|
आता कॅमेरा वर सरकतो व आरश्यात तोंड दिसते अंतरा माळीचे. आफताब (व मी पण) घबरून किंचाळतो. अप्रतीम
|
अजून एक वीक पॉईंट उदाहरण संगीतकार शंकर (शंकर जयकिशनपैकी एक) आणि शारदा. ही बया अगदी विचित्र काहिशा बेसूर आवाजात गायची. उदा. अराउंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स. पण शंकरराव हट्टाने ह्या बाईंना घ्यायचे. बाकी संध्या आणि व्ही शांताराम हा ही एक अत्यंत विकृत प्रकार. मला ही बाई अत्यंत कुरुप, कृत्रीम अभिनय करणारी वाटायची. पण शांतारामचा सिनेमा असेल तर ही बया असणारच. ऐकायला सुंदर वाटणारी कितीतरी गाणी (नवरंग, सेहरा) पडद्यावर पहायला नको वाटतात केवळ ह्या बयेमुळे.
|
Ashbaby
| |
| Monday, April 07, 2008 - 5:31 am: |
| 
|
व्ही. शांताराम आणि संध्या हे कॉम्बिनेशन अगदी नकोसे झाले नन्तर नन्तर... शिरीष कणेकरांनी एका प्रश्नाच्या उत्तरात लिहीलेले की व्ही. शांतारामांनी बालचित्रपट काढले नाही कारण त्यांनी त्यातही संध्याला घेतले असते आणि मग तो बालचित्रपट न राहता भयपट झाला असता. खरे तर ती अतिशय चांगली नर्तकी होती, मेहनती होती. तिचा झनक झनक पायल बाजे हा अतिशय सुंदर चित्रपट होता. गोपिकृष्णाच्या तोडीस तोड नाचलीय ती. तिची मेहनत दिसते त्यात. पण व्ही. शांतारामांचा स्वत्:चाही दिग्दर्शक म्हणून एक गुण-दोष होता तो म्हणजे प्रत्येक भावना अभिनयातुन व्यक्त झालीच पाहिजे. सुरवातीच्या काळात ते बहुतेक बरोबर होते, पण अभिनयाची गणिते भराभर बदलत गेली तसे ते लाऊड वाटायला लागले. संध्या त्या लाऊडपणातून कधीच बाहेर आली नाही आणि मग ते सगळे प्रकरण अगदी नकोसे झाले. पिंजरा मध्ये संध्याच्या जागी जयश्री गडकर असती तर काय बहार आली असती ह्या विचाराने मी आजही हळहळते. (कालच टीवीवर एक मराठी कार्यक्रमात जज म्हणून आलेल्या एक नर्तकीने "तुम्हावर केली मर्जी बहाल" गाण्यावर अगदी सुरेख नृत्य केले तेही पाचवारी साडीत ते पाहून पुन्हा वाईट वाटले). साधना
|
Mi_anu
| |
| Thursday, April 10, 2008 - 3:46 am: |
| 
|
अत्यंत भयंकर चित्रपट हा मिस्टर या मिस. अंतरा पण सहन केली असती, पण चित्रपटाला काही आगापिछा हवा ना? आणि मी ट्रेलर्स बघून (मूळ इंग्रजी चित्रपट आधी पाहिलेला असल्याने) हा चांगला असेल म्हणून रविवारी अगावू बुकिंग करुन पाहिला.(माझे डोके तपासायचे म्हणताय? बरोबर आहे. तेव्हा बिघडलेलेच असणार नक्की.) घरी एक महत्वाचे पाहुनेही आले होते त्यांआ एका तासात भेटून चित्रपटाला गेलो. रात्री आल्यावर २ वाजेपर्यंत भांडलो अशा चित्रपटाला घरची कामे व पाहुणे सोडून गेल्याबद्दल
|
Mi_anu
| |
| Thursday, April 10, 2008 - 7:21 am: |
| 
|
कोणीतरी 'क्या कूल है हम' आणि 'हम तुमपे मरते है' आणि गोविंदाच्या 'कुवारा' वर लिहा...
|
Dakshina
| |
| Thursday, April 10, 2008 - 7:27 am: |
| 
|
अनू, अगं कोणितरी कशाला.... तूच लिही... मस्त लिहीतेस. 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|