Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Skin care

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Skin care « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 04, 200625 04-04-06  4:41 pm
Archive through May 21, 200820 05-21-08  8:36 am
Archive through May 22, 200820 05-22-08  12:03 pm

Manuswini
Thursday, May 22, 2008 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वा२६, तुला जर तसे करायचे असेल तर तसे कर.:-)

तन्या,
ह्या प्रश्णावरून दिसते की तुझे logical sense खूप कमी तेव्हा तुला सांगून नाही कळणार. :-)


Zakki
Thursday, May 22, 2008 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भांडी धुणं वगैरे पाण्यातली कामं त्यांच्या यजमानांना करायला सांगा
असे सांगा म्हंटल्याने नि सांगितल्याने कामे होत असती तर काय पाहिजे होते? उद्या यजमानांनी वॉशर ड्रायर मधे भांडी नि डिशवॉशरमधे कापडे टाकले तर नंतरचे निस्तरणार कोण? जरा काही विचार करावा माणसाने म्हणतो मी!

Arch
Thursday, May 22, 2008 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यजमानानांच निस्तरायला लावायच. एकदा दोनदा त्यांचे पैसे गेले न repairs मध्ये की शिकतील. आणि त्या यजमानानांच त्या washer, dryer मध्ये धुतलेल्या भांड्यात जेवायला घालायच. मग तर धुण्या भांड्यात expert होतील ते. आतापर्यंत फ़ारच लाड केलेले दिसतायत त्या यजमानांचे.

Mrinmayee
Thursday, May 22, 2008 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या दोन बोळ्यांचा चेहर्‍याशी काय संबंध.. 'डोळ्यांना' थंडावा मिळंत असेल! :-) मने, ~ D
झक्कीआजोबांचा हिरमोड? सौ झक्कींची काळजी करताहेत ते! तेव्हा मी नाई बा खोडा घालत! :-)


Zakki
Thursday, May 22, 2008 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतापर्यंत फ़ारच लाड केलेले दिसतायत त्या यजमानांचे.
अहो असते एखाद्या यजमानाचे नशीब तसेच बलवत्तर. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. तुम्हाला यजमान आहेत का? त्यांना शिकवलेत का? ते शिकले का?
मृण्मयींना कळले खरे काय ते. धन्यवाद मृण्मयी. तुमची गरम हवा इकडे पाठवा की! इथे अजून ६५ च्या वर तपमान जातच नाही!


Yog
Thursday, May 22, 2008 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>धन्यवाद मृण्मयी. तुमची गरम हवा इकडे पाठवा की
आता मुरूमावरून वातावर नेणार काय ही चर्चा.. अन तिथे फ़िरवायला बोळे कुठले मग? :-)
Mru,~

Ajjuka
Friday, May 23, 2008 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या मटाच्या मुंबई टाइम्स मधे अर्ध पान भरून घरगुती उपाय आलेत. वाचा.
आज जमल तर स्कॅन करून टाकते ते पान इथे.

बाकी घरगुती उपाय स्वस्त आणि उपयोगी तर खरेच पण अश्या स्पा किंवा क्लिनिकमधे जाण्यामधे गंमत आहे इतकीच की कोणीतरी आपल्याल सुंदर करण्यासाठी आपल्याकडे लक्ष देतंय, आपले लाड (चेहर्‍याचा मसाज इत्यादी) करतंय, वेळ देतंय, आपण मस्त बसलोय आणि एक सेविका एका पायाला मसाज करतेय एक हाताच्या बोटांना... अहाहा.. एकदम राणी असल्याचा भास.. सगळा पैसा त्यासाठीच.
शेवटी घरगुती फेशियल करणार कोण? तुमचं तुम्हीच. तेही घाईघाईने. त्यात तोंडावर पॅक थापलाय आणि नेमकं कुणीतरी आलं. वाजले तीन तेरा तुमच्या फेशियल चे आणि रिलॅक्स होण्याचे!

हे आपलं आजकालच्या पोरीच्या मनातलं!! :-)


Manjud
Friday, May 23, 2008 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुके, तुझं काम मीच करते....


हे पाळा, उष्णतेचा त्रास टाळा
महराष्ट्र टाईम्स 23 May 2008, 0314 hrs IST

- डॉ. कविता मर्चण्ट
नेचरोपथी स्पेशालिस्ट, लीव थेरपिस्ट

उन्हाळा संपत आला असतानाही उकाड्याने हैराण व्हायला लागलंय. उष्णतेचे विकार सुरू झाले आहेत. घामामुळे जाणवणारी चिकचिक आणि उष्णतेमुळे होणारे विकार टाळण्यासाठी रोजच्या आहारात डॉक्टरांनी सुचवलेल्या या काही टिप्स गारेगार होण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतील.
* उन्हाळ्यात पोटात गारवा राहण्यासाठी दुधीचा रस काढून पिणं हा सवोर्त्तम उपाय आहे.
* दुधीचा गर काढून चेहऱ्याला लावल्यास किंवा तुकडे चेहऱ्यावर ठेवल्यास अतिरिक्त उष्णता शोषून घेतली जाते.
* कोरफडीचे काटे काढून त्यावर काळं मीठ आणि लिंबू पिळून तयार केलेलं सलाड उन्हाळयात पचनासाठी उपयुक्त ठरतं. कोरफडीचा रसंही उष्णतेवर अत्यंत गुणकारी आहे. कोरफडीचा गर आणि टोमॅटोच्या फोडींचा रस उन्हाळयात त्वचा काळवंडणं आणि डोळयाभोवती येणाऱ्या काळया वर्तुळांवर लावल्यास त्वचेमध्ये फरक पडतो.
* कच्चा आवळा मीठ लावून खाल्यास किंवा मोरावळा खाल्ल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते. आवळयाचा रस उन्हाळयात सतत जाणवणारी तहान भागवण्यासाठी पिता येईल.
* दुपारच्या जेवणात पांढऱ्या कांद्याचा समावेश असावा. त्यामुळे शरीरातील उष्मा कमी होतो.
* कोथिंबीर आणि पुदिन्याचा जेवणात अधिकाधिक वापर करावा. कोथिंबीर आणि पुदिन्याचा रस काढून तो प्यायलास घामामुळे जाणवारा थकवा भरून येण्यास मदत होते.
* पालेभाज्यांमध्ये पाण्याचा अंश अधिक असतो. त्यापैकी चवळीची भाजी अल्पमोली बहुगुणी आहे. चवळीच्या पालेभाजीचा रस काढून प्यायल्यास उष्णतेच्या विकारांवर हमखास उपाय आहे.
* तुरीच्या पाल्याची भाजी आणि फरसबी भाजी उन्हाळयात खावी. फरसबीच्या शेंगांचा रसंही शरीरामध्ये थंडावा निर्माण करतो. पडवळ आणि लाल भोपळयाची भाजी उन्हाळयात उपयुक्त ठरते.
* वाळा पाण्यात तास-दोन तास भिजवून त्याचं पाणी प्यायल्यास पोटात गारवा निर्माण होतो.
* सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून किंवा लिंबू सरबतामध्ये मिसळून प्यायल्यास डिहायड्रेशनवर त्याचा फायदा होऊ शकतो.
* बडीशेप पाण्यात भिजवून ते पाणी गरम करावं. पाणी गाळून थंड करून प्यावं. मनुका पाण्यात भिजवून ते पाणी प्यावं.
* शहाळयाचं पाणी, गुलाबपाणी आणि ताजी नीरा प्यावी. पिकलेली पपई, जाम, ताडगोळा, कलिंगड अशी पाण्याचा अधिकाधिक अंश असणारी रसाळ फळं आणि वेलची केळयासारखी पोटाला थंडावा देणारी फळं खावीत.
* उन्हाळयात दुधाऐवजी ताक, किंवा दही खाणं योग्य.
* आंब्याचा रसात दूध मिसळून रस खावा. आंबा उष्ण पडत नाही.


उन्हाळयात खालील पदार्थ खाणं शक्यतो टाळावं.
* कोकम सरबताबरोबर दुग्धजन्य पदार्थ खाणं टाळावं.
* बर्फाचा गोळा खाणं शक्यतो टाळावं. खायचा झाल्यास रंगीत सिरपऐवजी गुलाबपाणी, लिंबू सरबतासारख्या इतर मिश्रणामध्ये घोळवून खावा.
* ड्रायफ्रूट्स, खोबरं, शेंगदाणे खाणं टाळावं.
* मसालेदार आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत.



Supriya19
Thursday, May 29, 2008 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NetrogenachM Dry Touch Sunblock with SPF55 mast aahe. Oliy skin asalelyansathi treat!
agdi light aahe ani ajeebaat greasy,oily nahi.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators