Ajjuka
| |
| Thursday, April 03, 2008 - 4:49 pm: |
| 
|
अशक्य!! सिनेमा संपूर्ण पाह्यल्याबद्दल भारतरत्न नाही रामरतन द्यायला हवं. रामू चा होता ना हा सिनेमा. त्याच्याशिवाय अंतराला कोण घेणार म्हणा! असा एक हॉलिवूड चिकफ्लिक पण आहे. स्टार मूव्हीज वर लागत असतो. पण त्यात एक बेवडा ऐय्याश आणि एक सोरॉरिटी गर्ल अदली बदली होतात. शरीर एक और आत्मा दुसरी असं. आणि हा बघताना (टिव्हीवरच!) मजाही येते.
|
Sashal
| |
| Thursday, April 03, 2008 - 4:55 pm: |
| 
|
धमाल लिहीलंय .. आणि मला पण तोच प्रश्न पडला, त्या 'बच्च्या'चं काय झालं .. सहसा बॉलीवूड च्या मॉरल व्हॅल्यूज् प्रमाणे असं 'बच्चा' वगैरे डावलणं बरोबर नाही वाटत ..
|
Mansmi18
| |
| Thursday, April 03, 2008 - 7:25 pm: |
| 
|
This movie is inspired(??) by a movie called "switch" or should I say copied? )
|
त्या बच्चाचं काय झालं? अब्जावधी आत्मे रिसायकल करणार्या पार्वती देवीला एका बच्चाचा आत्मा रिसायकल करणे म्हणजे कुठल्याही डाव्या हाताचा खेळ असेल.
|
Zakasrao
| |
| Friday, April 04, 2008 - 4:16 am: |
| 
|
.. .. .. ..
|
Ankyno1
| |
| Friday, April 04, 2008 - 5:13 am: |
| 
|
रामूचा नाही...... अंतरा चा स्वताः चा सिनेमा होता हा.... (याच्या नंतर कोणीही तिला फुटकळ रोल ही ऑफर केला नाही...)
|
सर्वात शेवटी हे सर्व स्वप्न असल्याचं आफ़ताबला सामजतं... अत्यंत हिडीस वाटते अंतरा.
|
अँशबेबी / सशल . शेंडेनक्षत्राने लिहील्याप्रमाणे “बच्चा” रिसायकल झाला असावा. केवळ नशीब थोर म्हणुन हा प्रश्न अंतराच्या डोक्यात आला नाही. नाहीतर तिने आफताबला गरोदर दाखवुन आणखी वात आणला असता (नंतर “पुरूष गरोदर” या थिमवर सिनेमे आलेच. मराठीतही अंकुश चौधरीचा असा एक सिनेमा आला होता). टण्या : “भारत रत्न” नाही पण “अशोक चक्र” पुरस्काराच्या यादीत नाव होते म्हणे. पण अडवानींनी बाजपेईंचे नाव “भारत रत्न” साठी सुचवल्यावर झालेल्या गदारोळात चुकुन कट झाले. अँकी नं 1 : हा सिनेमा रामु प्रॉडक्शनचाच, पण सबकुछ अंतरा असा होता. अंतरा सिनेमाची हिरविण, दिग्दर्शीका, पटकथा लेखिका व संवाद लेखिका पण होती. नंदिनी : नाही ते स्वप्न नसते. सिनेमाच्या सुरुवातीच्या भागात तो असाच विचार (स्वप्नच पड्ले होते) करुन मुळ स्वभावावर जातो. तसेच् पुन्हा घडू नये म्हणुन शेवटच्या सिनमधे आफताब पाहिले ते स्वप्न कि सत्य असा विचार करत घराबाहेर पडतो. त्याला पार्वती सामान्या स्त्रीच्या पोषाखात दिसतो. तो तिला ओळखुन तिच्याकडे तोंड वासुन पहात रहातो. ती लिफ्ट मधे शिरते व लिफ्टचे दार बंद होता होता त्याला देवीच्या पोषाखात दिसते व आशीर्वाद देते. “अंतरा हीडीस दिसते” : 110 टक्के सहमत. मी हा शब्द मोठ्या प्रयासाने टाळला. हो! मलाच पार्वती मातेने रातोरात पुरुषाचे स्त्री केले तर काय घ्या?
|
Mukund
| |
| Friday, April 04, 2008 - 10:17 am: |
| 
|
तर दिव्व्या आफताबच्या स्टोरी वर इतक्या पटकन विश्वास ठेवते कि हे असे लिंगबदल (ऑपरेशन शिवाय आणी रातोरात) नेहमीचीच गोष्ट आहे. मला तर वाटले आता ती आफताबची समजुत काढेल. “ज़ाउ दे रे! होते असे बरेचदा! आता तुझी एकदम अंतरा झाली हे जरा जास्तच झाले, पण काय करणार? आपल नशीब म्हणायचे आणी गप्प बसायचे. आता तुला म्हणुन सांगते, कुणाला सांगु नको हं, पण मी पण अशीच रातोरात पुरुषाची स्त्री झाले.” वगैरे वगैरे. पण तसे काही झाले नाही उचापती...
|
आता कॅमेरा वर सरकतो व आरश्यात तोंड दिसते अंतरा माळीचे. आफताब (व मी पण) घबरून किंचाळतो. (आता कॅमेरा मुव्हमेंट वरून काहीतरी भयानक दिसणार याची कल्पना आली होती. पण ईतके भयानक दिसेल असे वाटले नव्हते. हा तर रामसे पटा पेक्षा ही सुपर भयपट निघाला.)<<<<<<<<<<<< उचापती, सही. वाट लागली हसून हसून. तुकडे बघितले आहेत या सिनेमाचे. त्यात अंतरा माळी भयंकर विस्कटलेले केस घेऊन, अंगात पुरुषी कपडे घालून भीषण दिसत हिंडत असते, बॉक्सिन्ग करते वगैरे. भीषण सिनेमा.
|
Dakshina
| |
| Friday, April 04, 2008 - 12:09 pm: |
| 
|
ते दृष्य आठवा जेव्हा इलुसा स्कर्ट घालून भरत दाभोळकरच्या ऑफ़िसात भेटायला जाते आणि बसताना बसते कशी? आणि पार्टीला जाते तेव्हा... काना गळ्यात काही नाही, तसंच अंगावर साडी असूनही काही नसल्याजोगीच दिसते.
|
Manjud
| |
| Friday, April 04, 2008 - 12:14 pm: |
| 
|
उचापती, सॉलीड लिहिलंय... ती अंतरा माळी कॉलेजात पण अशीच अचाटपणा करत फिरायची. आणि तो रीतेश देशमुख, हे असले प्रकार करायचे होते तर कशाला उगाच आर्किटेक्ट झाला? एक सीट फुकट घालवली.
|
Dakshina
| |
| Friday, April 04, 2008 - 1:23 pm: |
| 
|
फ़ार काही नाही, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय.. इतकंच...
|
Asami
| |
| Friday, April 04, 2008 - 3:25 pm: |
| 
|
तो movie Rob Schneider चा hot chick आहे
|
हा Switch (Blake Edward, Ellen Barkin) .. मी पंधरा वर्षांपूर्वी पाहिला होता.. त्यातलं एक वाक्य लक्षात राहीलंय..
|
Runi
| |
| Friday, April 04, 2008 - 10:18 pm: |
| 
|
उचापती बरेच हिम्मतवान आहात की हे सगळ बघु शकलात म्हणजे. त्या अंतराचा एक असह्य सिनेमा मी बघीतला होता 'गर्लफ्रेंड' नावाचा. त्यात पण ती खुप किळसवाणी (हो, हा एकच शब्द सुचतो तिला बघीतल्यावर) दिसते. तो सिनेमाच एकंदर रद्दड होता.
|
Shanky
| |
| Friday, April 04, 2008 - 10:24 pm: |
| 
|
रुनि गर्लफ़्रेन्ड मधे अन्तरा नव्हती इशा कोप्पिकर आणि अम्रुता अरोरा होत्या.
|
Runi
| |
| Saturday, April 05, 2008 - 1:19 am: |
| 
|
हो का त्या कोप्पीकर बाई होत्या का? मी उचापतीने लिहिलेले सगळे ती कोप्पीकर डोळ्यासमोर आणुन वाचले मला तिच वाटली (आणि ते इथे तंतोतंत लागु पडले)
|
Ashbaby
| |
| Saturday, April 05, 2008 - 5:41 am: |
| 
|
इशा कोप्पीकर अंतरा एवढी हिडीस, भयाण (आता अजुन शब्द सुचत नाही पण ह्याच्या जोडीने अजुन जे काही असतील ते सगळे) दिसत नाही. गर्लफ़्रेंड मध्ये दिसली असेल कदाचीत, पण अदरवाईज ती ठिकठाक आहे. अंतरा ती अंतराच शेवटी. रामु जाणे तिच्यात काय गुण आहेत जे तिला एवढे पिक्चर त्याने दिले. मी. या मी. नंतर तिला कोणी पिक्चरमध्ये घेतले नाही नंतर हे पाहणा-यांचे नशिब. साधना
|
अंतरा ती अंतराच शेवटी. रामु जाणे तिच्यात काय गुण आहेत जे तिला एवढे पिक्चर त्याने दिले. प्रतिभावान दिग्दर्शकन्न्चा कधी कधी एखादी हिरवीण हा वीक पॉइन्ट असतो. व्ही शान्ताराम सन्ध्या, चेतन आनन्द प्रिया राज्वन्श रामु आणी अन्तरा
|