Princess
| |
| Tuesday, June 20, 2006 - 6:00 am: |
| 
|
कोणी बंगलोरचे नाहीत का इथे? इथे खाण्या पिण्याचे फारच हाल होतात( वीकएंडला). कोणाला जर चांगली हॉटेल्स माहिती असतील तर कळवा प्लीज.
|
Moodi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 8:44 am: |
| 
|
प्रिंसेस अगं इथे या बीबीवरच बघ की. श्रद्धा ने बंगलोरमधील विवीध हॉटेल्सची माहिती दिलीय. ही लिंक बघ. /hitguj/messages/644/89460.html?1113854735
|
Princess
| |
| Tuesday, June 20, 2006 - 10:06 am: |
| 
|
धन्स मूडी, श्रद्धा ने लिहिलेल्या हॉटेल्स पैकी अन्गीठी झालय ट्राय करुन आता जयनगरला पण जाउन येइन.
|
प्रिन्सेस, बंगलोरचं नाव काढलंस आणि आले बघ मी लगेच इथे. इंचारा बद्दल लिहिलं आहेच. ते J P Nagar मधे आहे. तसंच M G road वरचं एबनी ट्राय करून बघ. कोरमंगला एअरपोर्ट रोड junction च्या इथे डावीकडे वळले की दाल रोटी आहे. छान veg जेवणासाठी रहेजा आर्केड (forum समोरचं) मधलं ग्रामीण. इटालियन फ़ूडसाठी Little Italy किंवा कोरमंगला मधलं fiorano . पण fiorano जबरदस्त costly आहे. जयनगर third block चं उत्सव पण हेदेखील veg food साठी. कोरमंगलातलं महाराजा veg/non veg food साठी. लालबागजवळचं MTR कर्नाटकातलं जेवण जेवायचं असेल तर. अतिशय सही असतं पण इथे गर्दी ही तितकीच असते. मराठी पदार्थ हवे असतील तर जयनगर 9th block चं राजवर्धन फ़ूड्स. इथले पदार्थ ठीकठाकच असतात पण महाराष्ट्रीयन पदार्थ अधून मधून बाहेर जाऊन खावेसे वाटले तर चांगला ऑप्शन आहे. मारथाहल्लीकडे जाणार्या रस्त्यावर अरण्या ( ह्याचे लोकेशन confirm करणे, मला आत्ता नीट आठवत नाही आहे.) आहे. तिथे Non veg food छान मिळते. थाई फ़ूडसाठी लेमन ग्रास. ही सर्व restaurants मी आणि माझ्या मैत्रिणींनी ट्राय केलेली आहेत. अजून आठवली तर लिहिन पुन्हा. गूगलवर सर्च केलास की या सर्व restaurants चे addresses ही सहज मिळतील तुला. BTW सकाळी मायबोलीची चक्कर मारत असताना तुझे कुठल्यातरी पाककृती BB वर ' बंगलोरमध्ये broccoli कुठे मिळेल? ' असे पोस्ट वाचले. फ़ूडवर्ल्ड ( आताचे स्पेन्सर्स डेली) किंवा monday to sunday मध्ये नक्की मिळेल. SD मध्ये सकाळी लौकर जायचं तेव्हा तुला ताज्या भाज्या मिळतील. broccoli मी बघितली आहे SD मध्ये.
|
Maanus
| |
| Tuesday, June 20, 2006 - 12:26 pm: |
| 
|
बेंगलोर मधल्या हॉटेल मध ऑर्डर घेणार्या माणसांवर आजीबात विश्वार ठेवत जावु नकोस... एकदा मी विश्वास ठेवला त्या भयानक माणसाने मला ७५० रुपायची एक डिश आणली.. असला राग आलता त्याचा आणि खानारे आम्ही दोनच जण होतो. हे richmond road वरच्या circle जवळच्या chinease hotel बद्दल बोलतोय. एक MG Road च्या मागे मस्त हॉटेल आहे, पण नाव विसरलो आता. ते पण थोडे costly होत.
|
Seema_
| |
| Tuesday, June 20, 2006 - 3:43 pm: |
| 
|
pricess अगदी पटकन जेवुन यायच असेल म्हणजे office मधुन lunch time ला वैगरे तर residency road वरच कोणार्क try कर . golden enclve च्या खाली नेहमीच nilagiri's आहे तीथेही luch ला पोळी भाजी मिळते . निदान मी असताना तरी मिळायची . असच indian chinese खाव वाटल तर commercial street वरच woody's चांगल आहे . जयनगर मध्ये पण बरीच चांगली restaurants आहेत . नाव आठवली कि लिहिन . broccoli food world मध्ये मिळतेच मिळते . MG road वरच try कर .
|
Shonoo
| |
| Thursday, June 22, 2006 - 7:55 pm: |
| 
|
कोरा मन्गला मधे खुबे म्हणून एक आहे तिथे माशांचे प्रकार छान मिळतात. आरण्या HSR Layout मधे आहे. तिथले जेवण छान आहे. बाजुलाच मल्लिगे आहे तिथले इडलि डोसा सांबार आणि कॉफ़ी अगदी माटुन्ग्याला मिळते तशी. कोरामन्गला मधले hyderabad house मात्र मला अगदी बेकार वाटले. भयंकर गर्दी, आधी सांगून सुद्धा take out ला पन्चेचाळीस मिनिटे लागली आणि पुन्हा जेवण बेचव. M G Road च्या जवळ museum road वर एका हॉटेलच्या गच्चीवर तन्दुरी पदार्थांचे रेस्टॉरन्ट आहे. नाव आता आठवत नाही. पण ते ही एकदम मस्त आहे. नाव कोणाला तरी विचारून सांगीन
|
Princess
| |
| Monday, June 26, 2006 - 3:54 am: |
| 
|
हाय, श्रद्धा, सीमा, माणुस, शोनू खुप खुप धन्यवाद. खरतर, मायबोलीवर खुप दिवसात चक्कर मारलीच नाही त्यामुळे धन्यवाद द्यायला उशिर झाला. पण तुम्ही सगळ्यानी देलेली माहिति खुपच उपयुक्त आहे. आत एक एक वीकएंडला सगळे हॉटेल्सला भेट देउन येते. प्रिन्सेस
|
मी मार्केटिन्गच्या निमित्तान्ने भरपूर हिन्डलो माज़्या आवडीप्रमाणे मला खालिल गावी काय काय पदार्थ आवडले व ते कोठे प्रसिद्ध आहेत्: मुम्बई- येथिल मस्जिद जवळ होटेल ग्रन्ड हाज बिल्ड्निग शेजारि आहे..तिथला खीमा पाव जेव्हा आम्हि तेथे जायाचो तेव्हा आख्या होल मुम्बईमध्ये प्रसिद्ध होता.. आताही तितकाच जबर्दस्त चविष्ट आहे म्हणतात नक्की जाऊन बघा आणि मला कळवा.
|
सचिन मला वाटते हे हाॅटेल पोलिस कॅन्टीन या टोपन नावाने प्रसिद्ध आहे. यावर लोकसत्ता किंवा म.टा. ला लेखही आला होता.....
|
Moodi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 8:34 am: |
| 
|
हॉटेल बंजारा, ढाबा म्हणा हवे तर. http://www.loksatta.com/daily/20060711/ent03.htm
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 9:11 am: |
| 
|
स्नॅक्स आणि इतर देखील. http://www.loksatta.com/daily/20060718/ent02.htm
|
Moodi
| |
| Thursday, July 20, 2006 - 11:54 am: |
| 
|
इथे सूप ट्राय करा. http://www.loksatta.com/daily/20060720/viva08.htm
|
Moodi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 8:55 am: |
| 
|
श्रावणातील रेलचेल, श्रावण स्पेशल. http://www.loksatta.com/daily/20060801/ent04.htm
|
Zakki
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:43 am: |
| 
|
अहो, हे सगळे ठीक आहे, पण श्रावणीला पंच गव्य खाल्ले तर! कदाचित् आरक्षणात संधि मिळावी म्हणून असले अस्सल ब्राम्हणी प्रकार जनतेने बंद केले असावेत! नाहीतरी कोण इथे समजून उमजून, श्रद्धेने काही करत होते? उगीच आपले काहीतरी! शिवाय निरनिराळ्या स्वरूपात गोमूत्र नि पंचगव्य समान असलेल्या गोष्टी खाणे रोजच चालू असते!
|
Maanus
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:58 pm: |
| 
|
तोंडात लाळ पानी आणनारे पदार्थ... १. मिसळ २. सुरमई fry ३. बांगडा fry ४. चिकण वडे (आणि चिकण पन. माझ्याकडे आत्ता गावरण चिकण वड्याचे पिठ आहे पन चिकण बनवनारे कोणी नाही.) ५. भरलेली वांगी आजुन काही आठवतेय का कुणाला
|
Panna
| |
| Friday, August 24, 2007 - 12:40 pm: |
| 
|
मिसळी वरुन आठवलं, ठाण्याची मामलेदार मिसळ कोणी खाल्ली आहे?? मस्त झणझणीत असते! खाताना तोंडातूनच काय, तर नाका डोळ्यातून पण पाणी येतं!! नंतर पोटात जळजळ होऊ नये म्हणुन मोठ्ठा ग्लासभर थंडगार ताक.... आहाहा....
|
Uno
| |
| Friday, February 01, 2008 - 8:26 pm: |
| 
|
Nasikla kuthle hotels change aahet?
|
स्नक्स साठी पंचवटी चे कोफ़ी शोप,कोलेज रोड वरील श्री क्रुष्ण आणी महाराष्ट्रीय खाण्यासाठी माडर्न काफ्फ़े हे गन्गापूर रोड वर आहे.तसेच राजीव गांधी भवन जवळ पुरोहीत ची थाळी ७५ रु. ला खूप भूक असताना खायला उत्तम आहे.मामाची पाव भाजी श्रिक्रुष्ण च्या अलिकडे कालेज रोड वर आहे त्याचे रगडा प्याटीस ही मस्त आहे.प्रकाश बेकरी ही सातपूर मध्ये प्रसिद्ध आहे त्याचे सर्वच बेकरी प्रोडक्ट्स छान आहेत.सातपुर मधील शामसुन्दर ची मिसळ खाण्याजोगी आहे
|
Pranju
| |
| Sunday, February 03, 2008 - 7:54 am: |
| 
|
उपनगर बस स्टोप समोर एक पाव भाजी ची गाडी असते. खुप मस्त असते तिथली पाव भाजी. पेशवे पार्क समोर शौकीन ची पाणि-पूरी
|