Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 29, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » उदरभरण नोहे » मुंबई » Archive through October 29, 2007 « Previous Next »

Ajai
Tuesday, October 23, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे मुंबईतले खव्वय्ये गेले कुठे.. चला मी सुरुवात करतो.बाकिचे join करतीलच
.
पारसी फूड साठि मुंबईत तीनचार restaurants प्रसिद्ध आहेत त्यातले एक Ideal Corner फोर्ट भागात, D.N. Rd च्या थोड आत मधे Citi bank-branch च्या बाजुच्या गल्लित्-पाठिमागच्या भागात.
non AC, no frills मेनुवर आठवड्याच्या दिवसाप्रमाणे ठराविक पारसि पदार्थ मिळतात. अगदि धन्साक ही रोज मिळत नाही. माझे आवडते सल्लिबोटि, नॉन्व्हेज धन्साक आणि लगननु कस्टर्ड. मेनु कार्डवर chinese पदार्थ्ही आहेत पण ते बहुतेक काळाची गरज म्हणुन.


Ajai
Thursday, October 25, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वडापाव म्हणजे मुंबईचे पेटन्टेड फ़ूड. गल्लोगल्लि मिळते तरिही मला त्यातल्या त्यात जास्त आवडलेले joints
१. आशोक वडापाव्- किर्ती कॉलेज़ जवळ्- त्याची चटणी म्हणजे सही..
२. कुंजविहार ठाणे- मी स्वतः कधि इथे गेलो नाहि पण ठाण्याहुन आमचा येक सहकारि बर्‍याचदा पार्सल घेऊन यायचा. (true jumbo size and taste) बरोबर हिरवी मिर्चि.
३. श्रीकृष्ण वडा- छबिलदास गल्लि दादर स्टेशन जवळ्- नुसता वडा no पाव. आणी तळलेली मिराची- भार्पुर राई घालतात पण टेस्ट चांगलि. bombay नावाचं येक magazine यायच त्यानी यावर cover story केली होती.
४. शिवाजी पार्क्- रवि स्टॉल मागे- इथल्या वडा पाव पेक्षा भजिपाव चांगला.
५.मिठिबाइ कॉलेज समोर्- वडावाप पेक्षा क्राऊड जास्त चान्गले :-)
--


Ajai
Thursday, October 25, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईतल्या रात्रि उशिरा पोट भरण्याच्या जागा-
रात्रि १ नंतर बहुतेक रोडसाईड स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्स बंद झाल्यावर पोट्पुजेची काहि ठिकाणे
१.भगवती पावभाजी- तवा पुलाव, कांदिवली (w) swimming pool च्या बाजुचि गल्लि (राम गल्लि)
२. अंधेरि स्टेशन (w) समोरची गल्ली. भुर्जि आणी तस्तम प्रकार
३. अमर ज्युस सेंटर्- कुपर ईस्पितळा जवळ.
४. दिल्ली दरबार्- कामठी पुरा- रेड लाईट एरिआ असला तरी बिर्यानी आणि भेजा साठी अवश्य जायला हवे.


Chandya
Thursday, October 25, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मांसाहार
दत्तगुरु बोर्डिंग लालबाग
सायबीण दादर सेना भवन जवळ
गोमांतक दादर शिवाजी मंदिर समोर
एक वरळीला सेंचुरी बाजार जवळ, नाव विसरलो.

रगडा पटिस
जयंत चिंचपोकळी, गणेश सिनेमागृहाशेजारी

बटाटे वडे आणि पियुष
लाडुसम्राट लालबाग
श्रीकृष्ण दादर छबिलदास गल्ली

लस्सी
अगरवाल डेअरी परळ

बंगाली मिठाई
गौरीशंकर छितरमल परळ नाका

ईडली वडा सांबार
मणी रुईया कॉलेज समोर






Monakshi
Thursday, October 25, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या कुंजविहारची ब्रॅंच बांद्रा (प). स्टेशनच्या समोर उघडली आहे.

Manuswini
Thursday, October 25, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खाण्याच्या जागा वा वा...
हे घ्या माझ्याकडून,
addition होत राहील एकेक आठवेल तसे.

गिरगाव :
प्रकाश चे पियुष,

दादर : (हे एक खवेय्यांचे ठीकाण आहे)
श्रीकृष्ण बटाटा वडा,
कामतचा southindian dishes
मधुरा चे महाराष्ट्रीयन फ़ूड,(वडे, भजी; आता नेमके सगळे सांगता येत नाही, शुद्ध शाकाहारी थाळी),
दत्तात्रेय ( near 92 busdepo ind adar ) त्याचा साबुदाणा वडा आणखी चांगला वाटायचा,
गोमंतक.

पार्ले :
गजाली(आता खराब झाले, april 2007 मध्ये गेले तर ठीक वाटले.)

चर्चगेट :
महेश
विठ्ठल चे बरेचसे आयटेम.
पाव भाजी(खाऊगल्ली),

बान्द्रा :
फ़्रॅन्कीज on linking road ,
linking road ची मटका कुल्फ़ी,
cakes n cookies bakery near बान्द्रा डेपो(ह्याच्याकडचा cookies मला भारी आवडत.


माटुंगा :
महाभोज south Indian थाळी मस्तच,
नायक नीयर माटुंगा Station ,
रुइया जवळचा मणी,
आता नावच आठवत नाही ठिकाणांची यार,

चेंबुर station :

Grand Central ,
वैशाली,
सद्गुरु juice center ,
दुसरे एक manglorean fodo साठी पसिद्ध ocena काहीतरी होते,


Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आता नावच आठवत नाही ठिकाणांची यार
वा, काय नाव आहे ठिकाणाच. एकदा बघायला पाहीजे :-)

Asami
Thursday, October 25, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१.भगवती पावभाजी- तवा पुलाव, कांदिवली (w) >> काय साला आठवणी काढतोयस

Ajai
Friday, October 26, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chandya-वरळिला मस्त्याहारसाठि ३-४ थिकाण चान्गलि आहेत्- सेन्चुरि जवळ म्हणशिल तर आदर्श नगर च्या मंडईत येक आहे. but best in that area - भारत बोर्डिंग्- वरळि नाका
बाकिचि माझी आवडती sea food restaurants दहिसर ते चर्चगेट.
१. कोकणरत्न्- दहिसर चेक नाक्या जवळ
२.पंगत्- nancy colony - approach from गोकुळांद हॉटेल turn किंवा नशनल पार्क कडुन.
३.मालवणि कालवण्- ऑर्लेम्- मलाड्-सुंदर लेन्- मलाड लिन्क रोड वरुन HSBC ATM चि गल्ली
४. हायवे गोमांतक्- म्हाडा ऑफ़िस जवळ वांद्रे E
५.सायबा- वांद्रे w
६.फ्रेश क्याच्- शितलादेवी- माहिम- (भंडार गल्लि समोरच्या गल्लिच्या कोपर्‍यावर जो रस्ता नश्नल हॉस्पिटल कडे जातो)
७. गोवा पोर्तुगिजा- माहिम close to maahim post office
८.सिंधुदुर्ग्-दादर
९.जय हिन्द्- परेल बस डेपो जवळ्- there is another one opposite kamala mills -parel but not the original
१० गजाली- पार्ले, अन्धेरि midc आणि परेल्- high street फिनिक्स मिल
११.महेश लंच होम्- चर्चगेट आणि जुहु.


Manya2804
Friday, October 26, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरगाव :
कोना - भाजणीचे थालिपीठ
ताराबाग - भेळ, रगडा पॅटीस

दादर :
प्रकाश (सेनाभवन जवळ) - साबुदाणा वडा

सांताक्रूझ :
गुलिस्तान ( S.V.Road ) - मोगलाई जेवण

पार्ले :
दर्या (स्टेशन जवळ) - मालवणी जेवण
मालवणी आस्वाद (भूता हायस्कूल जवळ) - मालवणी जेवण
रसोई (जुन्या मैलूच्या वर) - गुजराथी थाळी
सम्राट वडापाव (रसोईच्या समोर) - वडापाव
स्वाद (ईस्टन रेडीओ च्या मागे) - गुजराथी थाळी

अंधेरी :
कॅफे अल्फा - बिर्‍याणी, बटर चिकन
उत्तम दा धाबा ( SEEPZ जवळ) - सर्व प्रकरचे typical पंजाबी पदार्थ



Ajai
Friday, October 26, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manyaa2804- uttam da dhabaa is more close to marol military road than seepz from Marol fire station

Shonoo
Friday, October 26, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालाड चे मालवण कालवण एकदम मस्त आहे. आम्ही तिथे गेलो होतो- चार जोडपी अन २ ते दहा वर्षे वयाची आठ पक्की मासेखाऊ मुलं. त्यांनी मुलांकरता कमी तिखट आमटी अन तळलेले मासे करून दिले. सुरमई, बोम्बील व OverDose केलंय मुलांनी त्यादिवशी.

कोलडोंगरीला क्रिडा संकुलाच्या जवळ पण एक छान मालवणी रेस्टॉरन्ट आहे. त्यांच्या तांदळाच्या भाकर्‍या अप्रतिम.

विवा पश्चिम पण मला आवडलं होतं.
आता येव्हडंच पुरे


Manuswini
Friday, October 26, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय,
तुझे ३ ते ८ ला yes, yes , नावच आठवत न्हवती.
when it comes to eating , यार आपला भारत देशच.

इथे काय मजा नाही. कधी मला रस्सेदार कालवण मिळाले नाही बांगड्याचे नी मऊ तांदूळ भाकरी. लाईफ़ मे दम नाही जर हे खायला मिळत नसेल तर :-).

तळलेला बांगडा, त्याचेच कालवण, भाकरी, कुरकुरीत जोडीला बोंबील, लाईफ़ बन गयी उस दीन.

'कर्ली' मासा कुणी खाल्ला आहे काय?
सायबात त्याचे सार मिळायचे. अतीशय काटेरी तरी आम्ही लहानपणी खायचो. काटा गळ्याला ना लागता. :-)



Apurv
Friday, October 26, 2007 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, पंगत मध्ये काही वर्षांपुर्वी गेलो होतो...फार तिखट होते (उसगावातून आल्याच परिणाम असेल ).
यादी मध्ये दहिसरचे नाव पाहून छान वाटलं... दहिसर पश्चिमेला एक चायनीज चे छान restaurante होते... आता नाव आठवत नाही...
I miss Indian chinese food.


Ajai
Saturday, October 27, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>I miss Indian chinese food >>
खरय.. खर्‍या चायनीज फ़ूड मधे तो दम नाही. खर म्हणजे चायनीज फ़ूड ची चव चायना मधे ही भागा प्रामाणे बदलत असावी. शांघाइ मधे खाल्लेले चायनीज थोड्फ़ार खाण्यासारखे होते.पण तीकडुन गोन्झावला चव वेगळी here u have many Indian restaurants aanI as ususal tyaanchi naav taj, mehafil,haveli ashisch aahet , झान्शान्ग this is industrial district अशा आतल्या भागात खाण्याचे खुप हाल होतात. जे खाले त्याचे वर्णन केले तर लोक चायनिज खायचे सोडुन देतील :-) इथेही येक indian restaurant आहे ज्याचे नाव आहे खलनायक्-खर म्हण्जे ते पाकिस्तानी आहे
Hongkong चे चायनीज आणि सी फ़ुड त्यामानाने खुप खाणेबल, मला विशेषत prawns च्या डिशेस आवडतात त्यांच्या.
back to Mumbai- for authentic chinese food - taste close to what u get in Hongkong - फ्लोरा- वरळि सीफेस कडे जाणार्‍या रस्त्यावर. अर्थात बरच महाग आहे other overhyped chinese speciality restaurant - mainland china- saakinaka परत परत जाव असे काहि नाही.


Princess
Saturday, October 27, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकल किचन्- मालाड, लिंक रोड
सत्कार गोरेगांव पुर्व
स्पाईस गोरेगांव पश्चिम
चायना गार्डन क्रॉस रोड्स
नुरानी- हिरा पन्नाच्या समोर, हाजी अली
महेश लंच होम, जुहु- माझे खुप आवडते रेस्टॉरंट.





Itgirl
Saturday, October 27, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..'कर्ली' मासा कुणी खाल्ला आहे काय? ..

मी :-) गळ्याला काटा न लागता, सेम पिंच :-)


Panna
Saturday, October 27, 2007 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्ली मासा म्हणजेच करदी ( करंदी) का?

ठाण्यात गडकरी रंगायतन चे जे हॉटेल होते तिकडे नॉन-व्हेज चांगलं मिळायचं! आता चालू आहे की बंद पडलय??

इंडो-चायनीज च्या लिस्ट मधे अजुन एक... दादर शिवाजी पार्क चे जिप्सि. त्याच्याच बाजुला पुर्वी एक गाडीवर वेगवेगळे कबाब मिळायचे. शिग कबाब, पहाडी कबाब, तंदूरी कबाब.... (तोंडाला पाणी सुटलेला चेहरा)


Manuswini
Saturday, October 27, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो कर्ली म्हणजे करंदी... खुप चविष्ट कालवण होते ह्याचे.

Ajai
Monday, October 29, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bombay House च्या पाठिमागच्या भागात असलेले पुर्णिमा Restaurant हे मला थोडेसे Bangalore च्या food joints ची आठवण करुन देते. कुपन घ्या आणि उभ्या उभ्या खा. (जागा मिळणे कठीण). शुद्ध शकाहारी working lunch . अगदीच निरुपाय असेल तरच मी शाकाहारी असतो पण fort भागात असलो तर बिसेबेले भात ( ते लोक त्याचा उच्चार बाथ असा करतात) खाण्यासाठी जातो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators