|
एका manufacturing plant मधे नव्यानीच संगणक बसवले जात होते. एका मॅनेजरने त्याच्या खोलीत ठेवलेला संगणक पाहिला आणि संगणक बसवणार्या माणसाला सांगितलं... "मला असा रॅंडम अक्षरांचा कीबोर्ड नको आहे. alphabetically A,B,C,D एका रांगेत असलेला कीबोर्ड बसव माझ्या खोलीत.
|
Zakasrao
| |
| Saturday, October 27, 2007 - 6:29 am: |
| 
|
अफ़लातुन आहेत किस्से सगळेच. हा असाच एक किस्सा. एक ट्रेनी मुलगा जॉइन झाल होता. त्याने एक प्रिंट सोडली होती. काहितरी एरर आल्याने ती प्रिंट आली नाही. त्याला कॉम्प बद्दल माहिती नव्हते. त्याने येवुन त्याच्या एका इब्लिस सिनियरला विचारले की अस झाल. हे का? त्यावर त्या इब्लिस चे उत्तर बघा त्याची खेचणासाठीचे. अरे त्याच्या मागे एक केबल असते जाड. तिच्या टोकाला एक पिन असते. ती काढ आणि त्यात फ़ुक. कारण कधी कधी प्रिंट त्यात अडकते. आणि तो मुलगा तसच करायला गेला
|
माझ्या मैत्रिणीच्या बाबतीतला हा किस्सा ती एका इन्स्टिट्यूट मध्ये सन्गणक शिकवत असे.. महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेसाठी एकदा जिल्हापरिषदेच्या लोकान्ची बॅच होती तिथे एकदा एका माणसाने हिला विचारले "मॅडम अहो ते पेन्ट मधले रन्ग वापरले तर कमी नाही का होत ? " ही पठ्ठी पण हुशार ही उत्तरली "अहो नाही कलर टीव्ही चे रन्ग कितीही टीव्ही लावला तरी संपत नाहीत किनै तसेच हे !"

|
Itgirl
| |
| Monday, October 29, 2007 - 3:55 am: |
| 
|
...आता साबीर भाटीयाकडे एवढा पैसा (पक्षी $ ) असूनही त्याची कुठे ऐश झाली..... स्लार्टी,
|
Swa_26
| |
| Monday, October 29, 2007 - 10:14 am: |
| 
|
आयटे, अगो तुला खय दिसला भाटिया हयसर???? का हल्ली दिसायला लागलाय जिकडे तिकडे??? 
|
Itgirl
| |
| Monday, October 29, 2007 - 10:26 am: |
| 
|
स्वा, तू नीट नाय वाचूक, फ़र्नीन डोळे पकडलेले काय गो? ह्या बघ.. Slarti Friday, October 26, 2007 - 4:11 pm: आता साबीर भाटीयाकडे एवढा पैसा (पक्षी $ ) असूनही त्याची कुठे ऐश झाली... असो. ते जाऊ दे. तू पुढचा संगणक किस्सा टाक...
|
Rajasee
| |
| Monday, October 29, 2007 - 10:30 am: |
| 
|
he sabeer bhatia che $$ kaay prakaran aahe??? pratyek bb var tyacha ullekh yetoy mhanoon niragas shanka vicharte aahe ....
|
Zakki
| |
| Monday, October 29, 2007 - 3:46 pm: |
| 
|
आता ही अनेऽक अनेऽक वर्षांपूर्वीची सत्य घटना. एकदा थेट व्हाईस प्रेसिडेंटच्या सेक्रेटरीला तिने सेव्ह केलेली फाईल सापडत नव्हती. आता हा प्रकार पूर्वी पण अनेकदा घडला होता. बिचार्या म्हातार्या बाईला आठवत नसे आपण कुठल्या डिरेक्टरीत किंवा फ्लॉपीवर सेव्ह केली. मग शोधाशोध करून ती फाईल सापडवायची! या वेळी मात्र खुद्द व्हाईस प्रेसिडेंटने मलाच बोलावले नि सांगितले की तू हिचा काँप्युटरच बदलून टाक कारण हे असे बरेचदा होते. मग मी गेलो नि सेक्रेटरीला म्हंटले तू फाईल कुठे सेव्ह केलीस? ती म्हणाली या निळ्या फ्लॉपिवर. अर्थातच् त्या फ्लॉपीत ती फाईल नव्हती! पण तिथे दुसरी निळि फ्लॉपी होती. आपली लाज वाचवायला तिने सांगीतले की मी याच फ्लॉपीवर सेव्ह केली, दुसरी फ्लॉपी Confidential आहे, मी तुला त्या फ्लॉपीला हात लावू देणार नाही. मी मोठ्या मुश्किलीने त्या व्हाईस प्रेसिडेंटला नि म्हातारीला समजावून सांगितले की नुसती डिरेक्टरी चेक केल्याने मला इतर फाईल्स मधे काय लिहीले आहे ते कळणार नाही हो! नि मी सुद्धा कं च्या Confidentiality कायद्याने बद्ध आहे. मग काय, अर्थातच फाइल त्या confidential फ्लॉपिवर होती. मग व्हाईस प्रेसिडेंट म्हणाला की या काँप्युटरचे सगळे एलेक्ट्रोमॅग्नेटिक असते, कदाचित् दोन फ्लॉपिज जवळ जवळ असल्याने ती फाइल एका फ्लॉपीवरून दुसर्या फ्लॉपीवर 'लीक' झाली असेल. मी बराच समंजस असल्याने म्हंटले 'शक्य आहे'. आता तुम्ही confidential फ्लॉपिज दुसर्या ड्रावरमधे ठेवत जा! 'पोटासाठी माणसाला काहीपण ऐकून घ्यावे लागते, त्यातून हा बाबा तर आमचा डायरेक्ट कश्टमर!'
|
झक्कि कोण होता हा व्हाईस प्रेसिडेंट???
|
Zakki
| |
| Monday, October 29, 2007 - 9:25 pm: |
| 
|
तो एका प्रसिद्ध कॉलेजातून MBA केलेला, अत्यंत मोठ्या कं तील होता. शिवाय त्याचे नातेवाईक कं त बर्याच वरच्या हुद्द्यांवर होते. शिवाय त्याच्या हातात माझे काँट्रॅक्ट रिन्यू करण्याचे सर्वस्वी अधिकार होते. त्यामुळे तो नि:संशय अत्यंत विद्वान असणार याबद्दल मला शंका नव्हती. तो म्हणेल ते सगळे खरेच! त्याच्या शहाणपणाचा पुरावा म्हणजे त्याने माझे काँट्रॅक्ट रिन्यू केले. नाहीतर मी त्याच्या बॉसला हा किस्सा कळवला असता हे त्याला माहित होते.
|
Chyayla
| |
| Monday, October 29, 2007 - 11:38 pm: |
| 
|
या काँप्युटरचे सगळे एलेक्ट्रोमॅग्नेटिक असते, कदाचित् दोन फ्लॉपिज जवळ जवळ असल्याने ती फाइल एका फ्लॉपीवरून दुसर्या फ्लॉपीवर 'लीक' झाली असेल फ़ारच भारी किस्से आहेत एके एकाचे.. तुम्हाला कोणी "कॉम्पुटर स्वच्छ ठेवत जा धुळ असली की त्यात व्हायरस जातो" असे सांगणारे महाभाग भेटलाय का? माझ्या अनुभवामधे एकदा ईन्स्पेक्शन साठी गेलो असताना तहसिलदार साहेब त्याच्या ऑपरेटरला वरील टेक्निकल उपदेश देत होते... वरुन मलाच विचारले का हो बरोबर ना? झक्की प्रमाणे मी ही होय म्हटले, म्हटल त्या निमित्याने का होईना ते स्वच्छता तर ठेवतील.
|
Maanus
| |
| Monday, October 29, 2007 - 11:49 pm: |
| 
|
कंपुटर न येनार्या लोकांना एक वाईट सवय असते. My Documents किंवा desktop वर passwords.txt म्हणजे आ बैल मुझे मार.
|
Maanus
| |
| Tuesday, October 30, 2007 - 12:10 am: |
| 
|
हम्म्म... फक्त Al Gore harvard मधे होते... but he did not receive masters degree... neither Bush Sr., he also has batchelors degree. anyway al gore has major share in Apple. and he recently received nobel prize.
|
Gsumit
| |
| Tuesday, October 30, 2007 - 3:11 am: |
| 
|
आमच्या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या सरांचे संगणकाचे ज्ञान अतिशय अगाध होते... थर्ड इयरला त्यांच्या प्रक्टिकलला आम्हाला संगणकावर आकृत्या बनवाव्या लागायच्या, सगळी डायग्राम कॉलेजमधे व्हायची नाही, म्हणुन आम्ही कॉपी करुन होस्टेलमधे नेउन बनवायचो. आम्हाला एकदा कॉपी करतानी पाहुन म्हणतात, "अरे तुम्ही सगळे कॉपि करुन नेताल तर माझ्या मशिनवर डाटा कसकाय रहाणार?" त्याच सरांचा अजुन एक किस्सा- त्याच वर्षी आमच्या कॉलेजमधे NBAची कमिटी आली होती कॉलेजचे ग्रेडिंग करायला, तर यांनी शिपायाला सांगुन ठेवले ते लोक लबकडे येतानी दिसले तर मला सांग, ते लोक जेव्हा येतायेत असे मामांनी सरांना सांगीतले तेव्हा हे एका कॉम्प्युटरकडे बघत जोराजोरात टाइप करत बसले... समोर फक्त डेस्कटॉप वॉलपेपर होता...
|
Slarti
| |
| Tuesday, October 30, 2007 - 3:55 am: |
| 
|
>>> हम्म्म... फक्त Al Gore harvard मधे होते... but he did not receive masters degree... neither Bush Sr., he also has batchelors degree. anyway al gore has major share in Apple. and he recently received nobel prize. माणसा, भलताच विनोदी बुवा तू...
|
माणूस, अरे झक्की कंपनीच्या VP बद्दल बोलताहेत.. आणि तू अमेरिकेच्या... Dick तिथे असता तर म्हणाला असता, 'इराकी लोकांची चाल आहे ही (चुकीच्या Disk मध्ये File save करणे).....
|
Amruta
| |
| Tuesday, October 30, 2007 - 2:42 pm: |
| 
|
हिंदी सिनेमांमधे पण एक से एक computer expert दाखवतात. एकदा एक सिनेमा पहात असतना नाव आठवत नाही आता पण त्यातली हिरोइन comp वर काहितरी भयंकर महत्वाच करत असते आणि screen दाखवला तर त्यावर काय असाव? bad command or file name bad command or file name bad command or file name bad command or file name bad command or file name
|
Asami
| |
| Tuesday, October 30, 2007 - 5:37 pm: |
| 
|
Dick तिथे असता तर म्हणाला असता, >> आजकल त्याला dick नाहि तर darth wader असे म्हणतात
|
विनय प्रथम माणुस काय म्हणायचा प्रयत्न करतोय हे मलाही उमजले नव्हते. एक जाहिरात असाच अडाणीपणा दर्शवणारि होती. त्यातले वाक्य होते -'कम्प्युटर क्यों??टाईप राईटर क्यों नही???' अरे काय??कम्प्युटर काय फ़क्त टाईपिंगच काम करतो काय??
|
Apurv
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:13 pm: |
| 
|
बरेच जण मी बघीतले जे संगणक शिकण्या आधी टायपिंग चे क्लासेस करत संगणक शिकायला सोप्पे व्हावे म्हणून.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|