|
Pranju
| |
| Monday, February 04, 2008 - 2:59 am: |
| 
|
वरच्य पोस्ट मधे नेहरू गार्डन ऐवजी पेशवे पार्क लिहिले गेले ...... पुण्यात रहायचा परीणाम.... उपनगर बस स्टोप समोर एक पाव भाजी ची गाडी असते. खुप मस्त असते तिथली पाव भाजी. नेहरू गार्डन समोर शौकीन ची पाणि-पूरी .
|
प्रांजु नाशिक मधे कुठे रहातेस? जलरामचे सामोसे मस्तच असतात... शौकीनची पाणिपुरी आणि भेळ पण मस्तच असते...
|
Nkashi
| |
| Monday, February 04, 2008 - 11:09 am: |
| 
|
भगवतीची पाणीपुरी, शेवपुरी छान असते त्याच्या शेजारी एक कुल्फ़ीवाला आहे. त्याची कुल्फ़ी तर अप्रतिम..
|
Tiu
| |
| Monday, February 04, 2008 - 5:45 pm: |
| 
|
जलारामचे समोसे पुर्वी चांगले मिळायचे... नंतर नंतर quality बिघडली... अजुन काही चांगल्या खाण्याच्या जागा. सायंतारा (भद्रकाली) - साबुदाणा वडा शामसुंदर ( MIDC ) - मिसळ मामाज (कॉलेज रोड) - पावभाजी, भेळ सर्कलच्या बाहेर श्रीकृश्ण वडापाव सेंटर (अशोक स्तंभ) - वडापाव रविवार कारंजा (हॉटेलचं नाव लक्षात नाही, पुर्वी त्यांची मेन रोडवर गाडी असायची) - अननस सरबत (विथ आईसक्रिम) बुधाशेठ - जिलेबी मॉडर्न कफे (पंपीन्ग स्टेशन) - शेव भाजी (किंवा कुठलीही महराष्ट्रियन डिश)
|
अहो अग अरे/ ???टिउ जी- यातील बर्याच जागा माझ्या मेल मध्ये आहेत. नवीन सुचवा ना?
|
Ambar
| |
| Tuesday, February 05, 2008 - 7:08 am: |
| 
|
अहो नाशिककर बुधाचि आंबाबर्फ़ी विसरलात का? नं.१.तसेच माझदा बेकरीचे पटीस अप्रतीम. जेवण्याकरतातर नाशिक म्हन्जे पर्वणी आहे. पण माझ्या खास आवडीचि ठिकाण म्हणजे- साहेबा-बाॅम्बे नाका. पंचवटी मधलि थाळी दिवट्या बुधल्या-नाॅन व्हेज खास मराठी पध्ध्तीच आणी नुकतच चालु झालेलं हाॅटेल लय भारी-आग्रा रोड
|
Ashbaby
| |
| Tuesday, February 05, 2008 - 8:20 am: |
| 
|
नव्या मुंबईत (वाशी ते बेलापुर) कोणी सांगेल काय चांगली ठिकाणे? साधना
|
Prajaktad
| |
| Tuesday, February 05, 2008 - 11:45 am: |
| 
|
रविवार कारंजा (हॉटेलचं नाव लक्षात नाही, पुर्वी त्यांची मेन रोडवर गाडी असायची) - अननस सरबत (विथ आईसक्रिम) >>>समर्थ ज्युस सेन्टर पेठे विद्यालयाजवळ आहे ते..त्यांचिच गाडी चांदिच्या गणपतीसमोर उभि असते. अननस आईस्क्रिम सरबत हे म्हणजे एकदम स्पेशल! हा प्रकार फ़क़्त आमच्या नाशकात मिळतो बरं! (भाव एकदम रिझनेबल).बाकी सिझनल शेक वैगरे ही छान मिळते. बाकि सतराशेठ आइस्क्रिमचे प्रकार खायला थोड पुढे गेल्यावर प्रशस्त dariy-Don आहेच.याची अजुन एक शाखा कॉलेज रोडलाही आहे. सर्कल च्या वडा-पाव चा उल्लेख आहेच..तिथेच मेहेर जवळ' गारवा' हे एक्दम जुने आणि फ़ेमस दुकान आहे. झणझणित मिसळीसाठी पंचवटितले अबिंका एकदम सही.. दवे कडचा ढोकळा एकदम मस्त..याची मिठाई मात्र तेव्ह्ढी खास नाही... त्यासाठी थोड पुढे आरके जवळ याव लागेल.. अग्रवाल ची मिठाई बासुंदी छान असते.. कॉलेज रोडला सागर स्विट चांगले आहे..दवे चा समोसा पुर्वी चांगला होते(९२-९४ साली).. क्रमश्:
|
ऍशबेबी, नवी मुंबईत खायचे फ़ार हाल होतात. काही मिळत नाही. बेलापूर्मधे कुणीतरी पोळी भाजी सेंटर सुरू करा असे पत्र मी विविध वर्तमान पत्रातून पाठवले. शेवटी जॉब चेंज करून मुंबईला आले.
|
Tiu
| |
| Tuesday, February 05, 2008 - 4:28 pm: |
| 
|
उपाध्येकाका... अहो / अग नाही! "अरे" म्हणा. प्राजक्ता... बरोबर समर्थ ज्युस सेंटर. समर्थ नगरला त्यांचा बंगला आहे. दोन मजली, प्रशस्त! पण अंगणात अननसाचे ढीगच्या ढीग पडलेले असतात!!!
|
Tiu
| |
| Tuesday, February 05, 2008 - 4:36 pm: |
| 
|
मेहेरवरच विश्वा नावाचं एक अतीप्राचीन हॉटेल आहे...तिथली पावभाजी कुणी खाल्ली आहे का? खुप वर्ष झाले पण अजुन ती चव लक्षात आहे...
|
Ashbaby
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:10 am: |
| 
|
नंदिनी, सो सड... नेरूळला आहेत पोळीभाजी केंद्रे, पण तिथे फ़क्त उदरभरणम.. चवीचे काही नाही. (अर्थात मला गरज नाही त्यांची, माझ्या मुलीने मम्मीची खोली म्हणून किचनकडे बोट दाखवल्यावर माझे डोळे खाडकन उघडले आणी सरळ सैपाकापासुन सगळ्यालाच बाई ठेवली. बस्स झाले ते आपल्या माणसांसाठी किचन मध्ये राबायचे.) आता बेलापुरला प्रभात सेंटर जवळ बिकानेर उघडले आहे, तिथे सन्ध्याकाळी चटपटीत मिळते थोडेफ़ार. पण जास्त वरायटी नाही आणि मराठी पदार्थ तर नाहीच नाही. मुंबईठाण्यापुण्याला जसे मराठी चमचमीत पदार्थ मिळतात तसे नेरुळ बेलापुरला नाहितच काय? मामलेदाराच्या मिसळिबद्दल बरेच वाचले पण त्यासाठी ठाणे गाठावे म्हणजे जरा लांब पडते. कोणीतरी मराठी उद्योजकाने इकडे दुकान टाकायचे मनावर घ्या जरा.. चांगला धंदा होइल. तोपर्यंत आम्हाला बिकानेरच्या भय्याचाच आधार... साधना.
|
Mandarp
| |
| Wednesday, February 06, 2008 - 7:07 am: |
| 
|
नन्दिनी, मुंबईत कुठे असतेस? तिथे आहे का पोळी-भाजी केंद्र? ठाण्यात भरपूर आहेत अशी पोळी-भाजी केंद्र. साधना, मामलेदार बद्दल खूप ऐकुन होतो म्हणुन एकदा गेलो होतो. पण मला विशेष नाही आवडली. पुण्याच्या श्री, बेडेकर, श्रीक्रुष्ण यान्च्या तुलनेत मामलेदार काहीच नाही.
|
ऍश त्या बिकानेरवाल्याला कसलीच चव नाही. त्यापेक्षा सेक्टर चार मधे एक दुकाम आहे तिथे चटपटीत चांगले मिळते.. त्यातल्या त्यात. मंदार, मुंबईमधे मी चर्चगेटला काम करते. इथे खाण्यापिण्याचे अजिबात हाल होत नाहीत. बोरीवलीला पण बरीच पोळी भाजी केंद्रे आहेत.
|
Ashbaby
| |
| Wednesday, February 06, 2008 - 8:15 am: |
| 
|
ह्म्म्म्म.... मी एकदा घरी केली होती (मनोगतावरून कृती घेवून, मामिचे चाहते तिकडेही फ़ार आहेत). छान झाली होती. पण इतकी सगळी वर्णने ऐकुन म्हणजे वाचून तोंडाला पाणी सुटते... एकदा पुण्याच्या मिसळकेंद्रांना भेट द्यायला पाहिजे आता.. नंदिनी, शनिवारी बघते जावून सेcटर ४ मद्ध्ये... साधना
|
Bhidesm
| |
| Wednesday, February 27, 2008 - 11:28 pm: |
| 
|
कोणी सोलापुरचे आहे का ? सोलापुरच्या Restaurants बद्दल माहिती हवी आहे. कोणी तिथे खाल्ले असेल तर अभिप्रायही कळवा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|