|
बस झाले औरंगाबाद पुराण>>>> गुरु तुम नॉस्टल्जीक होगये क्या? आता थोडे श्यामली ला लिहायला देऊयात ती रंगीबेरंगीवर लेख टाकतीये.
|
Naatyaa
| |
| Monday, August 06, 2007 - 9:18 pm: |
| 
|
पुण्याहुन शेगावला जाताना वाटेत औरंगाबाद मध्ये गुजराती थाळी खाल्लेली आठवतीय.. एकदम झकास चव..
|
Pancha
| |
| Tuesday, August 07, 2007 - 1:19 am: |
| 
|
शेरे पंजाब chicken झकास मि हेच लिहीनार होतो. अरे ते गावात कचोरी मिळण्याचे एक famous साधे hotel होतेआहे, त्याचे नाव आठवत नाही. तिथुन थोडे पुढे हाजी ची gym आहे. GECA कॅंटीन हे कधी सुरु झाले होते? auditorium मधले का? गोटी म्हणजे एक परंपंरा होती. - खरच ती चव अजुन जीभेवर आहे. medical college च्या कॅंटीन मधला अत्यंत स्वस्तात मिळणारा वडाइडली सा..बार चांगला असायचा- पण तिथे तो typical medicine smell असायचा. मयुरी हे हॉटेल वाळुज MIDC मध्ये आहे इथेही बरेच वेळा खाल्ले आहे. तिथली tomato chatuni खास होती. Shymali हे वरचे सर्व compile करुन एक लेख लिही आता.
|
Alpana
| |
| Tuesday, August 07, 2007 - 4:40 am: |
| 
|
केदार,जे एन इ सी च्या समोरच्या त्या टपरीचे नाव अग्गरवाल... पण आम्ही मात्र त्याला मागची टपरी म्हणायचो.. तिथे पराठ्या बरोबर दही तर द्यायचेच पण आम्बट गोड चटणी आणी पुदिन्याची चटणी पण द्यायचे... नेहेमी म्हणते यावेळी घरी गेले की तिथे जाउन नक्की पराठा खाइन पण नाही जाणे झाले अशात.. आणी अग्गरवाल लक्शात आहे तर मग काटे चा चहा आणी पोहे कसे विसरलात? पुर्णानंद च्या वड्याला मात्र आता चव नाही राहिली.. आणी ते ईंद्राली आहे ना ते मेडिकलच्या कऽंटीनवाल्या शेट्टीचे आहे
|
Ajjuka
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:16 am: |
| 
|
मी औरंगाबादला ३-४ वेळाच गेले असेन पण तारा पान मात्र चांगलं लक्षात आहे. WZCC च्या पारंपारीक नाट्यमहोत्सवासाठी ५-६ दिवस गेलो होतो. एकनाथ च्या मागे एका हॉल मधे सोय केली होती आमची. तेव्हा थोडंफार हिंडले होते. पण वरचं वाचून एकदा तरी खादाडीसाठी गेलं पाहिजे असं वाटतंय.
|
Shyamli
| |
| Tuesday, August 07, 2007 - 6:08 pm: |
| 
|
Shymali हे वरचे सर्व compile करुन एक लेख लिही आत>>> पंचा लिहितेये पण तुम्हि प्रसाद आणि केदार नी सांगितलेली काहि ठिकाणं मला अजिबात माहित नसलेली आहेत,उदा मयुरी. असो तरिही मी माझ्यापरिनी प्रयत्न करतीये. ५६ भोगच्या लायनितलं>>>केदार , ते फास्टफुड सेंटर बहुदा. आर्चिज...... बस झाले औरंगाबाद पुराण>>>>पुराण काल लिहायला घेतलं आणि आज सकाळपासुन नेट झोपलं, ते आत्ता जागं होतय. अल्पना तु पण औरंगाबदकर? निरजा, जायच्या आधी ई-मेल टाक मला
|
Runi
| |
| Tuesday, August 07, 2007 - 8:20 pm: |
| 
|
अरे हा बी बी एकदम एवढा बहरला. मी औ.बादची नाहीये पण अधुन मधुन जात असते खुप नातेवाइक आहेत तेथे. मला आईने १०वीच्या उन्हाळी वर्गासाठी जाधव सरांचा क्लास लावला होता तेव्हा मी तिथे ३-४ महीने होते. क्लास नावालाच केला आणि हिंडलो मात्र खुप. त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. स.भु. च्या जवळच आमचा क्लास होता. तेव्हा मी आणि क्लासचे सगळे निराला बाजारचे ५६भोग, दिनशॉ चे दुकान असे जायचो खुप वेळा. उस्मानपुरा, मछलीखडक ग़ुलमंडी, क्रांती चौक, लॉ कॉलेज रोड, अंबा-अप्सरा, अंजली ही सगळी नावे मला माहीत आहे
|
Manojsb
| |
| Wednesday, August 08, 2007 - 1:21 am: |
| 
|
हाय, मी औरंगाबादला १.५ वर्ष होतो, वाळूज मध्ये job ला होतो. पण आता औरंगाबाद सोडून ४-५ वर्ष झाली आहे. बरेच बदल झाले असतील ना आता?
|
Mahaguru
| |
| Wednesday, August 08, 2007 - 4:08 am: |
| 
|
फार काय बदल नाही झाले, लोकसंख्या वाढली, भरपुर रस्ते, पुल यांचे बांधकाम झाले, पावलोपावली दुकाने, इस्पितळे निघाली आहेत. लोक आहेत तसेच आहेत. अजुनही क्रांतीचौकात उभा असणारा आईसक्रिमचा गाडेवाला भय्या केळीच्या शिकरणात पिस्ता आईसक्रिम टाकुन 'स्पेसल फ्रुटसलाड' असे म्हणुन लुबाडतो.
|
Alpana
| |
| Wednesday, August 08, 2007 - 4:57 am: |
| 
|
हो ग श्यामली मी पण औरंगाबादचीच... शारदा मंदिर मध्ये होते, पुढे देवगिरी आणी जे एन ई सी मध्ये, तु पण शारदा मंदिर मध्ये होतिस?
|
Shyamli
| |
| Wednesday, August 08, 2007 - 5:13 am: |
| 
|
अल्पना मेल चेक कर
|
Pancha
| |
| Wednesday, August 08, 2007 - 5:22 am: |
| 
|
अजुनही क्रांतीचौकात उभा असणारा आईसक्रिमचा गाडेवाला भय्या केळीच्या शिकरणात पिस्ता आईसक्रिम टाकुन 'स्पेसल फ्रुटसलाड' असे म्हणुन लुबाडतो. अगदी अगदी, यार महगुरु क्या बात है, तुला भेटलेच पाहिजे. मी ते ३ रुपयाला असतांना खात असे. त्यावेळेस तो कधितरी चुकुन चिकु (सालीसकट) पण टाकायचा.
|
Mahaguru
| |
| Wednesday, August 08, 2007 - 8:40 pm: |
| 
|
उस्मानपुर्यातल्या तारापानसमोरच्या टपर्या/ पीरबाजरातल्या समस्त टप्र्या आणि तिथे मिळणारे क्रीमरोल / बन पाव तसेच त्याच भागातील आपल्या पाककौशल्याने दर महिन्याला बदलायला लावणार्या मेस... सगळे जसै थे. मराठी माणसाचे म्हणुन जरा सुखावणारे पंचतारांकीत वेदांग मात्र जरा मागे पडले असे म्हणतात.
|
Shyamli
| |
| Thursday, August 09, 2007 - 3:15 am: |
| 
|
मराठी माणसाचे म्हणुन जरा सुखावणारे पंचतारांकीत वेदांग>>>>वेदांत, मागे नाही, बंदच पडलय ते उस्मानपुरा मात्र अगदी हायफाय झालाय आता. बरीच सुपरमार्केटेस,malls झालेत तिथे. पुणा स्टाईल पोळीभाजी सेंटर्सपण निघालीयेत आता बरीच.
|
Pancha
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:13 am: |
| 
|
त्या तारा पान वाल्याने दंगली च्या काळात कर्फ़्यु असताना होस्टेल वर पिठल पोळ्या आणल्या होत्या, पण कोणीही त्या खाल्ल्या नव्हत्या. सगळे जण terrace वर झोपले होते. गेले ते दिवस
|
Aaftaab
| |
| Thursday, August 09, 2007 - 8:48 am: |
| 
|
इथे कोणि ex "VVL Videocon भालगाव"चं आहे का?
|
Ambar
| |
| Wednesday, December 05, 2007 - 8:15 am: |
| 
|
mi pan hoto kahi mahine aurangabadla.waluj la hoto kamala.tikde pandharpur madhe shere punjab hota,tithe/kranti chowka javal haveli madhe pagar zalyavar jevayacho.rahayala room hoti new usmanpura madhe chetana nagar.so breakfast gopal tea centre.mastach vatayacha.aani pratyek fridaylatara pan na chukta.
|
Anaghavn
| |
| Tuesday, January 08, 2008 - 5:28 am: |
| 
|
मी पण शारदा मंदीर ची आहे. कोण कोण आहेत अजुन इथे शारदा मंदिर च्या? आणि S.B.(संडास बाथरुम) चे? औ.बाद ला परवाच जाउन आले आहे. तिथे गेलं की अगदी अपलं आपलं वाटतं. क्रुपा करून लवकर लिहा, हा बीबी बंद पडु देऊ नका.
|
Anaghavn
| |
| Thursday, January 10, 2008 - 12:14 pm: |
| 
|
अहो औ.बाद कर कुठे गेलात सगळे? औ.बाद ला का?
|
Shyamli
| |
| Thursday, January 10, 2008 - 4:17 pm: |
| 
|
हाय अनघा, औरंगाबादकर आहेत ग इथेच पण या बीबीच नाव बघ ना. मग नुसत्याच गप्पा मारायला इथे कसं येणार कोणी ? नवीन मायबोलीवर असलेल्या विचारपूसच्या मदतीनी तू औरंगाबदकर किंवा इतर मायबोलीकरांशी गप्पा मारु शकतेस. .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|