|
Hkumar
| |
| Saturday, March 01, 2008 - 4:58 am: |
| 
|
'संस्कृती व समाज' मधील हा बा.फ. येथे हलवत आहे. सर्वांच्या आठवणींचे स्वागत.
|
ही १९६६ ची आठवण आहे.मी चौदा वर्षांचा होतो.(तसा मी तुमच्या पैकी बर्याच तरुणाईस पुरातन वाटत असेन्- ), वाशिम या अकोला जिल्ह्यातिल गावात शिकायला होतो.माझ्या एका मित्राचा थोरला भाऊ सुभाष आर्मी मध्ये सुभेदार होता व सीमारेषेवर लढत होता. त्यावेळेस ही विविध भारतीची "जयमाला" पावणे सात वाजता सन्ध्याकाळी यायची.शॉर्ट वेव्ह ३१ वर.खूप ट्युन करावे लागायचे.मग आम्ही रिसेप्शन सुधारावे म्हणून एक लांब तांब्याची तार छतावर टाकली असायची. ट्रांझिस्टर होता फ़िलिप्स चा "राजा" नावाचा.त्याला फ़ाईन ट्युनिंग होते. असो. डिसेंबरचा महिना होता.शेकोटी लावून मी व माझा मित्र बरोब्बर पावणे सात वाजता विविध भारती लावून बसलो होतो. रिसेप्शन यथा तथाच होते. चूंई,चूं असे आवाज,मधेच इतर चिनी स्टेशन ओव्हरलाप व्हायची. मग फर्माईश आली; ***********फर्मईश करनेवाले है**********-------------,और हवालदार सुभाष)********** -------,फ़िल्म है बंदिनी ओरे मांझी****** ची धुन्द करणारी मेलोडी सुरू झाली. आमच्या दोघांचे डोळे सुभाष च्या आठवणीने डोळे भरून आले. किशोरावस्थेत असून ही "मेरे साजन है उस पार" या ओळींचा अर्थ थोडाफार कळत होता. आमची नजर वरच्या मजल्याकडे अनाहूतपणे वळली वहिनी कानात प्राण ओतून ओलावलेल्या पापण्यानी ती विराणी ऐकत होत्या. रेडियो अन विविध भारती ची ही माझी हृद्य आठ्वण. ही विवीध भारतीच्या स्वर्ण जयन्ती निमित्त माझी आदरान्जली
|
Hkumar
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:02 am: |
| 
|
रवि, आठवण हृद्य आहे. रविवार दुपारची विविध भा. म्हणजे तर चंगळच असायची. एस कुमार प्रायोजीत एक कार्यक्रम आणि cricket with Vijay Merchant अजूनही आठवतात.
|
Athak
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:52 am: |
| 
|
बीबी सहीच दर बुधवारी संध्याकाळचे ८ वाजलेले अन 'अमिन सयानी' की आवाज 'ये सिलॉन ब्रॉटकॉस्टिन्ग का विदेशी विभाग है' ते म्युझिक 'बिनाका गीतमाला' अन पहीली पादान पर .... वा वा कान कसे आतुर न चुकता अभ्यासाच्या दिवसात सुद्धा हॉस्टेलवरुन चौकात जायचे ऐकायला
|
आता बिनाका गीत माले संबंधी. आमच्या घरी रेडियो नव्हता. कानावर गाणी पडायची ती पलिकडल्या इराण्याच्या रेडियो वर वाजलेली. "तेरे घरके सामने, जो वादा किया वो,हम बेखूदी में तुमको, मुझे दुनियावालो शराबी न समझो,मुझ को अपने गले लगा लो " ही बहुतेक सर्व "आखरी पादान" वर वाजलेली आणि अमीनच्या अजरामर compering ने "चार चान्द" लागलेली गाणी. त्या काळात आणखी उत्कन्ठेने वाट पाहू लावणारा कार्यक्रम म्हणजे शनिवारी सायंकाळी व रविवारी दुपारी वाजणारी"फौजी भाईयोंके लिये विशेष जयमाला-- प्रस्तुत करेंगे शम्मी कपूर लता मन्गेशकर,देव आनन्द" असे दिग्गज प्रस्तुत करणारा कार्यक्रम.. सोमवारी रात्री आमच्या चाळीत सामूहिक श्रवण असायचे आकाशवाणी मुम्बई ब केन्द्राचे"आपली आवड" मग रसग्रहण व्हायचे "सखी मन्द झाल्या"चे. रेडियो म्हणजे " down the memory lane ,ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा.-
|
इन्ग्रजी नम्बर्स ची ही ओळख करून दिली १९७३ साली रेडिओ कुवैत ने. रात्री १२ ते २ पहाटे पर्यन्त २५ व ३१ मिटर बांड वर हा "listener's choice" यायचा. आम्ही १२-३० पर्यन्त अभ्यास करून मग बेन्गलोर च्या "कृष्णराव पार्क मधे ट्रन्झिस्टर घेवोन जायचो.इथेच बीटल्स चे वेड लागले,साउन्ड ऑफ म्युझिक ची गाणी याच कुवैत वर ऐकली.एक गाणे अजून ही आठवते" if you happen to see the most beautiful girl in the world---" बी बी सी वर रवीवारी सायन्काळी ७-१५ ला non english speaking लोकान्cनी लिहिलेल्या इन्ग्रजी लघु कथांचे वाचन व्हायचे त्यात एकदा आर के नारायणांचे वाचन झाले होते. हिंदी बातम्यांचा signature voice होता ""यह आकाशवाणी है अब आप देवकीनन्दन पान्डेय से समाचार सुनिये".""त्यानी ४५ वर्षे बातम्या वाचल्या.""
|
Hkumar
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:34 am: |
| 
|
रेडिओवरची cricket commentary ही खरी com. असायची. जेव्हा TV आला तेव्हा आम्ही त्याचा आवाज बंद ठेवून फक्त चित्र बघायचो व जोडीला रेडिओचीच com. मनसोक्त ऐकयचो. आठवतात का सुरेश सरय्या व अनंत सेटलवाड?
|
Hkumar
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:40 am: |
| 
|
रवी, आणि रात्री ८ च्या मराठी बातम्या सांगण्याचा हक्क जणू दत्ता कुलकर्णींचाच असे! english बातम्या म्हणजे लुतिका रत्नम (नावातील चु भु दे घे, कारण ते खास इंग्लिश style ने त्या उच्चारायच्या) हेही एक समीकरणच!
|
Athak
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:41 am: |
| 
|
आमच्या गांवात आमचेकडे पहिला रेडिओ आला Murphy चा , अजुनही आहे , मोठमोठे Valves , 21-25-31 ... मिटर बॅंड सोबतच रेडिओ स्टेशनची नांव लिहीलेला . मोठा knob अन fine tune चा छोटा knob तो धागाने सरकणारा कांटा गांवातली खुप वडील मंडळी अन मुले यायची ऐकायला , मी मुलांकडुन प्रत्येक entry ला एक एक लेखणी गोळा करायचो
|
Hkumar
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:50 am: |
| 
|
अथक, त्या जुन्या मोठ्या रे. बद्दल माझ्याही त्याच भावना आहेत. केवळ त्यात खूप झुरळे झाली म्हणून तो मोडीत काढला. त्याची खरखर हे आता एक स्मरणरंजन आहे!
|
व्हॉल्व्ह चा रेडियो hmmmm लई डेन्जर,त्याचा प्ल्यास्टिक चा नॉब जर बाहीर आला अन मन्ग त्या ताम्ब्याच्या दान्डील्ला ब्वाट लागल तर असा दणकन्न शाक बस्सायचा राव्--लई डेन्जार ती लोतिका रत्नम होती कारण रत्नम मूळ साउथ ची व नवरा बंगाली बाबू म्हणून लोतिका- तसेच एक झोपवणारा क्रिकेट चा कॉमेन्टेटर होता-महाराजकुमार ऑफ विजयनगरम्-विझी
|
Ankyno1
| |
| Wednesday, March 05, 2008 - 8:41 am: |
| 
|
आमच्याकडे पण व्हॉल्व्ह चा रेडिओ आहे... फिलिप्स चा.... आणखी ही एक मॉडेल होतं पण त्यानी राम म्हटला....
|
Sush
| |
| Wednesday, March 05, 2008 - 9:47 am: |
| 
|
बरिचशी मराठि हिन्दि जुनी गाणि रेडिओ मुळे लक्शात राहिलि. कारण घरात हमखास कामाच्यावेळि आई रेडिओ लावायचि. आता कुठे जरि एखादे गाणे TV वर पाहिले कि वाटतं अरे हे गाणं माहित आहे पाठहि आहे पण पाहिलं नव्हतं कधि.
|
Hkumar
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:37 am: |
| 
|
दुपारी २ च्या सुमारास 'संथगतीने चालणारे बातमीपत्र' असायचे. ऐकताना मजा वाटायची. नंतर कळले की ते पत्रकारांसाठी लिहून घ्यायला असायचे. त्यावेळेस आधुनिक संपर्क माध्यमे नसल्याने.
|
पहिल्यांदा गीत रामायण रेडियो वरून प्रसारित झाले त्याच्या कुणाकडे काही आठवणी आहेत का? पन्डित नेहरू १९६४ मध्ये वारले तेंव्हा ऑल इन्डिया रेडियो वरून अंत्य यात्रेचे धावते वर्णन ऐकताना माझे आई वडिल ढसढसा रडले होते,एवढी हृदयाला भिडणारे ते वर्णन होते.
|
Lalitas
| |
| Wednesday, March 05, 2008 - 11:59 am: |
| 
|
कुणाला मुंबई (ब) वरील सकाळी साडेसात वाजता दर शनिवारचा "भावसरगम" आठवतोय का? दर महिन्याला एक भावगीत प्रसारीत होत असे. रात्र काळी घागर काळी, हात तुझा हातातुन, शुक्रतारा मंद वारा... ही सर्व भावगीते भावसरगमची देणगी आहे. आधी गीताचं रसग्रहण होत असे नंतर ऐकवलं जायचं.
|
Athak
| |
| Wednesday, March 05, 2008 - 12:13 pm: |
| 
|
रेडिओवर गाणी लावुनच अभ्यासात मन लागायचे मस्त हळु गोड आवाजात ती गाणी अन मस्त छान लहरीवर तरंगत आमचा अभ्यास आई जवळ आली की लगेच बंद , 'आताच लावला' आजकाल मुलांना TV On करुन अभ्यास करतांना बघुन ओरडतो तेव्हा त्या रेडिओच्या आठवणी ताज्या होतात ओरडतांना त्यांना एकदा म्हटले 'आम्ही नव्हतो असा TV ऑन करुन अभ्यास करायचो' तर लगेच उत्तर , 'नव्हताच तेव्हा TV तर काय ऑन करणार'
|
Sas
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:25 pm: |
| 
|
रेडियो... 'विविध भारती' शी माझ नात जुळल ते नोकरी करत असतांना after 2002, त्या काळात 'विविध भारती' अगदि जवळची मैत्रीण झाली. ज्या मुलींसोबत मी Apartment Share करायचे त्या रात्री उशिरा यायच्या कधि १० ला कधी १ वा., त्यांच्या ह्या आणी इतर काही ग़ोष्टी मला पटायच्या नाहित म्हणुन मी एकटी पडायचे. .....संध्याकाळ पासुन एकट, अश्यावेळी 'विविध भारती' ही एकमेव सोबत. मी 'जयमाला' , पत्र वाचन वा काही Awareness related program असला तरी आवडिने एकायचे. Apartment वर आल्या आल्या मी आधी 'विविध भारती' लावायचे. सकाळी ७:०० वा 'भुले बिसरे गित', मग ८:१५ ला नविन गाण्यांचा कार्यक्रम. रविवारि तर पुर्ण दिवस 'विविध भारती'. रेडियो च्या कार्यक्रमां प्रमाणे मी माझा रविवार plan करायचे. काहीवेळा सुट्टिच्या दिवशी सकाळी ९:३० चा गाण्यांचा कार्यक्रम (बुधवार वा गुरुवारी) जो एखाद्या कलाकारावर असायचा तो एकायला मिळायचा...खुप खुप आवडायचे मला सारे कार्येक्रम. वि.वि.भा वर Criket ची Commentary एकण्याची मजा तर काही औरच!! नंतर मी TV घेतला पण 'विविध भारतिची जागा' TV काय पण Net, FM कोणिच घेवु शकत नाही....एक-दिड वर्षे काय तो वि.वि.भा. चा अमृततुल्य लाभ झाला, लग्ना नंतर देश सुटला आणी वि.वि.भा., पण देश आणी वि.वि.भा. शी जुळलेल नात मात्र अजुन तसच आहे आणी राहिल... गेल्या ३ वर्षात internet वर वि.वि.भा. बरच शोधल, Online एकता याव म्हणुन पण नाही सापडल, कुणाला Online वि.वि.भा. ची link माहित असल्यास Please सांगणे. ज्या मुलिंसोबत मी रहायचे त्या टेप रेकौर्ड वर गाणी एकायच्या.... नंतर एकिने 'रेडियो' विकत घेतला व त्या ही वि.वि.भा. एकु लागल्या पुण्यात बस मध्ये, College मध्ये, अभ्यास करतांना सर्वत्र 'रेडियो मिरची FM 99.96' सोबत असायच पण, वि.वि.भा. शी ओळख झाल्यावर मी 'रे.मी.' विसरुन गेले, अशी अनोखी जादु आहे वि.वि.भा. ची
|
Dineshvs
| |
| Thursday, March 06, 2008 - 3:26 am: |
| 
|
पहिल्या चांद्रमोहिमेचे धावते वर्णन रेडिओवर ऐकवले होते. माझाहि सर्वच अभ्यास रेडिओ ऐकतच झाला. आमच्या परिक्षेला नीटनेटकेपणासाठी ४ मार्क्स राखुन ठेवलेले असत. ते मिळवण्यासाठी रेडिओवरची गाणी लिहुन घेण्याचा सराव करत असे मी. ( अक्षर न बिघडवता भराभर लिहिता यावे म्हणुन ) अमिन सायानी ची बिनाका, सुरू झाली ती मोरारजी देसाई मूळे, त्या इसमाने विविध भारतीवर हिंदी सिनेमातली गाणीच ऐकवणे बंद केले. म्हणून लोक श्रीलंका ब्रॉडकाष्टिंग कॉर्पोरेशनकडे वळले. अमिन सायानी इथेच हा कार्यक्रम रेकॉर्ड करुन तिथे पाठवत असे. तो जे क्रमांक देत असे त्याला त्या काळच्या रेडिओ श्रोता संघाचे पाठबळ असे. त्या काळची प्रतवारी कधीच खटकली नाही. पहिल्या पायदान वर कुठले गाणे असेल याची उत्सुकता असली तरी अंदाज बरोबरच असे. पुढे बिनाका बंद पडली आणि सिबाका सुरु झाली. पण पुढे गाणीच श्रवणीय न उरल्याने, ते ऐकणे बंद झाले. परदेशातहि, म्हणजे आफ़्रिकेत आणि आखाती प्रदेशात, ऑल इंडिया रेडिओ ऐकु येत असे. ते एक खास वेगळे प्रसारण असे. पुर्वी मुंबई अ आणि मुंबई ब असे दोन वेगळे प्रकार असत. त्यावेळी फक्त विविध भारतीवरच जाहिराती असत. लाईफ़बॉय, मॉडर्न ब्रेड सारख्या जिंगल्स अजुन लक्षात आहेत. सिनेमाच्या जाहिरातीही असत. एक जाहिरात माझ्या आवाजामधे होती. ( बालक नावाचा सिनेमा होता तो. ) दुपारची शाळेतुन यायची किंवा जायची वेळ असायची त्यावेळी, वनिता मंडळ चालु असायचे. यात लिलावती भागवत आणि कमलिनी विजयकर असत. दोघींचे आवाज खुपच छान होते. हा कार्यक्रम असे मंगळवारी आणि शुक्रवारी. बुधवारी पुण्याचा गृहिणी आणि आणी शनिवारी आपले माजघर हा कार्यक्रम असे. यात ज्योत्स्ना देवधर असत. त्यांची पत्राना उत्तरे द्यायची भाषा तर अप्रतिम असे. अकरा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा वाजता कामगार सभा असे. सकाळी नवे जुने, नाट्य चित्र संगीत, लोकगीत अश्या शीर्षकांतर्गत गाणी ऐकवली जात आणि संध्याकाळी नाटुकली, गप्पागोष्टी असा कार्यक्रम असे. दोन्ही कार्यक्रम दर्जेदार असत. आणखी लिहिनच.
|
कामगार सभा- ट्यांव ट्यांव ट्यांव्-२ अशी signature tune होती-अजून ही वाजविली जाते. दुसरा एक landmark कार्यक्रम म्हणजे शनिवारची सन्गीत सभा व आकाशवाणी सन्गीत संमेलन.एक संमेलन मी धारवाड ला लाईव्ह ऐकले होते.त्यात मल्लिकार्जून मन्सूर बुवा (कानपाळ्यास स्पर्श्- ) गाईले होते,या आकाशवाणी संमेलनात रविवारची मैफील अप्रतिम असायची कारण यात सकाळचे व अनवट राग गायले जायचे. रेडियो विशेष: विविध भारती च्या पंख्यांना माहित आहे ना?यन्दा वि भा चे स्वर्ण जयंत्योत्सव वर्ष भर चालू आहेत व दुपारी दीड ते तीन साडेतीन ते पांच व रात्री दहा नंतर जुने अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम प्रसारीत होतात ज्यांच्याकडे टी व्ही सेट टॉप बॉक्स वर चालतो त्यान्च्याकडे वि भा चा वेगळा चानेल असून त्याचे रिसेप्शन उत्तम आहे. हा थ वे वर हा चानेल ८९९ आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|