|
Aaftaab
| |
| Thursday, March 06, 2008 - 5:21 am: |
| 
|
कुणाला हे आठवतय का? १. "नभोनाट्य" वेगवेगळ्या रंजक विषयांवरच्या नाटिका. अगदी कसलेल्या रेडिओ कलावंतांनी सादर केलेल्या.. २. "कामगारांसाठी" याचं सुरुवातीचं संगीत अजून कानात घुमतय. साधारण दुपारी अकराला लागायचा हा कार्यक्रम. ३. आपली आवड ४. 'आकाशवाणी पुणे', सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ५. संध्याकाळचा बीबीसी चा हिंदी कार्यक्रम. शफ़ी जामीचा आवाज लक्षात आहे का? ६. सुशील दोशी आणि सुरेश सरय्याची commentary . "कलकत्ता के इडन गार्डन पे माल्कम मार्शल की ये पेहेली गेंद सुनील गावासकरको, और इसे बकफ़ुट्पे जाके straight drive किया है, चार रन!" ७. टेकाडे भाउजी आठवतायत का? ८. संस्कृत बातम्या, सकाळचं वंदे मातरम, चिंतन, संगीत सरिता, ९. बालदोस्तांसाठीचे कार्यक्रम एक, दो, तीन, चार साई सुट्ट्यो, ल ल ला... १०. बिनाका गीत माला का सरताज गीत चं संगीत... अरेरे गेले ते दिन गेले, मी अजूनही कारमध्ये रेडिओ मिर्ची क्वचितच लावतो, नेहमी विविध भारती FM चालू असते..
|
आफताब मी ही तुमच्या पंक्तीतला आहे. नासिक एफ एम ने गेल्या वर्षी वि भा ला दुपारी रे मि ने replace केले तेंव्हा आम्ही वि भा च्या समदु:खी श्रोत्यानी आन्दोलन करून हा कार्यक्रम परत आणण्यास भाग पाडले.इथे एकच चनेल आहे ऑल इन्डिया रेडियो चा
|
Dineshvs
| |
| Thursday, March 06, 2008 - 5:32 am: |
| 
|
विविध भारती लावायचे ती सकाळी सात वाजता. त्यावेळी आजके कार्यक्रमोंका विवरण और मौसम का हाल, असे कार्यक्रम असत. ते अजुनही आहेत. सात वाजुन पाच मिनिटानी पुर्वी रसवंती कार्यक्रम असे आता तो भुलेबिसरे गीत झाला आहे. ( पुर्वी भुले बिसरे गीत, आठ वाजुन दहा मिनिटानी असायचा ) सकाळी विविधभारती कायम दर्जेदार गाणी ऐकवत आलीय. अजुनही तो दर्जा राखला गेलाय. पुर्वी रेकॉर्ड अडकायचे प्रमाण फ़ार असे, मग मात्र आकाशवाणीने आपल्या संग्रहातली सर्व गाणी, डिजिटली रिमास्टर करुन घेतली, त्यामूळे, आता अगदी जुनी गाणीहि सुस्पष्ट ऐकता येतात. साडेसातचा संगीत सरिता कार्यक्रम तर माझा जीव कि प्राण. ( निव्वळ हा कार्यक्रम ऐकण्यासाठी मी मस्कतला असताना, सकाळी पावणेपाचला उठत असे. ) पुर्वी एखाद्या रागावर आधारित एक फ़िल्मी गाणे आणि त्या रागातली एखादी शास्त्रीय रचना असे याचे स्वरुप असे. रविवारी विशेष संगीत सरिता असे. त्यात एखादा कलाकार येऊन कार्यक्रम सादर करत असे. आता मात्र रोजचाच कार्यक्रम विशेष असतो. आशा खाडिलकर, वीणा सहस्त्रबुद्धे, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा अशी अनेक मंडळी येऊन, एखाद्या विषयाला धरुन एखादी मालिका सादर करतात. हि ऋषितुल्य माणसे, शास्त्रीय संगीताची अगदी प्राथमिक माहिती, कुठलाहि आवेश न आणता इतक्या जिव्हाळ्याने सांगतात ना, कि समजणे आणि लक्षात ठेवणे, अजिबात कठिण जात नाही. सध्या बेगम परवीन सुलताना, हा कार्यक्रम सादर करित आहेत. पुर्वी विविध भारतीवर मराठी गाण्याना वाव नव्हता. साधारण ८० च्या दशकात हे कार्यक्रम सुरु झाली. संध्याकाळी साडेपाच वाजता, सांजधारा हा खास मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. सकाळी आठ वाजता आणि रात्री पावणेआठवाजताहि कार्यक्रम सुरु झाले. सांजधारा मधे आवर्जुन नाट्यगीते ऐकवतात. पावणेआठचा कार्यक्रम, चित्रगंगा पण आठवड्यातुन एकदा आमंत्रित कलाकार सादर करु लागले. आता हा कार्यक्रम साडेपाचच्या ऐवजी सव्वा सहाला असतो. तो ज्यावेळी साडेपाचला असे त्यावेळी, सव्वा सहा ते सात पर्यंत पंधरा पंधरा मिनिटाचे सुंदर कार्यक्रम असत. एक असे हिंदी भक्तीगीतांचा, एक असे एकाच शब्दाला धरुन असणार्या तीन गीतांचा आणि शेवटचा, रागदारी संगीताचा.. पण हे कार्यक्रम आता बंद झालेत. फ़ौजी भाईयोंके लिये विशेष जयमाला, तर खासच असतो. लताने तिने गायलेल्या अनेक भाषेतल्या गाण्यांची झलक ऐकवली होती. मला वाटते, मदनमोहनचे, माई रि, हे तिने पहिल्यांदा तिने जयमाला मधेच ऐकवले होते. देव आनंदने सुरैयाचे गाणे ऐकवले होते आणि ओपीने लताचे. कधी कधी एखादा छोटा कलाकारदेखील सुंदर कार्यक्रम सादर करत असे. अलिकडे हे कार्यक्रम परत ऐकवले जातात. अगदी अलिकडे या कार्यक्रमाद्वारे फ़ौजी जवानाना संदेश पाठवण्याची सुविधा दिली गेली आहे. ते जिथे असतात आणि जिथे त्यांचे कुटुंबिय असते, तिथे संपर्काचे कुठलेच साधन नसते. त्यांचे संदेश ऐकुन जीव एकाचवेळी अभिमानाने आणि करुणेने भरुन येतो. जुन्या आणि विस्मृतीत गेलेल्या कलाकाराना पण बोलते करण्याचे काम विविध भारती करत असते. उजाले उनकि यादोंके, अश्या नावाचा हा कार्यक्रम असतो. यात ते कलाकार मनमोकळ्या गप्पा मारतात. सध्या सुलक्षणा पंडित या कार्यक्रमात असते. हा कार्यक्रम अनेक भागात सादर केला जातो. रात्री दहा वाजताचे छायागीत तर सर्व रात्र सोनेरी करुन जाते. यातल्या गाण्यांची निवड आणि निवेदन खुपच छान असते. यातले सूत्र इतके अनोखे असते, कि त्या निवेदकाना दाद द्यावी तितकी थोडीच. एका कार्यक्रमात साहित्यातील व्यक्तिरेखांची गाणी होती, त्यात शकुंतला, सीता अश्या भुमिकांशी संबंधित गाणी ऐकवली होती. एकदा तालवाद्यांची गाणी ऐकवली होती तर एकदा दागिन्यांशी संबंधित. अजुनही हा कार्यक्रम तितक्याच उत्कटतेने सादर केला जातो. साडेदहाला आपकी फ़र्माईश नावाचा कार्यक्रम सादर होतो. पुर्वी रात्री अकराला बेला के फ़ुल नावाचा छान कार्यक्रम असे. आता मात्र रात्री अकराला सभा संपते. पुर्वी श्रुतिका आणि नभोनाट्य हा एक सुंदर प्रकार असे. दळवींची महानंदा हि कादंबरी चार भागात सादर झाली होती. त्यात निलम प्रभु आणि बाळ कुरतडकर या दोघानी अप्रतिम भुमिका केल्या होत्या. यावरुनच प्रेरणा घेऊन, पुढे ते नाटक म्हणुन रंगमंचावर आले. प्रपंच नावाची एक दैनंदिन मालिका सादर होत असे. प्रभाकरपंत, मीनावहिनी आणि टेकाडेभावोजी अशी तीनच पात्र. अनुक्रमे बाळ कुरतडकर, निलम प्रभु आणि प्रभाकर जोशी CBDG या बुमिका करत असत. या कार्यक्रमाचे स्वरुप इतके घरगुति असे कि आपल्याच घरातला संवाद ऐकतो आहोत असे वाटे. शन्ना आणि वि आ बुआ, हे या मालिकेचे लेखक होते. हा कार्यक्रम जिथे रेकॉर्ड होत असे ती रुम बघण्याचा योग मग आला होता. तिथे एक छोटेसे पार्टिशन घालुन, स्वयंपाक घर केले होते. काहि कपबश्या पण होत्या. या सगळ्यांचा वापर करुन हि मालिका जिवंत केली जात असे. योग्य ती वेळ आल्यानंतर हि मालिका बंद केली होती पण लोकाग्रहास्तव हि मालिका पुन्हा प्रपंच या नावाने काहि काळ चालवली गेली. या तिघांपैकी एखादा कलाकार उपलब्ध नसेल तर बाकिचे दोघे सादर करत असत पण या तिघांशिवाय चौथे पात्र कधी आणले गेले नाही. सौ टेकाडे याना आणावे, असा बराच आग्रह झाला, पण ते झाले नाही. साप्ताहिक ध्वनिचित्र नावाचा पण एक छान कार्यक्रम सादर केला जात असे. त्यात सप्ताहातील बातम्यांचा आढावा आणि त्याबरोबर भाषणातील काहि अंश वगैरे ऐकवले जात असत. त्या काळात त्याचे खुप अप्रुप वाटत असे. आणि ऐकु नयेत अश्या बातम्याहि त्या काळात नसत फ़ारश्या.
|
सर्व रेडिओ पंख्यांचे अभिनंदन.मस्त चालले आहे. खूप अभिरुची पूर्ण आहे-
|
चिनुलीस्नं आणलं पानी, शेतं पिकली सोन्यावानी. (चिनुलीस काय आहे, हे मला आजपर्यंत कळले नाही.) खार छाप अनिल माचिस (बया बया बया, वैतागली या काड्यापेटीला! निम्मी काड्यापेटी घाटली तरी चूलच पेटना. अगं आसल्या काड्यापेटीच्या नादाला लागन्या परीस ध्यानात ठेव- खार छाप आनिल माचिसच वापर. यका काडीत, चूल, श्टो, गॅस, बंब समदं झक्कास पेटतया.) GS चहा, ताजा चहा (आन् आमी काय गरम पानी पितोय व्हय? आवो आमी बी आमच्या आबा-आज्याबस्नं जी-एस चहाच पितोय.) डोकं दुखतंय, अंग ठणकतंय, ..... मस्त उपाय लक्ष्मी रोड, नारायण पेठ अशा सांगली, कोल्हापूर, कराड मधल्या स्थानिक दुकानांच्या जाहिराती, लखानी चप्पल, राधिका, रूपम साडी, कालनिर्णय, विको वज्रदंती अशा सगळ्या प्रकारच्या जाहिराती आमच्या तोंडपाठ होत्या. रविवारी दुपारी साडे-बाराला 'आपली आवड' च्या पूर्वी जी धून वाजायची ती पण आम्ही आवडीने ऐकायचो. आधी नुसतीच बारीक शिटी वाजायची आणि नंतर धून सुरू व्हायची. आणि ते ताई-दादाचं पत्रवाचन. आमचा रेडिओ बराच जुना होता. त्याचं बटन बंद केल्यावर पण थोडा वेळ ऐकू यायचा मग बन्द व्हायचा. तसंच सुरू केल्यावर पण थोड्या वेळानं ऐकायला यायचं.
|
Ana_meera
| |
| Thursday, March 06, 2008 - 6:59 am: |
| 
|
ते "फिनोलिक्स" आहे... फिनोलिक्स नं आणलं पाणी........
|
मी उत्तरेत असताना मराठी गाणी फक्त रात्रीच ऐकू यायची. त्यामुळे साडेतीन वाजता-दुपारी विविध भारतीवर प्रादेशिक सन्गीत या कार्यक्रमात कधी भारूडे,कधी लावण्या वाजवायचे.उत्कन्ठेने वाट पहायचो.कार्यक्रमाचे नाव विसरलो. अनुरन्जनी का? गजानन आणि दिनेश आफ़ताब,कुमार,अथक,आन्की नं १,सुश,ललिता एस,सास, तुम्ही चालू ठेवा हा सहप्रवास
|
ana_meera तुम्ही ही यात भाग घ्या!!!
|
Athak
| |
| Thursday, March 06, 2008 - 10:45 am: |
| 
|
पुण्यात कॉलेजला असतांना आकाशवाणी केंद्राच्या बाजुलाच होस्टेल , दिवसरात्र छान छान गाणी ऐकली तेही २० रुपयात ४ वर्षे एक diode , २ Transistors, एक coil एक छोटा speaker आणुन रेडिओ बनवलेला अरे हा speaker वर ठेवायला एक steel चा ग्लास अन 1.5V ची बॅटरी ३ महिने पुरायची
|
sounds familiar ही technology मी पण ५ वर्षे वापरलीये-
|
हेच device सेल शिवाय इयर फोन वर ही चालते-
|
Dakshina
| |
| Thursday, March 06, 2008 - 11:26 am: |
| 
|
GD ती अख्खी जाहीरात अशी होती... झूळझूळवाणी खेळवा पाणी आणायचं कोणी?... सांगतो राणी.... फ़िनोलेक्स ची कमाल, फ़िनोलेक्स ची धमाल.... फ़िनोलेक्स नं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी.... आणि बाकीच्या जाहीराती अगदी तश्शाच्या तश्या आठवतायत की तुम्हाला... अजून एक होती... फ़ेयर अँड लव्हली ची... हाय रुपा, काय केलं सुट्टीत.. झाडं लावली, बागकाम केलं... तरिही त्वचा इतकी गोरी, नितळ... अगं ही तर फ़ेयर अँड लव्हली ची कमाल...
|
Gobu
| |
| Thursday, March 06, 2008 - 11:31 am: |
| 
|
'आकाशवाणी पुणे', सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. किती जुन्या आठवणी जाग्या झाल्यात....
|
Dinesh77
| |
| Thursday, March 06, 2008 - 12:16 pm: |
| 
|
मगदूम चहाची एक मस्त जहिरात होती. बाईनं कुकवाला आणि मर्दानं चहाला नग म्हनु नै. आमी बी नेहमी मगदूम चहाच पितो.
|
Dinesh77
| |
| Thursday, March 06, 2008 - 12:24 pm: |
| 
|
गीत रामायण ही सुद्धा रेडीओचीच देणगी म्हणावी लागेल. त्यावेळी लोक अक्षरश रेडीओसमोर फ़ुले आणि उदबत्ती लाऊन गीत रामायणाची वाट बघत असायचे.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, March 06, 2008 - 12:35 pm: |
| 
|
सुधा नरवणेंच्या बातम्या म्हणजे खणखणीत आवजातल्या बातम्या असायच्या.. मी औरंगाबाद - परभणी केंद्र ऐकायचो लहानपणी.. त्यांच्या बातम्या सकाळी ७:३० ला असायच्या.. तीच वेळ आमची शाळेला जाण्याची असायची. त्यांच्या बातम्या सुरू झाल्या की असं वाटायचं की "आता शाळेला जाण्याची वेळ झाली.. लवकर निघा" असंच काहीतरी त्या सांगत आहेत.. मग दुपारी १२:३० ला मराठी भावगीतांचा कार्यक्रम असायचा त्यावेळी आम्ही शाळेतून घरी येत असू. सगळ्या कॉलनीभर ही गाणी ऐकू यायची कारण प्रत्येक घरात हा कार्यक्रम ऐकला जायचा. "त्या फुलांच्या गंधकोषी.." हे गाणं लागलं की आजही मला माझी शाळा सुटलीये असंच वाटतं... दर रविवारच्या बालोद्यान कार्यक्रमाची आम्ही आतुरतेनं वाट पहात असू. "किलबिल किलबिल पक्षी बोलती..", "कोणास ठाउक कसा पण शाळेत गेला ससा..", "ससा तू ससा के कापूस जसा ज्याने कासवाशी पैज लाविली..", "चॉकलेटचा बंगला.." अशा कितीतरी बालगीतांचा आनंद या कार्यक्रमा मुळे आम्ही लुटला... सुशील दोशी तर आख्खं मैदान डोळ्यासमोर उभं करायचे. दर बुधवारी बिनाका गीतमाला लागायची. अमीन सायानी आणि तबस्सुम असायचे. त्यांचं बोलणं.. ते "पायदान नीचे उतरा, उपर गया" (हा शब्द आम्हाला "बादाम" असा ऐकू यायचा..) असं सांगणं... नंतर या बिनाकाची सिबाका झाली अन् जाणवलं... या कार्यक्रमातली मजा गेली (त्यावेळी बरं का..). वर्षाच्या शेवटच्या कार्यक्रमात ते त्या वर्षातली सर्वोकृष्ट १६ गाणी त्यांना मिळालेल्या गुणांसहीत जाहीर करत. त्याला सरताज गीत असं म्हणत ( cbdg ). हे सरताज गीत कोणतं असेल याची सगळीकडे चर्चा असायची. "मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है" हे गाणं ४०० गुण घेऊन सरताज गीत झाल्याचं आठवतंय... त्यावेळी आमच्या आईबाबांनी नाकं मुरडली होती. हेही आठवतंय. "ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉपोरेशन का विदेशी विभाग है" असं रेडीओ सिलोन ची निवेदिका ज्या आवाजात सांगायची तो आवाज अजूनही व्यवस्थित आठवतो... दर बुधवारी आणि रविवारी रात्री (नक्की आठवत नाही..) औरंगाबाद - परभणी केंद्रावर "श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम" (नाव आठवत नाही.) लागायचा. (हे "श्रोत्यांच्या मनपसंत..." ती निवेदिका असं काही म्हणायची की मला ते "श्रोत्यांच्या मनापासून ते गीतांचा कार्यक्रम" असं ऐकू यायचं). याच कार्यक्रमात मी आशा भोसलेंचं "रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना..." हे गाणं पहिल्यांदा ऐकलं. त्या गाण्यात "हाएऽऽ" असा शब्द आहे. ते ऐकल्याबरोब्बर मी जोरात ओरडलो होतो "ही गाणं चुकली...". श्रवणीय गाणी होती, जाहिरातींचा मारा नव्हता.. कसं छान वाटायचं ऐकताना
|
Mrdmahesh
| |
| Thursday, March 06, 2008 - 12:45 pm: |
| 
|
साप्ताहिक ध्वनिचित्र नावाचा पण एक छान कार्यक्रम सादर केला जात असे. >>> या कार्यक्रमाचं संगीत (सुरुवातीला लागणारं) मात्र (उगीचंच) भीतीदायक वाटायचं
|
Mansmi18
| |
| Thursday, March 06, 2008 - 3:14 pm: |
| 
|
पत्र्याची जाहिरात्: "कसला विचार करतोस रामय्या"? "घराला आणि गोठ्याला कुठले छप्पर वापरावे तेच कळत नाही. "अरे चारमिनार छाप asbestos चे पत्रे विकत घे. माझ्या आजोबानी घराला बसवलेले पत्रे अजुनहि शाबूत आहेत. "अरे खरच की, मीही चारमिनार पत्रे घेऊन येतो." चारमिनार पत्रे, जगातले सर्वाधिक विक्री असलेले asbestos cement उत्पादन! ही जाहिरात इतके वेळा ऐकली की इतक्या वर्षानंतरही आठवतेय सम्पूर्ण.
|
मन्डळी आअणखी एक स्टेशन विसरलो आपण्-अत्यन्त सुरेल गाणी लावणारी "ऑल इन्डीया रेडिओ की उर्दू सर्विस की मजलीस है-अब उर्दू नशरियात शुरू करते हैं- यातले बरेच शब्द कळायचे नाहीत उदा. सामयीन इ. ते programme ला परोगराम म्हणायचे.यात युध्दाआधी लाहौर पाकीस्तान से ज़ुबेइदा बेगुम वगैरे फ़र्माइश करणारे होते. दुपारी विविध भारती वर सिनेगीते बन्द झाली की ३-३० ते ४-३० की ४-४५ पयन्त व रात्री १०-३० ते १२ पर्यन्त हे स्टेशन यायचे. इन्ग्लीश बातम्या वाले मेअविल दीमेलो.पियेर्सन सुरिटा अगदी आधी फ्रन्क मॉरए असे यन्ग्लो इन्डीयन ही बरेच होते
|
पु लंच्या शब्दात बहुतेक निवेदक आ का श वा णी ला आका ष्वाणी असे announce करायचे-
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|