Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 08, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » सारंग » Archive through March 08, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, March 07, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



प्रिय मित्रांनो ... इतर गज़लकारांशी चर्चा सुरू आहेत तोपर्यंत आपण खूप आधीपासून मराठी गज़ल लिहीत असलेल्या सारंग ह्यांची गज़ल वाचावी , सौंदर्यस्थळं शोधावीत , शंका विचाराव्यात व त्यावर खुली चर्चा करावी.

सारंग



ऋतू येत होते ऋतू जात होते !
बहरणे फुलांच्या न भाग्यात होते !

किती हासरा भासलो बोलताना
मनी माझिया मात्र आघात होते !

इथे तेच जाणून होते यशाला ;
दिमाखात जे जे शिव्या खात होते !

अशा मोगलाईत जन्मास आलो
कलम घेतले की कलम हात होते !

तुझे साफ चुकलेत अंदाज वेड्या
इथे पावसाळे उन्हाळ्यात होते !

कसे बोचते सूख आताच त्यांना?
कधी ते सुखाने व्यथा गात होते !

कुणी चंद्र विश्वास तोडून जातो
हसे चांदणीचे लिलावात होते !

नको एवढा जीव लावू कुणाला
युगांचे दिवाळे क्षणार्धात होते !

लिहावीच लागेल तरही गझल हे
कलम वैभवाच्या करारात होते !


Nachikets
Wednesday, March 07, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!!!

२रा, ३रा आणि ६वा शेर विषेश आवडले. आणि 'कलम' ह्या शब्दाचे तीन वेगवेगळे उपयोगही!!!


Shyamli
Wednesday, March 07, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशा मोगलाईत जन्मास आलो
कलम घेतले की कलम हात होते !>>>
वाह...:-)
बाकी काय बोलावं आम्हा बापड्यांनी गुरुंच्या गझलेबद्दल :-)

Chakrapani
Wednesday, March 07, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सारंगराव, गझल फ़ारच छान आहे. सगळेच शेर आवडले. मात्र त्यातही चांदणीचा लिलाव, उन्हाळे-पावसाळे आणि कलमांचे शेर विशेष आवडले.

Ashwini
Wednesday, March 07, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, मस्त.
कलम वैभवाच्या करारात होते - एकदम खास.

'तरही' गझल म्हणजे काय?


Paragkan
Wednesday, March 07, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरही' गझल म्हणजे काय? >>> माझाही तोच प्रश्न.

काही काही शेर खासच!

Swaatee_ambole
Wednesday, March 07, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है, सारंग!!
' कलम' खास!! चांदणीचा शेर पण मस्त आहे.

अश्विनी, तरही गज़ल म्हणजे तयार ज़मिनीवर लिहीलेली गज़ल. चुभूद्याघ्या.
या कार्यशाळेत आपण सगळे लिहीतोय त्या ' तरही' गज़ला आहेत. वैभवने दिलेल्या ज़मिनीवर based .


Yog
Wednesday, March 07, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह गुरू! ये बात है... गझल टीम चा दुसरा चौकार :-)

Jayavi
Wednesday, March 07, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

....... ह्याला गझल म्हणतात राजा....:-)

सारंगा.... इथे पाहिजे जातीचे..... ह्या उक्तीचा अर्थ कळ्ला. अगदी सगळॆच शेर मनापासून आवडले.
कुणी चंद्र विश्वास तोडून जातो
हसे चांदणीचे लिलावात होते !

अशा मोगलाईत जन्मास आलो
कलम घेतले की कलम हात होते !
हे जास्त आवडले.

Hems
Wednesday, March 07, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग , क्या बात है ! गाण्या बाबत कसं म्हणतात " तयारीचं गाणं ", तशी तुझी गझल वाटतेय.

" तरही " गझल चा माझा अंदाज सही निघाला तर ! मला " गझल ची जमीन " ही concept च आवडलीय !


Chinnu
Wednesday, March 07, 2007 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बा सारंगा तुझी तरही गझल पिवुन तर्र झाले(आज बुधवार! :-))
जयुला आणि सर्वांना अनुमोदक. येथे पाहीजेच जातीचे. अगदी यशवंत आणि जातिवंत गजल तुझी ही. कुणा एका शेराला खास म्हणण्याचा प्रश्नच नाही, सगळेच चौकार आणि षटकार!
पुन्हा मोगलाईचा उल्लेख नको बाबा, अशी सुंदर गजल लिहीणार्‍यांचे हात कलम करणार्‍यांचे डोकेच.... :-)
मतला सुंदर, किती हासरा भासलो.., इथे तेच.., पावसाळे उन्हाळ्यात, सुखाने व्यथा गाणारे, युगांचे दिवाळे, (अरे सगळे शेर आलेत कि यात! ) वाह. सुंदर सुंदर रत्ने बाहेर काढलीस आज, अजून किती तरी तुझ्याकडे आहेत!
कुणी चंद्र विश्वास तोडून जातो
हसे चांदणीचे लिलावात होते,
ह्या ओळींवर जीव खल्लास झाला रे! प्रत्येक शेराला व्यवस्थित न्याय, जमीन्-जुमला मिळाला आहे. आता मक्त्याविषयी, वैभवा असा करार जर झाला नसता तर एक सुंदर (तर्रीदार) गजलेला मुकलो असतो रे, म्हणुन तुझेही आभार! :-)


Vaibhav_joshi
Wednesday, March 07, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आत्तापर्यंत सारंगची सर्वात आवडलेली गज़ल .

Mayurlankeshwar
Thursday, March 08, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई शपथ! काय गझल आहे ही!!

वाचता वाचता स्तब्ध झालो प्रत्येक वेळी!

इथल्या प्रत्येक शेरावर आम्ही उत्तरादाखल १०० गझला लिहल्या तरी ते अपुरे ठरेल!!
अजुन काय बोला?
भालचंद्र नेमाडेंच्या भाषेत 'भयंकर सुंदर' :-)


Mi_anandyatri
Thursday, March 08, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी चंद्र विश्वास तोडून जातो
हसे चांदणीचे लिलावात होते !

जीव घेतला या शेराने...
कधी भेटलोच तर सारंगा, नक्की पाय धरेन, या गज़ल साठी!


Kandapohe
Thursday, March 08, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा सहीच रे. कार्याशाला संपल्यावर बैठकीचा कार्यक्रम करूयात. वैभव गुर्जी पण मोकळे असतील तेव्हा. :-)

Nandini2911
Thursday, March 08, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, प्रत्येक शेर जिवघेणा आहे..
खरंच कधी भेटलास ना तर पाय नक्की धरेन..

तुझे साफ चुकलेत अंदाज वेड्या
इथे पावसाळे उन्हाळ्यात होते !
==============
आयला, या शेराने तर झोपच उडवली.. दणदणीत गझल..


Psg
Thursday, March 08, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान गजल.. 'कलम' मस्तच! मतलाही आवडला.

Bairagee
Thursday, March 08, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



अशा मोगलाईत जन्मास आलो
कलम घेतले की कलम हात होते !
वरचा मिसरा मस्त. इरादा चांगला होता. अन्त्ययमक(रदीफ) "होते" आहे. त्यावरून आधीचा किमान "कलम" पुल्लिंगी किंवा न. लिंगी असावे असे वाटते. "ही कलम" आहे की "हा कलम" आहे की "हे कलम" आहे हे जाणून घ्यावेसे वाटते.

कुणी चंद्र विश्वास तोडून जातो
हसे चांदणीचे लिलावात होते !
वाव्वा!फार मस्त आहे.


नको एवढा जीव लावू कुणाला
युगांचे दिवाळे क्षणार्धात होते !
वा. खालचा मिसरा फारच मस्त आहे.

कलोअ. पुढच्या गझलेला शुभेच्छा.


Sanghamitra
Thursday, March 08, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग सुरेख जमलीय गज़ल. कल्पना अतिशय छान आहेत सगळ्याच शेरांच्या.

>>नको एवढा जीव लावू कुणाला
युगांचे दिवाळे क्षणार्धात होते !
सही आहे.
मोगलाई पण विशेष आवडला पण बैरागींनी लिहीलेय तेच मलाही खटकले. काहीतरी राहीलेय असे वाटते.
शेवटी चांदणीचा शेर. अतिशय सुरेख पण काहीतरी काळाची गडबड वाटतेय.

कुणी चंद्र विश्वास तोडून गेला
हसे चांदणीचे लिलावात होते !
असे कसे वाटेल?


Mi_abhijeet
Thursday, March 08, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही गज़ल लिहिणार्‍याला दंडवतच घातला पाहिजे...!

अशा मोगलाईत जन्मास आलो
कलम घेतले की कलम हात होते

कुणी चंद्र विश्वास तोडून जातो
हसे चांदणीचे लिलावात होते !

आम्ही पामरांनी काही न बोलणेच उत्तम...!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators