Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
औरंगाबाद

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » उदरभरण नोहे » औरंगाबाद « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 06, 200720 08-06-07  5:00 pm
Archive through January 10, 200820 01-10-08  4:17 pm

Manjud
Friday, January 11, 2008 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, श्यामली, मी १० आणि ११ फेब्रुवारी हे दोन अख्खे दिवस औरंगाबादला जात आहे. मी काय काय बघू खाऊ तिकडॅ? मला जरा गाईड करा......

Anaghavn
Friday, January 11, 2008 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"गायत्री चाट भांडार" य क्रांति चौकातील टपरी वजा दुकानात जा. म्हणजे ती खर तर चटपटीत खाद्य पदार्थांची एक जागा आहे. तिथे कदाचीत तुला थोड अस्वछ वाटेल. पण quality चांगली आहे. (६ महीन्या पुर्वी पर्यंत तरी होती).


Mrdmahesh
Thursday, January 31, 2008 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या आठवड्यात औरंगाबाद - परभणी असं जाणं झालं.. गाडी घेऊन गेलो होतो.. परभणीहून २ तासात औ.बाद गाठलं दुपारचे ११:३० वाजले होते.. जाम भूक लागली होती.. सिडकोला सकाळ कार्यालयासमोर एक "लाडली" नावाचं हॉटेल दिसलं.. तिथे गेलो.. मस्त जेवण मिळालं.. मी थाळी घेतली होती आणि कुटुंबियांनी ईडली डोसा वगैरे घेतलं.. सगळे पदार्थ छान होते.. अगदी आवर्जून जाण्यासारखं हॉटेल नसलं तरी आमच्यासारख्या परगावच्या लोकांसाठी किंवा आसपासच्या ऑफिसवाल्या मंडळींसाठी छान हॉटेल आहे..
बाय द वे.. जालना रोडला जोडणार्‍या एका रस्त्यावर एक छान राजहंस पक्ष्याचा पुतळा आहे.. तिथले लोक पत्ता सांगताना त्याचा "बदक" असा उल्लेख करतात.. "बदकाच्या तिथून लेफ्टला वळा" वगैरे.. अन् खरंच लेफ्टला वळलात की नुसती हॉस्पिटल्स ची लाईन आहे तिथे.. खूप हॉस्पिटल्स आहेत त्या रस्त्यावर.. :-)


Anaghavn
Thursday, February 07, 2008 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु मी पण जात आहे १० आणि ११ फेब ला औ.बाद ला. बहीणीच्या लग्नाला. तु कामासाठी का?
जमल तर "गायत्री चाट भांडार च्या इथे भेटुयात"

अनघा


Manjud
Thursday, February 07, 2008 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, मी मुंजीसाठी जात आहे. ११ ला 'लॉर्डस मंगल कार्यालयात' मुंज आहे.

Kedarjoshi
Thursday, February 07, 2008 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'लॉर्डस मंगल कार्यालयात'?? हे कुठे आहे. नविन झालेले दिसतेय. नावावरुन मला एक सुटा बुटातला गोरा साहेब एखाद्या लुगड घातलेल्या बाईशी लग्न करतोय अन त्या सन्मानार्थ हे नाव दिले असे वाटतेय.

Anaghavn
Friday, February 08, 2008 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, "गोरा साहेब आइ लुगडं घातलेली साधी बाई!!!" ---आणि त्यांच्या संमानार्थ अस हे "लॉर्ड्स मन्गल कार्यालय!!!" imagin करुनच मजा आली.
बाकी हे नवीन कार्यालय मलाही माहीत नाही.


Manjud
Friday, February 08, 2008 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, आम्ही पण ते नाव वाचून जाम हसलो होतो. कुठे आहे ते मला आत्ता आठवत नहीये. जाऊन आले की सांगेन. पण नणंद राहते त्या एरीयाचं नाव दशमेश नगर आहे. बरं आत्ता तिकडे कितीशी थंडी आहे ते कोणी सांगेल का? म्हणजे तेवढे गरम कपडे हेऊन यायला बरं...

Ajai
Saturday, February 16, 2008 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

और्न्गाबादला थाळी सर्व्ह करणारी बरिच रेस्टॉरन्ट्स आहेत, मला आवडलेले कैलाश, लाडली, थाटबाट. थाटबाट चे पदार्थ जरा गोड्सर वाटले पण खाउ शकतो चेन्ज म्हणुन
येक अमरप्रीत नावचे होटेल आहे जालना रोडवर त्यांच्या रेस्टॉरंट मधे बाबा चिकन नावाचा शेफ स्पेशल प्रकार मिळतो. झकास आहे ती डिश


Anaghavn
Monday, May 19, 2008 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, बर्याच दिवसात दिसली नाहिस ते.
कुठे आहेस?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators