Upas
| |
| Tuesday, March 18, 2008 - 6:44 pm: |
| 
|
मृ you are right! धूनच म्हणायचं होतं मला.. कुठे मिळेल का ती? मला वाटतं जेव्हा पाचवा रविवार असेल तेव्हा दुपारी मराठी नाटकाचे वाचन असे.. घरातली सगळी मंडळी तन्मयतेने ऐकत असत.. मला मात्र नाटक नुसते ऐकून काय मिळते हे कळत नसे.. अजूनही चालतो का हा कार्यक्रम?
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 19, 2008 - 3:16 am: |
| 
|
परिक्षेच्या दिवसातही माझे रेडिओ ऐकणे सुरुच असायचे. त्यावेळी संध्याकाळी पावणेसातला स्वरसुधा नावाचा कार्यक्रम लागायचा. रागावर आधारित एक गाणे, मग तोच राग मूळ रुपात ऐकवत असत. एकदा शर्मिली मधले मेघा छाये आधी रात, बैरन बन गयी निंदिया हे पटदीप CBDG रागातले गाणे ऐकले. त्या नंतरचा पेपर मला कठिण गेला होता. त्यात व्यवस्थित गूण मिळाले पण या गाण्याचा मी धसकाच घेतला होता. पुढे पटदीप मधला प ऐकला तरी मी रेडिओ बंद करत असे. आता खुप हसू येतेय खरे, पण त्यावेळी मात्र असे व्हायचे खरे.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 19, 2008 - 4:19 am: |
| 
|
मला भुलेबिघरे गीत आवडायचे संध्याकाळी ६:३० लागायचे बहुधा. त्यात वरचेवर आईचे फ़ेव गाणे, चोरी चोरी मेरी गली आना है बुरा... असायचे. आणि रात्री आई हमखास 'आपली आवड' लावायची,ते मला आठवतेय आम्हाला झोपवताना. त्यात एक गाणे आम्ही लहान मुले अगदी म्हणायचो, डार्लींग डार्लींग काय म्हणतोस? डा डा डारलींग हाऽऽऽ हा डारलींग. कोणाला आठवते हे गाणे? आणि रोज वरचेवर लागणारे गाणे 'रुपेरी वाळुत माडाच्या बनात' हे गाणे एकून एकून लहानपणीच इतके पाठ ना.. सगळे हसायचे मला कुठलेही गाणे म्हणायला सांगीतले की हेच गाणे आईने दटावले तरीही. इतक्या लहानपणी काय हे असे भाव चेहर्यावर लोकांच्या. तर सकाळी ११ ११:३० वाजता वगैरे,आर्त स्वरात 'भेटी लागे जीवा' .. हमखास लागणारे गाणे. मी नुकतीच झोपेतून उठलेली असायची नी दुपारची शाळा. वैताग यायचा पन सांभळणार्या आजी पण सतत रडीओ लावायच्या आई नसताना. ऋणानुबांधाच्या जिथेच पडल्या गाठी.. ही सर्व मी फक्त रेडीओवरच एकली आहेत लहानपणी. आणखी हमखास लागणारे गाणे म्हणजे गंध फुलाच गेला सांगून हे आपली आवड मध्ये लागयचे बहुतेक वेळा. आम्ही वात्रट लहान मुले नाक दाबून वगैरे गंध तुझा गेला सांगून म्हणायचो. गेले ते दिवस....................
|
Manuswini
| |
| Wednesday, March 19, 2008 - 4:53 am: |
| 
|
आणखी आठवण म्हणजे पप्पांनी खूप आठवणीने एक जुना रेडीओ जपून ठेवला होता, आजोबांची(त्यांच्या बाबांची) आठवण म्हणून. आजोबांना गाण्याची आवड होती. कोणी पाहीलेय हे मॉडेल? तो रेडीओ जवळ्जवळ २२ inch असेल, मोठा नॉब, लहान नॉब, सरकता काटा नी पिवळ्या रंगाचे काळे डोट असलेले कापड नी खाली ब्रॉउन रंगाची फळी का काय ते. मला कळायचेच नाही की पप्पा हा रेडीओ का इतके जपतात दुसरा नवीन छान घरात रेडीओ कम cassettplayer असताना जो पर्यन्त मी 'तो' प्रताप केला. आजही वाईट वाटते. पप्पा जे खरोखर कधी मला ओरडले न्हवते / नाहीत चांगलेच वैतागले होते तेव्हा घरात आल्यावर. तसा तो चालत पण होता बर्यापैकी. पन ह्या प्रकारानंतर बंद पडला. मी संशोधक वृतीने तो वरून काढून त्याचे disection केले होते घरात आई नसताना. खरे तर disection कराअय्च्या आधीच वरून कढताना पडला,नशीब माझ्या अंगावर नाही पडला पण कायच्याकाय जड.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 19, 2008 - 5:03 am: |
| 
|
ही आठवण लिहिताना कायच्याकाय nostalogia झाला नी सहज गूगल केले नी अगदी फॉटोच मिळाला, अगदी असाच होता आजोबांचा रेडीओ पण कापड पिवळे ने काळे डॉट होते. हे पण पिवळेच आहे वाटते पण ही अशी Extra बटणे न्हवती पण खाली.... 
|
कुणाला "शुक शुक मन्या जातोस कि नाही" आणि " "राजा राणीची नको काऊ माऊ ची नको" हि आपली आवड मधे नेहमी लागणारी गाणी आठवतायत का? यातील राजा राणीची नको गोष्ट मला सांग आई रामाची" हे बालगीत तर अप्रतीमच होत. अजुनही त्या नादमधुर गाण्याचे स्वर कानात गुंजत आहेत.
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 19, 2008 - 5:06 pm: |
| 
|
जयमहाराष्ट्र. असे शब्द होते त्याचे. शुक शुक मन्या जातोस कि नाही का घालु पाठीत लाटणे अगं नको गं मने, तूला न शोभे तूझ्या मन्याला अस्से हे हाकलुन देणे आई आणि शेजारच्या काकू मात्र ज्याम वैतागायच्या या गाण्यावर. दूसरे पण आठवतेय मला, पण ते जरा गेंगाण्या स्वरात होते.
|
Upas
| |
| Wednesday, March 19, 2008 - 8:37 pm: |
| 
|
मला वाटतं ह्या गाण्याचे कवी गिरगावतले विनायक रहातेकर आहेत..
|
ते गेंगाण्या आवाजातील गीताचे बोल असे होते. राजा राणीची नको,काऊ माऊची नको गोष्ट मला सांगा आई रामाची, वेळ माझी झाली आता झोपेची, राम हसायचा कसा?राम रडायचा कसा? आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा? समजुत कोणी घातली त्या वेड्याची? गोष्ट मला सांग आई रामाची. राम काळा का गोरा दिसत होता का बरा? मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा? आवड होती का त्याला खेळाची? गोष्ट मला सांग आई रामाची. राम गेला का वनी त्याला धाडीला कुणी? भिती नाही त्याच्या कशी आली ग मनी? सोबत तेथे होती त्याला कोणाची? गोष्ट मला सांग आई रामाची. फ़ार आठवावे नाही लागले.गाण्याची चाल आठवल्यावर बोल देखिल आठवले. पण खरच रेडिओचे ते दिवस फ़ारच अविस्मरणीय होते आणि आहेत.
|
पुणे केंद्र ऐकणार्यांनी दोन नावे आकाशवाणीवर नेहमीच ऐकली असतील ... सेवा चौहान आणि बंडा जोशी. बर्याच कार्यक्रमांत यांचा आवाज ऐकायला मिळायचा विशेषत विविधभारतीवरील बेला के फूल या कार्यक्रमात. मध्यंतरी आकाशवाणीने बेला के फूल बंद करून त्या वेळेत रेनबो वाहिनी असा काहीतरी कार्यक्रम चालू केला. लोकांच्या मागणीनुसार सदर कार्यक्रम बंद करून परत बेला के फूल सुरु करावे लागले.
|
Mrinmayee
| |
| Saturday, March 22, 2008 - 4:52 pm: |
| 
|
बालविहारात एक 'लाटणे काकु' असलेली श्रुतीका यायची. नाव आठवत नाही. पण ऐकायला मजा यायची. तसंच 'खोडी माझी काढाल तर, अश्शी मारीन फाईट' हे गाणं आवडायचं! नागपूर आकाशवाणीच्या बालविहारात 'कुंदाताई आणि अरविंदमामा' असायचे. बालविहारासाठी माझी आई नाटकं, श्रुतीका वगैरे ल्याहायची.
|
Maanus
| |
| Sunday, March 23, 2008 - 4:52 am: |
| 
|
ईथे कुणाला पॉडकास्टींग मधे interest आहे का? पॉडकास्टींग्: म्हणजे. दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी प्रकाशीत होणारा श्रवणीय कार्यक्रम. प्रत्येकालाच रेडीओ स्टेशन टाकता येत नाही म्हणुन मग ते audio files internet वर टाकतात व, मग ज्यांना ऐकायच्या असतील ते लोक download करुन ऐकतात. तर मुद्दा असा की ईथे कोणाचा आवाज चांगला असेल, व कुणाकडे दर १०-१२ दिवसांनी बोलण्यासारखे मटेरीअल गोळा करण्याची कला अंगात असेल तर आपन मिळुन आपला mini radio project सुरु करु शकतो. सगळ्या technical बाबी मी सांभाळु शकतो, फक्त आता एक चांगला आवज आणि एक चांगला लेखक पाहीजे.
|
Maanus
| |
| Sunday, March 23, 2008 - 4:58 am: |
| 
|
btw मधे esakal ने podcasting सुरु केले होते, पण दोन मुलाखतीनंतर बंद झाले. त्याची लींक http://www.esakal.com/podcast/interviews/interviews.xml आणि मायबोलीवरच्या श्यामली ने देखील podcasting सुरु केले होते, पण ते देखील बंद दिसतेय. http://www.odeo.com/channel/411313/rss.xml radio nri
|
D_ani
| |
| Sunday, March 23, 2008 - 2:52 pm: |
| 
|
माणूस, मला खूप आवडेल लिखाण करायला. आणि सद्ध्या मला वेळ पण आहे. माझा आवाज चांगला आहे पण मला गाता येत नाही.
|
Shyamli
| |
| Sunday, March 23, 2008 - 6:17 pm: |
| 
|
माणसा, मी ते पोड्कास्ट सुरु केलं होतं खरं पण त्यात मला दुस-याची गाणी नव्हती गायची माझी असलेलीच गायची होती. दुर्दैवानी माझी गाडी एका गाण्याच्या पुढे सरकलेली नाहिये अजुन. पण तू म्हणतोस तसा प्रयोग करायला पण हरकत नाहीये. बघुया काय करता येइल ते. काही कल्पना तुझ्या डोक्यात असतील तर मेल टाक. ...
|
Anaghavn
| |
| Monday, March 24, 2008 - 5:19 am: |
| 
|
माणसा, मला पण interest आहे.माझा आवाज चंगला आहे. मी गाणंही म्हणते. (लेखन पण करते मधुन मधुन). काय कराव लागेल ते सांग. अनघा
|
Ajjuka
| |
| Monday, March 24, 2008 - 5:37 am: |
| 
|
मी लिहीन, बोलेन सुद्धा! पण regularly जरा अवघड आहे.
|
Aaftaab
| |
| Monday, March 24, 2008 - 5:46 am: |
| 
|
मीही गातो. मीही यात सहभागी होऊ इच्छितो.
|
माणसा याबद्दल अजुन थोड सविस्तर लिहिलेस तर बरे होईल! नक्कि काय करायला हव हे देखिल कळेल. मला देखिल काही करता येईल का? याचा अंदाज बांधता येईल
|
Bee
| |
| Monday, March 24, 2008 - 9:12 am: |
| 
|
अरे पण गाण हेच फ़क्त रेडीओ नाही. इतर गोष्टीही असतात बोलायला आणि त्यात गाणार्याचाच आवाज हवा असतो असे नाही. श्रवणीय आवाज असायला हवा मग गद्य लिखाण देखील काव्यमय वाटतं ऐकायला. माणूस, तुम्हीच आवाज तपासून मग काय ते ठरवल तर बरे होईल. माझ्या आवाजाबद्दल मी कसे काय बोलणार. अजूनपर्यंत तरी कुणी कानावर हात ठेवला नाही इतके काय नक्की सांगतो
|