|
Manuswini
| |
| Wednesday, October 31, 2007 - 8:06 pm: |
| 
|
अरे यार ह्याच्यावर बरीच चर्चा झालीय आधी, चोथा होईपर्यंत. BB was QLC . बरेच variety of सल्ले मिळतील तिथे, मुळात म्हणजे नावाचा इतका घोळ घातला नीट समजून घेण्याआधी. असो.(मी तक्रार करत नाही नाहीतर ह्याच्यावर एक comment येईल.) म्हणजे बर्याच लोकांनी टवाळी केली BB चे नाव वाचून तर काहींनी 'सुख बोचते' वगैरे शेरे मारले,काहींनी प्रामाणीक सल्ले दिले नी आपले अनुभव शेयर केले आहेत तर Duplicate IDs घेवून इथुन तिथुन BB वर फीरत अन्नुलेखाने मारणे असे नी बरेच पचनी पडणारे, नाही पडणारे सल्ले आहेत त्या B वर. फक्त तुझ्याकडे 'नजर' हवी काय घ्याअय्चे ते ह्यातून . पॉझीटीव घ्यायचे नी करमणूक हवी असेल, एकटेपणा काही काळ घालवायचा असेल तर नी वाचायची तयारी असेल जा भेटा तिथे. नाहीतर सगळेकडे( BB वर) काहीतरी मनाला येईल तसे खरडवत बसायचे, वाटेल ते बाळ शंका कुशंका काढत कुणालाही पिळत बसावे (हा सुद्धा माझा सल्ला नाहीये, this is an observation only ) (आता इथे गर्दी जमण्याची शक्यता नाकारता येत नाही). दिवे घ्या on serious note, you would find something good there
|
Tiu
| |
| Wednesday, October 31, 2007 - 8:43 pm: |
| 
|
म्हणजे बर्याच लोकांनी टवाळी केली BB चे नाव वाचून तर काहींनी 'सुख बोचते' वगैरे शेरे मारले,काहींनी प्रामाणीक सल्ले दिले नी आपले अनुभव शेयर केले आहेत तर Duplicate IDs घेवून इथुन तिथुन BB वर फीरत अन्नुलेखाने मारणे असे नी बरेच पचनी पडणारे, नाही पडणारे सल्ले आहेत त्या B वर. >>> अरे वा...मग वाचायलाच पाहिजे एकदा...एकदम interesting दिसतोय BB ...लिंक मिळेल काय मनु?
|
Vegayan
| |
| Thursday, November 01, 2007 - 4:59 am: |
| 
|
तुझ म्हणण खर अहे manuswini मि हा BB उघडायच्या आधि तो QLC BB बघीतलाच नव्हता पन तुझी post वाचुन बघीतला खरच कहि चान्गल्या post आहेत तिथे. thanks तर LOKS तुम्ही त्या BB वर आपले अनुभव continue करावे ही विनंती
|
Yashwant
| |
| Thursday, November 01, 2007 - 8:36 am: |
| 
|
मला एकटेपना जानवायला लागला की मी घरातुन बाहेर पडतो. प्रभात रोड गल्ल्यामधुन फ़िरतो. अजुन बरीच झाडी शिल्लक आहेत. विशेष करुन income tax lane मधुन फ़िरायला मजा येते. शनिवारी सुट्टी असते तेंव्हा ओळखीच्या कॉलेज मध्ये जावुन interview techniques lecture देतो. कोलेज च्या मुलांशी बोलुन खुप छान वाट्ते. corporate world बद्दल त्यान्ना खुपच उत्सुकता असते.
|
Manya2804
| |
| Thursday, November 01, 2007 - 9:27 am: |
| 
|
एका इंग्रज साहित्यिकाचा (नाव आठवत नाही...) किस्सा या महाशयांकडे एकाने एकाकी वाटण्याची तक्रार केली. तेंव्हा हे लेखक महाशय म्हणाले, 'भल्या गृहस्था, तुला तुझी स्वतःची सोबत देखील आवडत नाही तेथे इतर लोक काय करणार?'
|
Pillu
| |
| Thursday, November 01, 2007 - 9:53 am: |
| 
|
मंडळी बरीच चर्चा रंगली की इथे, छान, पण माझा अनुभव वेगळा आहे मला एकटे असे वाटायला लागले की मी सरळ गाडी काढतो आणी स्मशान भुमीत जाऊन बसतो ( सगळ्यांना ते जमणार नाही ) आणी तिथे चाललेला आक्रोश पहातो एका नश्वर देहा साठी चाललेला त्या सर्वांचा आटापिटा पहातो (अघोरी वाटेल हे कुणाला ) तेव्हा कळते ते दु:ख गेलेला जिव हा खरा एकटा असतो त्याचे सर्व आपले म्हट्लेले आप्त ईथेच आसतात ज्या साठी जिवाने आयुष्यभर कष्ट केले ते सुध्दा साथ देउ शकत नाहीत मग जो पर्यंत आपण जगतो तो वर आपण एकटे नाही ही जाणिव होते आणी शांत मनाने घरी परत येतो. आनि दुसरा पर्याय म्हणजे मस्त पैकी घाटात जाणे. वळणा वळणा ने गाडी चालवली ना की खुप उत्साह येतो. प्ण हा दुय्यम पर्याय.
|
Dakshina
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:25 pm: |
| 
|
एकटं तर सगळ्यांनाच वाटतं आणि त्यावर काही रामबाण उपाय आहे, असं निदान मला तरी नाही वाटत. माणूस हा पावलोपावली अतृप्त आणि अशांतच आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. शहाणा आणि सुज्ञ माणूस कदाचित विचार करून शोधून काढू शकेल की आपल्याला एकटं का वाटतंय. पण माझ्यामते आपल्यातल्या प्रत्येकालाच आपल्या एकटेपणाचं कारण ठाऊक असतं आणि आपण नेमकं त्यापासूनच दूर जाण्याच्या प्रयत्नात स्वतःला एकटे पाडत असतो. काही धाडसी माणसंच फ़क्त या एकटेपणाच्या कारणाला फ़ेस करून त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नं करतात. पण मी ते स्वतःहून कधीच करू शकले नाही. मला नेहमीच त्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागली. अन्यथा आताचं गतिमान आयुष्य पहाता मला नाही वाटत की कुणाकडे एकटं पडायला वेळ असेल. फ़क्त स्वतःचा विचार जरी करायचा म्हटलं तरी लोकांकडे वेळ नसतो, पण इथे ज्या पोकळीबद्दल आपण बोलतोय ती आपल्याला कधीही, कुठेही गाठू शकते. Because it is all in mind मन प्रसन्नं असेल तर सगळं जग प्रसन्नं दिसेल. otherwise जगातली सगळी सुखं तुमच्या पायांशी लोळण घेत असली तरीही तुम्ही एकटेच असता. अशा वेळी लोक सांगतात, पुस्तकं वाचा, छंद लावून घ्या, पण अशा गोष्टींनी खरंच सांगा... Does that pain go off ? मला नाही वाटत. छं लावून घेऊन आपण त्या Problem मधून फ़क्त पळवाट काढतो. त्यावर उपाय करतो का खरंच? त्या वेदनेशी लढण्याचा प्रयत्नं करतो का? माझ्यामते तरी, चांगला counsellor शोधून त्याच्याशी / तिच्याशी बोलून त्यावर काम करावं. लगेच यश नाही मिळणार, पण मनाची बळकटी नक्कीच वाढेल. हळू हळू... अर्थात प्रत्येकच वेळी एकटं वाटलं की आपण मदत घ्यायला जावं असं नाही. पण प्रत्येकालाच आपल्या एकटेपणाची तीव्रता माहीती असते. त्या त्याप्रमाणे वेळोवेळी आपण स्वतः त्याच्याशी deal करून मार्ग काढत असतोच. तात्पुरते उपाय म्हणजे तात्पुरता अराम.
|
Dakshina
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:34 pm: |
| 
|
मन्याचा किस्सा खरंच पटला. आपल्या पिढीचा तर रिटायर झाल्यावर फ़ार मोठा problem होणार आहे. कारण मरमरून काम. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काय ते माहीती नाही. मला तर शनिवारी आणि रविवारी पण कधी कधी बोर होतं. मग नोकरी संपल्यावर काय होईल? आता आपल्याला पुस्तक वाचायला किंवा इतर छंद जोपासायला वेळ नाहीये, आणि तेव्हा वेळ असेल पण त्यात रस नसेल. मग तेव्हाच्या एकटेपणाचं काय करणार?
|
Maanus
| |
| Thursday, November 01, 2007 - 2:07 pm: |
| 
|
there are these two great books out there, Men are from Mars, and Women are from Venus How to win friends and Influence People try to get hold of them, they are good to understand human relationsips. you dont have to follow everything, but if you'll follow a bit also it may help.
|
Chinya1985
| |
| Thursday, November 01, 2007 - 10:30 pm: |
| 
|
अरे हा BB चांगला आहे. मुळात अश्विनीनी मागे लिहिलच आहे ते पुढे नेउन लिहितो. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद म्हणतात की ' u feel lonely when u forget that Lord Krishna is ur eternal companion '. हे वाक्य अतिशय महत्वपुर्ण आहे आणि अतिशय meaningful ही. भगवान तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्हाला सतत बघत आहेत आणि तुम्ही तुम्हाला ओळखत नाही तितके ते तुम्हाला ओळखतात. आपण हे नेहमी विसरतो आणि त्यामुळे जगात suffer करतो. हे विसरलेले ज्ञान आपण परत realize केले की आपला जन्म सार्थक होईल. माणसाला एकट का वाटत??कारण माणुस स्वत्: बरोबर जगु शकत नाही. आपल्याला सतत काहीतरी व्याप हवा असतो, पुस्तके,काम,अभ्यास,टी.व्ही.,गाणी,गॉसिप,कम्पुटर,मोकाट फ़िरणे आणि इतर असंख्य उपाय आहेत ज्याने आपण स्वत्:ला जखडुन घेतो कारण आपण या क्षणी इथे राहू इच्छित नाही. आपल्याला स्वत्:बरोबर रहायला लागलेच तरी आपण मग स्वत्:शीच गप्पा मारायला लागतो,चर्चा करायला लागतो,स्वप्ने बघायला लागतो. मग काही वेळानी याचाही कंटाळा येतो. आणि मग एकटेपणा वाटायला लागतो. मलाही असेच एकटे वाटायचे आधी पण भक्ती संप्रदायातील पुस्तकातील ज्ञान मला खुप उपयोगी पडले,भगवंताच्या नामाचा भक्तिने केलेला जप हा एकटेपणावरच नाही तर इतर अनेक समस्यांवरचा रामबाण उपाय आहे.कोणीतरी एकाग्रतेबद्दल पण विचारले आहे,त्यासाठीही जपाचा चांगला उपयोग होतो. मात्र हे सगळे एकट वाटायला लागल्यावर नव्हे तर दररोज करायला हवे म्हणजे त्यात प्रगती होत जाते. एकट वाटायला लागल्यावर आपले विचार witness करणे हाही चांगला उपाय आहे त्यानंतर मनाची चलबिचल थांबते आणि मन शांत होत पण ते करण थोडस अवघड आहे कारण आपण मायेने cover झालेले आहोत आणि माया आपल्याला हे करण्यापासुन वंचित करायचा खुप प्रयत्न करते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे we must learn 2 live alone but without loneliness . alone आणि lonely यात खुप फ़रक आहे. कारण दुसर्या शब्दाचा अर्थ आहे की आपल्याला कुठेतरी त्रास होतोय आपल्याला हा क्षण नकोसा झालाय.
|
Hkumar
| |
| Saturday, November 03, 2007 - 4:47 am: |
| 
|
एकटेपणावरून एक गाणे आठवले: कोणी नसे रे कोणाचा, जो तो स्वतःचा स्वतःचा.....
|
संदीप खरेंच्या "सूपरमॅन कवितेमधील शेवटचं कडवं जरूर वाचावं एकट्या(मनानी ) लोकांनी! कुणाकडे असेल तर इथे पोस्टा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|