|
Dakshina
| |
| Friday, October 05, 2007 - 10:16 am: |
| 
|
हा माझा stage वर गाण्याचा पहीला अनुभव.... मी अकरावीत असताना पहील्यांदाच college च्या gathering मध्ये भाग घेतला होता. जनरल सेक्रेटरीने आर्थिक जबाबदारी उचलली होती. Orchestra बोलवला होता, आमची रोज संध्याकाळी college मध्येच practice चालायची. पहील्यांदा खूप मुलींनी भाग घेतला होता, पण त्या संयोजकाने बर्याच मुलींना बाद केले, मुलं तर सर्वंच बाद झाली. शेवटी गाणारे आम्ही ३ जणंच उरलो. त्यापैकी माझा वाट्याला ४ गाणी आली. मी stage वर गेले, एक तर पहिल्यांदाच, समोर हीऽऽऽऽ एव्हढी मुलं बसलेली... दंगा, नाच, शिट्ट्या... माझे हात पाय गारंच पडले. तरीही पहीलं गाणं पार पडलं. ते होतं रोजा सिनेमातलं 'दिल है छोटासा' आता हे गाणं काय dance करण्याजोगं आहे का? तरीही लोक उगिचच नाचत होते. दुसर्या गाण्याच्या सुरवातीपासूनच, पहील्या रांगेतला एक मुलगा, मला सारखी 'वहीनी, वहीनी' अशी हाक मारत होता... का ते मला आजतागायत कळलं नाही. मी त्यापुर्वी त्याला कधीच आमच्या college मध्ये पाहीलं नव्हतं. ३रं गाणं होतं 'ओ मेरे सोना रे, सोना..' त्या गाण्याला once more मिळाला, आणि एका बावळट मुलाने माझ्या गळ्यात stage वर येऊन हार घातलेला... मग बरेच लोक पेटले, आणि कित्येक लोकांनी गाणं आवडल म्हणून स्वखुशिचे बक्षिस... म्हणून दहा, दहा रुपये सुद्धा दिले. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याकडे दहा, पन्नास, वीस च्या बर्याच नोटा, एक हार, खूप गुलाबाची फ़ुलं, पेढे, चॉकलेटं असं बरंच काही जमा झालं होतं. एकूण हा अनुभव आत्ता म्याड सारखा वाटत असला तरी तेव्हा फ़ार आनंद देऊन गेला होता....
|
म्हणजे कलाकार आहेस तर दक्ष्स....
|
Dakshina
| |
| Friday, October 05, 2007 - 10:42 am: |
| 
|
'यो'....कॉलेजात चार दोन गाणी म्हणून कोणी कलाकार नाही होत गं... By the way इतकं हसयला काय झालं आणि?
|
नाही ग तो scene आला डोळ्यासमोर त्या मुलाने हार घातला ना...
|
Arch
| |
| Friday, October 05, 2007 - 12:38 pm: |
| 
|
तो हार घालणारा पहिल्या रांगेतल्या ' वहिनी ' म्हणणार्या मुलाचा भाऊ नव्हता न? 
|
Runi
| |
| Friday, October 05, 2007 - 1:38 pm: |
| 
|
पहील्या रांगेतला एक मुलगा, मला सारखी 'वहीनी, वहीनी' अशी हाक मारत होता... >>> आईशप्पथ मला एकदम डोळ्यासमोर आला हा प्रसंग आणि मग खुप हसायल आले
|
Hkumar
| |
| Wednesday, October 24, 2007 - 5:40 am: |
| 
|
मी एकदा आणि एकदाच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. सुरवात चांगली जमली पण पाचच मिनिटात गोची झाली! एकदम block बसला आणि पुढचे काही आठवेना. मग काय, सरळ स्टेजवरून पलायन केले. अशा स्पर्धेचा हा पहिला आणि शेवटचा अनुभव.
|
Gsumit
| |
| Wednesday, October 24, 2007 - 3:36 pm: |
| 
|
माझा पण पहीला स्टेजचा अनुभव काही असाच आहे. मी शाळेत सातवीला असतानी कर्मवीर जयंतीला भाषणात भाग घेतला. भाषण होते लोकमान्य टिळकांवर. चांगलीच तयारी केली होती अन स्पर्धेच्या आदल्या दिवशी सरांनी मला वर्गात भाषण करायला सांगितले... तिथे पण व्यवस्थित झाले. पण स्टेजवर गेलो अन पुर्ण शाळा समोर पाहुन हात्-पाय लटलट कापायला लागले काही केल्या भाषण आठवेना... अजुन पण आठवतेय काय भाषण केलते मी ते... हे बघा- "माझ्या प्रिय विद्यार्थि बंधु भगिनिंनो ( ), आणी इथे बसलेल्या सर्व गुरुजनांनो, मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांवर दोन शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही ते शांतचित्ताने ऐकुन घ्यावेत अशी माझी नम्र विनंती." हे सगळ जमलं नीट. पण, इथुन पुढे जी डोक खाली घालुन बडबड केली त्याला भाषण म्हणणे जरा जास्तच होइल. लोकमान्यांचा शेंगा न खायचा प्रसंग ५ वेळा भाषणात आला त्याच्यानंतर भाषणं केली पण हे भाषण कधीच नाही विसरु शकत.
|
Ajai
| |
| Saturday, October 27, 2007 - 6:53 am: |
| 
|
हा माझा स्टेज वरचा नाही camera समोरचा पहिला आणि एकमेव अनुभव. स्क्रीन टेस्ट चा. साधारण दहायेक वर्षापुर्वीचा किस्सा.. नेहमीप्रमाणे मी संध्याकाळ्चा मी 'तळवलकर्स' चर्नि रोड जिम मधे व्यायाम करत होतो. ज्यानी ही जिम पाहिलेय त्याना माहित असेल कि जागा किती छोटि आहे. त्यातुन रिनोवेशन च काम चालु असल्याने आम्हि बाहेरच बेंच, वेट्स करत होतो. येक मुलगी बाहेरच बसुन बराच वेळ observe करत होती आणि ते बघुन माझे बेंच प्रेस चे सेट पण नेहमी पेक्षा जास्त झाले होते थोड्यावेळाने त्या मुलीने मला विचारले " are u into modeling ?" मला वाट्ले ही कुणितरी जिम मेंबर असेल आणि खेचतेय. मी नाही म्हट्ल्यावर तीने विचारले modeling madhe interest आहे का? मला नक्कि खात्रि पटली कि मला शेंडि लावली जातेय. शेवटि तीने तीचे विझिटिंग कार्ड दिले. ती 'भारतबाला प्रोडक्शन"साठि model coordinator होती. त्यानी वंदे मातरम चा video बनवल्यामुळे नाव माहित होत त्या production house च. तिनचार दिवसानी तीचा परत फोन आला कि खरच intrest असेल तर आज दुपारी पेडर रोड ला स्रीन टेस्ट साठी ये. try करायला काय हरकत आहे म्हणुन दुपार नंतर पेडर रोड्ला पोचलो. आणि ८-१० मुल, मुली आधिच तिथे होती. बहुतेकानी थोड्याफ़ार ads मधे already कामं केलेली होती. मीच काय तो एक फ़्रेशर त्या छोट्याश्या रूम मधे एक camera आणि दोनेक lights लाऊन शूट करत होते. येक cameraman सोडला तर बाकि मुलिच होत्या बहुतेक. जेव्हा माझी पाळि आलि तेव्हा आधिच घाम फुटला होता. त्यातल्या एका मुलिने पोर्टफोलिओ मागितला. आता कधिच न बनवलेला पोर्टफोलिओ कुठुन दाखवणार. म्हटलं नंतर फोटो पाठवतो. नंतर त्यानी येक काहितरि situation दिलि. कुणाला तरी propose करायच आणि येखादा dilouge बोलायचा. camera सुरु केला. हातात पहिल्यांदा एक पेपर, त्यावर माझं नाव, आणि नंबर लिहुन शूट केल. ते चोरांचे हातात पाट्या घेऊन फोटो काधतात तसे. नंतर मी पांढर shirt घातलाय. त्यामुळे lighting burn होतेय अशी cameraman ची तक्रार. मग light adjust करण्यात थोडा वेळ गेला. तेव्ह्ढ्यात मी त्या situation ची मनातल्या मनात उजळणी केली त्यानंतर मी जे काही केले ते म्हणजे.... ते एक वाक्य camera त बघुन बोलणे मला १५ मिनीटात ही शक्य झाले नाही. कधि भलतीचकडे बघुन बोलत होतो तर कधि शब्द चुकत होते. शेवटी एक मुलगी camera मागे उभि राहिलि आणि तीच्याकडे बघुन तो dialouge अक्षरशः संपवला. नंअतर मला काही दिवसानी फोटो पाठव म्हणुन फोन आला पण हा आपल प्रांत नाही हे कळुन चुकले होते
|
माझा पण एक असाच आंतरशालेय कविता पठण स्पर्धेतला प्रसंग आहे. मी ५वीत होतो. आणि मला आमच्या बाईंनी सांगितल की अशी स्पर्धा आहे वगैरे. मला कविता पठण करताना कविता गायची नसते हे माहितच नव्हत. मला त्या बाईंनी एक्दा सांगितल की अस अस कर बाबा. त्यांनी दिलेली कविता तर अशी meaningless होती(किंवा तेंव्हा त्याचा अर्थ समजण्याईतकी बुध्दी नसावी). मग मला आईनी 'गे मायभु तुझे मी' कविता म्हणायला सांगितली मी पाठ केली व्यवस्थित. मग मी तिथे गेलो तर माझा शेवटचा नंबर होता, माझ्याआधी सर्व मुलांनी कविता म्हटल्या आणि त्याच्या दरम्यान मी मनातल्या मनात कवितेची उजळणी करत होतो पण त्या लोकांच्या कवितेमुळे पहिल्या ओळीच्या पुढे जातच नव्हती उजळणी. नंतर त्या सर्व कविता ऐकुन माझी वेळ आली. माझ्या घशाला कोरड पडली होती,आणि आधीच्या ३०-३५ कवितांमुळे डोक्यात सगळी खिचडी झाली होती.मी समोर जाउन म्हटल 'गे मायभु तुझे मी,फ़ेडिल पांग सारे' आणि झाल मला पुढची ओळच आठवेना. मग अजुनच टेन्शन आल मग हातपाय थरथरायला लागले,तोंडातुन शब्दच फ़ुटत नव्हते. मग त्या तिथल्या बायका(परिक्षक) म्हणाल्या परत ट्राय कर मग परत ट्राय केल पण जमेच ना मग त्या म्हणाल्या एकदा वाचुन म्हणायची आहे का? माझा कॉन्फ़िडन्स तर एकदम संपला होता मी म्हटलो नाही आणि तिथुन सरळ निघुन आलो असल awkward वाटत होत,एक दिवस आधी पुर्ण कविता पाठ होती आणि त्यादिवशी काहिच आठवल नाही. नंतर कुणालाच सांगितल नाही याबद्दल. पण नंतरचे २-३ वर्ष मात्र मी परत स्पर्धेत भाग घेतला आणि व्यवस्थित कविता म्हटल्या आणि एकदा ३ रा नंबरही मिळाला.
|
Apurv
| |
| Sunday, October 28, 2007 - 12:56 pm: |
| 
|
माझा आंतरशालेय स्टेज वरचा पहीला अनुभव. लहानपणापासून मला नाटकात काम करायची फार आवड. आंतरशालेय नाटका साठी शाळेत टेस्ट घेतली होती त्यातून मी निवडून आलो. नाटक होते ससा आणि कासवाची शर्यत. माझे काम होते..... झाड आणि दगड दिनानाथ मध्ये स्पर्धा होती. त्या कामासाठी मला बक्षिस वगैरे मिळेल अशी आशापण होती! नंतर नाटकाचे फोटो विकत होते तेंव्हा माझा मी दगड असताना आणि कासव बाजूनी जात असतानच फोटो पाहून मी खुश. अजूनही तो फोटो जपून ठेवला आहे. पुढे मोठा झाल्यावर आणि जरा अक्कल आल्यावर संवाद नसेल तर नाटकात काम करणे सोडून दिले.
|
Gsumit
| |
| Sunday, October 28, 2007 - 6:02 pm: |
| 
|
wow! अजय, मग personal contact ठेवला की नाही त्या मुलीबरोबर?
|
हा हा अपूर्व, जबरी लिहील आहेस. फार हसलो.
|
Manuswini
| |
| Tuesday, October 30, 2007 - 8:03 pm: |
| 
|
माझा सगळ्यात अगदी पहीला वहीला स्टेजवरचा अनुभव, मी ४ - ५ वर्षाची असेन, animal kingdom म्हणून play होता. प्रत्येकाने पुढे येवून त्या त्या प्राण्याची ओळख नी आवाज काढून दाखवायचा. मी मांजर झाले होते. पण मांजरीचा मुखवटा मिळाला नाही नेमका. बाहेर board लावला होता. We regret to inform you that 'CAT mask is not available to the actor. वगैरे. आधीच माझा मूड गेला होता की मीच एक वेगळी दिसते. दुसरे म्हणजे मला कुत्रा व्हायचे होते पण teacher चे politics स्वतच्या मुलीला तो रोल दीला. आणि लहानपणी शाळेत teachers लोक कसे कायच्या काय loud मेकप करतात ते माहीती आहे ना(कीती तरी जाड काजळ,फेंदरलेल्या मिश्या, लाल भडक लिपस्टिक वगैरे) मुखवटा नसल्याने माझ्या चेहर्यावरच केल्या होत्या. पडदा बाजुला झाल्यावर सगळे प्राणी एकदम बाहेर जाणार, हात धरून गोल नाचणार मग मागे खाली स्टेजवरच बसणार(छोट्या खुर्च्या होत्या). मग एकेक पुढे येवून introduce करणार. मी हत्ती वगैरे. माझा नंबर येईपर्यंत मला लागली झोप(तशी मला झोपायची खुप आवड होती लहानपणी). नंबर आला तरी झोपून. बाजुच्या हत्तीने(माझी मैत्रिण जी हत्ती झाली होती ) तीने चिमटा काढला, सरळ उठले गडबडीत समोर आली नी कुत्र्यासारखे भूंकून पुन्हा मागे आले. सगळे हसून पाहत होते तरी मी गडबडलेलीच. तेव्हापासून बरेच दिवस आमच्याकडच्या मांजरी भो भो करतात असे चिडवत होते सगळे.
|
Prajaktad
| |
| Wednesday, October 31, 2007 - 1:28 am: |
| 
|
बाजुच्या हत्तीने(माझी मैत्रिण जी हत्ती झाली होती ) तीने चिमटा काढला, सरळ उठले गडबडीत समोर आली नी कुत्र्यासारखे भूंकून पुन्हा मागे आले. सगळे हसून पाहत होते तरी मी गडबडलेलीच. तेव्हापासून बरेच दिवस आमच्याकडच्या मांजरी भो भो करतात असे चिडवत होते सगळे. >>>>  
|
Chyayla
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:06 am: |
| 
|
अजय, चिन्या, अपुर्व मस्त अनुभव आहेत तुमचे.. मनुस्विनी तुझा किस्सा वाचुन तर खुप हसलो
|
Itgirl
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:53 am: |
| 
|
मनुस्विनी तुझा किस्सा वाचुन धमालच किस्सा आहे!! अजून टाक असले तर!!
|
Ajai
| |
| Wednesday, October 31, 2007 - 10:38 am: |
| 
|
हा किस्सा साधारण दोन वर्षापुर्वीचा- अगदीच स्टेजवरचा नाही पण त्यातलाच. माझ्या त्यावेळच्या ऑर्गनायझेशन ची ऑफसाईट होती strat cruise वर्- तीन दीवस्- मुंबई ते गोवा. आत्ता ऑफसाईट म्हटल तर दोन तीन तास मीटींग्स, रिव्हूज, थोडी प्रेसेन्टेशन्स आणि बाकि धमाल. साधार्ण ५० प्रतीनिधी होते, बहुतेक देशभरातले आणि काही विदेशी. त्यातुन ४ ग्रुप करुन काही activities करायचे ठरले. त्यातली एक activity म्हणजे ऑफ़िस मधल्या एखाद्या department वर छोटेसे Skit करायचे. आमच्या ग्रुपला कस्ट्मर सर्विस्/ कॉल सेंटर चा विषय मिळाला. skit लिहायला आणि बसवायला एक दिवस होता. लिहायचे काम मी अंगावर घेतले. रात्रीच्या पार्टित ते विसरुनपण गेलो ( नाहितरी मी काय दिवे लावले असते ते मला पक्क माहीती आहे). दुसर्या दिवशी आयत्यावेळी कागदावर storyline लिहली कस्ट्मर चा तक्रारिचा फोन, call center officer ची नेहमीची उडवाउडवी, escalation आणि शेवटी MD चे सगळ्याना झापणे. संवाद लिहलेच नव्हते त्यामुळे कुणी काम करायला तयार नव्हते. शेवटि मी कस्ट्मर आणि Banagalore ची एक मुलगी customer service officer व्हायला तयार झाली.जे सुचेल तस रेटुन न्यायचे ठरले. तिच्या हिमतीची दाद द्यायला हवी( Bangalore च्या कन्या तश्या धडाकेबाज हे मी शपथेवर सांगु शकतो) बाकी दोघा तीघाना फक्त escalation चे दोन तीन संवाद होते. prop महणुन mobile वापरले. तर मी कस्ट्मर म्हणुन कॉल केला. तीकडुन त्या मुलीचे उत्तर how may I help u sir? आत्ता काहितरी रेटायच म्हणुन मी म्हणालो. " before i tell u about problem, I should know whom I am talking to" त्यावर तीचे उत्तर " पैचान कोन?" अगदी नवीन प्रभाकर स्टाईल. मी सेकंदभर उदालो कारण हे अनपेक्षित होत. त्यातुन सावरुन पुढे १५ मिनिटे अक्षरशः आम्ही impromptu धिंगाणा घातला. त्या skiT साठी आम्हाला बक्षिस जरी नाही मिळाल तरीही अनेकाना ते जबरदस्त आवडले. सुदैवाने तो भाग कुणीतरी record केला होता आणि त्याची cD बघताना मजा येते
|
Apurv
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:30 pm: |
| 
|
solid मजा आली वाचून अजय, भन्नाटच आहे ती मुलगी!
|
Gsumit
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:43 pm: |
| 
|
मनुस्विनी, अजय मस्तच एकेक अनुभव...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|