Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 22, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » उदरभरण नोहे » मुंबई » Archive through November 22, 2007 « Previous Next »

Manya2804
Monday, October 29, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो कर्ली म्हणजे करंदी...

माझ्या माहिती प्रमाणे कर्ली हा एक सुरमई सारखा मासा असतो. तो कापताना तिरका कापावा लागतो. नाहीतर काटे मोडतात आणि खाणे अशक्य होते.

करंदी ही कोलंबीसारखीच पण अतिशय बारीक असते.

कृपया तज्ञानी अधिक माहिती द्यावी.


Ajai
Monday, October 29, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्या२८०४- u r right कर्लि (करली) मध्यम आकाराच्या सुरमई एव्हढी आणि पाल्या एव्हढी काटेरि असते. citylight market- माहिमला करली चांगली मिळते

Vinaydesai
Monday, October 29, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्ली कापायला, करायला आणि खायला मासे खाण्याचा खूप दांडगा अनुभव लागतो... नाहीतर काटेच काटे नशिबी येतात...

कलकत्त्याला एकदा माझ्या वडिलांना बाजारात कर्ली मिळाली... शेजारचा बंगाली बरोबर होता... माझ्या आईने त्यालाही कर्ली कापून देण्याची तयारी दाखवली. पण त्याचा बंगाली अभिमान दुखावला...

दुपारी त्याची बायको, पातेल्यातून काटेच काटे घेऊन आमच्या घरी आली.. तिला अजूनही कळले नव्हते नक्की काय Problem आहे ते...

करंदी, छोट्या कोलंबीला म्हणतात..


Panna
Monday, October 29, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म्म... येत्या भारतवारी मधे कर्ली ट्राय करायलाच हवा!!
तव्यावर परतुन केलेली करंदी पण मस्त लागते!!

ठाण्याच्या राम मारुती रोड वरचा "राजमाता वडा" पण टेस्टी असतो! तळलेली मिरची असते सोबत! आणि तहान भागवायला उन्हाळ्यात स्पेशल कोकम सोडा!!


Ajai
Tuesday, November 20, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डान्सबार, ऑर्केस्ट्रा बार संस्कृतीत चांगले live गझल Performances असलेली restaurants बंद झाली. अजुनही चालु असलेली काही Restaurants
१. avenue - ठाकुर कॉम्प्लेक्स्- इथे तीन fine dining - restaurants आहेत त्यातील xanadu मधे live गझल होते.
२. Golden Chariot - domestic airport- इथे दोन sections आहेत, बाहेरचा भाग non-AC open area , दुसरा AC Restaurant . दोन्हीकडे एकाच प्रकारचे खाणे मिळते पण Performance वेगळे वेगळे होतात. गझल बरोबर कव्वाली, फिल्मि गाणी सुद्धा गायली जातात. जर मित्रांच्या टोळक्यात गेलात तर बाहेरचा section जास्त चांगला. :-)
३. पिंड दा धाबा- खार स्टेशन च्या बाजुला- इथले गाणे मला कधि फारसे आवडले नाही पण खाणे, ambience चांगले.
इथे येक ज्योतिषीही बसतो जो ५० रुपये घेवुन तुम्हाला रुचेल असेच भविष्य सांगतो :-))


Naatyaa
Tuesday, November 20, 2007 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच 'दिवा महाराष्ट्राचा' या restaurant बद्दल वाचनात आले.. जरा महाग वाटत आहे.. कोणी इथे जाऊन आले आहे काय?

http://divamaharashtracha.com/

Meggi
Wednesday, November 21, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठाण्यात स्टेशन जवळ टिपटॉप म्हणून एक चाटच दुकान आहे, मस्त असते तिकडची भेळ आणि शेव्-पूरी. कुंजविहार पासुन जवळ आहे, खंडेलवाल sweets च्यासमोर
कुंजविहारचा jumbo वडापाव तर मस्तच...


Shyamli
Wednesday, November 21, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो कुंजविहारमधली मिसळपाव पण खाण्यासारखी हातात रुमाल असलाच पाहिजे ही अट आहे पण :-)

जंबो वडापाव: एका वड्यात पोट भरतं,आणि लस्सी पण खास एकदम



Prady
Wednesday, November 21, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शामले तुला मामलेदारची मिसळ म्हणायची आहे का? टिपटॉपची थाळी पण एकदम शाही असते. त्यांचं तीन हात नाक्याजवळ मोठं complex आहे तिथेच थाळी रेस्टॉरंट पण आहे. आमचं लग्न टिपटॉप प्लाझाच्या हॉलमधेच झालं. पण स्वत्:चं लग्न असलं की जेवण नाही enjoy करता येत. आता भारतवारीत एकदा चक्कर मारायला हवी. निर्मल लाईफस्टाईल मधली राजधानी थाळी पण मस्तच. मुलुंड पूर्वेला स्टेशनच्या बाहेरच योगेश्वरी म्हणून खास महाराष्ट्रीयन पदार्थांचं दुकान आहे. त्यांचा बटाटावडा, कोथिंबीर वडी खासच.

Panna
Wednesday, November 21, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिप-टॉप चे चाट items मस्त असतात. ढोकळा पण फेमस!! मला तिकडचा उंधियो खुपच आवडतो! टिप-टॉप ची थाळी जेवलायत कधी?? २-३ दिवस उपास करुन मगच जेवायला जावे...

कुंजविहारची मिसळ..ट्राय नाही केली कधी :-(
श्यामली, हातात रुमाल वाली 'मामलेदार मिसळ' म्हणायचय का? स्टेशन रोड वरच्या आमंत्रण हॉटेल मधली??


Amruta
Wednesday, November 21, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसल बोलतायSSSSS.. आता हे सगळ इथे कुठे खाउSSS ?? :-(

Panna
Wednesday, November 21, 2007 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, सेम पिंच!! :-)
योगेश्वरी च्या कोहळ्याच्या वड्या, आंबा बर्फी पण सुप्रसिध्द आहेत!
निर्मल मधल 'सचिन्स' बंद झाल नं?

Sayuri
Thursday, November 22, 2007 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पन्ना, प्रज्ञा! योगेश्वरीची आठवण करुन दिलीत... आत्ताच्या आत्ता तिकडे जावसं वाटतंय! त्यांच्या दुधीभोपळ्याच्या वड्यापण खास लागतात... आणि साबुदाणा वडेपण
बाकी ढोकळा वगैरे गुज्जु प्रकार मला अन्नपूर्णाचे जाम आवडतात... आणि समोसा हरीओमचा!
हं... सचिन्स बंद झाल्याचं मीपण ऐकलं...तिथली सोलकढी चांगली असायची...


Shyamli
Thursday, November 22, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ग प्र. मी कुंजविहारच्या मिसळबद्दलच बोलत होते
मामलेदारची पण तशीच असते असं ऐकलय मात्र कधी जायला मिळाल नाही. टिपटॉप ला शनीवार रविवार फार गर्दी असते पण फार वाट बघावी लागते :-(

Prady
Thursday, November 22, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहीत नव्हतं कुंजविहारच्या मिसळी बद्दल. आता मुलुंडला पण सुरू झालय कुंजविहार. पन्ना तू पण मुलुंडचीच का? अजून एक खासियत योगेश्वरीची म्हणजे संक्रांतीचा तीळाचा काटेरी हलवा. असा कुठेच नाही मिळत. सायुरी हरिओम वाल्याने पण चांगलाच जम बसवलाय आता. मिठाई छानच असते तिथे. आणी अजून एक आवर्जून सांगावं असं मुलुंड पूर्वेचं दुकान म्हणजे विनायक बेकरी. ह्यांचा लादीपाव इतका चविष्ट असतो की पूर्वी एका गिर्‍हाईकाला एकच लादी विकत मिळे.

Panna
Thursday, November 22, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्या, आता कुंजविहारची मिसळ खाऊन बघितली पाहिजे!
सायुरी, हरी ओमS!! नाव काढल्याबरोब्बर आत्ता रात्री ११.३० ला सामोसा खावासा वाटतोय! :-)
प्रज्ञा, मी ठाण्याची आहे. मुलुंडला काका रहातात माझे. आणि कॉलेज पण तिकडेच.. केळकर... मुलुंड हे माझं दुसर घर आहे! :-)


Panna
Thursday, November 22, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, इकडे आपणच करायच आणि आपणच खायच.... :-(
फार त फार म्हणू शकतो की आज वडा पाव केलाय तो "अमक्या अमक्या" दुकानाचा!!


Manjud
Thursday, November 22, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ठाण्यातली खादाडी आणि तुम्ही लोक Temptetions विसरलात? चाट आयटेम्स गावदेवीजवळ एक दुकान आहे तिथे छान मिळतात. पाणीपुरी तर सहिच असते.
अरे ठाण्यातली खादाडी मिसणार्‍यानो, मी ठाण्यात राहते. तुम्हाला काही खावंसं वाटत असेल तर मला सांगा. तुमच्या वतीने मी खाऊन येईन आणि इथे येऊन चवीचवीने वर्णन करून सांगेन. आणि असं रसभरीत वर्णान करेन की तुम्हालाही खाल्ल्याचं समाधान होईल.


Sampada_oke
Thursday, November 22, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा मंजू. पुढच्या आठवड्यापर्यंत खालील गोष्टी खाऊन घे, मग मिळणार नाहीत.( मी येतेय, म्हणून.:-))
१. आपटेचा वडा. ए.के. जोशी शाळेजवळच्या गल्लीत असणार्‍या गाडीवरचा वडा.
२.शुभमानस ( श्रीराम बूक डेपो जवळचे हॉटेल) चे स्प्रिंग रोल्स आणि हक्का नूडल्स.
३.खंडेलवाल( पाचपाखाडी) चा सामोसा.
४.प्रशांत कॉर्नरकडचे चाट आणि पनीर रोल्स ई. ई.
५.श्रद्धा वडे वाल्यांची मूग भजी, बटाटेवडे.
६.श्रद्धाच्या समोरचे दुकान( श्या नाव नाही आठवत:-() फ़्रेश फ़्रूट श्रीखंड.
न संपणारी यादी.:-)


Ajai
Thursday, November 22, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर समोशांचा विषय निघालाय आणि कुणिच गुरुकृपा सायन बद्दल लिहल नाहिये. that has to be best Samosa with ragada in town यांचा समोसा मुंबई भर सगळ्या थियेटर मधे जातो आणि रोज ३०००० समोसे बनतात असे वाचलेय कुठेतरी

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators