|
Zakki
| |
| Friday, March 07, 2008 - 1:24 pm: |
| 
|
तुंग्रुस, तुमच्या अपघाताबद्दल वाचून वाईट वाटले. मलाहि त्या तरुणीचा राग आला. असे बोलणे बरोबर नाही. पण भारतात नाहीये हो वहतुकीचे नियम पाळण्याची पद्धत! अजिबात नाहीये. असे होणारच. तरुणी ऐवजी तरुण असता तरी त्याने असेच केले असते. आता तुमची खरी तक्रार नोंदवून का घेतली नाही? कारण हे असे इतकेदा होते की पोलीसपण कंटाळले असतील. हेहि भारतात चालतेच. या उलट माझा अनुभव. रस्ता गोठणार्या पावसामुळे फारच गुळगुळीत झाला होता. पुढे जाण्या ऐवजी मागे फिरावे का, याचा विचार करत मी गाडी बाजूला घेतली. थांबवली. नि बघतो तो समोरून एक भली मोठी गाडी जरा वेगातच येत होती. आणि अपेक्षेप्रमाणे त्या गाडी चलवणार्या बाईचा गाडीवरील ताबा सुटला नि ती माझ्या गाडीवर अगदी समोर येऊन जोरात आपटली. जवळ जवळ ७० कि.मी. वेगाने. माझी गाडी दहा बारा मीटर मागे ढकलल्या जाऊन, आयतीच उलट दिशेला फिरली. हा अर्थात, रस्ता खराब असल्याने झालेला अपघात. ती बाई गाडीतून उतरून बाहेर आली. मी पण. तिने डोळ्यात आसवे आणून माझी पुन: पुन: क्षमा मागितली. मला आश्वासन दिले की जो काय खर्च येईल तो सर्व तिची विमा कं मला पूर्णपणे देईल. नंतर मग पोलीस आला, रीतसर चौकशी झाली वगैरे. पण मुद्दा असा की वाहतुकीचे नियम आहेत नि ज्याची चूक असेल त्यावर कारवाई होते. हे सर्व माहित असल्याने कुणि दादागिरी करू शकत नाही! भांडतील, पण पोलीस काय म्हणेल ते खरे. एव्हढे सगळे कुठले भारतात व्हायला? मुळात अगदी शिकलेले, श्रीमंत, वरच्या वर्गाचे, खालच्या वर्गाचे, कायदा मोडण्यात अग्रेसर! ह्या गोष्टी नागरिकांनी आपआपसात समजून घ्यायच्या नि कायद्याप्रमाणे काय असेल ते करायचे! भारतात काय नुसताच आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! प्रत्येक देशात काही ना काही अडचणी असतातच. त्याचा स्त्री पुरुष असण्याशी संबंध फार कमी!
|
अरे काय अजुनही राग गेला नाही वाटत?????अजुन काय करायला हव??? <<< मला वाटते, हीच विचारसरणी पुढे पुरुषाची व्यथा बनत असेल मॉड / ऍडमिन, सगळीकडे द्याव्या लागणार्या तळ्टीपा पाहता त्याचेही काही शॉर्टकट बनवता येतिल का>>.. गिर्या लै हसलो. टुंग्रुस जबरी लिहीलय.
|
Zakki
| |
| Friday, March 07, 2008 - 10:52 pm: |
| 
|
'पटले नाही, अपमानकारक, भावना दुखावणारे असे वाटत असल्यास, आ. बु. दो. स.!!' कशी आहे तळटीप? नुसते आ. बु. दो. स. लिहीले की काही लिहीले तरी चालेल!
|
Manjud
| |
| Saturday, March 08, 2008 - 7:48 am: |
| 
|
पुरुष जातीने सावध व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे ते नाही सांगितले तुंग्रुस ह्यांनी...... बहुतेक पुरुष जातीला वाचवण्यासाठी स्त्रीयांऐवजी पुरुषांनीच गरोदर रहावे असे तर नाही ना सुचवायचे त्यांना? वॉव, खरंच असं झालं तर स्त्रीयांना काय बरंय.... केवढं मोठं संकट टळेल जीवावरचं. मॉड्सनी हा बा. फ. अजून कसा काय चालू ठेव्लाय आश्चर्यच आहे.
|
>>>>>> मॉड्सनी हा बा. फ. अजून कसा काय चालू ठेव्लाय आश्चर्यच आहे. कारण मी अजुन इथ टपकायचोय! हे हे पान्ढर्या शाईत लिहाव लागण हा देखिल बर्याच सार्या स्त्रीयान्चा कटच बर का!
|
Uday123
| |
| Saturday, March 08, 2008 - 5:14 pm: |
| 
|
तुषार्- एक चांगले लिखाण टाकले, धन्यवाद. झिजलेले जोडे, पेढे ई. मला तर माझे लहानपण आठवले, गत-स्म्रुतीत हरवलो. तुंगृस- तुमची भिती १००% खरी आहे. हा फ़ळा म्हणजे काही लोकांचे पोटशूळ ठरु लागला आहे. जाणुन बुजुन उधळण्याचे प्रयत्न होतील (मला तर व्युह-रचनेबद्दल कुज-बुज सुरु झालेली दिसत आहे), पण आपण आता त्याला बळी न पडण्याचा प्रयत्न करु. भलेही अपयश आपलेच आहे पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
|
या स्त्रीयांना कितीही मान दिला ना तरी या कायम म्हणत राहतीलच की आमच्या वर अन्याय होतो. अरे सध्या ट्रेंड च आहे तसा. अजुन काहि मुद्दे. प्रत्येक प्रेमिक आणि प्रेमिकेच्या जोडित पहिले बाईचेच नाव असते. हिर्-रांझा, सोनी-महिवाल,लैला-मजनू वगैरे ( रोमियो चा अपवाद पण मेजोरिटी मधे त्याच आहेत.) सार्या जगाने कायम आईचे गुनगान केले बापाला कोण विचारतय का? आणि या बायका कायम म्हणतात कि पुरुष त्यांना कमी लेखतात दुयाम दर्जा देतात. अरे कित्ति कित्ती स्त्रीदेवता ना पुजतोय आम्हि वर्षानु वर्षे. रेणुका, यल्लमा, तुळजाभवानी, चंडी, दुर्गामाता अजुन किती लिहु? स्त्रीया संसारासाठी कायम खुप त्याग करतात म्हणुनच प्रत्येक नात्यात आम्हि स्त्रीची पुजा केली आहे. तिचा कायम मान ठेवला आहे. घरातले कुठले तरी धार्मिक काम कधी स्त्रीच्या शुभ हस्तस्पर्शा शिवाय केले जाते का? पत्येक ठिकाणी बरोबरीचे स्थान आहे त्यांना. पण कायम त्यांच्या वर होणार्या अन्यायाविशयीच बोलले जाते. तुम्हाला जाणीव आहे का तुम्हाला आमच्या मनात विचारत किती मान आहे आहे किती आदर आहे ते.
|
तुम्हाला जाणीव आहे का तुम्हाला आमच्या मनात विचारत किती मान आहे आहे किती आदर आहे ते. >>>> ते सर्व मनात आणि विचारातच आहे बरं का.. कृतीत फ़ार कमी पुरुषाच्या दिसते.
|
Zakki
| |
| Monday, March 10, 2008 - 11:36 am: |
| 
|
कृति पण होईल हो! पण मन शुद्ध झाल्याशिवाय कृतीत प्रामाणिकपणा येत नाही. तेंव्हा सुरुवात योग्य दिशेने झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही!

|

|
आत्ताच एका फिलिपिनी च्या टि शर्ट वर वाचलेले झक्कास वाक्य I dont need encyclopedia, my wife knows everything.
|
Storvi
| |
| Tuesday, March 11, 2008 - 6:47 pm: |
| 
|
>>आणि या बायका कायम म्हणतात कि पुरुष त्यांना कमी लेखतात दुयाम दर्जा देतात. छे छे आम्ही असलं काही म्हणत नाही, उलट आम्ही तर म्हणतो, की बायकाच बायकांवर अन्याय करतात आणि त्यांना कमी लेखतात, त्यामुळे पुरुषांना गरजच पडत नाही त्या फंदात पडायची. ज्या क्षणी सगळ्या बायका एकमेकांना मान देतील आणि पुरुषांचा उदो करायचा बंद करतील तेंव्हा खरे कळेल की पुरुषांची या बाबतीत खरी खुरी वागणुक कशी आहे ती. 
|
Zakki
| |
| Tuesday, March 11, 2008 - 8:50 pm: |
| 
|
वा, वा, Storvi ! कित्येक वर्षांनी! आरोही काय म्हणते? शाळेत जाऊ लागली का? नि इतके तर्कशुद्ध लिखाण आजकाल करायचे नसते मायबोलीवर, नि तेहि अश्या मुद्दाम भांडण उकरून काढलेल्या बातमी फलकावर! तुम्ही मागे ते पुण्यातील वहातुकीचे नियम इंग्रजीतून मराठीत का मराठीतून इंग्रजीत भाषांतर करायला घेतले होते त्याचे काय झाले? खरे तर हिंदीत नि बिहारीत करायचे भाषांतर. म्हणजे कदाचित् थोडा उपयोग झाला असता. काही फरक पडला आहे का पुण्यात वहातुकीबाबत? येत जा, नियमितपणे. आजकाल इकडे अनेऽक लोक अत्यंत भावनाप्रधान, हळवे, नि मनस्वी झाले आहेत. जपून लिहावे लागते. नाहीतर एकदम वणवा पेटतो!!
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, March 12, 2008 - 5:24 am: |
| 
|
जपून लिहावे लागते. नाहीतर एकदम वणवा पेटतो!! >>
|
Dakshina
| |
| Wednesday, March 12, 2008 - 6:32 am: |
| 
|
झक्की, इतके जुने तुमच्या लक्षात कसे काय रहाते?
|
Tonaga
| |
| Wednesday, March 12, 2008 - 2:40 pm: |
| 
|
जपून लिहावे लागते. नाहीतर एकदम वणवा पेटतो!! >>>>>>>>>>वणवा मराठीतच पेटतो ना? झाले की मग............!
|
Storvi
| |
| Wednesday, March 12, 2008 - 3:50 pm: |
| 
|
जपून लिहावे लागते. नाहीतर एकदम वणवा पेटतो!! >> आणि हे पुर्वी पेक्षा वेगळे आहे असे तुमचे म्हणणे आहे का? दक्षिणा अगं त्यांना काही आठवत नाही, आठवले असते तर असे विधान त्यांनी केले नसते झक्की माझ्या निरिक्षणात असे अढळले आहे कि तुमच्या आसपास नेहमीच वणवे पेटलेले असतात
|
Mrinmayee
| |
| Wednesday, March 12, 2008 - 4:02 pm: |
| 
|
वणवे पेटणार नाहीत तर काय? ते स्वत: फँटास्टिक फ़ोर मधले ह्युमन टॉर्च आहेत! *कधीकधी डॉक्टर व्हिक्टर वॉन डूम चा पण रोल अदा करतात! ~D
|
Tonaga
| |
| Wednesday, March 12, 2008 - 4:20 pm: |
| 
|
झक्की साहेबांचे शागीर्द कुठे आहेत? (आणखी एक आग लावे!)
|
Sayonara
| |
| Wednesday, March 12, 2008 - 4:40 pm: |
| 
|
हो दिसले नाहीत बरेच दिवसात. नाहीतर मधे मधे झक्कींच्या पोस्टच्या खाली त्यांचं पोस्ट असायचंच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|