Dineshvs
| |
| Thursday, November 22, 2007 - 9:15 am: |
| 
|
अजय तो गुरुकृपाचा समोसा अजुनही मिळतो पण आता आकार थोडा लहान असतो. चवीत किंचीत फरक पडलाय. तरिही सगळ्यात बेस्ट तोच.
|
Manjud
| |
| Friday, November 23, 2007 - 6:08 am: |
| 
|
संपदा, त्याचं नावच 'श्रीखंड सम्राट' आहे. आणि आपटेचा वडा, त्याला आम्ही बाईचा वडा म्हणतो. एक बाई ती गाडी चालवते. खंडेलवालची जिलबी पण खास असते एकदम. मी पाचपाखाडीलाच राहते त्यामूळे तिकडची माझी खादाडी तु गृहितच धर. आता खंडेलवालने पण चाट काउंटर चालू केलाय. येशील तेव्हा नक्की टेस्ट कर...
|
Manjud
| |
| Friday, November 23, 2007 - 6:22 am: |
| 
|
नाट्या, मी कालच 'दिवा महाराष्ट्राचा' मध्ये जाऊन आले. एकदाच जाण्यासारखं रेस्टो आहे ते. आम्ही व्हेज. असल्यामूळे कदाचित आम्हाला जास्त व्हरायटी मिळाली नाही. नॉन व्हेज. किंवा मासेखाऊ लोक तिथे जास्त एंजॉय करू शकतील असं वाटतं. आमचा कोर्स ऑफ डिनर बघ्: १. क्रिम ऑफ टोमॅटो सूप : टेस्ट सगळ्या हॉटेलांमधली सेम : किंमत ९५ रुपये फक्त. २. स्टार्टर्स : बटाटा मटार पॅटिस : टेस्ट सुंदर : किंमत १५९ रुपये फक्त. (८ पॅटिस) ३. पिठलं : छान, घरच्यासारखी चव नाही. : किंमत १५९ रुपये फक्त. ४. भाकरी : तांदूळाची आणि ज्वारीची : इंडस्ट्रिअल तव्यावर भाजलेली : चव फारशी छान नाही. ५. वांग्याचं भरीत : अगदीच पचकवणी. गॅसवर किंवा चूलीवर भाजलेल्याची चव नाही. ग्रिलमधे भाजल्यासारखं वाटात होतं. : किंमत १५९ रुपये फक्त. एवढेच पदार्थ खाल्ले, टोटल बिल ९५० रुपये फक्त झालं चौघींच. ह्यावर एका मैत्रीणीची कॉमेंट : च्यामारी, झुणका भाकरच खायची होती तर पुण्याचं तिकिट काढून सिंहगडावर जाऊन खाऊन आलो असतो. एवढ्या पैशात चौघी जाऊन येऊन प्रवास खर्च भागला असता आणि ह्यापेक्षा authentic आणि चविष्ट झुणका भाकरी मिळाली असती. इंटिरिअर बघण्यासारखं आहे. पैठणी टांगलेली आहे. दहिहंडी बांधलेली आहे. एक झरोका केलाय तिथे म्हणे सुगम संगीताचे कार्यक्रम होतात. सर्व्हिस ठिक आहे. सूप आणि स्टार्टर्स चटकन आलं, मेन कोर्स सर्व्ह करायला खूपच वेळ घेतला.
|
Monakshi
| |
| Friday, November 23, 2007 - 7:11 am: |
| 
|
पार्ल्यात 'परिचय' म्हणून नवीन हॉटेल चालू झालेलं आहे. धनश्री कॅटरर्सचे पराग साठे यांच आहे ते. maharashtrian special, pure veg अर्थात किंमती थोड्या जास्त आहेत. उदा: थालीपीठ रु. ४५ फक्त वगैरे. पण टेस्ट सुंदर. ज्येष्ठ नागरिकांकरता 50% discount . पार्लेश्वर देवळाच्या समोर जी गल्ली आहे जी पुढे स्टेशनकडे जाते तिथे आहे. एकदा जाऊन या.
|
Manjud
| |
| Friday, November 23, 2007 - 7:51 am: |
| 
|
मोना, त्या 'धनश्री कॅटरर्सचे' जेवण जेवलीये मी. छान असतं सगळं. हे 'दिवा'वाले अवचट काही पण क्लेम करतात. अस्सल महाराष्ट्रियन चव देणरी अने हॉटेल्स दादर, गिरगाव, पार्ले, डोंबिवली, ठाण्यात कित्येक वर्षे चालू आहेत.
|
Monakshi
| |
| Friday, November 23, 2007 - 8:37 am: |
| 
|
हम्म. तो चेन चालू करतोय परिचय ची. आता पार्ल्यानंतर बांद्रा, कुलाबा इथे चालू करण्याच्या विचारात आहे. ह्याचं पण interior सुपर्ब आहे. पैठणीचा पडदा, एके ठिकाणी भारतीय बैठक घातलेली आहे. फक्त जागा कमी पडतेय.
|
Manya2804
| |
| Monday, November 26, 2007 - 11:46 am: |
| 
|
'परिचय' च्या जागी पूर्वी 'रूची-सागर' नावाचं हाॅटेल होतं. तिथे मराठमोळे पदार्थ खुप छान मिळत...
|
Monakshi
| |
| Tuesday, November 27, 2007 - 6:19 am: |
| 
|
मन्या, त्या रुचिसागर मध्ये जे पदार्थ मिळायचे ना तेच आता जरा सजवून आणि आकर्षक भांड्यातून आणि किंमत वाढवून पेश केले आहेत. पण दोन्ही चवींमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. BTW अरे वा तू पण पार्लेकरच आहेस की. प्रभू बंगला काय रे??????
|
Ajai
| |
| Tuesday, November 27, 2007 - 6:49 am: |
| 
|
पार्ल्याचे मला माहीत असलेले तीनच जॉईंट्स. गजाली, क्रंची मंची आणि daffodils . पार्ल्यात भेटायचे म्हटलं तर हिच ठिकाण ठरलेली
|
Monakshi
| |
| Tuesday, November 27, 2007 - 7:25 am: |
| 
|
क्रंची मंची च्या इथे उभं रहायचं म्हटलं तरी वैताग येतो. एकतर एवढा रस्ता अरुंद आहे आणि नेमक्या दोन गाड्या समोरासमोर आल्या की संपलं. चालणं ही मुश्किल होऊन बसतं त्यामानाने गजाली आणि dafodills जोसात आहेत. गजालीच्या बाजूला गोकुळ tea & cold drink house आहे ते पण मुलांच्या जमण्याचा अड्डा आहे. मुली फार क्वचितच गोकुळवर जातात. अर्थात बरोबर ग्रुपमध्ये मुलं असतील तर. नाहीतर बाजूला ICICI Bank च्या इकडे बसायला मस्त पायर्या आहेत तिकडे बसून TP करायचा.
|
Manjud
| |
| Tuesday, November 27, 2007 - 9:34 am: |
| 
|
पार्ल्यात शिवसागरच्य शेजारी एक आईसक्रीम पार्लर होतं. नाव विसरले पण तिथे मस्त डेकोरेटीव आइसक्रिम्स मिळायची. आहे का ते अजून?
|
Monakshi
| |
| Tuesday, November 27, 2007 - 9:40 am: |
| 
|
snow lops म्हणत असशील तर आहे. पण आम्ही तिकडे नाय जात. त्याच्या समोरच्या गल्लीत naturals आहे तिकडे जातो किंवा दोन तीन कुल्फीवाले आहेत त्यांच्याकडे जातो.
|
Skdeep
| |
| Tuesday, November 27, 2007 - 5:30 pm: |
| 
|
पार्ल्याचा विषय आला तर पार्ले टिळक मधील बाबूचा बटाटे वडा पट्टीईच समोसा आठवला आत्ता त्याने आतल्या बाजूने गाडीवर पण विकायला सुरुवात केली आहे
|
Manya2804
| |
| Wednesday, November 28, 2007 - 11:33 am: |
| 
|
मोना, मी जन्मापासून पार्लेकर. 'प्रभू बंगला' वाले प्रभू आमचे कोणी नाहीत. बाबूने आता पार्लेस्टेशनच्या बाहेर दुकान काढलं आहे....
|
Shonoo
| |
| Wednesday, November 28, 2007 - 1:43 pm: |
| 
|
श्या सकाळी सकाळी गजाली अन बाबू चे बटाटेवडे या वर्षी तरी भारतवारीचा योग नाही:-( अजून किती वाट पहायची या सगळ्या खादाडीची! गूगलच्या कृपेने बिझीबी ने लिहिलेला व्हिव्हा पश्चिम चा रिव्ह्यू वाचला मागच्या आठवड्यात. तेंव्हापासून मालवणि अन गोवन पदार्थांची स्वप्न पडतायत. त्यात आता ही भर! ( भोकाड पसरत जाते)
|
Ladtushar
| |
| Tuesday, December 04, 2007 - 3:28 pm: |
| 
|
कुणाला माहित असेल किवा नाही पण परेल ला के इ म समोर मस्त मिसळ मिळते ! अणि लालबागला किवा एलफिन्स्तान ला मस्त मालवणी होटल्स आहेत तिथे मस्त कोलाम्बी फ्रया अणि सोल कढी....एकदम सही...
|
Ajai
| |
| Monday, December 10, 2007 - 7:04 am: |
| 
|
हल्ली किनारा,कोकण, मालवण आणि तत्सम शब्द जोडुन बरेच सी फुड जॉईंट्स मुंबईत उघडलेत. आधिची शेट्ट्यांची रेस्टॉरंट्स बहुतेक. त्यातुन ऑथेन्टीक मालवणी खुप कमी. काल ' कोकण किनारा' नावाच्या एका रेस्टॉरंट मधे गेलो होतो. अगदी छोटी जागा पण फूड आवडलं म्हणुन मुद्दाम लिहतोय. हिंदुस्तान नाक्याहुन चारकोप कडे जाणार्या रस्त्यावर (ओम साई ऑटो सर्व्हिस च्या थोडं पुढे) आहे. रविवार असल्याने थोडे वेटिंग होते इतरवेळि जागा मिळत असेल आरामात. coming back to food मेनु तसा नेहमीचा मालवणी रेस्टॉरंट्चा. इथे वडे मिळतात पण भाकरी नाही मिळत. सोलकडीची चव उत्तम आणि थोडि वेग़ळि. चौकशी केलि तेव्हा कळल कि त्यात जिंजर पण टाकतात. भरलेल्या पापलेट्चे हिरवे स्टफिंग पण चविष्ट. यात बाकि मसाल्याबरोबर प्रॉन्सचा खिमा टाकतात त्यामुळे चव भलतीच चांगली होते. आत तिन चार वॉटर कलर पेंटींग्ज आहेत तीही सुंदर आहेत
|
Ajai
| |
| Friday, March 21, 2008 - 4:50 pm: |
| 
|
काल काही कामा निमित्त ठाण्याला जायला लागले. तीन पेट्रोल ंप च्या जवळ (आराम्बाग बिल्डींग समओर) येक खवैया नावाचे रेस्टॉरंट आहे तीथे वेळ वाचावा म्हणुन गावरान थाळी मागवली. ज्वारिच्या भाकरी, ठेचा, पीठलं उसळ, येक भाजी, आणी मुगाची खिचडी.. लै झ्याक म्हणावी अशी ही थाळी. ही जागा फार मोठी नाहिये पण जेवन मला तरी खुप आवडले
|
Sonchafa
| |
| Friday, May 02, 2008 - 5:10 pm: |
| 
|
पार्ल्यात गजाली ला पर्याय म्हणून काही महिन्यांपूर्वी दर्या नावाचे रेस्टॉरंट सुरु झालं आहे.. जुन्या रुचीसागरवरून स्टेशनकडे जाताना पुढच्या बिल्डिंगमध्ये.. पर्ल्याला गेलं की माझा नवरा घराजवळच आहे म्हणून तिथे भेट देऊन येतो.. (तो सारस्वत पण बिचार्याचं सासर कोब्रा पडलं ना.. )कर्नाटकात सहजी न मिळणारा बोंबिल तिथे न चुकता तो हादडतो.. अट्टल खाणार्यांनी एकदा भेट देऊन गजाली चांगलं की दर्या ते स्वत:च ठरवावं.
|