मधे' असा होत असेल, तर सु, म हे तांत्रिकदृष्ट्या गुरू असूनही लघु पकडण्याची सूट आपण घेतोच! का?" चक्रपाणी, ह्या सुटी घेतल्याने मराठी व्याकरणाला धक्का पोचत नाही. सारंगने जाणूनबुजून तो मिसरा तसाच ठेवला असेल पण चुकीचे व्याकरण राबवून गझल लिहिण्याचा पायंडा पडायला नकोच. उद्या असे मिसरे लिहिण्याचे पेवच फुटेल. निदर्शनास आणून दिल्यावर, "नाही, नाही त्या मिसऱ्यात ते (होत, नाही, येत जावे, यावे वगैरे) अध्याहृत, गृहीत आहेच." असे गझलकार म्हणतील. आणि समर्थनार्थ २० वाचकांची फौज असेलच.कवी भाषा घडवत असतात पण भाषा जपण्याची ज़बाबदारीही त्यांच्यावरच आहे. शेवटी कवी शब्दांचे ईश्वर आहेत. सारंगने याहून चांगल्या गझला केलेल्या आहेत. त्याची ही गझल ठीक आहे. बोटचेपेपणा, "लोकप्रियता"प्रियता, कंपूशाही आणि इतर ( ) गोष्टी सत्य स्वीकारताना आड येतात असे दिसते. ह्यापुढे ह्या विषयावर काही बोलणे नाही. कलम बंद. बैरागी
|
चुकीचे व्याकरण राबवून गझल लिहिण्याचा पायंडा पडायला नकोच, हे बैरागीबुवांचे म्हणणे पूर्ण पटले. येथे केवळ अशी सूट घेण्याबाबत माझे मत मांडले आहे आणि कल्पनाप्रधानतेचा बळी घेण्याइतपत कर्मठपणा व्याकरणाच्या दुराग्रहापोटी ज़ोपासायला नको, हे म्हटले आहे. त्यासाठी एखादवेळेस सूट ज़रूर घ्यावी. ज़ाणूनबुज़ून चुकीचा पायंडा पाडण्याइतक्या सवलती 'जस्ट फ़ॉर द सेक ऑफ़ इट' कोणी घेत असेल असे मला तरी आढळलेले नाही आणि त्यासाठी कोणी इच्छुक असेल, असेही वाटत नाही (निदान मी तरी नाही ) बाकी कवी शब्दांचे ईश्वर वगैरे आहेच. असो. बोटचेपेपणा, "लोकप्रियता"प्रियता, कंपूशाही आणि इतर गोष्टी सत्य स्वीकारताना आड येतात असे दिसते. ह्यापुढे ह्या विषयावर काही बोलणे नाही. कलम बंद.
|
Milya
| |
| Saturday, March 10, 2007 - 5:37 pm: |
| 
|
सारंग खरेच मस्त गज़ल आहे... सर्वच शेर सुरेख आहेत... पण 'कलम' हात होते बद्दल मी पण बराचसा बैरागीशी सहमत आहे... एक रसिक (जाणकार नव्हे) म्हणून पहिल्यांदा वाचतानाच तो शेर खटकला.. अर्थ कळला तरी काहितरी missing आहे असे जाणवले... अर्थात माझ्या मताला किती महत्व द्यायचे हे तूच ठरवायचे. चु. भु.दे. घे. अजून एक मित्रत्वाची सुचना... तुझ्या कवितेबद्दल किंवा गज़लेबद्दल कुणी काही प्रतिक्रीया दिल्या की तू थोडा defensive होतोस असे आजवरच्या अनुभवांवरुन मला वाटते... be open with suggestions given by people तुझाच फ़ायदा होईल असे वाटते... मायबोलीवर constructive criticism तसेही कमीच आहे.. लोक आवडले तर comment लिहितात नाही आवडले तर गप्प बसतात.. तुला लोकांचा feedback मिळत आहे तर त्याचा फ़ायदा उठवावास असे वाटते खूप लिहिले पण खरेच राहवले नाही
|
Manas6
| |
| Saturday, March 10, 2007 - 5:38 pm: |
| 
|
मित्रा चक्रपाणी-- जर रदीफ, काफियाचे बंधन पाळले नाही तर ती गझल राहत नाही, पण तरिही आपण सूट घेतोच, आशयासाठी; कबूल, समजू शकतो! पण ज्या व्याकरणांच्या नियमांवर भाषेचा डोलारा उभा आहे त्याच्या नियमांविषयी आग्रही असण्याला मी तरी कर्मठपणा म्हणणार नाही.. आतापर्यंत ज्या थोड्या फार कविता वाचल्या आहेत, त्यात व्याकरणांच्या नियमात, निदान क्रियापदांशी संबंधित नियमांविषयी तरी सूट घेतलेली स्मरत नाही...व्याकरणच गेले तर भाषा तरी राहील का?..आणि ही जवाबदारी कविची आहे ह्या बैरागी ह्यांच्या मताशी मी सहमत आहे. -मानस६
|
कसे बोचते सूख आताच त्यांना? कधी ते सुखाने व्यथा गात होते !>>>>. हे खुप आवडले सारंग...!!!
|
सर्वांनी एकत्र येऊन शिकणे हा कार्यशाळेचा उद्देश नक्कीच सफल होतो आहे असे दिसते . कार्यशाळेत आलेल्या रचनांमधील कल्पना , शेराचा गाभा हा जसाच्या तसा ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे नियामक मंडळाने आधीच कबूल केले होते आणि त्याच धर्तीवर प्रत्येक गज़ल आणि प्रत्येक शेर वर चर्चा केली गेलेली आहे . हाती असलेल्या वेळेत ती रचना शक्य तितकी योग्य व निर्दोष करून वाचकांसमोर ठेवल्या गेल्या आहेत . सारंग सारख्यांची गज़ल तर एखाद दुसरा शेर सोडला तर आहे तशीच वाचकांसमोर ठेवता येते . आणि त्या एखाद दुसर्या शेरवरतीही किती चर्चा करायची हा प्रश्न आहेच . बैरागी ... तुमचे म्हणणे , माझ्यासकट इतर बर्याच जणांना पटले आहे . फक्त दिलेले वृत्त , जमीन पाहता त्या शेरात आणखी काही करायला खरोखर जागा उरलेली नाही असे माझ्या कुवतीनुसार मला तरी दिसून आले . आणि तो शेर काढून टाकण्यासारखाही नव्हता असे वाटून गेले . एक चर्चा म्हणून सांगतो " अंदाज आरशाचा वाटे खरा असावा " ह्या इलाही जमादार यांच्या गज़लमध्ये एक मिसरा " डोळ्यात वेदनेचा , माझ्या झरा असावा " अ सा येतो . मला पहिल्यापासून हा मिसरा खटकत आला आहे तो " माझ्या " ह्या शब्दाच्या प्लेसमेंट मुळे . पण जेव्हा जेव्हा मी भिमरावजींच्या मैफ़लीत ही गज़ल ऐकतो आणि लोकांना प्रचंड दाद देताना बघतो तेव्हा मला मी दुराग्रही झालो आहे की काय अशी शंका येते . अर्थात म्हणून मी गप्प बसलो नाही तर शक्य असेल तेव्हा मी ह्या बाबतीतले माझे मत मंडलेच होते . जसे आपण येथे मांडले हो .. त्यात " होते " येतं तर शेर आणखीच अप्रतिम झाला असता याबद्दल इथे कुणाचेच दुमत दिसले नाही पण इथे तशी जागाच दिसत नाहीये . मी करून पाहिलेल्या कित्येक बदलांपैकी " कलम बोचले मोगलाईस त्यांच्या उचलताच झाले कलम हात होते " हा एकच कसाबसा जवळपास आलेला शेर . पण त्यातही वारंवारिता येत नाहीच आणि अर्थातच मूळ शेरातली मजा नाही . इथे सुचवल्या गेलेल्या कुठल्याही बदलात ती मला दिसली नाही . असा पायंडा पडणार नाही ह्याची मात्र मला खात्री वाटते . कवीला लिहीताना स्वतःला काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्याला त्या वाचकांसमोर ठेवाव्याश्या वाटत असतील असे मला तरी वाटत नाही . हां त्या जर त्यालाच खटकल्या नाहीत आणि साधारण शंभर वाचकांपैकी तीन चारच लोकांना खटकल्या तर can't it be taken in stride? विशेषतः वरील शेरासारखी चांगली गोष्ट असेल तर ? असो . सर्वांनीच ह्या गोष्टीवर कलम बंद केले आहे ही चांगली गोष्ट आहे . कार्यशाळेने आधीच सांगितल्याप्रमाणे निर्दोष रचना आणखी सुंदर करत राहण्याची जबाबदारी प्रत्येक गज़लकाराची आहे आणि कार्यशाळेत सहभागी सर्व कवींशी ह्या बाबतीत बोलणे झाले आहे . ह्या हून अप्रतिम काही सारंग ला सुचलंच तर त्याने सर्वांनाच ते ऐकवावं अन्यथा हा शेर आहेच . चला .. सर्वजण दुसर्या गज़ल कडे वळू या ...
|
|
|