Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 03, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » Mr. Yaa Miss » Archive through April 03, 2008 « Previous Next »

Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसांपुर्वी मला “मिस्टर या मिस” नावाचा सिनेमा बघाण्याचा दुर्लभ योग आला. हा सिनेमा गेल्या सहा महिन्याच्या काळात फक्त एकदाच टी. व्ही. वर लागला. अगदी “दूध का कर्ज” सारखा सिनेमा (व तत्सम ईतर सिनेमे) त्यानंतरच्या काळात किमान चार वेळा तरी लागुन गेला (ले) असावा(वेत) पण याचे पुन्हा नाव नाही. यावरूनच याच्या दर्शनाचा योग किती दुर्मिळ आहे याचा अंदाज येतो. हा सिनेमा पाहिलेल्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींमध्ये माझी गणना होते. (माझी आई सार्थ पणे “मेरा बेटा (दस) करोडोमे एक है” असे म्हणू शकते) लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्डस मधे माझ्या नावाची नोंद होणार असल्याची वदंता आहे. पुर्वी जसे कहाण्यांमधे एखादे दुर्लभ व्रत फक्त एखाद्यालाच माहित असायचे व ते ईतरांच्या भल्याकरिता सांगीतले जायचे (संदर्भ : कथा सत्यनारायणाची, मंगळागौरी व्रत, ई.ई.) तसेच मीपण ही दुर्लभ अनुभुती माझ्या प्रमाणेच ईतरांनाही मिळावी यासाठी ईथे कथा देत आहे.

Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

********
“स्पॉईलर वॉर्नींग : हा सिनेमा स्वत:ला बघता (व सहन करता) येईल अशी आशा असणार्‍या दुर्दम्य़ आशावादी लोकांनी खालील लिखाण वाचु नये””
***************

सिनेमात आफताब शिवदासानी व रितेश देशमुख एका जाहिरात कंपनीत असतात (काही काम करतांना दाखविले नसल्यामुळे “काम करत असतात” असे लिहीता येत नाही). पैकी रितेश हा साधा सरळ तर आफताब शिवदासानी हा एक उनाड, लफडेबाज व व्यसनी माणुस असतो. याला सतत सिगरेट ओढतांना व दारू ढोसतांना दाखवले आहे. त्याच्या मते स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तु! कोणतीही बाई बघीतली की शिट्टी वाजवायचीच असा त्याचा परिपाठ असतो. आफताबची एकाच वेळेस तीन तीन बायांशी लफडी सुरू असतात. जणु आफताबला त्याची कंपनी लफडी करण्याचाच पगार देते आहे असे वाटते. (मला पण क्षणभर त्या कंपनीत काही “व्हॅकन्सीज्” आहेत का ते पहावे असे वाटुन गेले”) रितेश त्याला सारखे “भानगडी सोड, नाहीतर तु गोत्यात येशिल” असे सांगत असतो. पण आफताब त्याला उड्वुन लावत असतो. यथावकाश लफडे क्र. 1 ला त्याची ईतरही लफडी असल्याचा संशय येतो. ती आफताब वर पळत ठेवते आणी तिला लफडे क्र. 2 चा पत्ता लागतो. तिने काही करण्याच्या आतच आफताब ल. क्र. 3 (दिव्व्या दत्ता) ला भेटायला निघतो. ल.क्र. 1 त्याचा पाठलाग करते. आफताब दिव्व्याच्या घरात शिरल्यावर ल.क्र. 1 ल.क्र. 2 ला बोलाउन घेते. आत आफताब व दिव्व्या यांचा रोमांस सुरू असतो. या दोघी धाडकन दार उघडुन आत शिरतात. (आता रोज 3-3 लफडी सांभाळायची म्हणज़े तारांबळ उडणारच. त्या घाई गडबडीत “दार लावायला विसरणे” हे सहाजिकच) . तिघींना आफताबचे रंग ढंग कळल्यावर तिघीपण आफताब वर तुटुन पडतात. त्या भांडणात तोल सुटुन ल. क्र. 3 (दिव्व्या दत्ता) आफताबच्या डोक्यात एक पुतळा मारते व तो कोसळतो.


Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढच्या सिनमधे आफताब शुध्दीत येतो तेंव्हा त्याला समोर शंकर-पार्वती बसलेले दिसतात (आपले अजिंक्य देव आणी वर्षा उसगावकर). आफताबची रवानगी नरकात होत असल्याचे शुभ वर्तमान शंकर त्याला कळवतात. त्याबरोबर आफताब चिडून त्याच्याशी वाद घालतो व हा आपल्यावर अन्याय असल्याचे सांगतो. शंकर गडबडुन जातात. बरोबरच आहे! नॉर्मली ही कामे यम वा चित्रगुप्त यांची. शंकर डायरेक्ट फील्डवर काम करणारे. य़माला आत्मे सप्लाय (ते ही बल्क सप्लाय) करणे ही त्यांची कोअर कॉम्पीटन्सी, त्यांना बॅक ऑफीसचे काम दिल्यवर दुसरे काय होणार? ते बिचारे गडबडुन आफताबवर “अन्याय” झाल्याचे पटकन मान्य करतात व त्याला एक संधी देण्याचे ठरवुन परत पृथ्वी वर पाठवतात. नवीन माणसाला पुरेसे प्रशिक्षण न देता काम दिल्याचा परिणाम दुसरे काय! यमाने त्याला ईतक्या सहजासहजी सोडले असते? सावित्रीला किती पिदवले होते ते आठवा. असो. पार्वती तशी खमकी (नवरा भोळा म्ह्टल्यावर तिलाच सर्व बघवे/निस्तरावे लागते नं), पण ईथे नवर्‍यामुळे गप्प बसते.

Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताबला त्याच्या घरातिल बॆड वर जाग येते. उठुन तो वॉशरूम कडे जाउ लागतो. जाता जाता “हं! म्हणजे ते स्वप्नच होते तर” असा विचार करत दिवसभर काय करायचे याची उजळणी करतो. त्या वरून पार्वतीला आफताब सुधारला नसल्याचे लक्षात येते आणी ती त्याला धडा शिकवण्याचे ठरवते. प्रेक्षकांना समजावे म्हणुन ती आकाशवाणी करुन तसे “उदघोषित” करते. (विजेचा कडकडाट. आता सस्पेंस उघड होई पर्य़ंत नुसती कॅमेरा मुव्हमेंट व मनातिल संवाद. क़ोणताही रामसे पट आठवा. त्यामधे काहीतरी भयानक व हीडीस दाखवण्या आधी अशीच मुव्हमेंट असते) कॅमेरा जमिनीवरून पुढे सरकत सरकत वॉशरूम मधे जातो व हळूहळू वर सरकु लागतो. प्रथम दिसते वॉश बेसिन व नंतर आरश्याचा खालचा भाग दिसु लागतो. आरश्यात दिसतात बाईचे पाय व कमरे पर्यंतचा भाग. आफताब त्याही स्थितीत आपल्या संस्कारांना जागतो व कॅमेरा शिट्टीच्या आवाजात मागे वळतो. पण मागे कोणीच नसते. आपण काल मार खाल्ला व आपण बरोबर बाई घरी आणण्याच्या परिस्थीतीत नव्हतो हे त्याला आठवते. कॅमेरा पुन्हा आरशाकडे वळतो. आरश्यात पुन्हा बाईचा कमरेपर्य़ंत चा भाग. आता कॅमेरा वर सरकतो व आरश्यात तोंड दिसते अंतरा माळीचे. आफताब (व मी पण) घबरून किंचाळतो.
(आता कॅमेरा मुव्हमेंट वरून काहीतरी भयानक दिसणार याची कल्पना आली होती. पण ईतके भयानक दिसेल असे वाटले नव्हते. हा तर रामसे पटा पेक्षा ही सुपर भयपट निघाला.)


Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताबला आपण अंतरा माळी झाल्याचे (व आपला रोल क़ट झाल्याचे) कळते. विश्वास न बसुन आफताब/अंतरा स्वतःची लिंगपरिक्षा करतो(ते). (ईथे अंतरा बाईंनी गलिच्छ प्रकार केलेले आहेत). लिंगपालटाची खात्री पटल्य़ावर अंतरा पुन्हा जोरात किंचाळते व बेशुध्द पडते.
किंकाळी ऐकुन बिल्डिंगचे दोन सिक्य़ुरिटी गार्डस दार उघडुन आत येतात व अंतराला शुध्दीत आणतात. अंतरा त्याना ती आफताबची बहीण आहे असे सांगुन बाहेर काढते. (आता “सिक्य़ुरिटी गार्डस कडे याच्या फ्लॅटची किल्ली कशी आली?” असा विचार करायचा नाही. अंतरा शुध्दीत येणे महत्वाचे नाहीतर सिनेमा पुढे कसा सरकणार?)

अंतराला घरात लेडीज ड्रेसेस नसल्याची जाणीव होते. ते कसे मिळवायचे? तर ती सरळ दिव्व्या दत्ताला (ल. क्र. 3) फोन लावते आणी तिला रातोरात पुरूषाची स्त्र्री झाल्याचे सांगुन तिची मदत मागते. दिव्व्या तयार होते.
मला गहीवरून आले. स्त्रीया ईतक्या समजुतदार असतात? कुठे भेटल्या हो या त्यांना? आणी त्यांनाच बर्‍या भेटल्य़ा?. आमचे वधु संशोधन चालले होते तेव्हा कुठे दडुन बसल्या या? आमच्याकडे “आज कचेरीतुन यायला नेहेमीपेक्षा तासभर उशीर का झाला?” किंवा “कचेरीतुन येतायेता करून ये असे आज सकाळी सांगीतलेले काम का झाले नाही” अशा प्रश्नांना नव नवीन कारणे पुरवतांना सृजनशीलता (क्रिएटीव्हीटी) पणाला लागते (“कंटाळा आला”, “विसरलो”, “उनाडक्या करत होतो” अशी खरी कारणं कशी सांगायची?). तरी पण नंतरची सुमारे पाउण तासाची उलटतपासणी चुकत नाही. एवढे होउनही डोळ्यातला संशय उघड उघड दिसतो आणी “लई थापा माराया लागलय बेणं. एकदा धडा शिकवायाच पाहीजे” यासारखी वाक्य डोळ्यात स्पष्ट वाचता येतात. (हं! पुरुषी व्यथा दुसरं काय?) असो.


Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर दिव्व्या आफताबच्या स्टोरी वर इतक्या पटकन विश्वास ठेवते कि हे असे लिंगबदल (ऑपरेशन शिवाय आणी रातोरात) नेहमीचीच गोष्ट आहे. मला तर वाटले आता ती आफताबची समजुत काढेल. “ज़ाउ दे रे! होते असे बरेचदा! आता तुझी एकदम अंतरा झाली हे जरा जास्तच झाले, पण काय करणार? आपल नशीब म्हणायचे आणी गप्प बसायचे. आता तुला म्हणुन सांगते, कुणाला सांगु नको हं, पण मी पण अशीच रातोरात पुरुषाची स्त्री झाले.” वगैरे वगैरे. पण तसे काही झाले नाही.

आता अंतराला दिव्व्याची मदत कशाला हवी असते? तर म्हणे तिला स्त्रियोपयोगी वस्त्र/वस्तु कुठे आणी कशा मिळतात हे माहीत नसते. मला आफताबचा प्रचंड हेवा वाटला. कित्ती नशीबवान हा! फ्रेंड्स मधिल जोई प्रमाणे मला देखिल “धिस मॅन ईज माय गॉड” असे म्हणावेसे वाटले.
याच्या तिन-तिन लफड्यापैकी एकीनेही त्याची या गोष्टीची/ठिकाणांची ओळख करुन दिलेली नसावी न? आमचा सापु व लग्न यामधिल भेटींचा जास्तित जास्त वेळ याच ठिकाणांवर गेला. याच काळात सुरुवातिला मला “रंगातले काही कळत नाही” हे व नंतर थोड्याच दिवसात “कपड्यामधले काही कळत नाही” हे समजले. लग्नानंतर लागलीच “कशातलेच काहीच कळत नसल्याचे” समजले. असो, नशीब एकेकाचे!

तर दिव्व्या अंतराला मदत करायला तयार होते व एका स्त्रियोपयोगी वस्तुंच्या दुकानात तिला बोलावते. दिव्व्या दुकानात मुद्दाम अंतराला तंग कपडे सिलेक्ट करुन देते. अंतरा दुकाना बाहेर पडते तेंव्हा तिचा अवतार असा असतो.
अर्ध्य़ा मांड्यांपर्यंत जेमतेम येणारा टाईट स्कर्ट, वर तसाच तंग पण रिव्हीलींग टॉप आणी ब्लेझर. पायात हाय हील्स. शरीर स्त्रीचे असले तरी आत्मा पुरूषाचा आहे हे दाखवण्या करिता खांदे थोडेसे वर उचललेले, हात शरीरा पासुन थोडसे दुर (पैलवाना सारखे – किंवा विठोबाप्रमाणे उभे रहायचे पण पंजे कमरे ऐवजी मांड्या व कमरेच्या मधे). मायकेल जॅक्सन सारखे मोकळे सोडलेले व चेहेर्‍यावरून पुढे आलेले केस, आणी हाय हील्सची सवय नाही हे प्रेक्षकांना (असलाच माझ्यासारखा दुर्दैवी कोणी तर) समजावे म्हणुन दोन्ही पाय एकदम घोट्या जवळ मुरगळले असल्यासारखी फेंगडी चाल. बोटात जळती सिगारेट. अनाकलनिय कारणाने अंतरा तोंड अर्धवट उघडे ठेउन फिरते. खालचे व वरचे दात ओठाबाहेर आलेले (थोडक्यात दात विचकलेले). यावेळी ती रागाने अंगावर चाल करुन येणार्‍या गोरिला सारखी दिसते. कोणत्याही क्षणी छाती बडवत (स्वतःचीच) हल्ला करेल अशी भिती वाटते. यावर कडी म्हणुन अंतरा मधुन मधुन जीभेचे टोक तोंडाच्या कोपर्‍यातुन बाहेर काढते. (सापासारखी – फक्त साप तोंडाच्या मधोमध काढतो तर ही एका कोपर्‍यातुन. रामुच्या “बब्बनचे” स्फुर्तीस्थान हे तर नसेल?)


Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरा रस्त्यावरुन अशा अवतारात जात असतांना तिला 2-3 माणसे छेडतात (यासाठी त्यानी डबल पैसे घेतले असावेत. पात्र म्हणुन नेहेमीचे व अंतराला (ते ही अशा अवतारातिल) छेडण्याचे वेगळे). अंतराला फरक पडत नाही (पुरुषाचा आत्मा म्हणुन) उलट अंतराच 2-3 स्त्रीयांना शिट्ट्या वाजवते. त्या “काय ही निर्लज्ज मेली” अशा अर्थाची नजर तिच्याकडे टाकतात. संध्याकाळी अंतरा रितेशला बार मधे आफताबची बहीण म्हणुनच भेटते. त्याला “आफताब अचानक हिमालयात गेला आहे, त्याच्या गैरहजेरीत मी त्याची सर्व कामे बघणार आहे” अशी थाप मारते. नंतर रोजच्या प्रमाणे ती दारू पिते. असेच दोन तीन दिवस दारू पिण्यात टाईम पास केल्यावर तिला आपल्याला एक नोकरी असल्याची आठवण होते. ती व रितेश दुसर्‍या दिवशी कंपनीत जातात.

अंतरा बॉसला देखिल “मी आफताबची सर्व कामे बघणार आहे” असे सांगते. बॉस अर्थातच तिची लायकी काढुन तिला उडवुन लावतो. मग अंतरा बॉसला एका मोठ्या क्लायंटची माहीती देते. तिने काय माहीती सांगावी? क्लायंट कंपनीचा टर्न ओव्हर, त्यांचे जाहिरातींचे बजेट, क्लायंट कंपनीचा बॉस कोण व त्याचे सध्या जाहिरातीचे काम कोणाकडे आहे अशी “बहुमुल्य” व “आतल्या गोटातिल” माहिती सांगुन ती बॉसवर छाप पाडते. बॉसही लागलीच खुश होउन अंतराला आफताबच्या जागेवर घेतो वर ती आफताब पेक्षा हुशार असल्याचे प्रमाणपत्र देउन टाकतो.
(आयला! नोकरी मिळवणे इतके सोपे असते? मला तर किमान तीन तासाच्या 4-5 मुलाखती झाल्याशिवाय कधिच नोकरी मिळाली नाही.) आफताब खरच नशीबवानच म्हणायचा. त्रिखंडात शोधूनही मिळणार नाही ईतका चांगला व आदर्श बॉस(ही) त्याला मिळाला. (त्या कंपनीचा शोध घेउन काही “व्हॅकन्सीज्” आहेत का ते पहीलेच पाहीजे)


Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्त्री झाल्यामुळे आधीची लफडी बंद झालेली, व नविन लफडी अजुन सुरूच झाली नसल्याने अंतरा नाईलाजाने क्लायंट कंपनीच्या बॉसला भेटायला जाते व जाहीरातीचे काम तिला देण्याची विनंती करते. बॉस तिला असले डील्स ऑफिस मधे होत नसल्याचे सांगुन पार्टीचे आमंत्रण देतो. पार्टी सुरू असतांना तिला डील वर चर्चा करण्यासाठी आपल्या बेडरूम मधे नेतो. बेडरूम मधे अपेक्षित (आपल्याला) अशीच मागणी अंतरा कडे करतो. पण अंतराला म्हणे त्या मागणीचा प्रचंड धक्का बसतो. आफताब उर्फ अंतरा सारख्या पट्टीच्या लफडेबाज माणसाला बॉस डील साठी घरी आपल्या बेडरूम मधे का बोलावतो हे न कळावे म्हणजे बडजात्यांना “लग्नाच्या तयारीला काय काय करावयाचे असते” हे माहीत नसण्यासारखेच झाले. या गोष्टीचा अंतराला प्रचंड राग येतो (म्हणजे “तशी मागणी केल्याचा”, बडजात्यांचा नाही). राग घालवण्या करता ती रितेश बरोबर नेहेमीच्या बार मधे जाउन भरपुर दारू पिते व रितेशला ही पाजते. दोघेही टाईट होउन अंतराच्या घरी येतात व अर्थातच अशावेळी जे घडायचे तेच “नकळत सारे घडते”. दुसर्‍या दिवशी अंतरा रितेशला सर्व दोष देउन हाकलुन देते.


Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्व्याला अंतरावर सूड उगवायचा असतो म्हणुन ती “अंतराने आफताबचा डोक्यात घाव घालुन खून केल्याची” खबर पोलीसांना देते. पोलीस अंतराला संशयीत म्हणुन अटक करतात. या सिनेमातिल पोलीस हा देखिल एक दुर्मिळ नमुना आहे. असे पोलिस दुसर्‍या कुठल्याही सिनेमात वा प्रत्यक्षात आढळणार नाहीत. ते बहुदा रिव्हर्स इंजिनीअरींग शिकलेले असावेत. म्हणजे नेहेमी कसे प्रथम प्रेत, मग खुनाचे हत्यार, खुनाचा उद्देश व सर्वात शेवटी संशयीत आरोपीला अटक अशा पायर्‍या असतात. येथे डायरेक्ट संशयीत आरोपीला अटक करतात. कुठले हत्यार वापरले, प्रेत कुठे दडवले हे आरोपी सांगेलच किंवा आपोआप कळेलच अशी त्यांची समजुत असते (सच कभी छुपता नही).

Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधल्या काळात रितेश अंतराला जेल मधे जाउन भेटतो. अंतरा त्याला ती “उसके बच्चे की माँ बननेवाली” असल्याची सुवार्ता कळवते (यावेळेला तिचे पोट ईतके मोठे दाखवले आहे की ते न सांगताही लक्षात येते). रितेश तिला ती निर्दोष असल्याचे सांगुन ती सुटल्यावर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देतो.
ईकडे पोलिसांना खुनाचे हत्यार शोधायचे असते. पण नक्की काय शोधायचे आणी कुठे शोधायचे हे न सुधरल्याने पोलिस काहीच न करता गप्प बसुन रहातात. मग दिव्व्यालाच पुढाकार घ्यावा लागतो. ती आपल्या घरचा “तो” पुतळा गुपचुप आफताबच्या घरात नेउन ठेवते व पोलिसांना खुनाचे हत्यार उर्फ पुतळा आफताबच्या घरात असल्याची खबर देते. पोलिस तत्परतेने जाउन समोरच ठेवलेला पुतळा उर्फ खुनाचे हत्यार ताब्यात घेतात. (काय म्हणता?, अंतराला संशयीत म्हणुन अटक केल्यावर पोलिस घराची झडती घेत नाहीत का? घेत असतील की! पण डोक्यात मारता येतिल अशा कितीतरी वस्तु असतात. त्यातली नेमकी कुठली डोक्यात हाणायला वापरली ते पोलिसांना कुणी तरी सांगीतल्या शिवाय कसे समजणार?)

Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पोलिसांकडे दोन महत्वाच्या गोष्टी जमतात त्या म्हणजे संशयीत आरोपी व ख़ुनाचे हत्यार! पोलिस अंतरावर खुनाचा खटला सुरू करतात. “प्रेत सापडले नाही” ही किरकोळ अडचण असते खरी! पण ह्त्यार जसे आपोआप सापडले तसेच प्रेतही आपोआप सापडेलच की! (प्रेतच ते! जाउन जाउन जाणार कुठे?.) किरकोळ गोष्टीसाठी न्यायदानाला उगाच विलंब नको.
ख़टला सुरू होतो. पोलिस दिव्व्याला खुनाचा साक्षिदार व “पुतळा” हे खुनाचे हत्यार कोर्टात दाखल करतात. या पहिल्याच सुनावणीनंतर अंतराचा वकिल (रितेश ने दिलेला) त्यांना “ईनको बचान बहोत मुश्कील” असल्याचे सांगतो. अंतराला डोळ्यासमोर फासाचा दोर दिसायला लागतो. आता तिला पार्वती मातेची आठवण येते व अंतरा पार्वतीची क्षमा मागुन “सुधर जाने का” वचन देते.


Ashbaby
Thursday, April 03, 2008 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉलीड इन्टेरेस्टिन्ग आहे ही गोष्ट.... पटकथा तुम्ही लिहिली असतीत (वर लिहिलंय त्याची कॉपी टु कॉपी) आणी महत्वाचे म्हणजे अंतरा नसती तर मी कदाचित.. सिडी आणलीही असती. पण तेवढे नशीब कुठे??

खुप छान लिहिलेय, हहपुवा.....


Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुदैवाने (आपल्या) पार्वती मातेला दया येते (आपली) आणी अंतराला आपल्या टक़्क़ूर्‍यात दिव्व्याने पुतळा हाणल्याचे व त्यावेळेस आपली इतर दोन लफडी पण हजर असल्याचे आठवते. ती रितेशला बोलाउन “सब सच” सांगते. रितेश विश्वास ठेवतो व “सच सामने लाने की” कसम खातो. (पुरुष जात्याच समजुतदार असतात. बायको किंवा प्रेयसी वर अविश्वास दाखवुन तिच्या विरोधात सहसा जात नाहीत). रितेश मग पुतळा जिथुन विकत घेतलेला असतो त्या दुकानदाराला साक्षिला उभा करतो. दुकानदार पुतळा दिव्व्याने खरेदी केल्याची साक्ष देतो. रितेश मग दिव्व्याचा पाठलाग करून तिने अडकवुन ठेवलेल्या ईतर दोन लफड्यांची सुटका करतो व त्यांना साक्षिला उभे करतो. त्या दोघी दिव्व्याने आफताबचे डोके सडकवल्याची साक्ष देतात. न्यायाधीश अंतराला “बाईज्जत बरी” करतात. मग पोलिस दिव्व्याला अटक करतात. अंतरा पार्वती मातेचे आभार मानते.
आफताबला पुन्हा त्याच्या घरातिल बॆड वर जाग येते. तो चक्क पुरुष असतो व सुधारलेलाही असतो. असा सर्व आनंदी आनंद होतो.
(समाप्त).


Uchapatee
Thursday, April 03, 2008 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अँशबेबी. (चार शब्द)

Dakshina
Thursday, April 03, 2008 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब उर्फ अंतरा सारख्या पट्टीच्या लफडेबाज माणसाला बॉस डील
साठी घरी आपल्या बेडरूम मधे का बोलावतो हे न कळावे म्हणजे बडजात्यांना
“लग्नाच्या तयारीला काय काय करावयाचे असते” हे माहीत नसण्यासारखेच झाले.
>>>>


Aas
Thursday, April 03, 2008 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि
धमाल लिहिलय
मस्तच ग्रेट.....


Tanyabedekar
Thursday, April 03, 2008 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेरा बॉलीवूड महान!!!!!!

उचा"पतीं"ना हा चित्रपट संपूर्ण बघितल्याबद्दल भारतरत्न घोषित करायला पाहिजे


Swa_26
Thursday, April 03, 2008 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही लिहिलय. ... ...

Ashbaby
Thursday, April 03, 2008 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या, आणि ते "मै तेरे बच्चेकी मा बननेवाली हु" त्याचे काय झाले? कि सगळा पिक्चर म्हणजे आफ़ताब ला पडलेले स्वप्न होते???

Amruta
Thursday, April 03, 2008 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचापती मस्त लिहिलय. ह. ह. पु. वा झाली. :-)
कसला भयंकर अचाट आणि अतर्क्य आहे हा सिनेमा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators