एकाच विषयावरच्या गज़लेस गैर मुसलसल असे म्हणतात . आणि सगळे शेर एकाच अर्थाचे नसून एकाच विषयावरचे पण वेगवेगळ्या अर्थाचे असतात , . खाली एका गैर मुसलसल गज़लेचे उदाहरण देत आहोत. ही गज़ल आली तेव्हाच जवळपास पूर्ण होती कारण गज़लकाराला काय म्हणायचे आहे ते ध्वनित होत होतं आणि एकाच विषयावरचे शेर चढत्या क्रमाने चांगले होत गेलेले होते . त्यामुळे कुठलाही विशेष बदल न करता ही पोस्ट करत आहोत. मिलिंद छत्रे ( मिल्या ) ऋतू येत होते ऋतू जात होते तरी तेच माधुर्य प्रेमात होते नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो किती लाघवी तीर भात्यात होते मुकी राहुनीही किती बोलली ती उतरले तिच्या भाव डोळ्यांत होते अता सार्थकी लागला जन्म माझा तिचे मखमली श्वास श्वासात होते रुढींची वृथा का तमा बाळगू मी मला साथ द्याया तिचे हात होते तिच्यापासुनी वेगळे मज करावे कुठे एवढे धैर्य काळात होते ?
|
Jayavi
| |
| Monday, March 05, 2007 - 6:28 am: |
| 
|
मिल्या..... मार डाला रे....! नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो किती लाघवी तीर भात्यात होते ..... क्या बात है! अता सार्थकी लागला जन्म माझा तिचे मखमली श्वास श्वासात होते जियो.......! मस्तच रे.....! ए... आता अगदी नशा यायला लागलीये रे...!
|
Meenu
| |
| Monday, March 05, 2007 - 6:31 am: |
| 
|
वा मिल्या छानच जमलीये की रे ... तिच्यापासुनी वेगळे मज करावे कुठे एवढे धैर्य काळात होते ? >> मस्त !!!!
|
Jo_s
| |
| Monday, March 05, 2007 - 6:32 am: |
| 
|
मिल्या सुंदरच, सगळेच शेर मस्त. त्यातही शेवटचे दोन आणि दुसरा जास्तच छान
|
Shyamli
| |
| Monday, March 05, 2007 - 6:40 am: |
| 
|
गुर्जी जिंकलात हो तुम्ही... व्यसन लाउन टाकल आम्हाला गझलेच मिल्या सही रे तशी विडंबनाची सवय आहे तुला म्हणजे मीटर सांभाळायला प्रश्न आला नसेल फारसा आमचीच पंचाईत आहे 
|
Mankya
| |
| Monday, March 05, 2007 - 6:54 am: |
| 
|
अरे जमली की मिलिंदा ! एकदम सहि आहे रे .... जमेश रे जमेश ! रुढींची वृथा का तमा बाळगू मी मला साथ द्याया तिचे हात होते हे पटलं रे दोस्ता ....! माणिक !
|
ही गझल पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद! त्या निमित्ताने काही शंका निरसन होतील... गझलेच्या मांडणीत फक्त मात्रांना महत्त्व असतं की अक्षर-संख्येलाही? उदा. संपूर्ण गझलेत प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत, फक्त "नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो" इथे १४ अक्षरे आहेत.. नजर मधे "जर" असे २ लघु मिळून १ गुरू होतोय... पण म्हणताना मीटर चुकल्यासारखं वाटतंय... कृपया मार्गदर्शन करावे...
|
चु.भू.द्या.घ्या. प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेतच असं नाही... पण माझी शंका लक्षात आली असेलच, म्हणून १२ पेक्षा अधिक अक्षरे असलेल्या ओळी इथे देत नाही
|
Mankya
| |
| Monday, March 05, 2007 - 7:05 am: |
| 
|
न जर भिड वि ता पू र्ण घा या ळ झा लो ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा मला नाहि वाटत मीटर चुकलय असं ! चु. भु. दे. घे. वैभवा बरोबर ना ! माणिक !
|
तुला पाहुनी पूर्ण घायाळ झालो ह्यात १२ अक्षरे आहेत पण तो impact ह्या शेरातून येत नाही . नजर मध्ये " जर " मिळून एक गुरू व भिडविता मध्ये " भिड " मिळून एक गुरू असे झाले आहे . तीन लघू अक्षर एकत्र मीटर मध्ये म्हणताना जरासे अवघड जातेच हे खरे असले तरी संपूर्णा शेरचा अर्थ जर अधिक चांगला होणार असेल तर वापर करायला काहीच हरकत नाही . हा subjective decision आहे . आपण म्हणत आहात ते अक्षरगणवृत्ताबाबत असावे . जे वेगळ्या कार्यशाळेत चर्चिले जाईल . माणिक ... अगदी बरोबर
|
Psg
| |
| Monday, March 05, 2007 - 7:10 am: |
| 
|
वैभव, समजलं! मिलिंद छान आहे गजल.. romantic पण चांगलं लिहितोस तू! बाकी मात्रा, शब्दांचे निरसन होईल तशी अजून चांगली कळेल ही गजल
|
धन्यवाद वैभव, माणिक!! शंका निरसन झाली. आणि उरलेले स्वत्: प्रयत्न केल्यावर आणखी कळेलच!
|
Jo_s
| |
| Monday, March 05, 2007 - 7:24 am: |
| 
|
व्वा, बरीच माहीती मिळत्ये, (आणि कळत्ये हे महत्वाचं)शाळेत हे मात्रा वगैरे अस शिकवलं होतं की याचा आणि आपला काही संबंध नाही, उगाच आपण त्यांच्या आणि त्यानी आपल्या वाटेला कशाला जा असं वाटायचं. धन्यवद वैभव.
|
नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो किती लाघवी तीर भात्यात होते >>>> मिल्या मस्तच. जोरदार तिरंदाजी चालली आहे. 
|
Princess
| |
| Monday, March 05, 2007 - 8:04 am: |
| 
|
मिल्या, शेवटचा शेर जाम आवडला. लाघवी तीर क्या बात है!!!
|
मुकी राहुनीही किती बोलली ती उतरले तिच्या भाव डोळ्यांत होते अता सार्थकी लागला जन्म माझा तिचे मखमली श्वास श्वासात होते .. वाहवा!! मिल्या मस्तच रे!! साध्या शब्दांत सुंदर गझल मांडलीस! मुकी राहुनीही किती बोलली ती उतरले तिच्या भाव डोळ्यांत होते इथे 'राहुनीही' हे जरा ओढुन-ताणून आल्यासारखं वाटतंय... 'राहुनीही' म्हणताना शेवटच्या दोन अक्षरात लागोपाठ येणारा 'ई' स्वर हा शेराच्या सहजपणाला थोडी बाधा आणतो असे मला वाटते. अर्थात हे माझे वैयक्तीक मत... त्यात १००% तथ्य असेलच असे नव्हे तरी सानी-मिस-यामुळे शेर काळजाला भिडतो हे खरं
|
वा मिलिंद! मला सगळेच आवडलेत.पण तिसरा आणि शेवटचा जास्तच!
|
Bairagee
| |
| Monday, March 05, 2007 - 10:55 am: |
| 
|
वा. कार्यशाळा अगदी भरात आली आहे. इथले अधिकाधिक कवी गझलेकडे वळताहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. वैभव जोशी ह्यांना श्रेय द्यावे तेवढे कमीच. आतापर्यंतच्या तिन्ही गझला वाचल्या. छान! मीनू ह्यांची सगळयांत आवडली. "सावळ्याचा" आणि "मारव्याचा" शेर चांगला होता. जयावींचा "बाहुपाशातला" शेर विशेष. मिल्या ह्यांचे विडंबनच अजून सारखे आठवते आहे.
|
Shonoo
| |
| Monday, March 05, 2007 - 2:11 pm: |
| 
|
जयावी पौर्णिमेची मुजोरी वाचून काटा आला अंगावर. लै भारी. त्या एका शेरावर जान कुर्बान! PSG घरी जाऊन लगेच मिल्याची दृष्ट काढा अगोदर आणि मग त्याचे निदान शंभर अपराध माफ करून टाका या एका गजलेवर ( भाजी आणायला विसरला, गॅस संपलेला सांगितला नाही इत्यादी यच्चयावत नवर्यांच्या अकाउंटवर असले अनेक अपराध असणारच ). मिल्याचे सर्वच शेर भारी एकदम
|
मिल्याचे लाघवी तीर एकदम काळजातच घुसले...!
|
Ashwini
| |
| Monday, March 05, 2007 - 3:06 pm: |
| 
|
मिल्या, खूप सुरेख जमली आहे.
|
Chinnu
| |
| Monday, March 05, 2007 - 4:03 pm: |
| 
|
मिल्या छान. शोनू . पूनम, तुझ्यासाठी अशी सुंदर गझल मिल्या लिहीत असेल तर शंभर क्या दोनशे अपराध भी क्या चीज है! लगे रहो मिल्याभाय! आज नवर्याला translate करुन का होईना, पण ही गझल ऐकवणारच!
|
Pulasti
| |
| Monday, March 05, 2007 - 4:21 pm: |
| 
|
मिलिंद - मस्तच गझल! "मुकी", मक्ता विशेष आवडले. मुकी शेरात, "आ" अलामत पाळण्यासाठी "डोळ्यांत" मधील अनुस्वार वगळावा का? -- पुलस्ति.
|
Peshawa
| |
| Monday, March 05, 2007 - 8:30 pm: |
| 
|
क्या बात है मिल्या! झकास!
|
जयश्रीताई तसेच मिलिंद, तुमच्या गझला आवडल्या. जयश्रीताईंच्या गझलेतील पौर्णिमेच्या मुज़ोरीचा शेर मस्तच आहे. त्या गझलेतील उन्हे पेटवण्याची कल्पना मलाही नीटशी कळली नव्हती. जयश्रीताईंनी खुलासा केल्यावर त्याचा अर्थ लागला; पण तरीसुद्धा ती यापेक्षा जास्त 'अपीलिंग' झाली असती, असे माझे मत आहे. मिलिंदरावांच्या गझलेतील मतला अंमळ वृत्तांतात्मक किंवा थोडा सपाट वाटतो आहे. तसेच या गझलेतील दुसर्या आणि तिसर्या शेरातील अर्थछटा ज़वळज़वळ सारख्याच आहेत असे वाटले. या गझलेतील नज़रेचे तीर आणि मक्ता मला विशेष आवडले. लिहीत रहा मिलिंदराव! एकूण दोन्ही प्रयत्न छानच झाले आहेत. गझल कार्यशाळेतील सहभाग आणि वैभवरावांसारख्यांचे मार्गदर्शन, लेखन, आणि मुख्य म्हणजे गझल लिहावी असे मनापासून वाटणे... या छान छान गझला या सगळ्याचे यश आहेत.
|
Paragkan
| |
| Tuesday, March 06, 2007 - 3:16 am: |
| 
|
aay haay .. kya baat hai milya !
|