|
श्यामली तु ओरंगाबादची का? काल रात्री मला गायत्री चाट नी भोलेशंकरची जाम आठवन आली.
|
Shyamli
| |
| Sunday, August 05, 2007 - 5:18 pm: |
| 
|
अरे वा केदार तुम्हीपण औरंगाबादकर कि काय? क्या बात है औरंगाबाद बीबीवर स्वागत तुमच गायत्री एवढ नाहि मिस करत मी पण भोलेशंकर म्हणजे आईशप्पथ आहाहा आमचा अड्डाच होता तिथे क्लास सुटला कि थेट अप्पाकडे.... जायचं मग भले फक्त पाणिपुरीच खाउ तीही तिघाचौघांमधे एकच तशी पाणीपुरी कुठेच नाही मिळाली नंतर इथे तर नावही पहायला नाही मिळत अप्पा अजुनही गेलं की आपुलकीनी चौकशी करतो
|
तुम्ही? बापरे अग तु म्हण. सही म्हनजे तु पण तेथील पडीक का? माझी मावास बहीन तिथे आता पडीक असते संध्याकाळी. मी नांदेड चा पण ओरंगाबादला लहानपणा पासुन जातोय. शिवाय तिथे नोकरी ही करत होतो त्यामुळे पार्शल ओरंगाबादकर. भोले ला आम्ही शेव बटाटा दही पुरी खायचो. अहाहा. स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते अप्पाची SPDP ( अन पुनेकर त्या वैशाली च्या SPDP ला बेस्ट म्हणतात हत तुमच्या). फोजी वर जायचीस की नाही. अन उस्मानपुर्यातील पान. व्वा. रात्री १२ ला मी न माझी बायको तिकडे पान खायला जायचो. क्या बात है. ओरंगाबाद आता जबरी झालय. मी ज्योतीनगरात राहायचो. तु कुठे?
|
Mahaguru
| |
| Monday, August 06, 2007 - 2:53 am: |
| 
|
ज्योतीनगर का?, मी टिळकनगरमधे (वीर सावरकर चौक). उस्मानपुरामधील पानवाला म्हणजे तारापान. आतातर त्याचे प्रस्थ खुपच वाढले आहे. त्याच्यापानपट्टीवर एकावेळी २५-३० पान बनवणारे बसलेले असतात म्हणे. क्रांतीचौकातील ऑम्लेटच्या आणि पावभाजीच्या गाड्यांना विसरुन कसे चालेल? फौजी धाब्याशिवाय कुठली पार्टी झालीय कधी? असो, आता खुप बदलेले आहे म्हणे.
|
Shyamli
| |
| Monday, August 06, 2007 - 3:37 am: |
| 
|
अरे हो शेवबटाटा पुरी खरचच खास असते तिथली. या अप्पाच्या हाताखाली काम करणा-या एका माणसानी टिळकनगरच्या चौकात चाट सेंटर सुरु केले होते, तीच चव होती पण फार टिकलं नाही ते का कोण जाणे??? फौजीला जायचे कि पण घरच्यांबरोबरच फक्त(तेंव्हा अजुन मुलींवर बंधनं होती आजच्यासारखं सगळीकडॆ वावर नसायचा मुलींचा आमची धाव कुंपणापर्यंतच फक्त ) फौजी आता कायच्याकायच झालय पण लंचला गेलं तर दुपारचा चहा पिउनच बाहेर पडावं एवढा मंदपणा चालतो तिकडॆ(gtg ला मस्त ठीकाण एकदम :D) आणि तारापान च पान अर्थात....... आमच घर(माहेर) बेगमपु-यात आहे पण स्पेशल जेवणा नंतर तारा पान च पान कौतुकानी आणल जातं अजुनही. क्रांतीचौकातील ऑम्लेटच्या आणि पावभाजीच्या गाड्यांना विसरुन कसे चालेल>>>अर्र काय काय आठवून देताय रे तुम्ही दोघं! ऑम्लेट माहीत नाही पण पावभाजी खरचच खास असायची क्रांतीचौकातली काही खास असेल की आमचं टोळकं तिथे जमायचं आणि ही धमाल असायची नुसती. आता तिथे खायची हिम्मत होत नाही औरंगाबाद खाद्ययात्रा असा लेख लिहावा का
|
Ajay
| |
| Monday, August 06, 2007 - 4:17 am: |
| 
|
> औरंगाबाद खाद्ययात्रा असा लेख लिहावा का श्यामली, ऑगस्ट ६ ला खास यासाठी शुभमुहूर्त आहे. तेंव्हा येऊन जाऊ दे. केदार, ज्योतीनगरात कुठे? वृंदावन गार्डन मधे माझे घर आहे पण सध्या ते भाड्याने दिले आहे.
|
अजय, त्या समोरच एक मातृमंदीरम नावाचा बंगला आहे तेथे मी राहात होतो. गुरु मग आपण शेजारीच होतो. श्यामली माझ्या बहीनीचे नाव वेदा आहे. पण अग ती फार लहान आहे. ( TE ) त्यामुळे कदाचीत तुझ्या ओळखीची नसेल. अन ते लेखाच मनावर घे. मी खव्वया माणुस अस्ल्यामुळे निदान वेज चे अनेक हॉटेल नी त्यात मिळनार्या खास डिश मी तुला लिहुन पाठवेन. उदा. मास्टर कूक मधील चिझ अगुंरी, मयुरी मधी भेंडी सुनहरी. वाह. भेन्डी क्या लगती है. (हे माझ्या सारख्या भेंडी न आव आवडनार्या माणसाने असे लिहावे म्हणजे बघ. ते लेखाचे मनावर घेच.
|
Shyamli
| |
| Monday, August 06, 2007 - 5:09 am: |
| 
|
Ajay you too SB ला कधि होतात? शाळा का collage ? कालचा सुर्य पश्चिमेला उगवला होता की काय? औरंगाबाद बीबीवर मोठे मोठे लोक आलेत चक्क. मुहुर्त नाही लागत हो लिहायला एकदा सुचायला लागलं कि सुसाट निघते गाडी, पण औरंगाबादबद्दल प्रेम असणा-यांनाच कौतुक फक्त. अरे हो केदार वाचल मीं नंतर, केदार सांगच बरं तुला आठवतात ती hotels आणि डिशची नावं बघु या काय काय आठवतय अजुन ते.
|
Mahaguru
| |
| Monday, August 06, 2007 - 5:10 am: |
| 
|
तसे पहाता औरंगाबादशी माझे सख्य कधी जुळलेच नाही. तरी पण लिहिण्यासारखे खुप आहे. विशेषत: खवय्येगिरी बाबत. अंबाअप्सरा समोर उभ्या असलेल्या गाड्यावरचे साबुदाणावडे, गुलमंडीवर एका गल्लीत मिळणारे ढोकळे, गुलमंडीवरच्या तमाम जनतेला खुणावणारे ते ईम्रतीचे दुकान, पैठणगेट वरचे ज्युस चे दुकान (बहुतेक लकी नाव होते त्याचे), स.भु च्या तिथल्या स्टॉल वरचे कचोरी आणि समोसे, रात्री नऊ ते बारा चा पिक्चर संपल्यानंतर मिळणारा मुनलाईट मधला चहा. त्या मुनलाईट समोरच कबाब वाला जबरी कबाब बनवायचा. अर्थात कबाब आणि बाकी मांसाहारी गोष्टी खायची मजा रमजानच्या दिवसात भरणार्या चौपाटीसारख्या स्टॉलवर. दिनशॉचे दुकान साधारण १९८९ ला आले त्यावेळी कसाटाची खुपच क्रेझ होती. त्याच निराला बाजार मधे '५६ भोग' ह्या रेस्टॉरंट मधे पोरींना डेट वर घेवुन गेल्यावर बिल देतानाचा ५७ वा भोग तर काय सांगावा. मग त्या साठी मेषा वगैरे बरे होते. २ रु. चा चहा घेवुन पब्लिक तासंतास बोलत बसायचे तेही समोरच्या वरद गणेश ला साक्षी ठेवुन अर्थात माझ्या नोंदी १९९३-९४ पर्यंतच्या आहेत. नंतर परत कधी जाणे झाले नाही.
|
महागुरु ५६ भोग मध्ये काय डेट असतात काय राव? तिथे फक्त वजन वाढविने हे एकच काम. श्यामली लिहुन काढतो उद्या, आता जरा बाजाराकडे (शेअर) लक्ष देतो ३५० ने पडलाय. तु अजुनही जागी कशी?
|
Pancha
| |
| Monday, August 06, 2007 - 5:37 am: |
| 
|
क्रांतीचौकातील ऑम्लेटच्या आणि पावभाजीच्या गाड्यांना विसरुन कसे चालेल? वा वा, महागुरु, काय आठवण काढुन दिली. ग़ोटी होटेल आठवते का? तिथल्या waiter मुलांअ ५ रुपये दिले कि ते कुथलीपण डिश आनुण द्यायचे. त्यान्चा मालक त्याना फ़ारच कमी पैसे द्यायचा
|
Shyamli
| |
| Monday, August 06, 2007 - 5:46 am: |
| 
|
५६ भोग खायला काही खास नव्हतं तिथे पण एकुण माहौल मस्त असायचा तिथला आवडायच मला तिथे जायला. आमच्या टोळल्यातले एकेक मेंबर कमि झाले तसा तसा त्याचा धंदा बसला बिचा-याचा मेशा तेंव्हा आम्ही दोघच बहिणभाउ राहात होतो औरंगाबादला रात्री स्वैपाक करायचा कंटाळा आला कि आधि दोघांकडे असलेले पैसे मोजायचे आणि मग order करायची मजा होती. पण मेशा खर्रच सहि होतं एकदम. सभुच्या तिथला स्टॉल>>>> स्टॉल काय हो प्रसाद, पुर्णानंद म्हणा त्याच्याकडचा वडा आणि समोसा दिड रुपायाला मिळायचा फक्त.इम्रतीच दुकान >>>> उत्तम मिठाई,पैठणगेट वरच ज्युसच दुकान>>> लकिच ते चालु आहे अजुनही गर्दिपण असते ब-यापैकी. अजुन एक collage जवळच म्हणजे 'राधिका' गोमटेश मार्केटमधलं आणि औरंगपु-यातल 'इंद्राली' केदार मि उसगावात नाहिये आखातात आहे, माझी सकाळे आत्ता 
|
Mahaguru
| |
| Monday, August 06, 2007 - 5:46 am: |
| 
|
गोटी ची शान साधारण ९० च्या अगोदरच. तिथली मिसळ आणि दहीवडा खास. नंतर ते हळुहळु बंद पडले. हॉस्टेलमधल्या अनेकांचे वाढदिवस तिथल्या राईसप्लेटवर साजरे होत. अनेक महाभाग असे पाहिलेत की, २०-३० र. चे खावुन काउंटरवर फक्त चहा पिला म्हणुन २ रु. देत. ह्यात बिल देण्यार्या वेटरचा मोठा सहभाग असायचा, म्हणुन त्याला ५ रु. देत.
|
Mahaguru
| |
| Monday, August 06, 2007 - 5:49 am: |
| 
|
हो पुर्णानंद च ते. खुप वर्षे झाली त्यामुळे नावे आठवत नाहीत. त्याचा कडचा वडा खुप नंतर आला. (पुण्याची कॉपी). पुर्वी कचोरी आणि समोसाच असायचा. राधिका आठवत नाही पण इंद्राली आठवते, त्यावेळी नविनच निघाले होते, ok ok होते.. आणि '५६ भोग' मधे खायला जायचो असे कुठे म्हटले? ९५-९६ च्या सुमारास मनमंदीर ट्रॅव्हल्सच्या बाहेरच्या दुकानात कच्छी दाबेली मिळायची. फार काही खास नव्हती (डेक्कनवरच्या गाड्याची सर नाही) पण तेवढे एकच ठिकाण होते त्यावेळी. नंतर चे माहीत नाही
|
Shyamli
| |
| Monday, August 06, 2007 - 6:14 am: |
| 
|
अनेक महाभाग असे पाहिलेत की, २०-३० र. चे खावुन काउंटरवर फक्त चहा पिला म्हणुन २ रु. देत. ह्यात बिल देण्यार्या वेटरचा मोठा सहभाग असायचा, म्हणुन त्याला ५ रु. देत.>>>>> हा काय प्रकार होता???? असं का करावं पण लोकांनी? (पुण्याची कॉपी).>>>> कॉपी तर कॉ्पी , छान असायचा पण वडा आम्ही मुली मेवाडमधे खास दहि मिसळ खायला जायचो, सगळे चिडवायचे तिकडे हमाल जातात खायला म्हणुन पण जबरी असायची मिसळ तिथली . अजुनही मिळाते तिथे कच्छि दाबेली ,पण हे मात्र खरं कि पुण्यात मिळणा-या दाबेलीची सर नाही त्याला (तुळशीबागेत खायचो आम्ही ) केदार मयुरी कुठलं रे???? मला आठवत नाहिये
|
मयुरी हे हॉटेल वाळुज MIDC मध्ये आहे. एकदम पंचतारांकीत हाटेला सारखे. (म्हणजे तेव्हा होते). तिथे काम कराताना आठवड्यातुन निदान एक वेळ तरी मयुरीत जायचो. मयुरी नंतर लुधीयाना ढाबा व त्यांचे न्यु लुधीयाना दोन्ही पण चांगले आहेत. फोजी पेक्षा मला नंतर हेच आवडु लागले. बजाज चा समोर आहेत. गोटी म्हणजे एक परंपंरा होती. तिथला चहा क्या बात है. निव्वळ गप्पा मारायला पण एक माहोल होता जो दुसरीकडे एवढा नाही. गोटी बंद झाल्यावर आमचा कट्टा हा निराला बाजार मधल्या आर्चीज मध्ये वळला हे हॉटेल पण बंद झाले नंतर निराला बाजार मधीलच ५६ च्या लायनीतले एक हॉटेल आमचा कट्टा बनला. त्याचे नावच आता आठवत नाही. पण संध्याकाळी ६ ते ९ तिथे मग पायी पायी वरद गणेश ला तिथुन सल्टी घरी. पंचा गोटी माहीत म्हण्जे तु देखील ओरंगाबाद ला गेलेला दिसतोयस. अजय तुम्ही ओरंगाबाद ला लहानपनी राहायcआ का? (तुमच्या अनेक गांवापैकी एक) आता चांगले हॉटेल्स. ओरंगाबाद ची खासीयत म्हणजे तिथे उड्पी जास्त नाहीत तर पंजाबी हॉटेल जास्त आहेत. आंगेटी - बेबीकॉर्न चिली हॉंगकॉन्ग मास्टर कुक - चिज अंगुरी व व्हेज बुना क्या बात है. woodland - खास ईडली मेवाड एक क्रांती चोकात आहे तिथे एकदम स्वस्त नी जेवन मिळत असे. दुसरे गजानन महराजाला जिथे रस्ता जातो त्या चोकात आहे तिथे थाली जबरी मिळते. भोज बसस्टन्ड च्या जवळ, थाळी परंपरेचे जनक. President park व्हेज थाळी अप्रतीम. Rama international एकदम जबरी बैंगन मसाला मिळायचा. ajanta दुपारी बुफे मस्त असायचा. बर बसस्टन्डा जवळ एक टपरी टाईप अप्पा चे दुकान होते, तिथे ईडली वडा, डोसा न वर सांबार नी चटनी काय मिळायचे. जबरी. अजुनही तिथे मी जातो. सुंदर ढाबा माझा पियक्कड मित्रांसाठी पण जेवन फालतु अजुनही आहेत लिहीतो सावकाश.
|
Shyamli
| |
| Monday, August 06, 2007 - 3:13 pm: |
| 
|
अजय, केदार मुहुर्त साधलाय आजचा, "जायके का सफर" लिहायला घेतलाय. केदार येउ दे तुझ्याकडुन अजुन त्यातच माझ्याकडची भर घालुन पुर्ण करते आणि रंगिबेरंगीवर पोस्ट करते उद्या सकाळपर्यंत 
|
JNEC च्या समोर एक टपरी आहे. टपरी म्हनन्यापेक्षा एक छोटी खानावळ तिथे पराठे काय मिळतात. पराठे नी लोंच वर ज्याला पाहीजे त्याला दही. आहाहा. बायकोला तसे पराठे जमले नाहीतच. रेल्वे टेसनाच्या बाजुला एक शेरे पंजाब नावाचे हॉटेल आहे तेथे अंडाकरी मस्त मिळते म्हणे (मित्र म्हणतात) पण तेथील कुठलीही पंजाबी भाजी खास करुन दाल व्वा क्या कहने. तेथुन पूढे फार पुर्वी पदमपुर्याच्या बस स्टन्डाजवळ एक रसवंतीवाला होता तेथील रस नेहमी गोड च असायचा. तसा रस नंतर मी पुण्यात डेक्कन ला असनार्या रसवंती वरच पिला. लकी बद्दल काय लिहायचे. ज्युस ची गोडी फक्त त्यामुळे लागली. लकी तुझे सलाम. गुलमंडी वरच्या गायत्री च्या बाजुला एक हलवायाचे दुकान आहे. तेथील जिलबी व ईमरती क्या कहने. (त्याचे नाव विसरलो). गुलमंडीवरच्या मेवाड मध्ये चहा पण जबरी मिळायचा. त्याचे नाव स पासुन काहीसे आहे. पुण्या एवढे खायचे ऑप्शन नसलेल्या ओरंगाबाद मध्ये मिळनारे जेवन खरच स्वादिष्ट असते. कारन त्याला ऊडुपी टच नसतो.
|
Mahaguru
| |
| Monday, August 06, 2007 - 4:36 pm: |
| 
|
थाळी परंपरा होतीच, भोज ने 'unlimited थाळी' ची परंपरा आणली. भोज मधे मी पहिल्यांदा स्प्रिंग दोसा खाल्ला. शेरे पंजाब मधली अंडाकरी आणि chicken झकास., नंतर आनंद नगरी असे जत्रे सारखे काही तरी भरायचे, तिथला तिखट लावलेला भला मोठा पापड पण जबरी. ९५-९६ च्या सुमारास इडल्या घेवुन दारोदार फिरणारे लुंगीवाले पण खुप आले. लकी मधे मी सीताफळाचा ज्युस पण पिलाय.
|
Mahaguru
| |
| Monday, August 06, 2007 - 5:00 pm: |
| 
|
क्रांती चौकात गायत्रीच्या बाजुला एक जण छोले भटोरे आणि साबुदाणा वडा द्यायचा. तो इतका वेळ लावायचा की सगळी मजा निघुन जायची. क्रांती चौकात पुर्वी हॉटेल नायगरा असे होते. ते ९०-९१ साली अतिक्रमणात पाडले गेले. तो पर्यंत तो एक चहा घेवुन गप्पामारत बसण्याचा popular spot होता. क्रांती चौकात एक रसवंती आहे. त्याच्या समोर लावलेली पाटी: 'देशबंधुंनो विचार करा, चहा पेक्षा रस बरा' खुप पुर्वी अंजली मधली एक्स्प्रेसो कॉफि (खुप काही ग्रेट नव्हती) पण famous होती. medical college च्या कॅंटीन मधला अत्यंत स्वस्तात मिळणारा वडाइडली सा..बार चांगला असायचा. त्याच माणसाच्या GECA कॅंटीन मधला उपमा सकाळी सकाळी खायला मस्त गर्दी होत असे. बस झाले औरंगाबाद पुराण.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|