|
Maanus
| |
| Friday, October 26, 2007 - 3:06 am: |
| 
|
तर काल मला एक presentation द्यायचे होते. presentation पुर्वी सगळ्या cables वैगेरे निट लावलेल्या आहेत की नाही हे बघायला म्हणुन त्या room मधे गेलो. माझ्याबरोबर एक blond होती, खाण्याच्या सगळ्या गोष्टी आल्यात की नाही हे बघायला ती आलेली. मी projector जोडला आणि माझ्या pc ला connect केले. माझ्या desktop वर काही limited shortcuts आहेत, outlook, eclipse, IE आणि Toad समोरच्या पडद्यावर चित्र उमटताच ह्या बाईचे लक्ष त्या toad च्या icon कडे गेले आणि ती एकदम उडालईच. "Oh! thats so cute little frog, he is so green. I want him on my desk, Can I please please have him" आता हीला काय उत्तर द्यायचे. मी बघत बसलो फक्त तीच्याकडे.
|
Maanus
| |
| Friday, October 26, 2007 - 3:10 am: |
| 
|
खुप वर्षापुर्वी एका computer vendor आणि त्याच्या गिर्हाईकामधे ऐकलेले संभाषन. त्या vendor ने customer ला computer विकला होता, पण काही कारणास्तव power cable जळाली आणि म्हणुन नविन cable त्याला तो देत होता. "पण तुम्ही घरी का नाही येत" "कशाला" " cable install करायला" "नाही ही cable plug & play आहे, त्यामुळे नुसती लावली की drivers वैगेरे आपोआप install होतात, त्यामुळे मी यायची गरज नाहीय"
|
Maanus
| |
| Friday, October 26, 2007 - 3:19 am: |
| 
|
cummins मधे एक project चालु होता. तेव्हा तिथल्या एका व्यत्कीच्या computer वर cd तुन काही डाटा कॉपी करायचा होता. कॉपी करायला सुरवात केली. आता डोळ्यासमोर दोन फाईल्स चे फोल्डर्स आणि फाईल्स इकडुन तिकडे उडत असल्याचे चित्र. कळतेय का मी काय बोलतोय, remember that animation comes when you are copying files ५-६ मीनटानंतर त्या माणसाला काही चैन पडेना. "तुम्ही ते दोन फोल्डर जवळ आना की, म्हणजे त्या फाईल्स लवकर कॉपी होतील" एक मिनीट त्याच्याकडे पाहीले. "तुमची सुचना कळवतो वर, बघु पुढच्या वेळेस फोल्डर्स जवळ आनता आले तर"
|
Monakshi
| |
| Friday, October 26, 2007 - 5:37 am: |
| 
|
माणसा, तुलाच बरे असे महाभाग भेटतात.
|
Slarti
| |
| Friday, October 26, 2007 - 6:15 am: |
| 
|
माणसा, शेवटचा किस्सा तर अफलातून आहे...
|
Aaftaab
| |
| Friday, October 26, 2007 - 6:42 am: |
| 
|
पूर्वी मी US मध्ये असताना high end system administration च्या सोबत remote user support सुद्धा करायचो. Dallas मध्ये एक गोड आवाजाची admin lady होती. (ती खूपच वयस्कर होती हे नंतर कळाले..) तिचा नवीन laptop मध्ये काही गडबड आहे म्हणून फ़ोन आला.. जवळजवळ २० मिनिटे तिला start बटन click करताच येईना.. ती म्हणत होती की तिच्या laptop मध्ये माऊसच नाहीये. शेवटी keyboard च्या मध्यात एक छोटा हिरवा रंगाचा mouse होता हे तिच्या लक्षात आल्यावर अशी excite झाली की बस्स.. आम्ही इकडे यांच्या मठ्ठपणावर जाम चिडलेलो...
|
Aaftaab
| |
| Friday, October 26, 2007 - 6:50 am: |
| 
|
ज्यांना virtual private network (VPN) म्हणजे काय हे माहित असेल त्यांना हा किस्सा जास्त आवडेल. एकदा Boston मध्ये असताना office मध्ये sales department चा माणूस आला.. त्याच्याकडे laptop होता पण conference room मध्ये काहि network cable नव्हती किंवा wireless ही नव्हतं. पण त्याला e-mail access करायचे होते. तो IT support वाल्या मुलाला म्हणाला " why do I need a cable, man? I have the VPN client on this machine.. it should connect to the e-mail as it is through the internet cloud.." आणि वर असे हातवारे केले जसे आपण "विमान असे उडते" असे लहान मुलाला समजावताना सांगतो. तो गेल्यावर office मधले सगळे असे हसले....
|
Mrdmahesh
| |
| Friday, October 26, 2007 - 11:06 am: |
| 
|
मी एकदा एका औषध कंपनीच्या पुणे branch (साधू वासवानी चौक) मध्ये software installation साठी गेलो होतो. installation चालू केलं.. एक मुलगी तिथे operator म्हणून होती. त्या मुलीला हे software वापरायचं असल्यामुळे ती तिथे होती. तिला मी जवळची खिडकी जास्त प्रकाश येण्यासाठी उघडायला सांगितली तर तिने नकार दिला. मी कारण विचारलं तर ती म्हणाली "हमारे sir ने खिडकी बंद रखने को कहा है. और बताया है कि खिडकी खुली रहनेसे धूल अंदर आएगी, उसमें व्हायरस होता है. वो कंप्यूटर मे घुस सकता है. और व्हायरस कंप्यूटर मे घुस जाने के बाद क्या होता है ये तो आपको मुझसे ज्यादा पता होगा." मी blank ...
|
Sheshhnag
| |
| Friday, October 26, 2007 - 11:58 am: |
| 
|
मस्त! खूप जुनी गोष्ट आहे. वीज प्रवाह नसल्याने संगणक बंद होते, आणि साहजिकच सर्व डीटीपी ऑपरेटर `टीपी' करत बाहेर बसले होते, आणि आमचे तत्कालिन वृत्तसंपादक आले, आणि त्यांना म्हणाले, "तुम्ही इथे का बसलात? लाईट नाही तर मॉनिटरमागे मेणबत्ती लावून काम करता येत नाही का?" त्यानंतर ऑपरेटर आजपर्यंत काम नसले तर त्यांच्या जागेवरच बसून राहतात, काहीही झाले तरी. मेणबत्ती लावायचे धाडस कोण करणार?!
|
Shravan
| |
| Friday, October 26, 2007 - 1:23 pm: |
| 
|
मागे एकदा सपोर्ट मधल्या मुलाने admin च्या एका lady चा monitor बदलला. दोन्-तिन दिवसांनी तिची reaction : जबसे आपने मेरा मॉनिटर बदला है तबसे मेरा Word, Excell बहुत अच्छा चल रहा है! कुछ प्रॉब्लेम नही है अभी! तो सपोर्ट चा मुलगा तिला सांगतोय बिचारा की मॉनीटर चा आणी त्याचा काही संबंध नाही तर वर ही 'वो technical मुझे पता नही पर मेरे प्रॉब्लेम सब solve हुये अब!' (आम्ही हसता हसता पडायच्या बेतात होतो).
|
Maanus
| |
| Friday, October 26, 2007 - 3:24 pm: |
| 
|
not exactly related to computers माझे जुने अपार्टमेंट सोडत होतो तेव्हाची गोष्ट. आपार्टमेंट सोडले तरी अजुन १५ दिवसाकरता मला parking spot हवा होता त्या साठी building management बरोबर बोलायला गेलो. "hey jeniffer, i am vacating apt 104 on 31, but i still want to keep my parking spot active for next 15 days" "ok... lets see, your monthly parking spot fee is 250, our daily guest parking fee is 10 $. but as you were resident, i'll give you concession of 50% on daily fee, that comes out to be 5 $ per day. and you want parking spot for 15 days, so it is 5 into 15 i.e. 75 just give me cheque of 75 and you'll be all set" शपथ ह्या लोकांच गणित एवढ गंडलेल आहे की ते काय करत असतात त्यांच त्यांना कळते.
|
Slarti
| |
| Friday, October 26, 2007 - 5:17 pm: |
| 
|
माणसा, तुझ्या parking च्या किश्यातील विनोद कळला नाही रे...
|
एक कार्टून पाहिलं होतं. एक आजी-आजोबा Computer समोर बसून लेक अथवा नातू ह्यांच्याशी फोनवर बोलत आहेत. कम्प्यूटरच्या टेबलावर एक सापळा आहे, सापळ्यात एक मेलेला उंदीर आहे. आजोबा हैराण होऊन कंप्यूटर आणि सापळ्याकडे आळीपाळीने पाहतायत. आजी फोनवर विचारतायत. " Yes, we've got it. How do we install it now?" एक कार्टून पाहिलं होतं. एक आजी-आजोबा Computer समोर बसून लेकनातू ह्यांच्याशी फोनवर बोलत आहेत. कम्प्यूटरच्या टेबलावर एक सापळा आहे, सापळ्यात एक मेलेला उंदीर आहे. आजोबा हैराण होऊन कंप्यूटर आणि सापळ्याकडे आळीपाळीने पाहतायत. आजी फोनवर विचारतायत. " Yes, we've got it. How do we install it now?" ----------------- खुद्द माझ्या आईने एकदा मला फोन करून Google वरून Lemon-corriander soup ची recipe शोधायला मदत मागितली होती. माझं सर्फ़िंग सोडून मी कॅफ़ेतनं आईला सूचना करत होतो. इतर माणसं खारूताईसारखी बसल्या जागेवरून उठून पाहत होती- cubicles वरून डोकावून. "हंऽऽ Start button आहे ना monitor वर, त्याच्याच शेजारी उजवीकडे एक निळा ' e' दिसेल. दिसला? कर क्लिक! .... ..... ... आता एक विंडो उघडेल. त्यात अगदी वरच्या बाजूला address लिहिलेलं दिसेल. त्याच्यात Google लिही... .... Google गं!! Gee-double o-gee-el-ee... आता Ctrl+Enter कर... Ctrl+Enter म्हणजे?? नाहीतर थांब... नाही... त्या Google समोर डाॅट काॅम लिही... आता एंटर मार! ... एक गूगल सर्च त्या दिवशी १५ मिनिटांत पूर्ण झाला!! आता घरी गेलो की एकदा तिचा क्लास घेणारे!
|
Maanus
| |
| Friday, October 26, 2007 - 5:36 pm: |
| 
|
30 days fee was 250 $, so 15 days fee would be 250 / 2 = 125 but she calcualted daily rate / 2 * 15 10 / 2 * 5 = 75 so clear loss of 50, for her
|
Apurv
| |
| Friday, October 26, 2007 - 5:59 pm: |
| 
|
मल वाटत तु तिकडे रहात असल्याने शक्य तेवढा कमी चार्ज करावा हा तिचा हेतु होता.
|
स्लार्ती, मला पण त्याचा विनोद कम चुकीचे गणित कळले नव्हते. पण मीच गणितात प्रकांड पंडीत असल्याने (४ वेळा केटी घेतली आहे ) विचारायचे धाडस केले नाही.
|
Slarti
| |
| Friday, October 26, 2007 - 7:30 pm: |
| 
|
माणसा, नियमाप्रमाणे ती तुला रहिवासी दर लावू शकत नाही. कुठला दर लावायचा हे तिच्या अधिकारात नसणार, परंतु एकदा दर लावल्यावर किती सूट द्यायची हे तिच्या discretion मध्ये असणार. आता guest rate ने १५ दिवसांचे १५० झाले असते (रहिवासी दरापेक्षा २५ जास्त), पण तू रहिवासी म्हणून तिथे discretion वापरून तुला मोठी सूट दिली. हा त्या बाईचा चांगुलपणा आहे.
|
Maanus
| |
| Friday, October 26, 2007 - 7:53 pm: |
| 
|
हम्म्म इतके दिवस मी तिला बावळट समजत होतो, anyway पहीले दहा महीने बाईने माझ्याकडुन $ 250 / P.M. घेतले होतेच, त्यामुळे 50 $ सुट मिळुन मला काही विशेष आनंद नव्हता झाला.
|
Slarti
| |
| Friday, October 26, 2007 - 8:11 pm: |
| 
|
अरे माणसा, सूट ५० नाही रे.. ७५ अन् पैशांचं काय एवढं घेऊन बसलायस ? आता साबीर भाटीयाकडे एवढा पैसा (पक्षी $ ) असूनही त्याची कुठे ऐश झाली... असो. ते जाऊ दे. तू पुढचा संगणक किस्सा टाक...
|
फार पुर्वी एका मारवाडी व्यापार्याला सन्गणाकाचे महत्व पटवताना मी म्हणालो की तुमचा मुनिमजी एका महिन्याचा हिशेब दोन दिवसात करत असेल तर सन्गणक तो पाच मिनिटात करेल. त्यावर तो उत्तरला "पण दोन कप चहा सान्ग रे समोरच्या होटेलात" असे म्हणले तर ऐकेल का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|