|
आज लावणार बाराशे आठ्ठावन्न कीलो हर्टझवर.. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे.. दुपारचे साडेबारा वाजलेत.. आता ऐका आपली आवद्ड..
|
धोंडोपन्त साडेबारा केंव्हाच वाजून गेले. अजून कुंईईईईईईईइ चे चालू आहे- केन्द्रातील विज गेली का काय
|
धोंडोपंत, बाराशे अठ्ठावन्न किलो हर्ट्झ.. आजी कायम रेडिओ ऐकत असायची.. १२५८ वाचुन डोळ्यात पाणी आले.. आणि ती नेहेमी आकाशवाणी केंद्राला पोस्टकार्ड लिहुन तिची पसंती, नापसंती, एखाद्या मुद्यावर तिचे मत नेहेमी कळवायची.. तेव्हा वाटायचे की कोण हिचे पत्र वाचणार.. पण त्या पिढीमध्ये जागरुकता होती कदाचित आणि ती लोकं त्या जागरुकतेने आपली मते कळवायची.. """" आज लावणार बाराशे आठ्ठावन्न कीलो हर्टझवर.. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे.. दुपारचे साडेबारा वाजलेत.. आता ऐका आपली आवड.. """
|
Dineshvs
| |
| Monday, March 10, 2008 - 3:39 am: |
| 
|
टण्या, अजुनही विविधभारतीवर वैचारिक कार्यक्रम होतो. मंथन, आपले विचारोंका दर्पण असे नाव आहे त्याचे. दुपारी होतो तो पण त्याचे रेकॉर्डिंग आधी होते. त्याचे फोन नंबर्स आणि विषय सकाळी सांगत असतात. अर्थात अलिकडे पत्र कुणी लिहित नाही म्हणा. सगळे फोनवरच चालते. सुधीर, हो ते स्पूल्स राहिलेच कि. आकाशवाणीचे कार्यक्रम त्यावरच रेकॉर्ड होत असत, पण ते सगळे आकाशवाणीने अजून जपून ठेवले आहे.
|
Dakshina
| |
| Monday, March 10, 2008 - 6:17 am: |
| 
|
विशेष करून रविवारी दुपारी 'आपली आवड' ऐकायला वेगळेच मजा यायची. आम्ही खेळून खेळून दमलो असलो तरिही घरी जायचो नाही, भूक ही लागलेली असायची, आणि आई ओरडून ओरडून थकलेली असायची. बाबा पण साधारणपणे बाजारातून याचवेळी परतायचे, मग मात्र घरी जाण्यशिवाय काही इलाज उरत नसे. एकिकडे आपली आवड ऐकायची आणि दुसरीकडे गरम गरम पोळी, आणि तुरिच्या डाळीची आमटी खायची... आहा!हा!
|
Dineshvs
| |
| Monday, March 10, 2008 - 1:53 pm: |
| 
|
युववाणी नावाचा एक चांगला कार्यक्रम असे. त्यात माझी आवड म्हणून एक कार्यक्रम असे. त्यात एखादा आमंत्रित युवक वा युवती, आपल्या आवडीची गाणी निवेदनासकट सादर करत असे. बरेच जण बरी गाणी लावत पण एखादा सटकलेला असला तर काय बोलत असे, ते सगळेच डोक्यावरुन जायचे. याच कार्यक्रमात मी माझ्या शाळेतर्फ़े भाग घेऊन, बक्षीस मिळवले होते. याच युववाणीत, कॉफ़ी हाऊस म्हणुन एक छान चर्चेचा कार्यक्रम असे, अर्थात त्या काळातले चर्चेचे विषय वेगळे होते. आता कुणाला सांगून खरे वाटणार नाही पण रविवारी चक्क सिनेमा लागयचा रेडिओवर. एका तासात महत्वाचे संवाद आणि गाणी असायची. आम्ही अगदी आवर्जुन ऐकायचो तो कार्यक्रम. पण साधारणपणे, मायमाऊली, घरकुल, एकटा जीव सदाशिव असे ठराविक सिनेमे लागायचे.
|
रात्री नऊला नाटकवाचन किंवा कादंबरी वाचन असायचे. आम्ही पेंगत पेंगत ऐकायचो. दुसर्या दिवशी त्याची रसाळ चर्चा चालायची घरात, ते ऐकून आता न पेंगता ऐकायचे असा निश्यय करायचो पण केव्हा झोप लागायची कळायचेच नाही. ते फिनोलेक्स आहे होय! दक्षिणा, ती पूर्ण जाहिरात आणि दिनेश७७ मगदूम चहाचे धोषवाक्य वाचून छान वाटले. आणखी एक जाहिरात होती, विजेच्या दिव्याची. कंपनी कोणती ते आठवत नाही, पण- "आर आधांरात काय करतोस?" "गोट्या खेळतोय गोट्या!" असे संवाद त्यात होते. आपली आवड फक्त शनिवार-रविवारीच असते असा माझा बरेच दिवस समज होता, कारण इतर दिवशी शाळा असल्यामुळे ऐकायला मिळायची नाही. राजीव गांधींच्या हत्येच्या दिवशी दिवसभर रेडिओवर काहीच कार्यक्रम प्रसारीत केले नव्हते. तसेच ज्या दिवशी वीज नसायची त्या दिवशीही रेडिओचा आवाज बंद असल्यामुळे एकदम चुकल्यासारखे वाटायचे.
|
Hkumar
| |
| Tuesday, March 11, 2008 - 5:13 am: |
| 
|
रेडिओची करमणूक व श्रमजीवी यांचे एक वेगळेच अतूट नाते आहे. माझ्या नजरेत भरलेले एक ठळक उदाहरण म्हणजे इस्त्रीच्या दुकानातील कामगार. प्रचंड उष्णतेत फक्त बनियनवर काम करीत ते किती छान रेडिओचा आस्वाद घेत असतात.
|
गावात कुणाकडे काही कार्यक्रम असला (पूजा, जावळ काढायचा, लग्न, साखरपुडा वगैरे) तर दिवसभर घरावर मोठे कर्णे लावून त्यावर गाण्यांच्या ध्वनीफिती (पूर्वी ध्वनी तबकड्या असायच्या जुन्या काळातल्या काळ्या रंगाच्या) वाजवायची पद्धत सांगली कोल्हापुराकडे होती / आहे. तर रेडिओवर कार्यक्रम सुरू झाले की, कर्ण्यांना माईक जोडून त्याच्यासमोर रेडिओ लावून ठेवला जायचा. तसा रेडिओ घरोघरी असायचाच, पण रेडिओवरील कार्यक्रमांचे असे गावभर प्रसारण ऐकायला खूप गम्मत वाटायची. त्या कर्ण्यांवर आता 'झट ब्याह पट लफडे' प्रकारच्या दूरचित्रवाणीवरील दुपारच्या मालिकांचे प्रसारण होत असेल का? कोणी सांगावे!
|
अरे यार अजुन एक कोणता कार्यक्रम होता ज्यात एकाच चित्रपटातील सगळी गाणी ऐकवायचे. मला वाटते संध्याकाळी लागायचा तो.
|
Ankyno1
| |
| Tuesday, March 11, 2008 - 6:54 am: |
| 
|
'एक ही फिल्म से' रात्री ९ वाजता विविध भारती
|
Dakshina
| |
| Tuesday, March 11, 2008 - 7:08 am: |
| 
|
अभिजीत, तो कार्यक्रम म्हणजे "एक ही फ़िल्म से".... अजुनही लागतो, फ़क्त आता वेळ बदलली आहे. शिवाय असाच अजून एक कार्यक्रम म्हणजे "एक फ़नकार"... त्यात कुणी एक गीतकर, संगितकार... निवडून त्यांची सगळी गाणी लावली जात. पुर्वी या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं होतं, आज काल विशेष करून फ़क्त अभिनेते, गीतकार आणि संगितकारांवर्च फ़ोकस केला आहे असे दिसते. शिवाय "गुलदस्ता" नावाचा एक गझलांचा कार्यक्रम अजूनही लागतो रेडिओवर... त्यात दुर्मिळ गझला ऐकवतात. रुना लैला ची रन्जिशे सही मी याच कार्यक्रमात पहिल्यांदा ऐकली होती.
|
Hkumar
| |
| Tuesday, March 11, 2008 - 7:21 am: |
| 
|
पूर्वीच्या 'साज और आवाज' मध्ये इनाॅक डॅनियलचा वाटा खूप होता. अजूनही त्यांचे सूर आठवतात.
|
हवा महल हा हिन्दी नभोनाट्यांचा कार्यक्रम अजून ही आहे.त्यात बरीच छान नाटुकली ऐकलीत.काका हाथरसी महादेवी वर्मा प्रेमचन्द अशा अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या रचना नाट्य स्वरूपात सादर व्हायच्या
|
रेडिओचे जुने दिवस... मला पण आठवले, ते भल्यापहाटे उठून स्टेशनमधे जायचे. भक्तीसंगीत लावत लावत डोळ्यावरची झोप उडवायची. गाण्याच्या मधल्या वेळेत पट्कन डबा खायचा. ज्या दिवशी ड्युटी नसेल त्या दिवशी जुन्या सर्व तबकड्या घेऊन त्याcई सीडी बनवायचं. जुन्या निवेदकाना संगाकीय रेकॉर्डिंग करायला मदत करायची. संध्याकाळी गाणी लावताना मुद्दाम शोधून शोधून जुनी गाणी लावायची. आधी ती ऐकायची.. कित्येक गान्Yआशी परिचय इथेच झाला. त्या अंधार्या खोलीत बसून ऐकलेले न तुम हमे जानो किंवा लताचे तु जहा जहा चलेगा. आजही आठवण आली तरी अंगावर काटा येतो.
|
Tonaga
| |
| Tuesday, March 11, 2008 - 8:04 pm: |
| 
|
"....बॉथम पैवेलियन एंड से गेंदबाजी का जिम्मा सँभालेगे । सामना करेंगे गावसकर। फील्डिंग की जमावट.. तीन स्लिप्स, एक गली, कवर, मेड ओफ ओफ साइड में और वाइडिश मेड आन, मिड विकेट और फारवर्ड शार्ट लेग आन साइड में। बॉथम ने दौड़ना शुरु किया...अंपायर को पार किया दायें हाथ से ओवर दि विकेट ये गेंद आफ स्टम्प के थोड़ी सी बाहर। गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास किया गावसकर ने....। भाग्यशाली रहे कि गेंद ने उनके बल्ले का बाहिरी किनारा नहीं लिया अन्यथा परिणाम गंभीर हो सकता था।तारीफ करनी होगी बॉथम की कि जिन्होंने गेंद की लंबाई और दिशा पर अच्छा नियंत्रण रखा है और काफी परेशानी में डाल रखा हे भारतीय बल्लेबाजों को। अगली गेंद गुड लेन्थ, आफ मिडिल स्टंप पर ,बायाँ पैर बाहर निकाला गावसकर ने , गेंद के ठीक पीछे आकर सम्मानजनक तरीके से वापस पुश कर दिया गेंदबाज की ओर, बाँथम ने फोलोथ्रू में गेंद उठाई और चल पड़े हैं अपने बालिंग रन अप पर। पहली स्लिप पे गॉवर, दुसरी पर बॉयकॉट तीसरी पर बुचर, गली पर गूच और इसी बीच बॉथम की अगली गेंद आफ स्टम्प के बाहर, थोड़ी सी शॉट। स्कवायर कट कर दिया है गावसकर ने गली के पास से। गेंद के बीच भाग रहे हैं गूच..पहला रन भागकर पूरा किया गावसकर ने, दूसरे के लिए मुडे बैट्समैन..और गूच नहीं रोक पाए हैं गेंद को. गेंद सीमारेखा से बाहर ..चार रन......"
|
Hkumar
| |
| Wednesday, March 12, 2008 - 7:09 am: |
| 
|
क्रिकेटचे इंग्लिश, हिंदी व मराठी अशा तिन्ही भाषांतून समालोचन ऐकण्याची मजा वेगवेगळी असते. मराठीतून सुरूवात झाली तेव्हा ऐकताना खूप मजा वाटायची.
|
खरेच यार रात्रि अंधारात बसुन गाणी ऐकायला काय मजा यायची. ते पण अगदी त्या किशोर वयात! लताचे ना तुम बेवफा हो ना हम बेवफा है आणी अशी अजुन कितीतरी किशोरची दर्दी गाणी..... रात्री मला वाटते अकराला शेवटचा कार्यक्रम असायचा किती सुंदर गाणी लावायचे त्यात. अगदी मन हरखुन जायचे. कित्ती कित्ती हट्ट करुन मी नवीन म्युझिक सिस्टीम आल्यावर जुना रेडिओ विकू न देता माझ्या खोलीत ठेवुन घेतला होता फक्त हे सगळे रात्रिचे कार्यक्रम ऐकण्यासाठि!
|
Dakshina
| |
| Wednesday, March 12, 2008 - 7:53 am: |
| 
|
उजाले उनकी यादों के हा एक कार्यक्रमही असाच मला कायम nostalgic बनवतो.
|
Aaftaab
| |
| Wednesday, March 12, 2008 - 8:11 am: |
| 
|
बाळ करमरकर आणि बाळ पंडित यांचं मराठीत धावतं वर्णन असायचं. करमरकरांचा आवाज अगदी सचीन तेंडुलकरसारखा बारीक होता... "पुढचा चेंडू, यष्टीच्या अगदी जवळून मारा करत केलेला, त्याला हलकेच ढकललेलय point च्या दिशेने, चपळाईने क्षेत्ररक्षण करण्यात आलेलंय तरीपण एक धाव चोरण्यात फ़लंदाज यशस्वी.. आणि अशा तर्हेने भारताच्या शंभर धावा पूर्ण, याबद्दल अधिक माहिती देतायत नरेन ताम्हणे.." आणि ते नरेन ताम्हणे इतके सावकाश बोलायचे की बस्स..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|