|
Meenu
| |
| Monday, November 05, 2007 - 3:18 pm: |
| 
|
एक खूप सुंदर अनुभव मी कालच घेतला तो म्हणजे paragliding करण्याचा. पक्षी होऊन उडावं असं कधी ना कधी वाटलेलंच असतं की प्रत्येकाला. पण असं कधी प्रत्यक्षात येईल याचा मात्र अंदाज नव्हता. अर्थात याचं सगळं श्रेय आमच्या कंपनीला आणि HR ला. पुण्याच्या अगदी जवळच कामशेतला आम्ही गेलो होतो. www.templepilots.com यांच्याकडे सर्व व्यवस्था होती. जाताना dumb शेराज खेळण्यात मस्त वेळ गेला. तिथे लवकर पोचलो. जागा अतिशय सुंदर होती untouched . मस्त आकाशाखाली लोळण्याची इच्छा पूर्ण झाली. आपण, झाडांमधुन येणारा तो किर्र आवाज, आणि वार्याचा आवाज बाकी निरव शांतता. वार्याचा आणि किड्यांचा आवाज जणू त्या शांततेचाच आवाज असावा तसा. तिथेच जेवण उरकुन वारा कमी होण्याची वाट पहात बसलो. मग साधारण साडेतीनला वार्याचा वेग योग्य वाटला आणि मग एकेक जण glider घेऊन उतरायला लागले. पहील्यांदाच gliding करणारे आम्ही सगळे आतुन घाबरलो होतो पण तरीही इतरांचं gliding पहायला मस्त मजा येत होती. एकावेळी तर तिथे सोळा लोक उडत होते खरं म्हणजे जास्तच कारण पहील्यांदाच उडणार्यांबरोबर पायलटही होते. अखेर ती वेळ आली माझी उडायची. हेल्मेट, सॅक सगळं काही लावून झालं. आता मी, माझ्याबरोबर येणारा पायलट आणि मदत करणारा अजुन एक जण डोंगराच्या अगदी टोकाला उभे होतो. खाली किती खोल आहे हे पाहून अजूनच भिती वाटली. मदत करणारा सर्व तयारी झाल्यावर मला म्हणाला "Happy Flying!!" "Hey!! am afraid.." मी " अरे काही नाही होणार " अगदी आत्मविश्वासानी, जो त्याच्या डोळ्यात, आवाजात आणि कृतीत दिसत होता. ओह !! पॅराशूट वार्याच्या जोरानी ओढलं जायला लागलं आणि त्याबरोबरच काही विचार करण्याआधी आम्ही दोघेही (मी आणि बरोबरचा पायलट). पॅराशूट वर उचललं गेलं. बास त्याक्षणी वाटलं की संपलं आता पडणार मी, तो पायलट ते पॅराशूट सगळं काही खोल खोल दरीत .. हे ! हे ! असं काहीच झालं नाही. पायलटनी आधी सांगितल्याप्रमाणे कृती केल्यावर मी मस्त बसले होते त्या सॅकच्या खुर्चीत. आता आमच्या दोघांच्या सॅक एकामागे एक ठेवलेल्या खुर्चीसारख्या झाल्या ( same like single cane chair swing ). मग मी पुन्हा एकदा धीर करुन खाली बघितलं .. अप्रतिम !! डोंगरावर बसलेले माझे मित्र मैत्रिणी आता लहान लहान खेळण्यांसारखे दिसत होते. खाली छोटी छोटी आखीव रेखीव शेतं. तिकडे दिसणार्या त्या मुंबई पुणे मार्गावरच्या गाड्या, त्या पण छोट्या छोट्या .. हवेत असताना आपण हलतोय याची जराही जाणीव होत नव्हती. फक्त वळतानाच थोडीफार हालचाल जाणवायची. बाकी उलटेपालटे झोके नको हे मी आधीच सांगीतलं होतं त्यामुळे मस्त stable ride मग थोड्या वेळानी धीर करुन मी दोन्ही हात सोडुन मस्तपैकी पंखासारखे फैलावले. हम्म !! what a feeling of freedom!! अगदी भरभरुन मोकळा श्वास घेतला जसा काही कधी श्वास घेतलाच नाहीये मी. पुन्हा एकदा जमिनीकडे परतले तेव्हा आकाशाकडे त्या दरीकडे बघितलं, डोळे भरुन, अजुनही विश्वास बसत नव्हता की मी तिथे थोड्यावेळापूर्वी मुक्त विहार करत होते. बस्स ! तशीच हवेत उडत उडत घरी आले एक अप्रतिम अनुभव मनात घोळवत घोळवत. तुम्हीही जरुर हा अनुभव घ्या. आकाशात मुक्त मोकळा श्वास घ्या आणि तुमचे सहप्रवासी असु देत सुंदर सुंदर पक्षी, निळेशार ढग, सळसळणारा वारा ...!!
|
Itgirl
| |
| Monday, November 05, 2007 - 3:27 pm: |
| 
|
सुरेखच लिहिलय एकदा तरी हा अनुभव घ्यायला आवडेल पण हे सगळ खरच घडलय ना??
|
अरे वा सहीच. आता देशात आल्यावर तिकडे जावे लागनार. मला परासेलींग ( ग्लायडींग सारखेच असते पण बोटीला दोर लावलेला असतो) फार आवडत. मी समर मध्ये निदान दोन चारदा करुन घेतो. पण एकदा मात्र गंमत झाली. मी कि वेस्ट ला गेलो होतो तेव्हा तिथले वातावरन एक दोन दिवस बिघडले होते जाम वार चालु होत अन आदल्या दिवशी एक माणुस परासेलींग करताना त्याचा बोटीचा दोर तुटला व he was gone with the wind . मी तिथे गेल्यावर त्यांनी कल्पना दिली पण माझी तयारी होती. वर जायला काही प्रॉब्लेम झाला नाही पण एकदा वर गेल्यावर वार्याचा जोरा खुप वाढला व बोट हेलकावे खाउ लागली. (म्हणजे पराशुटच बोटीला इकडे तिकडे करु लागले) पण नावाडीही हार माननारा न्हवता त्याने बोट ईकडे तिकडे करत मला २० मिनीट वर ठेवले पण नंतरच्या १० मिनीटात माझी वर फ्या फ्या उडाली होती. खाली येताना मात्र माझा महागाचा चश्मा समुद्राधीन झाला. आता पुढच्या समर मध्ये विमानातुन खाली उडी मारायची आहे. सोबत एक कसलेला डाइव्हर असतो आपण फक्त त्या सोबत १२००० फुटांवरुन खाली पडायचे.
|
Aktta
| |
| Monday, November 05, 2007 - 4:25 pm: |
| 
|
ह्ह्ह्म्म्म्म.... लींक टाकल्या बद्ल धन्यवाद... एकटा.....
|
kedar, try bunji jumping too. its awesome fun.
|
Lampan
| |
| Monday, November 05, 2007 - 4:54 pm: |
| 
|
सही !!!! जाम आवडलय मला हे .. बघु कधी chance मिळतो ते ...
|
सव्या हो अजुन ट्राय केले नाही पण करायचे आहे.
|
Akhi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 4:20 am: |
| 
|
wow काय मस्त थरारक अनुभव! आता तर करुन बघायलाच हव!
|
Swa_26
| |
| Tuesday, November 06, 2007 - 4:54 am: |
| 
|
वॉव मीनु, सहीच!! एकदा घ्यायलाच हवा हा अनुभव!!
|
Meenu
| |
| Tuesday, November 06, 2007 - 5:14 am: |
| 
|
आयटे अगदी खरं गं फोटो आणि थोडं recording आहे पण size limit मुळे टाकले नाहीयेत.
|
Kandapohe
| |
| Tuesday, November 06, 2007 - 5:34 am: |
| 
|
मीनू तुझा अनुभव वाचुन मला एकदम आम्ही केलेल्या पॅरासेलिंगची आठवण झाली. जपानवरून परत येताना आम्ही ४ दिवस मलेशियामधे थांबलो होतो व लांगकावीला गेलो होतो. तिथे पॅरासेलिंग उपलब्ध होते. यात तुम्हाला पॅराशूट लावले जाते व ते एका बोटीला जोडून ती दोरी जोरात ओढतात. सुरुवातीला तुम्हाला समजावून देतात की वर जाताना काय करायचे आहे व खाली येताना काय केलेत की खाली याल. कारण यात तुमच्या बरोबर कुणीही येत नाही. बाबाऊ नावाच्या त्या मलेशियन माणसाने मला सगळ्या सेफ्टी इंस्ट्रकशन्स दिल्या. त्याला थोडीफार हींदी गाणी येत होती ती म्हणत त्याने माझे टेंशन कमी केले. खाली येताना त्याने लाल झेंडा दाखवला की कुठली दोरी ओढायची हे सांगताना तो सारखे 'खीचो खीचो' करत होता. पॅराशूटच्या एका बाजुला बांधलेली दोरी खाली ओढली की आतमधे हवा जाऊन ते खाली येते. आपल्याला जर ती ओढताच आली नाही तर? असा विचार मनात येतो न येतो तोच त्याने बी रेडी सांगीतले. सर्व तायारी झाली आणी बोटीने मला ओढायला सुरुवात केली. एका क्षाणात मागचे पॅराशूट फुलले व माझे पाय वर गेले. वर गेल्यावर मात्र भिती एकदम कमी झाली व मी मस्तपैकी खालचा समुद्र, पिटुकली माणसे, नेहा व मुले बघत होतो. समुद्रातील असंख्य बोटी सुंदर दिसत होत्या. आता खाली उतरुच नये असे वाटत असतानाच बाबाऊने झेंडा दाखवला. मी दोरी खेचायला हात वर केला आणी दोरी खेचायचा प्रयत्न केला. पॅराशूट हवेने तरारून फुगले होते त्यामुळे दोरी ओढणे सोप्पे नाही हे मला कळले. पण जोर लगाके प्रयत्नपूर्वक मी ती ओढली आणी सुळुककन जसा वर गेलो होतो तसाच खाली आलो. वर जाताना काही जाणवले नाही पण खाली उतरताना मात्र बाबाऊच्या सेफटी इंस्ट्रकशन्स कामी आल्या व मी सुखरूप खाली आलो. मी परत आल्यावर घाई घाईतच नेहाला तु जाच असा आग्रह केला व तिचा विचार बदलायच्या आत तिला पॅराशूट चढवायला बाबाऊला सांगीतले. तिला काही कळायच्या आतच भूर्र्अकन वर गेली व थोड्या वेळाने खाली आली. एक थरारक पण सुखावह अनुभव असेच याचे वर्णन करता येईल. नेहाने थोडी कटकट (भिती वाटली म्हणून) व खुप सारे धन्यवाद दिले हा अनुभव दिल्याबद्दल. मी जर तिला तत्परतेने पॅराशूट चढवले नसते तर कदाचीत तिचा विचार बदलला असता. 
|
Manjud
| |
| Tuesday, November 06, 2007 - 5:37 am: |
| 
|
हां, म्हणजे कालचं ते 'आज कल पॉंव ज़मी पर नही पडते मेरे' ह्याच्याबद्दल होतं तर....... सहीच अनुभव घेतलास मीनू तू... flying control पायलटच्या हातात असतो का? आणि खाली उतरताना कसं वाटतं ते सांग ना..... आपण पडत वगैरे नाही ना?
|
Itgirl
| |
| Tuesday, November 06, 2007 - 5:43 am: |
| 
|
मीनू, फ़ोटो तरी टाक ग इथे केपी, मस्तच
|
Meenu
| |
| Tuesday, November 06, 2007 - 6:37 am: |
| 
|
मंजु पायलट दिशा control करु शकतो speed नाही. पडत वगैरे नाही. But after all it is an adventure sport, right ? पण ते पूर्ण काळजी घेतात. helmet, emergency landing etc. आयटे टाकते गं फोटो जरा वेळानी.
|
Monakshi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 7:37 am: |
| 
|
मीनू, सहीच गं. मला त्या याराना पिक्चरमधल्या अमिताभ आणि अमजद च्या पॅराग्लायडिंगची आठवण झाली. केपी, तुमचा अनुभव पण मस्तच. फोटो टाकारे प्लीज असतील तर.
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:13 am: |
| 
|
मीनु मस्त अनुभव. फोटो हवेतच.
|
Zakasrao
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:42 am: |
| 
|
सहीच. तरीच काल "मेरे पाव जमीं पर नही म्हणत होतीस केपी तुझा अनुभव पण मस्त आहे
|
Kandapohe
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:56 am: |
| 
|
मेरे पाव जमीं पर नही म्हणत होतीस >>> झर्या ते वेगळ्या कारणाकरता होते. हल्ली पाव आणायला पिशवी नेते ती बरोबर. मोना एक टाकलाय नविन मायबोलीवर. सोबत बाबाऊ पण आहे. 
|
Meenu
| |
| Tuesday, November 06, 2007 - 9:25 am: |
| 
|
tandem flight मधे दोन लोक असे बसतात. 
|
Meenu
| |
| Tuesday, November 06, 2007 - 9:27 am: |
| 
|
ही एक मस्त formation

|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|