|
Mrdmahesh
| |
| Wednesday, March 12, 2008 - 8:23 am: |
| 
|
या मराठी समालोचकांची एक भारी खोड म्हणजे दरवेळी जुन्या मचचा संदर्भ देणे. एखाद्याने धुंवाधार फलंदाजी केली की हे म्हणायचे "मला वाटतं नरेन, १९३२ साली अमुक फलंदाजानेही अशीच फलंदाजी केली होती... पण त्यावेळी अमुक गोलंदाज होते.." इ. इ. मला बाळ ज. पंडितांचं समालोचन आवडायचं..
|
Hkumar
| |
| Wednesday, March 12, 2008 - 10:47 am: |
| 
|
इंग्लिश समालोचकांनी गावसकर चे 'गवासकर' व तसेच 'वेंगसारकर' करून टाकले होते ते मात्र खटकायचे. commentry च्या बाबतीत मला आठवतय की शाळेतील इंग्रजीत नापास होणारी मुले सुद्धा eng. comm मात्र 'फाडफाड' म्हणून दाखवत.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 13, 2008 - 3:20 am: |
| 
|
पद्मिनी कोल्हापुरेचे वडिल, पंढरीनाथ कोल्हापुरे, गायक आहेत हे माहित होते, पण त्यांचे गायन कधी ऐकण्याचा योग आला नव्हता. आज सकाळी भुले बिसरे गीत मधे त्यानी गायलेले, संगीतसम्राट तानसेन या चित्रपटातले एक सुंदर गीत लावले होते. एवढे जुने गाणे असूनही, दर्जा उत्तम होता, आणि गाणे तर चित्रपटाचा नावाला, साजेसेच होते. विविधभारती असे सूखद धक्के, देतच असते.
|
Dakshina
| |
| Thursday, March 13, 2008 - 5:22 am: |
| 
|
वा दिनेश, कित्ती छन....! पण मी नाही ऐकू शकले. मी नेमके परवाचे भुले बिसरे गीत ऐकले त्यात दिल अपना चे.. उईँ... इतनी बडी... लागलं होतं, आणि आज, शिशा ए दिल... दोन्ही गाणी मला प्रचंड आवडतात, आणि ही गाणी शक्यातो इतर कार्यक्रमात कधिच लागत नाहीत.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 13, 2008 - 7:55 am: |
| 
|
मराठीतल्या, किचकवध मधल्या लताच्या धुंद मधुमति रात रे आणि लता, सुधीर फडके यांच्या असा केसात माळुन मरवा या दोन्ही गाण्यांची हिंदी रुपांतरे याच कार्यक्रमात ऐकवली होती. ( अर्थात हा सिनेमा हिंदीतही निघाला होता ) हि दोन्ही गाणी मी पहिल्यांदाच ऐकली. आता परत ऐकण्यासाठी फ़र्माईश करायला हवी.
|
रेडियोवरची एक जुनी जाहिरात जिंगल नये जमाने के संग नये रंग फशन की दुनिया में आगे कदम फबिना सुटिंग फबिना हे फबिना प्रकरण आज अस्तित्त्वात आहे का? बहुधा नसावे. पण जुन्या हिंदी सिनेमात बी ई एस टी च्या बस दाखवतात त्यांच्या मागे ही जाहिरात हमखास दिसते. ह्या जाहिराती बहुधा प्रीती सागरच्य आवाजात असायच्या.
|
Tonaga
| |
| Sunday, March 16, 2008 - 1:45 pm: |
| 
|
हाथोमे हाथ लिये दिलबरको साथ लिये, हो जाये तन मन मगन, कोका कोलाके संग.... ही जाहिरात तर आता कोका कोला वाल्यानाही आठवत नसेल. happy days are here again च्या आधीची.
|
Tonaga
| |
| Sunday, March 16, 2008 - 1:51 pm: |
| 
|
तन्दुरुस्तीकी रक्षा करता है लाईफ बॉय, लाईफ बॉय है जहाँ, तन्दुरुस्ती है वहाँ... लाईफबॉय साबुन मैल मे छिपे कीटाणुओंको धो डालता है... लाईफ बॉय.....
|
Dineshvs
| |
| Sunday, March 16, 2008 - 4:10 pm: |
| 
|
तशीच आणखी एक लक्षात राहिलेली जाहिरात, एक सिर्फ़ एक, सिर्फ़ एक सॅरिडॉन और सरदर्दसे आराम. पुर्वी रेडिओवर जाहिराती संदर्भात एक निवेदन दिले जायचे. जाहिराती चूक, किंवा त्यातला दावा जर अतिरंजित वाटला तर तक्रार कुठे करायची ते सांगितले जायचे. आता ते निवेदन मागे घेतले आहे बहुतेक. काळाचा महिमा !!! आणीबाणीच्या काळात, हम होंगे कामयाब, या गाण्याने कहर केला होता. त्या गाण्याचा अर्थ छान असला तरी त्या काळाच्या कटु आठवणींमूळे, ते गाणे नावडते झाले आहे. पुढे असेही कळले कि या गाण्याची चाल एक इंग्रजी गाण्यावरुन, ( बहुतेक माय फ़ेअर लेडी, मधल्या, ) घेतली होती.
|
Tonaga
| |
| Monday, March 17, 2008 - 1:38 pm: |
| 
|
सिर्फ़ एक सॅरिडॉन और सरदर्दसे आराम. >>>>>>> दिनेश साहेब, सिर्फ़ एक सॅरिडॉन और सरदर्दसे आराम. ना रहे पीडा, ना रहे दर्द, चुस्ती फुर्ती मिल जाये जल्द.... सिर्फ एक सारिडॉन... राहिलं ना....
|
Tonaga
| |
| Monday, March 17, 2008 - 1:48 pm: |
| 
|
मला वाटते, नेल्सन मन्डेला भारतात सुरुवातीस आले तेव्हा त्यांचे मुक्तीगीत आफ्रिकन मुलीनी त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात गायले होते... ते होते we shal overcome, we shall overcome one day इन्दीराजीना ते खूप आवडले त्यावरून त्यांच्या सूचने नुसार ते हिन्दीत आणलं 'होंगे कामयाब...' म्हणून. नन्तर त्याच पार 'डोलकर' झाला..
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:21 am: |
| 
|
हॉ टोणगा, त्या दोन ओळी राहिल्याच. रविवारी दुपारी काहि प्रायोजित कार्यक्रम असायचे. कोहिनूर गीत गुंजार हा असाच एक दर्जेदार कार्यक्रम. त्यात एकदा मीरेची भजने ऐकवली होती. जुत्थिका रॉय चे गाणे मी पहिल्यांदा त्या कार्यक्रमात ऐकले. इन्स्पेकटर ईगल हा पण एक चांगला कार्यक्रम असे. तो बहुदा ईगल फ़्लास्क वाले सादर करत असत. निव्वळ आवाजाच्या माध्यमात डिटेक्टिव्ह स्टोरीज, छान सादर व्हायच्या. याच नावाचा एक सिनेमा आला होता त्यात संजीव कुमार आणि कुमकुम होते, मदनमोहनने संगीत दिलेला तो शेवटचा सिनेमा. ( त्या वेळचा. वीर झारा अलिकडे आला. ) पण तो सिनेमा अजिबात चालला नाही. मराठीत मर्मबंधातली ठेव, नावाचा सारस्वत बॅंकेचा कार्यक्रम असे. त्यात नाट्यगीते असत. तो पण छान कार्यक्रम असे. हे कार्यक्रम प्रायोजित असले तरी त्यातल्या जाहिराती कधीच अंगावर, सॉरी कानावर आदळत नसत. आता कॉम्प्युटर हार्डवेअरच्या क्षेत्रात असणारे जेटकिंग वाले त्याकाळे रेडिओ किट विकत असत. जोडणी, सॉलडरिंग वगैरे करुन एक छोटा रेडिओ तयार होत असे. अनेक उचापती मुलांचा तो आवडता छंद असे.
|
शेंडेनक्षत्र फबिना हे factory च नाव आहे कपड्यांच्या.माझे आजोबा होते तिथे. मुलुंडला होती ही factory केळकर च्या तिथे.बर्याच वर्षांपुर्वी बंद झाली.
|
रात्री १० वाजता 'हवामहल' नावाचा कार्यक्रम असायचा. श्रुतीकेसारखं काही असायचं बहुतेक? कुणाला आठवतंय?
|
Upas
| |
| Tuesday, March 18, 2008 - 2:52 pm: |
| 
|
मला आठवतय, त्याचं टायटल सॉंग आहे का कुणाजवळ.. छे अगदीच नॉस्टेलजीक वाटायला लागलं मृ..
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:13 pm: |
| 
|
मृन्मयी ताई, दहा वाजता नव्हे सव्वा नऊ वाजता...
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:27 pm: |
| 
|
ह्या विविध भारतीची अत्यन्त वाईट खोड म्हणजे कुठलेही गाणे ते पूर्ण ऐकू द्यायचे नाहीत. जाहिरातीसाठी ते शेवटच्या ओळी अथवा कडवी 'खात'असत. अतिशय चीड येई त्यावेळी... विशेषत: लागा चुनरीमे दाग अथवा ना तो कारवाकी तलाश है अशा क्रेसेन्डो गाठणार्या गाण्याच्या वेळी... आकाशवाणीका पंचरंगी प्रोग्राम आणि नन्तर आकाशवाणीकी विग्यापन सेवा झाली.....
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:32 pm: |
| 
|
रात्री १० वाजता 'हवामहल' नावाचा कार्यक्रम असायचा. श्रुतीकेसारखं काही असायचं बहुतेक? कुणाला आठवतंय? >>>>त्याला ते शिंचे 'झलकी' असे म्हणत. ती बहुधा त्यातल्या त्यात कुणी गंगाप्रसाद पांडेयकी लिखी असे.. त्याची सुरुवात बर्याच वेळा 'अजी सुनती हो...' असा होई अन शेवट सगळ्यांच्या गडगडाटी हास्याने होई
|
टोणग्या वेळ बरोब्बर! (तेव्हा डोळ्यात प्रचंड झोप असायची येव्हडं आठवतं!) उपास, हवामहलला टायटल सॉंग होतं की नुस्तच म्युजिक?
|
अजून काही जुने कार्यक्रम म्हणजे एस कुमार्स का फिल्मी मुकद्दमा! त्यात कुण्या प्रसिद्ध कलाकाराची कोर्ट ट्रायल व्ह्यायची आणि बहुधा विरोधी बाजूचा वकील हा अमीन सायानी असायचा. बरा असायचा प्रोग्राम. दुपारी कधीतरी लोकसंगीत असायचा. त्याचे ते एक विशिष्ट संगीत सुरू झाले की आता बराच वेळ काही चांगले कार्यक्रम नाहीत एवढे कळायचे आणि रेडियो बंद. रविवारी जॉनी वॉकरचा सवाल जवाब असा काहीतरी कार्यक्रम असे. बोर्नव्हिटाचाही स्कॉलर लोकांकरता एक प्रोग्रम असायचा. त्या काळात सिनेमे इतके जास्त बघत नव्हतो त्यामुळे नवा सिनेमा आला की त्याचा रेडियो प्रोग्रॅम असायचा. मग दुधाचि तहान ताकावर भागवली जायची. अमर अकबर अन्थनी, परवरीश, काला पत्थर असल्या सिनेमांचे रेडियो प्रोग्रॅम ऐकले आहेत. शोले जेव्हा येऊ घातला होता तेव्हा त्याची रेडियोवरची जाहिरात अंधुकशी आठवते आहे. अजून कुणाला आठवते का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|