|
…तो जुना बीबी अचानक बंद काय होतो.. आणि आपण अगदी मुगाचे पोते गिळुन मुक बसतो.. आपल्याला ठावुक आहे ना मुकाट्याने गप्प बसायचे... तर यातच समस्त पुरुषांचे अपयश सामावले आहे.. कीवा अवनती झाली आहे..कीवा पुरुषांना हे सहन करायची सवयच झाली आहे कींवा तो त्यांच्या स्वभावच झाला आहे कींवा ते आणि सहनशीलता यात काडीचा फरक नाही.. त्यामुळेच ते त्या काडीच्या जवळ जातात्… पुरुष लोक बिड्या, चिरुट,षिग्रेटी आणि तत्सम गोष्टी का पितात हे आता आम्हाला कळले. आपणही आग लावावी असे त्याला वाटत असतेच पण जमत्च नाही.. आता हेच पहा ना.. तो जुना बीबी कसा बंद पडला?.. कुणीतरी आग लावली आणि तीत तेल टाकण्याचेच काम ईतरानी केले.. हेतु एकच की तो चांगला चाललेला बीबी बंद पदावा.. असतात. आशी बदमाष माणसे अस्तातच.दुसर्याचे म्हणुन काही बरे चालले आहे हे त्याना बगवत म्हणुन नाही.. म्हणुन मग आग लावायची आणि नष्टसमाधान मिळवायचे आणि मिरवायचे.. पुरुषाना हे नाही जमत. (पाहा बीबी समानता अजुन चालु आहे.) पण म्हणुन गप्प बसणे पुरुषाच्या स्वभावात नाही म्हणुन तो बीडीला का होईना आग लावतो आणि स्वस्थ झुरके घेत्तो. पण ते ही बगवत नाही म्ह्णुन त्यावर ही बंदी आणली जाते. पण म्हणुन मग चोरुन का होईना पुरुष आपली स्वतंत्रता सोडत नाहीतच. त्यानंतर तो लीमलेटच्या गोळ्या वगैरे खातो.. या त्याच्या गनिमी काव्याचे आणि चातुर्याचे कवतिक करावे तेव्हडे थोडेचे आहे…अस्तु. विषयांतराबद्द्ल क्षमस्व. पण यातुन सर्वानाच धुम्रपानामागची मानसिक कारणे समजावीत हाच उदात्त हेतु होता.ऽसो. आता आपण पुन्हा आपल्या मुळ विषयाकडे वळुया…...... तर आफ्रीकन आणि भारतीय मानववंशाची जी सांगोपांग चर्चा ईथे अपेक्षित आहे त्यातुन एक मुद्दा म्हणजे या वंशामधे काय समानता……. ……अं……...बरे थोडे अजुनच विषयांतर झाले वाटते. पण असो अमानते वरुन पुढे धागा जुळला….. वास्तविक समानतेच्या न्यायाला अनुसरुन ” तो ” समानता बीबी बंद करायला नको का?... या अन्यायाला कोण वाचा फोडणार?.. समानतेच्या बीबीला उण्यापुर्या ३५० पोस्टस आणि ईकडे या पुऋषजन्माच्या बीबीवर नुसता पोस्टस चा पाउस काय पडत होता.. व्वा!.. ते कवतुक पाहात बसले होतो की अवचित आकाशातुन वीज कोसळावी की धरणी दुभंगुन जावी की ज्वालामुखी फुटावा की प्रलय व्हावा उपमा ही सुचेनात ….( पण उपमा करायला सांगु का?.. नको. ओरडेल.).. अशी अवस्था झाली. कॉट्वरुन खालीच पडलो. त्त्क्षणी आम्ही पुन्हा निषय केला.. याला पर्याय एकच.. पुन्हा एक बीबी सुरु करणे आणि खबरदार जर कुणी हा बीबी बंद पाडण्याचे कारथान केले तर. ....ईथे केवळ केवळातले केवळ हलके फुलके लिखाण अपेक्षित नाही तर ज्याला काहीच वजन नाही आणि तरीही जे वजनदार भासते असले लिखाण अपेक्षित आहे. पुरुषाच्या व्यक्तीमत्वासारखे.. वजन असुनही काहीच वजन नाही हो त्याला. संसारात..! असा बिनवजनाचा वजनदार कसे लिखाण करेल?.. तसे लिखाण करा.. म्हणजे ते वाचुन का होईना काही वजन वाढावे….तेंव्हा या.. ईथे खर्डा पण वजन वाढवण्यासाठी.. कमी करण्यासाठी नव्हे. ..वस्तुत: ईथे एक गोष्ट नमुद करावीशी वाटते कींवा सांगावीशी वाटते कींवा सुचवावीशी वाटते... ती कोणती असे जर तुम्ही विचाराल तर आम्ही म्हणु की ती म्हणजे तारतम्य.. कीत्येक बाफ वर आम्ही घसा मोकळा केलेला आहे की बाबानो तारतम्य तारतम्य आणि तारतम्य... कुठेही लिहीताना, बोलताना, चालताना वागताना एक लक्षात घ्यायचे ते तारतम्य... ते लक्षात घ्या.. हे तीन " ता " कार लक्षात घ्या.... चौथा " ता " कार म्हणजे " ताकभात " .. तो ही विसरु नका... हे ईथे नमुद करावयाचे कारण म्हणजे हा जो चौथा ता कार आहे तोच पुर्णपणे खरा आहे, सत्य आहे, मुलभुत आहे.. आणखी तो मिळाल्यावरच हे पहीले तीन ता कार सुचतात. केंबहुना त्या चौथ्या " ता " काराच्या नंतर आमची जी काही तार लागते ती पहीले तीनही " ता " यांच्या पलीकडे असते.. सांगायचा मुद्दा काय की तारतम्य आणि ताकभात हे सांप्रतसमयी महत्वाचे वाटतात. कारण चौथ्या ता कारानंतरची तंद्री ही " अहो ऐकल का? " याला दाद देत नाही.. असा शुरपणा देणार्या या ताकभाताचे समर्थन आम्ही सुखी संसाराची गुरुकील्ली आहे असे म्हणुन करत आहोत.... ताकभात खावुअन त्रुप्त झालेल्याचे समाधान एखादा दुसरा ताकभात त्रुप्तच जाणे.. अंमळ वामकुक्षी करावी म्हणतो. नुकताच ताकभात खाल्ला.. हं..!!
|
अरे काय हे परत सगळे सिरियस झाले का????या घोषणा शिवसेनेच्या विविध आंदोलनातील आहेत. त्या मी तशाच लिहिलेल्या आहेत. त्यात इतक चिडण्यासारख काय आहे??असो त्या पोस्ट्स फ़ार जहाल वाटत असतील तर नेमस्तकांनी उडवाव्यात. श्रध्दा,फ़,शेशनाग.कमयुरेश,शोनु लगेच मी सर्व स्त्रीयांचा द्वेश करतो म्हणुन माझ्या आईवर वगैरे लिहु नका मागील बाफ़ वर एका स्त्रीनेच 'धोंडोपंत बाळासाहेब व आम्ही शिवसैनिक' असे विधान केले होते. त्यानंतर मी या घोषणा तिथेही लिहिल्या होत्या हा बाफ़ जिथे बंद झाला होता तिथुनच सुरु होउ नये व त्यात विनोदी किनार असावी म्हणुन मी त्या लिहिल्या होत्या.या शिवसेनेच्या विविध आंदोलनात दिल्या जाणार्या घोषणा आहेत हे तुम्हाला माहीत असेल असे समजुन मी लिहिले होते तरी येथील अनेकांना ते माहीत नाही त्यामुळे त्या नेमस्तकांनी उडवल्यास हरकत नाही. बाकी येथील अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याने मी जाहीर माफ़ी मागतो. स्त्रीयांना कमी लेखणे माझा उद्देष नव्हता मी फ़क्त विनोद म्हणुन ते लिहिले होते जेणेकरुन परत इथे भांडणे सुरु होउ नयेत मात्र येथील लोक आता एकमेकांशी भांडण सोडुन काही करण्याच्या मनस्थीतीत नाही असे दिसते बाकी मागील बाफ़वर या घोषणा मी लिहिल्या होत्या तेंव्हा तिथे कोणी विरोध केला नव्हता त्यामुळे आज तुमची झालेली चिडचिड माझ्यासाठी अनपेक्षीत होती. परत याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो
|
Tonaga
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:05 pm: |
| 
|
धोन्ड्या लेका, तूही धमाल करतोस हं! काय हायक्लास मराठी हाणलीय.
|
Tiu
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:54 pm: |
| 
|
केवळ उच्च!!! धोंडोपंतांची पोस्ट वाचुन हसुन हसुन पडलो! अशक्य लिहिलंय...
|
Lalu
| |
| Wednesday, March 05, 2008 - 5:39 pm: |
| 
|
चिन्मय, सगळ्या पोस्ट्समध्ये नाही, पण काही वेळा (श्रद्धाने दिलेले उदाहरण) धोंडोपंत म्हणतात तसे तारतम्य राखले गेले नाही. पण तुला तू जे काही केलेस ते बरोबर वाटो अथवा चुकीचे, इथल्या लोकांच्या भावनांचा आदर राखून तू दिलगिरी व्यक्त केलीस हे चांगलं झालं. पं sss त, तुम्हाला नवीन मायबोलीत जाण्याचा मार्ग सापडला की नाही? इथे पहा. शेवटी एका स्त्रीनेच मार्ग दाखवला तुम्हाला. ~D बोलो, पुरुषोंका नेता कैसा धोंडोपंत जैसा हो!! ~D
|
Uday123
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:01 pm: |
| 
|
चिन्या तुम्ही (आपल्याला पुन्हा एकदा व्यथा मांडता येतील या केवळ भाबड्या कल्पनेने) आनंदाच्या भरात येऊन थोडे जास्त लिहीले. तुमच्या वरच्या पोस्ट मुळे तुमचा ऊद्देश अपमान करणे हा मुळीच नाही आहे हे त्यांच्या लक्षात येईल. पंतांवर (शेर्-ए-महाराष्ट्र) तर ताक्-भात (गवत) खायचेच दिवस आलेत.
|
Uday123
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:09 pm: |
| 
|
नवीन मायबोलीत जाण्याचा मार्ग सापडला की नाही? ---मला तर कधीच यश आले नाही. ३-४ वेळा प्रयत्न केला, पण केवळ वापरायचे नाव लाल (मला लाल, हिरवा, पांढरा, काळा हे चार रंग माहीत आहेत) हो-ऊन परत येते.
|
Zakki
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:58 pm: |
| 
|
खरे आहे. सुरुवातीला मला वाटायचे की माझ्या थोबाडीत मारली! पण हळू हळू जमले सगळे! सगळेच 'हळूहळू' जमते. हळू हळू 'सगळेच' जमते. हळू हळू सगळेच 'जमते'. लालू, तुम्ही एव्हढ्या भावनाशील होऊन कसे चालेल? तुमची बाई जर राजकारणात आहे, तर तिच्याबद्दल काय काय बोलतात लोक! ते ऐकून मग कसे होत असेल तुमचे? ते तर जाणून बुजून भावना दुखाव्यात म्हणून लिहीत असतात, बोलत असतात. सवय करायला पाहिजे. होईल हळू हळू. पण एकंदरीत आजकाल मायबोलीवर फारच सावध रहाणे श्रेयस्कर. पूर्वी कमी लोक होते. एकाला जे विनोदी वाटते ते इतरांना थोड्याफार प्रमाणात तसेच वाटायचे. मग इथे बरेच लोक आले, त्यांना भावना, मानापमान आले. त्यांच्या मनाविरुद्ध जे लिहीतील ते दुष्ट, मूर्ख ठरले. नि त्या लोकांच्या भावना दुखावल्या जातील याची पर्वा न करता, ते तसे लिहू लागले. मग एकदम आता विनोद वगैरे बंद! सगळे कस्से जपूऽन जपूऽन. अग पाटलाच्या पोरी (नि पोरा पण) जरा जपून जपून!
|
Tiu
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:02 pm: |
| 
|
बाकी येथील अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याने मी जाहीर माफ़ी मागतो. स्त्रीयांना कमी लेखणे माझा उद्देष नव्हता मी फ़क्त विनोद म्हणुन ते लिहिले होते. त्यामुळे आज तुमची झालेली चिडचिड माझ्यासाठी अनपेक्षीत होती. परत याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण तुला तू जे काही केलेस ते बरोबर वाटो अथवा चुकीचे, इथल्या लोकांच्या भावनांचा आदर राखून तू दिलगिरी व्यक्त केलीस हे चांगलं झालं. बघा! म्हणजे आपण जे केलं ते बरोबर वाटत असेल तरी दिलगिरी व्यक्त करावी लागते पुरुषांना... पुरुषजन्मा ही तुझी कहाणी!!! 'त्या' पोस्ट्सचं समर्थन करण्याचा कुठलाही हेतु नाही. यावरुन आणखी एक वाद सुरु व्हावा अशीही इच्छा नाही. हे पोस्ट सुद्धा एक विनोद म्हणुनच लिहिलंय. तरी कुणाला खटकल्यास आत्ताच दिलगिरी व्यक्त करतो! पुरुषजन्मा ही तुझी कहाणी!!!
|
>>>'हळूहळू' जमते. हळू हळू 'सगळेच' जमते. हळू हळू सगळेच 'जमते' ह्या वरून पाडगावकरांची "मोरू" कविता आठवली. एकदा मोरूनी ठरवलं की लोकशाही ला गुंडांच्या तावडीतून सोडवायला शब्दांचा क्रमच बदलून टाकावा... "गुंडांच्या तावडीत लोकशाही" "लोकशाही तावडीत गुंडांच्या" "तावडीत गुंडांच्या लोकशाही" काही केल्या गुंडांच्या तावडीतून लोकशाही सुटेचना! तेव्हा त्याला स्वत:चा मोरू झालेला कळला. आता ह्या धर्तीवर पु. जन्मा चा बा. फ़. कुणाच्या तावडीत आहे आणि तो कसा सोडवणार ह्यावर चर्चा करता येते का पहा
|
अरे काय अजुनही राग गेला नाही वाटत?????अजुन काय करायला हव???
|
Uday123
| |
| Thursday, March 06, 2008 - 6:12 pm: |
| 
|
चिन्या: चुका पटकन दाखवता येतात, पण जर कोणाला झालेली चुक उमजली असेल आणी त्याने मान्य करण्याचा मोठे पणा दाखवला असेल तरीही त्याच्या साठी साधे दोन कौतुकाचे शब्द नाही? (मी असे नाही म्हणणार की प्रथम चुकच का केली). चला मंडळी पटापट या आणी एका उत्साही युवकाचा उत्साह कमी नका करु, अन्यथा पुढे तो कधीही अत्मपरिक्षण करणार नाही, चुक मान्य करतांना कचरेल. त्याची ही दिल्-गिरी शेवटची ठरायला तुम्ही तरी निदान कारणीभूत ठरु नका.
|
अरे काय अजुनही राग गेला नाही वाटत?????अजुन काय करायला हव??? <<< मला वाटते, हीच विचारसरणी पुढे पुरुषाची व्यथा बनत असेल!
|
व्यथा बापाची ! भाग १
क्रमश:
|
व्यथा बापाची ! भाग २
क्रमश:
|
व्यथा बापाची ! भाग ३
वरील लेखाचा स्त्रोत: विश्व जालातिल आलेला एक निनावी मेल. (लेखक कदाचित दूसरा असू शकतो वपु नि असा बाप रेखाटला असल्याचा भास होतोय!) हा लेख इथे प्रकाशित करायचा उद्देश फ़क्त माहित साठी, कुठलाही वाद घालावा किंवा कुणालाही दुखवावे असा नव्हे किंवा आईची महती कमी आहे असाही नव्हे.
|
Giriraj
| |
| Friday, March 07, 2008 - 7:16 am: |
| 
|
मॉड / ऍडमिन, सगळीकडे द्याव्या लागणार्या तळ्टीपा पाहता त्याचेही काही शॉर्टकट बनवता येतिल का?
|
Tungrus
| |
| Friday, March 07, 2008 - 9:08 am: |
| 
|
धन्यवाद मीत्रांनो एका अतीशय महत्त्वा च्या विषयाला तोंड फोड्ल्या बद्दल. खरेतर आपण सर्व पुरुषांनी अतीशय सावधगीरीने हाताळायचा हा विषय आहे. जे माझे मित्र येथे ट्वाळीचा सुर लावत आहेत त्यांनी वेळेवर सावध व्हावे. नाहीतर आयुष्यभर त्यांच्या वर पश्चाताप करण्याची पाळी येइल. स्त्री आणि पुरुषाचे नाते म्हणजे मांजर आणी उंदराचे नाते. फरक इतकाच की मांजराला काही वेळाने उंदराची दया येते व ती त्याला मारुन टाकते. विशेषतः लग्न झालेल्या माझ्या मित्रांना मी काय म्हणतो ते लगेच पटेल. मधे एकदा एक बातमी वाचनात आली होती की आता पूर्नउत्पादना साठी पुरुषांची गरज लागणार नाही. स्त्रीया स्वतःच्या पेशीं पासुनच पूर्नउत्पादन करु शकतील. ही बातमी वाचल्या पासुन मी फारच सावध झालो आहे. या नंतर माझी खात्री पटली की पुरुषजातीचा अंत आता काही फार लांब नाही. आपण जर वेळीच सावध झालो नाही तर मीत्रांनो लक्षात ठेवा १०० वर्षां नंतर जगात पुरुष फक्त वस्तु संग्रहालयात पहायला मीळतील, पेंढा भरलेले. आताही काही फार वेगळी परीस्थीती नाही म्हणा. सगळे पुरुष पेंढा भरलेले असल्या सारखेच वागतात. नरकेसरी वगेरे फक्त भाषणां पुरते उरले आहेत. मला ठउक आहे माझे काही पुरुष मित्र मला कुत्सीत पणे हासत असतील. पण मला त्यांच्या डोळ्यात सुद्धा नंतर पाणी पहायच नाही. पुरुष जाती विरुद्ध फार पुर्वी पासुन एक कट रचला जात आहे. सर्व स्त्री जमात यामधे सामील आहे. पुरुष विरोधी कारवायां मधे ही जमात सतत कार्यरत असते. या ठीकाणी स्त्रीया सुद्धा माझे हे पत्र वाचु शकतात याची मला पुर्ण जाणीव आहे. पण आता मला माझ्या प्राणांची परवा राहीली नाही. माझ्या पुरुष बाधवांच्या भल्या साठी मी हा धोका सुद्धा पत्करला आहे. मित्रांनो मी काही उगाच बोलत नाही. माझ्या कडे काही पुरावे आहेत. खरेतर आपण सर्वांनी सावधपणे आजुबाजुला पाहीले तर तुमच्या ही मी काय म्हणतो ते सहज लक्षात येईल. दोन कींवा जास्त बायका एकमेकांसमोर आल्या तरी अतिशय खालच्या आवाजात त्यांची कुजबुज चालु होते. समोर पुरुष असले काय किंवा नसले काय. माझी अशी नक्की खात्री आहे की पुरुष जमाती विरुद्ध कश्या प्रकारे वागायचे याची त्या खलबते करीत असणार. पुरावा क्र. २ - दोन बायका एकत्र आल्या की पुरुषांची मनःशांती भंग करतात. उदा. सासवा सुना दोघी मीळुन त्यांचा तडाख्यात सापडलेल्या पुरुषाला पीळवटुन काढ्तात. नणंद भावजया, जावा जावा समोरा समोर आल्या की हीच परीस्थीती असते. पहा आणि विचार करा. आणि जर एखाद्या पुरुषाने त्यांच्या मधे पडायचा प्रयत्न जरी केला तरी त्याची पुर्ण वाट लागते. मुलगी, कींवा मुली असलेल्या पुरुषां कडे नीट पाहीले आहे का? त्यातील बहुसंख्य परुष ट्कलु असतात. यावरुन त्यांना भोगाव्या लागणार्या मानसीक तणावाची कल्पना येईल. पुरावा क्र. ३ स्त्रीया पुरुषांना स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करतात. आई मुलावर सत्ता गाजवत असते. त्याचे लग्न झाले तरी ती त्याला सोडत नाही. बायका नवर्यांना ताब्यात ठेवतात. बहीणी भावांवर अधीकार गाजवतात. आपण पुरुष फार भोळे असतो. असले प्रकार आपल्या कधी लक्षात येत नाहीत. कोणता सासरा कधी जावयाच्या मागे लागलेला पाहीला का? कींवा कोणता बाप आपल्या मुलाच्या नादाला लागतो? मुलगा मोठा झाला की? या स्त्रीयां पासुन तुम्ही अतीशय सावध रहा. त्यांचे हेर तुमच्या आजुबाजुला पसरलेले आहेत. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. मी एकदा या विषयावर माझ्या काही जवळच्या मित्रांबरोबर याची चर्चा केली होती. अर्थात त्या मित्रांनी मला वेड्यात काढ्ले. वर मलाच समजाउन सांगु लागले की हा माझ्या मनाचाच एक खेळ आहे. थोड्क्यात माझ्या डोक्यावर परीणाम झाला आहे अशी त्यांची समजुत झाली. पण त्यानंतर दोन दीवसातच माझ्यावर एक प्राणघातक हल्ला झाला. त्याच अस झाल. मी पुण्यातल्या रस्त्या वरुन चालत चाललो होतो. तो एकदीशा मार्ग होता. मी माझ्याच नादात होतो. अचानक उलट दिशेनी, समोरुन एक तरुणी वेगाने आली. ती तीच्या छोट्या दुचाकीवर स्वार झालेली होती. तीने चेहेर्या भोवती कापड गुंडाळले होते. डोळ्यावर काळा चष्मा होता.(चेहरा दीसू नये म्हणुन) हातात हातमोजे होते (बोटांचे ठ्से उमटु नयेत म्हणुन. ) पायात कापडी बुट (पावलांचा आवाज येउ नये या साठी). तीच्या पाठीवर एक छोटीशी पिशवी पण होती. (त्यात काय होते ते समजले नाही). ती अचानक समोरुन आल्याने मी बावचळलो. काय करावे ते मला पट्कन सुचले नाही. मी जागेवरच उभा राहीलो. तीने एक कर्कश्य किंचाळी मारली आणि तीच्या गाडीने मला जोरात धड्क दीली. अर्थात तो पर्यंत मी पुर्ण सावध झालो होतो. त्यामुळे मला फारच कमी दुखापत झाली. आजुबाजुला लोक जमा झाल्यामुळे तीला पुढे काही करता आले नाही. पण पराभवाचे दु:ख तीच्या चेहेर्यावर स्पष्ट दीसत होते. अतीशय उद्वेगाने ती मला म्हणाली "ए आंधळ्या तुला दीसत नाही का, समोरुन गाडी येते आहे ते?" मग माझा पण संयम सुटला. मी तीला बरेच काही बोललो आणि म्हणालो "तुमचा प्रयत्न फसला आता मी तुमच्या विरुद्ध पोलीसात तक्रार करणार आहे. माझ्यावर प्राणघातक हल्ला केला म्हणुन. तुम्ही स्त्रीया जरी बेकायदेशीर पणे आमच्या विरुद्ध लढ्त असला तरी मी कायद्याची वाट सोडणार नाही." मी तीच्या वहानाचा नंबर टीपुन घेतला. पण हाय पोलीस चौकी मधे पुरुष अधीकारी असताना सुद्धा मी तक्रार नोंदवु शकलो नाही. त्यांनी मला अपमानीत करुन हकलवुन लावले. हे इश्वरा मी त्यांना क्षमा केली आहे. तात्पर्य काय मित्रांनो वेळीच सावध व्हा. हा कट फार पुर्वी पासुन चालत आला आहे. या जगात कीती युद्ध झाली. त्यातली कीतीतरी फक्त स्त्रीयां साठी झाली. पण या युद्धां मधे कीती पुरुष कामी आले आणि कीती स्त्रीया याचा कधी वीचार केलात का? जगातल्या बलवान पुरुषांना नष्ट करण्याच्या कटाचा हा एक भाग तर नसेल? आता ती वेळ जवळ आली आहे मित्रांनो. वीचार करा, स्त्रीया आता हळुह्ळु सर्व क्षेत्र काबीज करत चालल्या आहेत. आता पर्यंत जेथे फक्त पुरुषांची मक्तेदारी होती तथे पण आता स्त्रीयांनी प्रवेश केला आहे. फक्त स्त्री वंश चालवण्या साठीच त्यांना आपली गरज आहे आणि म्हणुनच आपल्याला त्यांनी शिल्लक ठेवले आहे. आणि आता हळुहळु ती गरज पण संपणार आहे. पण आपला पुरुष वंश चालवण्या साठी मात्र आपल्याला त्यांच्यावरच अवलंबुन रहावे लागणार आहे. माझी पुरुष शास्त्रज्ञांना विनंती आहे त्यांनी आपल्या जातीला वाचवण्या साठी काही तरी संशोधन करावे. मित्रांनो तुम्ही पण वेळीच सावध व्हा, विचार करा, आणि कामाला लागा. नाहीतर तुमच्या पैकीच कोणी तरी असेल वस्तु संग्रहालया मधे, पेंढा भरलेल्या अवस्थेत. आणि कोणती तरी स्त्री आपल्या मुलीला सांगत असेल "हा पहा अशी होती पुरुष जमात, जगातला सर्वात निरुपयोगी प्राणी. आता नामशेश झाला आहे."
|
Princess
| |
| Friday, March 07, 2008 - 9:10 am: |
| 
|
गजानन, तुमच्या वरच्या दोन्ही पोस्ट्स साठी    तुषार, छान लेख आहे.
|
सही लिहिले आहे तुंग्रुस. बापरे !!! केवढा मोठा कट आहे हा आज महिला दिनी आमच्या हाफिसात पण असा कट चालाय वाटते, सकाळ पासून ह्या बया कसली तरी conference करत आहेत, celebration च्या नावा खाली कट रचत आहेत वाटत!!! आणि हो पुरूष दिना ची प्रथा कुठे आहे ??? मी पुरुष बिच्चारा /node/1348
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|