Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 31, 2007

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Mi eakata /eakati » Archive through October 31, 2007 « Previous Next »

Vegayan
Wednesday, October 31, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस कधीतरी होत की सगळे सोबत असूनही एकट वाटत राहत...मि ह्या सगळ्य.ऽअना आता नकोय ...खूप अ.धरायला होत.. अस होत तुम्हालाहि कधीतरी ?

Sakhi_d
Wednesday, October 31, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो होत ना.....पण असे झाले कि काय करायचे हे अजुन कोणीच सांगितले नाहि. तुला नक्कि काय अपेक्षित आहे ह्यावरचा उपाय कि अजुन काहि??

Vegayan
Wednesday, October 31, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सग्ळ्यांचे अनुभव आणी त्यातुन काढलेले मार्ग हवे आहेत

Hkumar
Wednesday, October 31, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकटेपणावरचा एक उपाय म्हणजे कुठलातरी छंद लावून घेणे व त्यात स्वतःला बुडवून घेणे. तो छंद व्यसनाप्रमाणे जोपासणे.

Haasri
Wednesday, October 31, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuni tari asava asa vaatate aani apaple kuni nahi aaapan ekadte aawahot ase vatate man khop udas hote apale jagane vayarth aahe kivan sagale swarthch pahata ase vatate

Mrdmahesh
Wednesday, October 31, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही कधी कधी भयंकर एकटेपणा जाणवतो.. अशावेळी मी TV बघतो, पुस्तकं वाचतो ( mostly आध्यात्मिक), गाणी ऐकतो, कोणकोणत्या मित्रांना बर्‍याच दिवसांपासून आपण फोन केलेला नाही हे पाहून त्यांना फोन करतो, कॅमेरा घेऊन वेगवेगळ्या सेटिंग करून एकाच वस्तूचे फोटो काढत बसतो, किंवा त्याचे मॅन्युअल वाचत बसतो. यातूनच पुष्कळवेळा मी एकटेपणाची भावना घालवली आहे. कधी कधी तर चक्क जपमाळ घेऊन २ / ३ तास डोळे बंद करून जप करत बसतो. जप केल्यावर काय सुंदर वाटतं म्हणून सांगू.. :-)
असा सगला वेळ घालवल्यावर एकतर एकटेपणाची भावना mostly जातेच किंवा कोणीतरी बोलणारं भेटलेलं असतं.
एकटंच फिरायला जाणं, नाटक, सिनेमाला जाणं तर फार भयानक वाटतं त्याने एकटेपणा जास्तच जाणवलाय मला.


Sakhi_d
Wednesday, October 31, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हे सगळ केल्यावरहि मन रमत नसेल तर???

Haasri
Wednesday, October 31, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी किति हि प्र यत्न केला तरि माज़े मन एकाग्र होत नाहि

Mrdmahesh
Wednesday, October 31, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी,
इतकं सगळं करूनही मन रमत नसेल तर मग आपल्याला नेमकं काय हवंय हे नीट विचार करून पहायलाच हवं आणि त्यासाठी झटून प्रयत्न करायला हवेत. तोच एक मार्ग मला योग्य वाटतो.
हासरी,
मन एकाग्र करणे हे सोपे काम नाही. त्याला शांत मनाची बैठक लागते. मन शांत नसेल तर आपली प्रिय देवता समोर आणून तिचं नामस्मरण करावे.. खूप त्रास होतो सुरुवातीला पण नंतर जमतं..


Badamraja
Wednesday, October 31, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकट असण्याचा सगळ्यात गंभीर परीणाम म्हणजे आपण एकटे असल्यावर आपल्या मनात Negative वीचार जास्त येणे. म्हणुन एकट जरी असल तरी आनंदी कस रहाता येइल हे आपण नेहमी बघीतल पाहीजे.

Mrdmahesh
Wednesday, October 31, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बदाम म्हणतोय ते खरं आहे! जितकं जास्त एकटं एकटं वाटेल मन तितकं जास्त negative विचार करतं.
माझा एकटे पणाचा अनुभव सांगतो:
काही वर्षांपूर्वी मला असंच सगळ्यांत राहूनही एकटं एकटं वाटायचं. नोकरी होती. घरात बोलायला पत्नी होती. छोटा छोकरा होता. TV, music system , पुस्तकं, पैसा सगळं होतं तरी एकटं एकटं वाटायचं.. पत्नी माहेरी जायची तेव्हा तर घर खायला उठायचं.. मन बेचैन असायचं.. या दिवसात मी जेव्हा जेव्हा पूजा करून उठायचो तेव्हा मात्र मन शांत असायचं. तेव्हा मी विचार केला की असं का होतंय.. तेव्हा याचं मूळ माझ्या नोकरीत निघालं.. मला माझ्या मनासारखी नोकरीच मिळत नव्हती. office मधले सहकारी मला मित्रासारखे कधीच वाटले नाहीत (सगळेच अविवाहित होते. त्यामुळे त्यांची जीवनशैलीच वेगळी होती.). मग मनासारखी नोकरी मिळत नसेल तर ती मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल याचा विचार केला आणि एका निर्णयाप्रत येऊन पोचलो. बाजारात जाऊन अधिक ज्ञान देणारी पुस्तकं आणली. ती वाचू लागलो. नेटकॅफेत जाऊन नोकरी शोधून apply करू लागलो. interviews देऊ लागलो. त्यातूनही बरंच ज्ञानार्जन झालं.. शेवटी प्रयत्नांना यश आलं आणि नोकरी मिळाली. आता तर बराच वेळ कामातच जातो. फावल्यावेळात करण्यासारख्या गोष्टींचा हाऽऽ ढीग पडलेला असतो. आणि मूड असेल त्याप्रमाणे त्यातली एक गोष्ट करायला घेतो आणि वेळ छान जातो....


Vegayan
Wednesday, October 31, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत कि हे एकटेपण मुद्दाम येत ,स्वत:ला तपासून बघायाला ,भवीष्याचा नीट विचार करयला , आणी सगळ्यात महत्वाच म्हणजे ह्याच काळात जो साथ देतो,जो वाट दाखवतो तोच खरा मित्र हे समजण्यासाठी.

Mrdmahesh
Wednesday, October 31, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly!! मुद्दाम येतो की नाही माहित नाही पण आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींचा गंभीरपणे विचार करायला लावतं हे एकटेपण..

Sakhi_d
Wednesday, October 31, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि नीट विचार करुन कळले कि आपण खरेच "एकटे" आहोत तर......??

Mrdmahesh
Wednesday, October 31, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि नीट विचार करुन कळले कि आपण खरेच "एकटे" आहोत तर......??>>
तर मग तो एकटेपणा घालवण्यासाठी प्रयत्न करायचे दुसरं काय??

Vegayan
Wednesday, October 31, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला ..सगळ्या प्रतीक्रीयांवरुन वाटतय सगळे 'एकटे' आहेत !!

Zakasrao
Wednesday, October 31, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि नीट विचार करुन कळले कि आपण खरेच "एकटे" आहोत तर......?? >>>>>>>..
जिंदगी आये हो अकेले
जाओगे अकेले
बाकी सगळ भ्रम आहे, मायाजाल आहे.
इथपर्यंत जोवर तुम्ही विचार करत नाही तोवर सगळे प्रश्न.
एकदा हे अंतिम सत्य लक्षात आल की मग प्रशन्च संपतात.
कोनिही हे एकटे येण्याची आणि जाण्याची परिस्थिती बदलु शकत नहि.
मग करायचे काय????????
तर जे आहे ते समाधान मानुन आनंदी जगण्याचा प्रयत्न करायचा.
जे नाहिये ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. जे मिळत नहिये त्याची खंत करत जीवनातले फ़ार क्षण वाया घालवु नयेत.
live life king size जितक मिळत तितक.
हे माझ तत्व आहे. :-)


Vegayan
Wednesday, October 31, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कास बोललात झकासराव !!

Ashwini_k
Wednesday, October 31, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, म्हटलं तर आपण सर्वच एकटे येतो, एकटे जातो (जो मानतो त्याच्या दृष्टीने "तो" प्रत्येक क्षण आपला सखा म्हणून असतोच).

पण एरव्हीही आपण आपल्या अवतीभवतीच्या प्रत्येक वस्तू, व्यक्तीशी कुठल्या ना कुठल्या co-ordinate मध्ये असतोच. तेही नको वाटले तर अनाथ मुले, मुलांनी घराबाहेर काढलेले वृध्द, घरच्यांनी मेंटल हॉस्पिटल मध्ये आणून टाकलेले (तेवढा serious matter नसतानाही) मनोरुग्ण यांच्याकढे पाहीले तर आपली परिस्थिती खूपच चांगली वाटते. जमत असेल तर वेळात वेळ काढून अशांसाठी वेळ द्यावा. कोणालातरी आपली गरज आहे हे जाणवले की एकटेपणा येणार नाही.


Badamraja
Wednesday, October 31, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर बोल्लीस अश्वीनी
कुनाला तरी आपली गरज आहे ही भावनाच एकटेपन घालवण्यासाठी जास्त उपयोगी पडते.
पण जेव्हा आपल्याला ही जाणीव होते की आपली कुणालाच गरज नाही तेव्हा गर्दी मधेही आपण स्वत्:ला अगदी एकटे समजतो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators