Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Skin care » Archive through May 22, 2008 « Previous Next »

Psg
Wednesday, May 21, 2008 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्जू, तुला जायफळाचा 'वैयक्तिक' अनुभव आहे का तरच सांग नाहीतर इथे दक्षिणेला उगाचच वैयक्तिक शंका यायला लागतात ~D

इतकं काय घाबरतेस दक्षिणा, जायफळ उगाळून वाटलं तर हातावर लेप देऊन बघ, आग झाली तर तिथेही होईल, झाली तर धुवून टाक..

चांगला देशी घरगुती उपाय आहे. हवीत कशाला क्रीमं.. आजकालच्या मुलींची फॅडं बघून घ्या :-)

दिवे घे मात्र न चुकता :-)



Tanyabedekar
Wednesday, May 21, 2008 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे सगळे मिळुन का त्या दक्षिणेला टार्गेट करता तुम्ही लोक.. पहिले त्या उखाण्यांवर मग आता त्वचेवर :-)

दिवे घ्या सगळे जण


Prajaktad
Wednesday, May 21, 2008 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जायफ़ळ चेहर्‍यावर लावायचेय तर दुधात उगाळ आणी लेप दे..शन्का असेल तर आधि मनगटावर लावुन बघ..

Prajaktad
Wednesday, May 21, 2008 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे कुणितरी सिफोरा च्या प्रॉडक्ट विषयी लिहले होते ना!...लिहा बर परत इथे..(एवीतेवी बीबी जाग्रुत झालाच आहे.. ))

Rimzim
Wednesday, May 21, 2008 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र दक्षिणा.... धन्यवाद. मी VLCC try करुन पाहते. results बद्दल ईथे लिहिनच.
श्र अजुन काहि details देशील का? म्हणजे सधारण किती दिवसांचा course, fees etc
आणि ते काया क्लिनिक नक्कि कोठे आहे आणि कसे आहे?

Vit E च्या कपसुल्स ने मसाज खरच चांगला होतो, ईथे एक पाकिस्तानी beautician कडे पाहिले होते. पण माझी skin oily असल्याने मला उपयोग नाहि.


Arch
Wednesday, May 21, 2008 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका beutician चा सल्ला आहे. जे फ़ळ खाल त्याचा थोडा रस तोंडाला लावायचा. चांगली तजेलदार skin होते.

आणि काय रे टण्या, तुला का एवढा दक्षिणाचा पुळका? काही विशेष?

Shraddhak
Wednesday, May 21, 2008 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिमझिम, कोर्सचं तुझ्या schedule वर अवलंबून आहे. तू प्रत्यक्ष VLCC मध्ये जा आणि त्यांच्या स्किन स्पेशालिस्टशी बोल.
कायाचा पत्ता लिहिला आहे की वर. माझ्या मते स्किन केअरच्या बाबतीत काया VLCC पेक्षा अजून चांगले.
आणि हो, या सगळ्या ट्रीटमेंट्स महाग वाटू शकतात पण उपयोग नक्की होतो.

आर्च, आमरस तोंडाला लावून किती तास ठेवू? आणि मुंग्या चावल्या त्यामुळे तर काय करू?



Tanyabedekar
Wednesday, May 21, 2008 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या, आता माझ्यावर घसरा... :-) मला काय, मला जगाचा पुळका आहे हो.. चिंता करितो विश्वाची :-)

व्ही एल सी सी वरुन आठवले.. मी खुप जाड झालो होतो मागच्या वर्षी.. तेव्हा व्ही एल सी सी मध्ये जाउन चौकशी करुन आलो.. कहितरी आठ-दहा हजार रुपड्यांचा कोर्स होता.. पैसे ऐकुन माझे वजन एखाद किलो कमी झाले.. आता इथे आल्यावर नामी उपाय कळला वजन कमी करायचा.. स्वत:च्या हातचे जेवण खाउन आठ-एक किलो तरी उतरलोय :-)


Zakki
Wednesday, May 21, 2008 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे लिक्विड पॅरॅफिन कुठे मिळते? ते नि ग्लिसरिन यांचे मिश्रण कोरड्या त्वचेवर लावावे म्हणतात. पण कुठल्याच फार्मसीत लिक्विड पॅरॅफिन मिळत नाही!

Mrinmayee
Wednesday, May 21, 2008 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्हाळा आला.तुम्हाला आत्ता कशाला हवंय? :-) amazon.com वरून घ्या. साडेचार डॉलर्सची बाटली आहे.

Arch
Wednesday, May 21, 2008 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मुंग्या चावल्या त्यामुळे तर काय करू?>>
बोरिक पावडर टाक म्हणजे मुंग्या येणारच नाहीत.

Tanyabedekar
Wednesday, May 21, 2008 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो मृण्मयी, कुठला उन्हाळा?? इथे एक दिवस पाउस तर एक दिवस ऊन... सकाळी थंडी आणि संध्याकाळी उकडते अशी परिस्थिती आहे.. आणि झक्की आजोबांना कोरड्या त्वचेची एव्हडी काळजी पडली आहे, का तुम्ही उगा हिरेमोड करता आहात? :-) (दिवे घ्या)..



Manuswini
Thursday, May 22, 2008 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेहरा एकदम चकचकीत हवा आही काही 'खास' ठीकाणी जाताना तर पटकन नी सोपा उपाय,

good quality मध नी लिंबू रस(त्वचा कुठलीही टाईप असो, पण खुप मुरुमे असेल तर नाहीऽऽऽ हां)
लावून दहा मिनीटाने धूवून बर्फ़ चोळावा. मग गारेगार freez मध्ये ठेवलेल्या कापसच्या बोळ्यावर गुलाबपाण्याचा बोळा फिरवून मगच काय ते रंगरंगोटी( make-up ) करावी.
हमखास उपाय compliment मिळण्यासाठी. :-)


Zakki
Thursday, May 22, 2008 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी, तान्या, धन्यवाद.
मृण्मयी फ्लोरिडात रहातात. १५ डिग. सेल्सिअस झाले तपमान की त्या हुडहुडू लागतात.
असो. हा माझ्या सौ. चा गेल्या कित्येक वर्षांचा प्रॉब्लेम आहे. अनेऽक उपाय केले. भारत अमेरिका दोन्हीकडच्या कातडी तज्ञांना दाखवले, काही उपयोग नाही.
मी चांगले म्हंटले होते, लोक कवळी घेतात तशी तू बोटे विकत घे, स्वस्तात होईल, पण असे समंजस बोलणे ऐकेल ती बायको कसली?


Arch
Thursday, May 22, 2008 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुमच्या सौ . ना सांगा regular manicure करत जा आणि भांडी धुणं वगैरे पाण्यातली कामं त्यांच्या यजमानांना करायला सांगा म्हणजे हात अगदी मऊसर आणि तुकतुकीत राहतील. कोणत्याही कातडी तज्ञाला पैसे द्यायला लागणार नाहीत.

Swa_26
Thursday, May 22, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग गारेगार freez मध्ये ठेवलेल्या कापसच्या बोळ्यावर गुलाबपाण्याचा बोळा फिरवून मगच काय ते रंगरंगोटी( make-up ) करावी.
>>>>>>>> मनु, रंगरंगोटीपण बोळ्यावरच करायची का गं??? TIL

Manjud
Thursday, May 22, 2008 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, हा जायफळाचा उपाय अगदी 'वैयक्तिक' आहे. तुझी चेष्टा करत नाही पण खरंच कॉलेजच्या दिवसांमध्ये आईपेक्षा मलाच जायफळं जास्त लागायची. जळजळ अजिबात होत नाही उलट छान थंड वाटतं. उघड्या, फुटलेल्या पिंपलवर लावू नकोस फक्त..

बाकी आजकालच्या मुलींच्या ह्या फॅडाबद्दल पूनमला मोदक... निव्वळ पिंपल्सच्या डागांसाठी कशाला ते VLCC आणि KAYA skin clinic ? माझ्या एका बहिणीला चेहर्‍यावर अनेक मुरुमं, पुटकुळ्या सदोदित असायच्या. त्या KAYA वाल्यांनी तिला चेहर्‍यावर 'जळवा' लावण्याचा सल्ला दिला ज्या अशुद्ध रक्त शोषून घेतात. ह्या उपायासाठी तिला मोजावे लागले ५००० रुपये आणि २ जळवा सप्लाय केल्याचे २५० रुपये .... 'जळवा' नुसत्या बघूनच ती किंचाळायला लागली. शेवटी तिचं ते मुरुम प्रकरण 'रक्तदोषांतक' घेतल्यामुळे बंद झालं. त्या बाटलीची किंमत काहीतरी १५० रुपये आणि आयुर्वेदिक डॉक्टरची फी ६० रुपये.... :-)


Dakshina
Thursday, May 22, 2008 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, तू गार्नियर च्या निळ्या ट्यूब बद्दल सांगितलंस ते पिंपल्स रोखण्याचं क्रिम आहे,
आणि अजूनि एक गर्नियरच प्रॉड्क्ट आहे ते स्किन लाइटनिंग चं. म्हणजे दोन्ही प्रिव्हेन्टिव झाली...
तु सुचवलेल्या क्रिम च नक्की नाव काय आहे? मी शंका आली म्हणून घेतलं नाहिए..
क्रिम घेतलं नाही त्यामूळे जायफ़ळ घेतलंय....
तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं सगळं करून पाहीन हो...


Dakshina
Thursday, May 22, 2008 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks गं मंजू, नक्की करून पाहीन. आणि सध्या (सुदैवाने) एक पण जागृत आवस्थेतला पिंपल नाहिए चेहर्‍यावर.. आहेत ते फ़क्त १/२ डाग. आणि जायफ़ळ आणलंय मी काल, आज रात्री लाविन. बाय द वे समज रात्री लावून सकाळी धूतलं तर चालतं ना?

Tanyabedekar
Thursday, May 22, 2008 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good quality मध नी लिंबू रस(त्वचा कुठलीही टाईप असो, पण खुप मुरुमे असेल तर नाहीऽऽऽ हां)
लावून दहा मिनीटाने धूवून बर्फ़ चोळावा. मग गारेगार freez मध्ये ठेवलेल्या कापसच्या बोळ्यावर गुलाबपाण्याचा बोळा फिरवून मगच काय ते रंगरंगोटी( make-up ) करावी.
>>>>

आधी चेहेर्‍यावर बर्फ घासायचा इथवर लॉजिकल आहे. आणि मग थंड कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाण्याचा बोळा फिरवायचा? ह्या दोन बोळ्यांचा चेहर्‍याशी काय संबंध :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators