Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 23, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Chuuk kii barobar » Archive through January 23, 2008 « Previous Next »

Abhijeet25
Tuesday, January 22, 2008 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले कित्येक वर्षे मी एक गोष्ट कोनाशीहि बोलु शकलो नाहि. ती इथे बोलायची आहे.मला आजहि कळत नाहि कि मी चुक होतो कि बरोबर.

मी काॅलेज ला असल्यापसुन मला समजाकार्याची फार आवड आहे. मी काॅलेज संपवुन नोकरीला लागलो हा तेंव्हाचा किस्सा आहे. मी मुंबई तल्या एका नामंकित कंपनीत कामाला होतो. नवीनच असुन पोस्ट अतिशय चांगली मिळाली होती. तिथे बाकि गोष्टींसोबत एक महत्वाची जबाबदारी माझ्याकडे होती, ती म्हणजे त्या डिपार्टमेंट मधे लागणारे कुठलेहि मटेरिअल माझ्या परवानगी शिवाय ( सहिशिवाय) खरेदी होत नसे. कुठले मटेरिअल घ्यायचे हे मी ठरवत असे. तो अधिकार पुर्ण पणे माझ्याकडे होता.
तिथे दोन चार ब्रांड चे मटेरिअल अप्रुव्हड होते. साहजीकच आमच्या सप्पलायर्स मधे चढाओढ होति मटेरिअल खपविण्यासाठि.

या मटेरिअल मागे मला २.५ ते ३ कमिशन द्यायला दोन सप्पलायर्स तयार होते. तिथे वर्षाला १५ ते २० लाखाचे मटेरियल यायचे आणि त्याचे २.५% टक्के म्हणजे कमीत कमी ४० ते ५० हजार रुपये. तर मी एका प्रसंगी ठरविले कि हो आता मी या पुढे हा पैसा घेणार आहे. मी ते कमीशन घ्यायला सुध्धा सुरुवात केली. ईथे पर्यंत कोणीहि म्हणेल कि हे चुकिचेच आहे.
पण मी हा पैसा कधीच स्वता:साठि वापरला नाहि.
पुण्यात कोठरुडला एक संवेदन नावाची संस्था आहे जी एड्स ग्रस्त लोकांसठि काम करते मी तो सगळा पैसा या संस्थे मधे द्यायचो आणि ज्या माणसाने मला तो पैसा लाच म्हणुन दिला आहे त्याला त्याची पावती नेउन द्यायचो, त्याला मिळकत करा मधे सवलत मिळेल या उद्देशाने.


पण पुढे पुढे त्या कंपनीचे मटेरिअल खराब निघायला लगले मग मीच त्या कंपनीच्या उत्पादने घ्यायला बंदि घातलि. ती कंपनी ब्लॅक लिस्ट केली.

मी आता ती नोकरी सोडली. आता माझा या कुठल्याहि गोष्टीशी संबंध येत नाहि. पण मी कधीही ही गोष्ट विसरु शकणार नाहि.

मला अजुनहि कधी कधी कळत नाहि मी केले ते चुक कि बरोबर!

माझ्या मनामधेच द्वंद्व चालु असते.
१. तो पैसा कोणीहि घेतलाच नसता तरि काहि झाले नसते. मटेरिअल या कंपनीचे घ्यायचे त्या ऐवजि दुसर्‍या कंपनी चे घेतले तर काय बिघडले? कोणीही तो घेतला नसता त्या ऐवजी मी घेतला आणि सत्कारनी लावला मग काय बिघडले?
२. मी पाप केल्याने कोणाच्या तरि पोटात चार घास जात असतील तर काय वाईट आहे? ते पुण्य जास्त महत्वाचे.

आता दुसरि बाजु जी मला कायम टोचत रहते.

१ कितीहि झाले तरि तो पैसा वाइट मार्गाने आला होता तो वाईटच परिणाम दाखविणार. तो पैसा कधीहि सन्मार्ग दखविणार नाहि. ( आईनी लहानपणापासुन मनावर बिंबविलेली गोष्ट! )

२ मी तो पैसा सत्कारणी लावला असला तरि मी पापी आहे हि गोष्ट खरी आहेच. पुढे मागे काहि झाले असते तर मीच अडकलो असतो. माझ्या पापात कोणीच सहभागी झाले नसते.

मला यातली कुठली बाजु बरोबर आणि कुठली चुकिची हे कधिच कळत नाहि.


कोणी तरी मला सांगेल का?


Dakshina
Tuesday, January 22, 2008 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत तुम्हाला नक्की कशाची टोचणी आहे?

* कमिशन घेतल्याची
* घेऊन सुद्धा, स्वतःसाठी न वापरल्याची
* किंवा इतर कशाची?

अजुन एक प्रश्नं -
तुम्ही तुमच्या पोस्ट मध्ये लिहीलय की जरी तुम्ही तो पैसा सत्कारणी लावला असला तरी तुम्ही पापी आहात. ते कसं काय?

माणूस हा ज्या त्या वेळेस योग्य असेच निर्णय घेत असतो. तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटलं, तुम्ही ते केलं. सुदैवाने त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या कोणत्याच ( personal आणि Professional ) लाईफ़ वर झाले नाहीत. हे एका दृष्टीने चांगलेच नाही का?


Abhijeet25
Tuesday, January 22, 2008 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोचणी फक्त कमिशन घेतल्याची आहे.


Meggi
Tuesday, January 22, 2008 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, दान हे नेहमी स्वत: च्या पैश्याचे किंवा वस्तुचेच करता येते.
कमिशन घेऊन कमी प्रतीचा माल घेणे हे चूक. असे करुन भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले गेले.
पण आज तुमच्या मनात हे चुक कि बरोबर अस प्रश्न आल हेही काही कमी नाही. तुम्ही स्वत: कंपनीच्या products वर बंदी घातली हे योग्य केलेत.


Raviupadhye
Tuesday, January 22, 2008 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते ही चूक आहे. अप्रामाणिक पणाच्या व्याख्ये प्रमाणे नोकरीच्या जागी असणार्या सवलतीचा वैयक्तीक कारणासाठी उपयोग करण्याचा विचार करणे देखील disintgrity अथवा अनैकतिक समजले जाते.यात office ची stationery पासून सामूहिक gift च्या discount चा स्वताच्या खरेदी साठी वापर करणे ही समाविष्ट आहे.परन्तु हे हल्ली पुस्तकातच राहिले आहे. आता खन्त वाटते आहे/ पुनर्विचार होतोय हेच खूप आहे

Pooh
Tuesday, January 22, 2008 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Abhijeet,

I think you are confusing the two things. If you keep them separate, you will realize that both the things you did were not right.

1. You accepted a bribe from a supplier. This is not correct from a legal as well as moral standpoint irrespective of where you used the money.

2. Eventhough you gave money to an organization which needed money, the money itself was tainted.

Just my $0.02

Abhijeet25
Tuesday, January 22, 2008 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेग्गि ( ताइ/ मावशी/ काकु) मी जेंव्हा कमिशन घ्यायला सुरुवात केली तेंव्हा त्यांचे मटेरियल चांगले यायचे. साधारण एका वर्षा नंतर मटेरियल खराब यायला लागले.

Meggi
Wednesday, January 23, 2008 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, जेव्हा कमिशन द्यायची गरज लागते तेव्हा त्यात मागे काही वेगळा डाव असतो. आपण या माणसाला विकत घेउ शकतो ही भावना त्यांच्यात बळकट होते.
तू नोकरीला सुरुवात केलीस तेव्हा जगाचा अनुभव नसतो. आपण पैसा चांगल्या कारणासाठी वापरलाय ना असं वाटणं साहजिक आहे. पण तू झालेली चुक वेळिच सावरलिस ( कंपनीला blacklist करुन ) हे योग्य झाले.


Raviupadhye
Wednesday, January 23, 2008 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मगलर्ने दिलेले धर्मादाय डोनेशन आणि तुम्ही दिलेल्या पैशात काय फरक आहे?

Abhijeet25
Wednesday, January 23, 2008 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वता: च्या चूकीचे समर्थन करतोय असे नाहि. फक्त तुम्ही सर्वांनि जे विचार मांडलेत त्यांची माझ्या मनात जी उत्तरे येतात ती देतोय

रवी (काकादादा) स्मगलर चा मुळ उद्देश हा लोकांचे अहित असतो. त्यातुन वाचण्यासाठी तो ते नाटक करत असतो. मार्ग सारखाच असला (पैशाचा स्त्रोत) तरी उद्देश वेगवेगळा आहे. त्याचा उद्देश हा स्वता:च्या कुकर्मांना लपवुन ठेवणे हा असेल तर माझा उद्देश फक्त गरजु लोकांना खरेच मदत मिळावी असा होता

पूह, तुम्ही सांगितलेले विचार मीच स्वता: मांडले आहेत. तरि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद


Hkumar
Wednesday, January 23, 2008 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारांश, तुमचे वागणे अंशतः बरोबर आणि अंशतः चूक वाटते!

Ashbaby
Wednesday, January 23, 2008 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत नाही अभिजीत ची काही चूक आहे म्हणून.

तिन्-चार सप्लायर्सपैकी कोणाकडूनहि घेतल्याने फ़रक पडत नव्हता. लाच घेणे चूकच आहे, पण इथे लाच देणारा आपली निवड व्हावी म्हणून लाच देत होता. लाचेचा फ़ायदा घेउन कमी प्रतिचा माल तो देत नव्हता (निदान पहिले वर्ष तरी). त्याने तसे केले असते आणि नाहीतरी आपण पैसे स्वत:साठी वापरणार नाही असे म्हणून अभिजीत ने ते मान्य केले असते तरीही चूकच.

अभिजीतने पैसे सत्कारणी लावले शिवाय त्याचे श्रेयही स्वत्:कडे घेतले नाही. नावासकट पावती नेउन सप्लायरला दिली. पुढे खराब माल यायला लागल्यावर सप्लायरला ब्ल्~अकलिस्ट करायचे धाडसही दाखवले. (सप्लायरने दिलेल्या पैशांचा उल्लेख करुन दबाव नाही आणला?)

वाइट मार्गाने कमावलेला पैसा वाइटाकडेच जातो हे खरे आहे, स्मगलरने दान दिले तर म्हणुन तो चांगला होत नाही, पण चांगल्या कामासाठी दिलेला पैसा सत्कारणी लागतोच ना? मग तो कोणी का देईना. (नदीचे मूळ आणी ऋषिचे कुळ शोघू नये म्हणतात ते कशासाठी?)

मुळात अभिजीतने पैसा कमावलाच नाही. त्याने तो फ़क्त हस्तांतरीत केला. आणि वेळ येताच पैसा नाकारण्याची हिंमतहि दाखवली. त्यामुळे ह्यात काही चुक आहे असे मला वाटत नाही. मीही कदाचीत असेच केले असते. (कुठचीही गोष्ट चूक का बरोबर हे संपुर्ण चित्र पाहून ठरवावे असे मला वाटते).


Ladtushar
Wednesday, January 23, 2008 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते काही चुक नाहि !!!
तुम्ही कमीशन घेतले जर हे चुक आहे तर तुम्ही नाहि तर दूसरे कोणी तरी घेतले असते कदाचित तुमच्या वरच्या अधिकारयाने आणि ते खाउन पचवले सुधा असते, तुम्ही तर चांगलेच वगालत काय वाईट केलयत कुणाचे. जास्त विचार करू नका... ऐकावे जनाचे करावे मनाचे ...

Yog
Wednesday, January 23, 2008 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

abhijit,
जे लिहील आहेस ते अस उघडपणे लिहायलाही धाडस लागत. तुझा हेतू चान्गलाच होता यात शन्का नाही पण मार्ग निश्चीत चुकला.. rather it was short sightedness..
अस करता आल असत का : ?
१. कम्पनीत अर्थात तुझ्या शब्दाला किम्मत होती तर good will च्या बळावर तुझी संस्थेला मदत कराय्ची इच्छा कम्पनीत व इतर सप्लायर्सनाही उघडपणे मोकळेपणे बोलून दाखवली असतीस तर कदाचित ५०००० च्या जागी दर वर्शी ठराविक देणगी कबूल करणारे अनेक जण भेटलेही असते... संस्थेलाही मदत सतत चालू राहीली असती.. आणि महत्वाचे म्हणजे अधिक proportions आणि अधिक लोकात याचा प्रसारही झाला असता?
२. त्या संस्थेला हे कळले असते (कळले नाही असे मी माअन्तो) तर त्यान्नी त्याला हरकत घेतली असती का..?
३. तुझे सुदैव तू यात कुठेही सापडला नाहीस पण मित्रा पुन्हा quality च्या नावाखाली त्या सप्लायरला black list करणे was nothing but abuse of power on your part.. they could have as well got you in trouble for what you did... पण त्यान्नी तसे केले नसावे(?) कारण त्यान्नी बहुतेक long term फ़ायदा बघितला असेल.. तूही तसे केले असतेस तर..?:-)
असो.. या जर तर ला आता विशेष अर्थ नाही.. in hindsight its always 20/20 ... पण असे अनेक प्रसन्ग आपल्यातल्या अनेक जणान्वर येत असतात, माझा अनुभव असा आहे की प्रामाणिक मार्गाने तात्पुरता फ़ायदा होत नसेलही पण long term benefits अधिक मिळतात.
तरिही एक चान्गले काम तुझ्या हातून घडले तेव्हा आता बोच ठेवू नकोस कारण घडलेली गोष्ट बदलणार नाही.

ps: i suggest delete the name of that institution from here.. you might unknowingly cause more trouble now!


Abhijeet25
Wednesday, January 23, 2008 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशबेबि(?)

सप्पलायर माझ्या वर दबाव आणू शकत नव्हता. कारण त्याचे मटेरियल खराब निघाले होते आणि शिवाय मी त्याला पुढे आणले होते. मी यायच्या आधी त्याचे मटेरियल क्वचितच घेतले जात असे. आणि मी ज्या कंपनीत काम करत होतो ती मुंबईतली फ़ार मोठि कंपनी आहेत उत्पादना मधे. त्याने कितीहि हातपाय मारले असते तरी तो माझे काहिहि वाकडे करु शकला नसत. त्याला माझ्या कलाने घेणे भाग होते. शिवाय त्याने लाच दिली हे सुध्धा सत्य आहेच. त्यामुळे तो माझ्या वरच्यांकडे गेला असता तरि भविष्यातली पावले ओळखुन कोणी त्याला जवळ केले नसते हे खरेच.
पण माझे नाव खराब झाले असते हे मात्र खरे.

आणि पैसा होताच तो कोणीहि वापरत नव्हते मी तो बरोबर बाहेर काढला असे मला वाटते.

लाड तुशार, ते मटेरियल घ्यायची जबाबदारि फ़क्त माझी होति. कोणीहि वरचे लोक त्यात हस्तक्षेप करत नसत. माझ्या कडुन कागद सरळ परचेस डिपार्टमेंट कढे जात. त्यामुळे दुसरे कोणीहि हा पैस काढु शकत नव्हतं, माझ्याशिवाय, अगदि परचेस वाले सुध्दा.


Raviupadhye
Wednesday, January 23, 2008 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेवढे commission होते त्या अंशी तुम्ही मालाची किंमत का कमी करून आपल्या employer फायदा करणे हा देखील पर्याय होत ना? "हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!!!!!"

Abhijeet25
Wednesday, January 23, 2008 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या कंपनीचा फायदा काय करणार? त्यांचा वर्षाचा निव्वळ फयदा ६०-७० करोड आहे त्यांना या ४०-५० हजारांनी काय फरक पडणार?
आणि शिवाय माझे काम फक्त मटेरियल ची गुणवत्ता बघणे आणि अप्परुव्ह करणे इतकेच होते. परचेस खाते भाव करित असे. आम्हि त्यात हस्तक्षेप करित नसु. सप्पलायर सुध्धा बहुतेक भाव करित असावेत कारण जर परचेस वाल्यांनी मला संगितले कि हा जास्त भावने माल विकतो आहे तर मला दुसरा पर्याय द्यावा लागलाच असता नाहितर हे मटेरियल महाग असुनहि आणि याचे पर्याय बाजारात कमी भावात उपलब्ध असतानाहि हेच मटेरियल का घ्यायचे याची उत्तरे द्यावि लागली असती. जे मी कदापि केले नसते.
असो तरिहि तुम्हि संगितलेला पर्याय चांगला आहेच

योग,

मी तिथे हे केले असते तर कदाचित अजुन धोकादायक झाले असते. माझे त्या संस्थेशी काहितरि सेटिंग असेल अस अर्थ बर्‍याच जणांनी काढला नसता का? अळिमिळि गुप चिळी

त्या संस्थेने कशाला हरकत घेतली असती? त्यांना असा ब्लॅकचा पैसा देणारे खुप असतात. मी जेवढे वर्गणीदार ओळखतो ते सगळे शक्यतो व्यावसायिक आहेत. हजारोंनी देणग्या देणारे तेच असतात. मध्यमवर्गिय इच्छा असेल तरि इतका पैसा देउ शकत नाहित. जे समाजकार्य करतात त्या सगळ्यांना माहित असते कि पैसा कोठुन येतो ते.

हे फक्त माझ्या मनात आलेले विचार.

आणि माझ्या मते मी त्या कंपनी चे नाव लिहिणे टाळलेच आहे चुकुन कुठे लिहिले कि काय?


Ladtushar
Wednesday, January 23, 2008 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत,
मला, लाच देणे अथवा घेणे हे चुक की बरोबरार असा प्रश्न नेहमी पडतो !
माझ्या जीवनात एक असा क्षण आला की मी लाच दिली पण ती नाशिबाने सत्कर्मी लागली, अणि ज्याने ती सत्कर्मी लावली त्याचा मी सैदव ऋणी रहिन....
माझ्या college च्या admission च्या वेळी बर्यापैकी मार्क असून देखील हवे त्या college ला admission मिळत नव्हते, काही लोक खोटे जातीचे दाखले देऊन admission list मधे स्वताचा नम्बर लावत होते. त्यावेळी माझ्या परमपूज्य काकानी एका पक्षाच्या युवा नेत्याला पकडून हवे त्या college ला admission करून दिली. त्याने आमच्या कडून ५००० रु मगिताले. मला या गोष्टीचा खुप राग आला होता. माझ्या आईने तिच्या शिवण कामातुन साठवलेल्या RD च्या खात्यातुन मला पैसे काढून दिले. मी ते पैसे घेउन collage ला गेलो, तिथे मला तो युवा नेता भेटला अणि मला collage च्या principle कडे घेउन गेला. तिथे गेल्यावर त्याने ते पैस्याचे पाकिट principle ना दिले.principle सरानी लगेच बेल दाबून बाहेर बसलेल्या एका गरीब विद्याथिनिला अणि तिच्या म्हातार्या बापाला बोलाउन घेउन ते पाकिट त्याच्या कडे दिले व तिचा admission फॉर्म भरायला सांगितला.
आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा ती बिचारी तिचा admission form भरत होती... आणि ते पाहून मी खरच धन्य झालो.
जाताना मी त्या युवा नेत्याला हात मिळवुन thanx दादा मन्ह्टले. यानंतर माझी पुढील collage शिष्कन मी अगदी मन लाउन घेतले कुठलाही पैसा वाया न घलावता.

आत्ता तुम्हीच सांगा हे लाच देणे चुकीचे आहे का बरोबर ?

Pooh
Wednesday, January 23, 2008 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

abhijeet,

I was not merely restating your points. What I meant to say was: both the things you did were not right. there is no second side to this. again my opinion.

Akhi
Wednesday, January 23, 2008 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, मला अस वाटत की, लाच देउन पुण्य काम करण्यापेक्षा त्या सरां का नाही फ़ी भरली? इतका कळवळा का?

दान द्यायच ना ते स्व:त च्या हिमती ने द्यावे.

अभिजीत, जे झालं ते झालं त्याची बोच कशाला ठेवतो मनात?
विसरुन जा ना ते....
आणी दुसरी गोस्ट म्हनजे तुझी सदद विवेक बुध्दी ला जर ही टोचणी आहे तर ही क्रुती चुकच ना?
माझ्या मत कर्म अस करावे कि भविष्या मधे पश्याताप किंवा रुखरुख लागता कामा नये.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators