|
जुना बीबी बंद झाला कींवा करवला गेला म्हणुन काय झाल.पुरुषसिंहानो या..! ईथे तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे... कथा तुमच्या व्यथा.........!
|
Uday123
| |
| Tuesday, March 04, 2008 - 5:02 pm: |
| 
|
अहो, धोंडोपंत अभिनंदन!! पण पुरुषांना (माफ़ करा शेळ्यांना) व्यथा मांडायची पण चोरी झाली आहे, लागलीच आवाज बंद केला जातो. तुम्ही मधुन-मधुन या बाजुला एक नजर टाकत रहा, नाही तर पुन्हा अपहरण व्हायचे.
|
आला रे आला................. पुरुषसेनेचा वाघ आला!!!!!!
|
ये बा.फ़. तो झांकी है..... 'मायबोली' अभी बाकी है
|
पुरुषोंका नेता कैसा हो???.............. पुरुषहृदयसम्राट धोंडोपंत जैसा हो!!!!!!!!
|
आवाSSSSSSSSSज कुणाचा????????? पुरुष सेनेSSSSSSS चा....................!!!!!!
|
समस्त पुरुषांचे आधारस्तंभ,क्रांतीचे संस्थापक,पुरुषशक्तिचे द्योतक,पुरुषहृदयसम्राट सरसेनापती माननिय पुरुषसेनाप्रमुख श्रिमान धोन्डोपंतांचा................... विजय असोSSSSSSS!!!!!!
|
जय हिंद!!!! जय महाराष्ट्र!!!! जय पुरुष!!!!
|
Aktta
| |
| Tuesday, March 04, 2008 - 8:01 pm: |
| 
|
चीन्या१९८५ बराच उत्साहात आलस तु.... एकटा....
|
Zakki
| |
| Wednesday, March 05, 2008 - 1:17 am: |
| 
|
अहो चिन्या, जरा धीर धरा. एकदा का त्या स्त्रिया इथे परत आल्या नि त्यांचे ते देवो न जानाति कुतो मनुष्य: असे तर्कशास्त्र लिहून काही लिहायला लागल्या की आपल्याला फक्त असल्या घोषणा करणे हाच एक उपाय आहे! नाहीतर आ. बु. दो. स. असे म्हणतील!
|
Shraddhak
| |
| Wednesday, March 05, 2008 - 5:54 am: |
| 
|
स्त्रीयांनो देता का जाता???? का घालू लाथा????? पृथ्वी कुणाSSSSSSची??????बापांची नाही कुणाच्या............... आयांची!!!!! <<<<<< हा काय बालिशपणा आहे? लाथा काय? पृथ्वी बापांची काय? चिन्या, मानसिक संतुलन वगैरे ठीक आहे ना तुमचं? गमतीत असो वा गांभिर्याने, सार्वजनिक बा. फ. वर लिहिताना काय लिहावे, काय तारतम्य बाळगावे याचेही भान उरू नये का? किमान सभ्यपणा तरी दाखवावा. ( आणि हो, बाकी बायका आम्हाला येऊन अशाच बोलतात, तशाच बोलतात म्हणून आम्हीही तसेच करू. वगैरे वाद माझ्याशी घालू नका. इतरांनी पातळी सोडून बोलले तरी आपण बोलू नये एवढी जाण तुम्हाला असावी अशी आशा.) धन्यवाद.
|
Giriraj
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:00 am: |
| 
|
धावा धावा आडमिना पुन्हा वाद उफ़ाळून आला ज्याला ना मर्यादा ना अंत करा हाही BB बंद!
|
Pha
| |
| Wednesday, March 05, 2008 - 9:06 am: |
| 
|
चिन्या, काहीच्च्या काही वेडगळपणा करू नका. हसं (किंवा छीथू) होईल. दुसरी गोष्ट नवरा - बायको - स्त्री - पुरुष, संसार - तडजोड यातल्या व्यथांचं चर्हाट लावणार्या आणि त्यात जाम रस घेणार्या मायबोलीकरांना उद्देशून सांगाविशी वाटते : सारखं कण्हत - कुंथत बसू नका. आपण फुटकळ ओरखड्यांचा बाऊ करताहोत का हे तपासा. खरोखर प्रॉब्लेम असतील तर पुष्पादीदी प्रकारातल्या जवळच्या / विश्वासार्ह लोकांशी बोला... शक्यतो ऑफलाइन. इथे इंटरनेटवर एकदा का भावना - बिवना मोकळ्या मांडायला लागलात( ' गुलमोहरा ' वरल्या ललित साहित्याव्यतिरिक्त ) की बरेच लोक मनोरंजन म्हणून, वेळ जावा म्हणून, कुणालातरी 'गिर्हाईक' बनवायची हौस भागवायला / गर्दीत सामील होऊन चारदोन शाब्दिक रट्टे कुणाच्यातरी पाठीत हाणायची हाताची खाज शमवायला म्हणून तुमच्या व्यथा - कथांचं पीठ काढतील. त्यातून समस्या सुटण्याची शक्यता दुरापास्तच; पण तुमच्याबद्दल अपसमज / हसं / शोभा व्हायची शक्यता अधिक. समस्या सुटत नसतील तर, हवं तर नातेसंबंध / संसार हा आपला मार्ग नोहे असं खुशाल समजा. लोकांच्या भल्याकरता सत्कृत्यं करा किंवा स्वतःच्या भल्याचा विचार स्मरत रग्गड पैसा कमवा, ऐष करा. पण मायबोलीवर किंवा इंटरनेटवर इतरत्र जाऊन संसार - नातेसंबंध विषयावरून सारखा गळा काढू नका. पुष्पादीदी बनण्याची क्षमता बाळगून असणार्या मायबोलीकरांसाठी : तुमचा मदत करायचा उद्देश चांगला असला तरी समस्या विचारणार्या व्यक्तीचा उद्देश काडी लावणे हा आहे किंवा कसे हे ताडून बघा. तुमचे सल्ले खरोखर दर्जेदार आणि अनुभवसिद्ध असतीलही; पण प्रसिद्धीच्या मोहाला बळी पडून आपली प्रकाशने वाढवण्यापेक्षा समस्याग्रस्त व्यक्तीला ऑफलाइन / खासगी पत्रव्यवहार अशा माध्यमातून सल्ला देण्याचे पाहा. त्यातही टेलिफोनसंपर्क बरा. कारण खासगी पत्रव्यवहार जाहीर करण्याचे प्रकारदेखील मायबोली / इंटरनेटवर इतरत्र झाले आहेत. तेव्हा, सद्हेतू बाळगून मदत करतानादेखील सावधान! टीप : काही माणसे खरोखरीच समस्येने गांजली असतात हे कबूल करूनही मायबोली (आणि अन्य संकेतस्थळांवरही) या ' टिप्पिकल ' विषयांच्या शिळ्या कढीला ऊत आणला जातो असे माझे वैयक्तिक मत आहे. इतरेजन असहमत असू शकतात. मी वाद घालणार नाही; त्यापेक्षा माझ्या लेखी अशा मतांची जय!
|
Giriraj
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:18 am: |
| 
|
संकल्प,अगदी बरोब्बर! जिथे विश्वासू माणसांकडूनही कधी कधी अश्या विषयांवर स्वतचं मनोरंजन करून घेणे हा प्रकार दिसतो तिथे विश्वजालाच्या आभासी वास्तवातल्या दुनियेत अशी प्रव्रुत्ति आणि खरोखरच तळमळीने मदत करणारी प्रव्रुत्ति शोधणे समस्याग्रस्त व्यक्तिला तसे अवघडच ठरावे. त्यामुळे तुझ्या वरील मताला सहस्त्रपटीने अनुमोदन!
|
Sheshhnag
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:47 am: |
| 
|
पृथ्वी कुणाSSSSSSची??????बापांची नाही कुणाच्या............... आयांची!!!!! ==== अहो चिन्या, असं एकदम एकेरीवर येऊ नका. धोंडोपंतांनी मायबोलीकरांच्या मनातील एका मिष्कील किनारीला वाट मोकळी करून दिली आहे. कदाचित त्यामध्ये एखादा बोचरा किंवा हळवा सूर पण मिळू शकेल, नव्हे तसा मिळावा असाच कदाचित त्यांचा हेतू असेल. याचा अर्थ असा नव्हे की, आपण भान सोडून महिला वर्गावर हल्ला करावा. आपली आई पण एक स्त्री होती, तसंच पृथ्वी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, एवढं तरी लक्षात घ्या!
|
चिन्याभाऊ,आपणसुध्दा एका मातेच्या (स्त्रीच्या) पोटीच जन्म घेतलाय हे भान ठेवा.. तेव्हा शब्द जरा जपुन वापरा.. उगाच लोकांना `काय डायरेक्ट अलीबागवरून आलात काय ' असे म्हणायची संधी देऊ नका
|
Giriraj
| |
| Wednesday, March 05, 2008 - 12:11 pm: |
| 
|
कृपया यापुढे वाद वाढवू नयेत!
|
Ladtushar
| |
| Wednesday, March 05, 2008 - 12:47 pm: |
| 
|
हलकेच घ्यावे ! मला वाटते या बीबी च हेतु हा निवळ मनोरंजन असावा! आनंद लुटा निखळ मनोरंजनाचा ! पुरुषजन्मा च्या वथ्यांचा! पुन्हा..पुरुषजन्मा ही तुझी कहाणी ... म्हणजे फ़िर तेरी कहानी याद आई स्टाइल, सहीच पंत. अजुन येउदेत....
|
Shonoo
| |
| Wednesday, March 05, 2008 - 1:37 pm: |
| 
|
चिन्मय तुमचे गणेशोत्सवाबद्दलचे लेखन अन इथले लेखन यात इतकी तफावत कशी काय? गणेशोत्सवातील लेखनानंतर असल्या विधानांची अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. का एकच आय डी ने दोन वेगवेगळ्या व्यक्ती लिहितात? ड्युप्लिकेट आयडीचा नवाच प्रकार म्हणायचा? संकल्प ने मांडलेल्या मुद्द्यांवर विचार करून पहा.
|
हे पहा विचार करण्यासारखे आहे Karan Thapar interviewing Renuka Chaudhary - Minister of Women and child welfare http://www.youtube.com/watch?v=in_4QhWQaq4
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|