|
अजय, ते रेकॉर्डींग कुठेतरी अपलोड कर ना. मी ३रीत शिवाजीचे काम केले होते. माझा जिरेटोप नेमका सैल होता. तरी सगळ नाटक नीट झाल. फक्त शेवटी तानाजी पडल्यावर मी गड आला पण .. हे वाक्य सुरू केल आणि टोप मागे पडला. आणि माझ मुंजीमुळे असलेल तुळतुळीत डोक उघड पडल. त्या वाक्याला माझ्यासकट सगळे हसत होते
|
Chandya
| |
| Wednesday, October 31, 2007 - 5:05 pm: |
| 
|
सव्या, गड आला पण टोप पडला . मनुस्विनी, सहिच
|
भारी अजय!!! माझा म्हणन्यापेक्षा आमचा पहिला नाटकाचा अनुभव असा होता. आता आमच्या शाळेत आमची तुकडी सर्वात हुशार मुलांची होती तरी आम्ही अतिशय टवाळ होतो. आम्ही नाटक वगैरे कधिच केली नव्हती. आणि आमच्या आधीची batch नाटकासाठी खुप प्रसिध्द होती पुण्यातल्या आंतरशालेय स्पर्धांमधे नेहमी बक्षिसे आणायची. आम्हाला ९वीपर्यंत नाटक वगैरे करायची संधीच मिळाली नव्हती. हे लोक १०वीत गेले म्हणुन आम्हाला नाटक कराव लागेल अस सांगण्यात आल. अनंत कान्हेरेंवर एक नाटक बसवण्यात आलं होतं(इंग्लिशमधे च दोन नंबरच पारितोषिक आमच्या आधीच्या लोकांनी यावरच आणल होत). आम्ही ते च्या स्पर्धेत मराठीत करणार होतो. आधी त्या बाई काही आल्याच नाहित नाटक बसवायला,एका मुलाला पाठवल. आम्ही त्या मुलाची खेचत बसण्यातच वेळ घालवला. मग शेवटचे ३-४ दिवस त्या बाई आल्या आणि त्यांनी आम्हाला नाटक बसवण्यासाठी अतोनात त्रास दिला. सगळ्यांचच डोकं फ़िरल. एक तर कुणालाही नाटकात कस बोलाव वाक्यात कुठे स्ट्रेस द्यायचा वगैरे काहिच जमत नव्हते. माझ काम सुत्रसंचालकाच होतं. त्या २० एक वाक्यांसाठी बराच वेळ द्यावा लागला होता,मी आपल सरळ वाक्य म्हणत असे आणि त्या बाई अरे अस नाही फ़ीलिंग्ससकट म्हण,असे असे चढ उतार घे सांगत असत. मग शेवटी नाटकाचा दिवस उजाडला. माझा एकच डायलॉग होता आणि पहिल्यांदीच होता. पडदा उघडला, मी घाबरलो होतो, जाऊन भडभड डायलॉग बोलुन आलो,थोड्यावेळानी वाटले आपला आवाज कमी येतोय. तर लक्षात आल की माईकपासुन बराच दुर उभ राहुन बोलत होतो(नंतर मित्रांनी सांगितले की बाबारे तु काय बोलला काहिच कळले नाही). नंतर अतिशय फ़ाल्तु पध्दतिने नाटक पुढे गेले(एकही धड डायलॉग बोलत नव्हता). रॅंड आणि अनंत कान्हेरे समोरासमोर आले. कान्हेरेने पिस्तुल काढायला हात नेला, रॅंड बघत होता कान्हेरेने पिस्तुल काढायला सुरुवात केली आणि मधेच रॅंडला काय झाले कळलेच नाही त्याने छातीला हात लावुन आSSSSS आवाज काढला,आणि त्यानंतर कान्हेरेकडुन पिस्तुल रोखली गेली (सगळ पब्लिक हसायला लागल) रॅंड अर्धवट पडायला लागला आणि तेव्हढ्यात मागुन गोळी चालल्याचा आवाज आला. मग पब्लिक अजुनच हसायला लागल. हे सर्व कमी म्हणुन एका टवाळ पोरानी बाईंवरचा राग काढायचा ठरवल. विंगेतुन माईकमधुन त्याला वाक्य होत की "रॅंडच्या खुनाबद्दल ३ आरोपिंना मरेपर्यंत फ़ाशीची शिक्षा देण्यात येत आहे" तर हा पठ्ठा मुद्दाम 'मरेपर्यंत फ़ाशीची शिक्षा' ऐवजी 'मरेपर्यंत खुनाची शिक्षा' म्हणाला. एव्हाना पब्लिकच हसुन हसुन पोट दुखु लागल होत. शेवटचा सीन होता तिघे आरोपी लटकले आहेत असे दाखवायच होत. तसा सीन बरोबर झाला पण मधेच एकाला वाटले की आपण बहुतेक इतरांच्या आधीच केल आहे. त्या हिरोने मान टाकली होती आणि परत डोळे उघडुन बाजुच्यांकडे पाहिले. मेलेला माणुस आजुबाजुच्यांकडे बघतोय असे चित्र दिसले. एव्हाना पब्लिक ओरडायला लागल होत. आता नाटक संपल. शेवटि तिघे लटकलेले आणि background मधुन एक गाण आणि सगळी पात्र मागे येऊन फ़्रीज अवस्थेत उभी रहातात. झाल ते गाण सुरु झाल सगळी पात्र फ़्रीज अवस्थेत. एकाला त्या फ़्रीज अवस्थेत काय सुचल काय माहित त्याने आजुबाजुच्यांकडे बघितल. त्यांनी टोप्या काढल्या होत्या,यानीही टोपी काढली. पब्लिक हसायला लागल त्यांच हसु आणि ही मजा बघुन स्टेजवर ५-६ जणांना हसु आवरल नाही आणि ते हसायला लागले. म्हणजे क्रांतिकारकांना फ़ाशी दिलिय ,'जरा याद करो कुर्बानी' गाण चालू आहे आणि स्टेजवरची ५-६ जण हसत आहेत अस दिसल. बाप रे असा पचका ZP ला (आमच्या शाळेसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा होती ती) आम्ही केला होता. नंतर शाळेत जो तो येउन आम्हाला शिव्या देत होता.
|
Gsumit
| |
| Wednesday, October 31, 2007 - 6:41 pm: |
| 
|
बापरे चिन्मय, हसणे कंट्रोल करणे अवघड झाले... आमच्या ऑफिसात जरा पब्लिक कमी आहे म्हणुन बर... नाटकाचा बट्ट्याबोळच झाला म्हणायचा... पब्लिकला पण ज्वलंत देशभक्ती अन कॉमेडी असा combo भेटला... त्या टोपी पडायच्या किस्स्यावरुन आठवले, मी पण असाच लहान असतानी मी, माझा भाउ अन माझा एक मित्र मिळुन सोसायटीच्या गणपतिमधे विविध गुणदर्शन कार्यक्रमात एक धनगराचे गाणे सादर केलते... गाणे जवळ जवळ व्यवस्थित झाले, पण शेवटचे कडवे सुरु झाले अन माझा फेटा सुटुन पडला, मी तो उचलायला लागलो तर मित्र मला धडकुन पडला, मग आमचे स्टेजवर भांडण सुरु झाले... माझ्या मोठ्या भावाने आम्हाला आवरले नाहीतर पब्लिकची फ़ुल करमणुक झाली असती... तरीही आम्हाला बक्षिस भेटले होते (ते भेटणारच होते, सोसायटीचेच तर कार्यक्रम ते...) पण बक्षिस देणारे माइक हातात असतानी मला म्हणतात असे भांडु नये म्हणुन... परत एकदा हशा
|
मि अभिजित पन्सरे बोल्तोय
|
चिन्या, त्याला विनोदी नाटक म्हणून तरी पहिल बक्षीस मिळायला पाहीजे
|
Slarti
| |
| Thursday, November 01, 2007 - 5:18 am: |
| 
|
चिन्या, ... ... ...
|
Sush
| |
| Thursday, November 01, 2007 - 7:20 am: |
| 
|
हा माझ्या पहिल्या नाटकाचा अनुभव. शाळेत स्टेजवर बरेचदा डान्स्मधे भाग घेतलेला पण नाटकात कधिच नाहि. ७वी-८वी त असताना विज्ञान दिनानिमित्त एक नाटक करायचे ठरवले होते. एक मान्त्रिक, त्याच्याकडे येणारे लोक, त्यांचे problem त्यावर मांत्रिकाचि जादु वगैरे. आणि नन्तर आमच्या एक madam त्यामागचे शास्त्रिय कारण सम्जावुन सांगणार अशी थिम होति. त्यात मी एक गरिब बाइ आणि माझा नवरा खुप दारु पितो म्हणुन त्याच्याकडे जाते तर तो मान्त्रिक लिम्बु कापतो तर ते लाल झालेले असते म्हणजे माझ्या नवर्यावर एका भुताचा प्रभाव आहे असे तो सांगतो. तेव्हा रन्गित तालिम वगैरे छान झाली. पण स्टेजवर माझा नवरा झालेल्या मुलिला over acting करायची हुक्की आलि. ति अशि हलत डुलत माझ्याबरोबर स्टेजवर आली मी बोलत असताना तिचे हलणे डुलणे चालु होते. मी नौवारी साडी नेसली होती आणि तिने पायजमा शर्ट घातला होता. मी माझी वाक्य बरोबर म्हणत होते. तिला फक्तं हलायचे काम दिले होते. त्या दारुड्याचि acting करण्याच्या नादात तिचा मला थोडा धक्का लागला. तर माझे लक्श तिच्याकडे गेले. तिचे ते ध्यान पाहुन मला खुप हसायला आले. ते पाहुन लक्शातच राहिले नाहि कि मी माइकसमोर उभी आहे आणि मोठ्याने हसले. गम्भिर नाटकाचा असा पचका झाला. नन्तर खुप वाइट वाटले. परत कधी नाटकात भाग नाहि घेतला. ( नन्तर नाटकात काम करायची तहान नाट्यवाचनावरच भागवलि )
|
Manjud
| |
| Thursday, November 01, 2007 - 7:28 am: |
| 
|
अहो चिन्मय महाराज, ते र्यांड जरा असं लिहा... rE.nD = रॅंड 'र्यांड' फार भयानक वाटतं वाचायला. आणि तो मराठी सा रे ग म प मधला 'चैतन्य कुलकर्णी' तुझा कोणी नातेवाईक लागतो का रे?
|
Ajai
| |
| Thursday, November 01, 2007 - 7:53 am: |
| 
|
चिन्मय्- मजेशीर अनुभव. .... ....
|
धन्यवाद सुमित,सव्यसाची,स्लार्ती,मंजु,अजय!! हा अनुभव जेंव्हा केंव्हा आठवतो तेंव्हा हसु आवरतच नाही. मंजु मि जेंव्हा आधी लिहिल होत तेंव्हा r.c.nd अस लिहिल होत पण ते रंड अस दिसल म्हणुन मी त्या रंड पेक्षा र्यांड बरा अस वाटल्याने तस लिहिल. आता rE.nD लिहितो.बघु काय होते ते- रॅंड
|
अरे वा!!!बरोबर आले की!!!पण त्या देवनागरिच्या विंडोत बरोबर दिसत नाही. पण आता उशीर झाला आहे.एडिट होत नाही आता. मॉड लोकांनो करा काहीतरी!!
|
Chinnu
| |
| Friday, November 02, 2007 - 8:48 pm: |
| 
|
चिन्या, way cool! Imagine करकरून अजून हसायला येत आहे. खुप सही लिहिलास किस्सा!
|
thanx चिन्नु!!!!मला लहानपणी रिक्षावाले काका चिनुच म्हणायचे,एक दोन मित्र अजुनही म्हणतात. मंजुद, चैतन्य कुलकर्णी नावाचा एकही भाऊ मला नाही. काय आहे कुलकर्णी हे एकदम कॉमन नाव आहे त्यामुळे चौकात १० दगड भिरकावले तर ७ कुलकर्ण्यांना जाउन लागतिल.
|
Orchid
| |
| Monday, November 05, 2007 - 5:32 pm: |
| 
|
हा पहीला 'फसलेला ' अनुभव त्यावर्शी [मी ५वी-६वी त असताना] मला सुत्रसंचालकाच काम दिल होत. बाईंचा आग्रह असायचा की वर्गातल्या प्रत्येकाने स्नेहसम्मेलनत भाग घेतला पाहीजे म्हणुन त्यांनी ज्या मुलामुलीनी अत्तापर्यन्त कशात भाग घेतला नव्हता अशांना एकत्र करुन कोळी नाच बसवला. १ कोळी कमी पडत होता म्हणुन ते काम माझ्या गळ्यात मारल. मग मी निवेदन करताना जीन्स स्कर्ट घालुन यायच आणि आमचा नाच सुरु होण्यापुर्वीच निवेदन करुन पडद्यामागे[विंगेत] जायच तिथे कोळ्याचा रुमाल बांधणे, मिशी रंगवणे इ.झाल्यावर मग पडदा वर जाणार अस सार ठरल होत. आयत्यावेळी शिपायानी माझ निवेदन सम्पताच पडदा वर केला. त्यात नेमका कोळ्यांच्या रांगेत माझा १ ला नंबर. समोरच असा स्कर्ट घातलेला कोळी नाचतना फनी दिसेल म्हणुन मग मी माझ्या जोडीच्या कोळणीचा हात धरुन रांगेच्या शेवटी पळाले.समोर बसलेले सर्वजण फिदीफिदी हसत होते.
|
Meggi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 4:51 am: |
| 
|
भारी BB आहे हा !!! चिन्या, ह. ह. पु. वा.
|
Nkashi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 11:41 am: |
| 
|
लोकहो, सगळ्यांचे किस्से वाचुन मी फ़क्त खुर्चीतुन खाली पडायचे बाकी आहे... कानाला फ़ोन लावुन पण फ़ार वेळ हसता येत नाही
|
Meenu
| |
| Wednesday, November 07, 2007 - 3:55 am: |
| 
|
हा माझाही 'पहिला आणि शेवटचा' फसलेला अनुभव. ऑफीसच्या annual function मधे गाणं एकदा म्हणलं होतं आणि मस्त once more घेतला होता. नोकरी बदलली आणि नविन ऑफीसचं annual function ठरलं rehersals करायला वगैरे अजिबात वेळ नव्हता. म्हणुन मागेच म्हणलेलं गाणं आयत्या वेळी परत म्हणायचं ठरवलं. त्यावेळचा once more responce अजुनही आठवत होताच. function ला अतुल, सिद्धार्थ (माझा मुलगा) दोघेही आले होते. सिधार्थनी fanci dress मधे सैनिकाचा वेष करुन मस्त गाणं म्हणलं. मी स्टेजवर उभी राहीले आणि अचानक भयंकर भिती वाटली. मग पायाचा ठोका वेगानी आणि गाणं मात्र तोंडातुन फुटतच नव्हतं अक्षरश स्टेजवरुन पळून जावसं वाटत होतं पण पाय अगदी स्टेजला जखडल्यासारखे. मग गाणं मधेच slow मधेच fast मधेच blank ती दोन तीन मिनीट अगदी दोन तीन युगांसारखी वाटली. इतका पोपट झाला त्यानंतर मला अजिबात ऑफिसमधे जाऊन कुणाला तोंड दाखवु नये असं वाटत राहीलं. खुप दिवस या पराभवानी माझा पिच्छा पुरवला. confidence level एकदम खाली नेली या प्रसंगानी. नंतर कधी तरी कसलेल्या अभिनेत्यांचीही अशी फजिती झालेल्याच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा कळलं की असं होतं कधी कधी.
|
Hkumar
| |
| Wednesday, November 07, 2007 - 8:21 am: |
| 
|
होय, असे श्रीराम लागूंच्या बाबतीत झाले होते त्यांच्या पहिल्या नाटकात. पण नंतर त्यांनी इतिहास घडविला आहे!
|
Nilima_v
| |
| Friday, November 09, 2007 - 7:24 pm: |
| 
|
माझ्या पहिल्या नाटकात मी झाड झालो होतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|